“जेव्हा आवश्यक व अपरिहार्य असेल, तेव्हा दुसर्या भाषेतील सुयोग्य शब्द आपल्या भाषेत अवश्य घ्यावे. पण आपल्या भाषेतील रूढ असलेल्या योग्य शब्दांचे उच्चाटन करून त्यांच्या जागी अनावश्यक व भाकड परभाषिक शब्द प्रस्थापित करणे पूर्णपणे आत्मघातकी आहे.”
सूचना – प्रस्तुत लेख हा ’हिंदी वाक्यम् प्रमाणम्’ या अमृतमंथनावर पूर्वी प्रसिद्ध झालेल्या लेखाचा पुढील भाग आहे. ’हिंदी वाक्यम् प्रमाणम्’ हा लेख जर वाचकांनी आधी वाचलेला नसेल तर तो लेख आधी खालील दुव्यावर वाचून घ्यावा आणि मगच प्रस्तुत लेख वाचावा ही विनंती.
हिंदी वाक्यम् प्रमाणम् ! (ले० सलील कुळकर्णी)
अंतर्नाद मासिकाच्या फेब्रुवारी २०१२च्या अंकात प्रथम प्रसिद्ध झालेला हा लेख खालील दुव्यावर उपलब्ध आहे.
अमृतमंथन_मायबोलीचे प्रेम म्हणजे अन्य भाषांचा द्वेष नव्हे_120207
ह्या लेखाबद्दलचे आपले प्रतिमत (feedback) लेखाखालील चर्चाचौकटीमध्ये अवश्य नोंदवावे.
– अमृतयात्री गट
ता०क० अशाच विषयावरील खालील लेखदेखील वाचून पाहा.
इंग्रजी भाषेचा विजय (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता ४ ऑक्टोबर २००९)
हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा! (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, १५ नोव्हें० २००९)
.
Tags: अनुवाद, भाषांतर, भाषाशुद्धी, भाषाशु्द्धि, मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी लेख, मातृभाषा, मायबोली, व्याकरण,शुद्धलेखन, सलील कुळकर्णी, हिंदी भाषा, GRAMMAR, HINDI LANGUGAE, MARATHI, MARATHI LANGUAGE,MOTHER TONGUE, SALEEL KULKARNI, SPELLINGS, TRANSLATION
.
आजच्या मराठी माणसामध्ये सर्वच मराठीविषयक वस्तु, लोक, चालीरीति, भाषा वगैरे जे जे म्हणून मराठी आहे त्याबद्दल एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झाला आहे की काय अशी अनेक वेळा शंका येते. याचे एक मुख्य कारण भारतीय सत्ताधिकार्यांमध्ये मराठी माणूस हिंदी राज्यकर्त्यांचे लांगूलचालन करतांना आढळ्तात व दिल्लीत मराठी माणूस पहिल्या श्रेणींच्या सत्ताधार्यामधे नाही हे असावे असे मला वाटते. शिक्षणक्षेत्रात महाराष्ट्राचे गेल्या काळातील धोरण व त्यामुळॆ झालेला मराठी भाषेचा र्हास हे दुसरे एक अतिशय महत्वाचे कारण आहे. शक्यतो लवकर मराठी भाषेतूनच पहिली सहा वर्षे सक्तीने शिक्षण हा ह्यावर एक महत्वाचा उपाय आहे. इतर कितीतरी क्षेत्रात मराठीला प्राधान्य देणे आवश्यक आहे.
बाळ संत
प्रिय श्री० बाळाराव संत यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपण जी शंका उपस्थित केलीत ती गोष्ट आता संशयातीत आहे. मराठी माणूस पूर्वीच्या इंग्रज राज्यकर्त्यांच्या व त्यांच्या भाषेबद्दलच्या दास्यत्वाच्या भावनेतून बाहेर आलेला नाहीच. उलट आता आजच्या भारतीय राज्यकर्त्यांच्या व त्यांच्या भाषेच्या दास्यत्वाखाली स्वतःला आपणहून दबून घेतो आहे. आणि आमचे राजकारणीदेखील आमच्याप्रमाणेच कणाहीन आहेत, यात शंका ती काय? दोघांचेही आचरण एकमेकांच्या न्यूनगंडत्वाला परिपोषक असेच आहे. फरक एवढाच की त्यातून इंग्रजी शाळा, महाविद्यालये उभारून व इतर क्लृप्त्या योजून राजकारणी गब्बर होत आहेत. पण सामान्य माणूस मात्र भरडला जातो आहे. आणि इथे सामान्य माणूस म्हणून आम्हाला संख्येने मूठभर पण प्रभावाने बलवत्तर असणारा शहरातील सुखवस्तु माणसे अभिप्रेत नाहीत, तर देशातील खरोखर सरासरी उत्पन्न असणारा, सरासरी परिस्थितीत जगणारा माणूस अभिप्रेत आहे. सामान्य माणसाला त्याच्या गावापर्यंत, त्याच्या भाषेत ज्ञान पोचवून, त्याला स्वतःच्या गावाच्या आसपासच रोजगार उपलब्ध करून देण्याचे गांधीजींचे तत्त्व धुडकावून लावल्यामुळेच आज अशी परिस्थिती आलेली आहे. पासष्ट वर्षानंतरही आमच्या बहुसंख्य मुलांपर्यंत साधे दहावीपर्यंतचे शिक्षणसुद्धा पोचलेले नाही, आमच्या देशात दररोज ४७ शेतकर्यांच्या आत्महत्या होतात व आमची ४२% मुले कुपोषित आहेत. मूठभर श्रीमंतांचे वाढलेले उत्पन्न दाखवून सांख्यिकी चलाखीच्या द्वारे सत्य लपवले जाते. दोष मान्य केलाच नाही तर चूक सुधारणार कशी?
काय म्हणायचे याला?
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
manApAsUn AiBinandan !! AgadI manAtala lihilat!
kuNItarI ho dUradarSanavarIla marAzI mAlikAMcyA loKakAMnA SahANaM karIl kA?
CAyA dev
प्रिय श्रीमती छाया देव यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपल्या पत्राबद्दल आभार. अमृतमंथनावर आपले स्वागत आहे. (आपले हे बहुधा पहिलेच पत्र असावे.)
प्रस्तुत लेखाचा पूर्वभाग म्हणजे ’हिंदीवाक्यं प्रमाणम्’ () हा लेख आपण वाचला होता का? नसल्यास तोदेखील वाचावा. म्हणजे या लेखातील काही मुद्दे अधिक स्पष्ट होतील.
आपण ’मनातलं लिहिलंत!!’ असे कौतुक केल्यामुळे आनंद वाटला. कारण हल्ली आपल्यासारखी मंडळी अल्पसंख्य आहेत. पूर्वीचे आपले राज्यकर्ते इंग्रज व त्यांची भाषा इंग्रजी आणि आजचे राज्यकर्ते व त्यांची भाषा यांच्यापुढे स्वाभिमान गहाण ठेवलेली बहुसंख्य मराठी माणसे तुम्हाआम्हाला वेड्यातच काढतील. शिवाजी महाराजांपासून ते महात्मा गांधी, आंबेडकर, सावरकरांनी व इतर अनेक दूरदृष्टीच्या व पूज्य नेत्यांनी जे सांगितले ते आम्ही विसरून गेलो आहोत आणि संकुचित, स्वार्थी राजकारण्यांनी दाखवलेल्या मार्गाने जाऊन आपल्या देशाचे नुकसान करून घेत आहोत.
या आधी श्री० मोरेश्वर संत यांचे पत्र व त्याला लिहिलेले उत्तर पाहावे.
अमृतमंथनावर ’मराठी भाषा, मराठी संस्कृति व त्यांच्या अनुषंगाने भारतीय संस्कृति’ या तत्त्वानुसार बरेच लेख प्रसिद्ध झालेले आहेत. सवडीनुसार नजर घालावी. बरे वाटतील ते वाचावेत. पटल्यास व आवडल्यास इतर मित्रांनादेखील अग्रेषित करावेत. आपापल्या परीने या चळवळीस हातभार लावावा, ही विनंति.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
नमस्कार अमृतयात्री गट,
आपला हा ब्लॉग मी गेले अनेक दिवस नियमितपणे वाचत आहे. यातील काही लेखातून प्रेरणा घेवून मी एक लेख माझ्या ब्लॉग वर लिहिला.
http://malawatate.blogspot.in/2012/02/blog-post.html
माझी आपणास विनंती आहे की जर शक्य असेल तर आपण यावर नजर टाकावी व काही त्यात काही त्रुटी असतील तर त्या अभिप्रायामध्ये कळवाव्यात.
आपला,
महेश कुलकर्णी
प्रिय श्री० महेश कुलकर्णी यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपल्या पत्राबद्दल आभार आणि आपला उपक्रम यशस्वी होवो अशी शुभेच्छा.
अमृतमंथन अनुदिनीच्या वाचकांच्या माहितीसाठी आपले पत्र इथे प्रकाशित करीत आहोत.
मराठी माणसाचा स्वभाषा, स्वसंस्कृतीच्या प्रति असणारी अनास्था, औदासिन्य, न्यूनगंड दूर करून त्याऐवजी त्याच्या मनात स्वाभिमान रुजवून त्याला स्वभाषा व स्वसंस्कृतीचे संवर्धन, प्रसार, विकास करण्यास उद्युक्त करणे हेच अमृतमंथनाचे मूळ उद्दिष्ट आहे.
आपले घोषवाक्यच आहे – मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…
मराठी संस्कृती व तिच्याच अनुषंगाने भारतीय संस्कृती. सर्व लेख मुख्यतः याच सूत्राला धरून असतात. मराठी माणसाचा ’स्वाभिमान म्हणजे संकुचितपणा’ हा गैरसमज दूर करून त्याचा न्यूनगंड नाहीसा करण्याचा हा प्रयत्न आहे.
आपण प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करून स्वभाषाप्रेम, स्वसंस्कृतिप्रेम, स्वाभिमान या भावनांचा सतत प्रसार करीत राहिले पाहिजे.
आपल्या उपक्रमाबद्दल अभिनंदन व त्याच्या यशासाठी पुन्हा एकवार शुभेच्छा व्यक्त करतो.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट