परराज्यांतून येणार्‍या विद्यार्थ्यांना ‘तमिळ’ शिकावीच लागेल! – मुख्यमंत्री जयललिता

परराज्यांतून आलेल्या आणि वेगळी मातृभाषा असलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता सहावीपर्यंत ‘तमिळ’ भाषा शिकावीच लागेल असे तामीळनाडू अण्णा द्रमुक सरकारने आज विधानसभेत ठणकावले. या धोरणात किंचितसाही बदल अजिबात होणार नाही, असे दस्तुरखुद्द मुख्यमंत्री जयललिता यांनी निक्षून सांगितले.

आमच्या राज्यात स्थायिक होऊन सर्व प्रकारचे फायदे घेत असताना येथील भाषा, येथील संस्कृति यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले तरी चालेल असे म्हणणारे महाराष्ट्र हे भारतातील किंबहुना जगातील एकमेव राज्य असावे. भारतातील इतर राज्यांत व जगातील बहुतेक सर्व देशांत स्थानिक भाषेचे शिक्षण व तीमधून व्यवहार करणे सक्तीचे असते. केवळ महाराष्ट्रातच आम्ही निरभिमानी लोक आपल्या भाषेबद्दल आग्रही नसतो. केवळ महाराष्ट्रातील शाळांमध्येच मराठी विषय अनिवार्य नाही व मराठी भाषा येत नसली तरीही आपण सर्वांना हिंदी वा इंग्रजी भाषांचे पर्याय स्वतःहून देऊन आपली भाषा अनावश्यक ठरवतो. आणि म्हणूनच अधिकृतपणे १५० कोटींची संपत्ती जाहीर करणारा अबू आझमी मला मराठी समजत नाही, मी मराठी बोलणार नाही व माझ्यासारख्यांच्यासाठी विधिमंडळाचे काम हिंदीमधून चालले पाहिजे असे उर्मटपणे केवळ महाराष्ट्रातच म्हणू शकतो. इतर राज्यांत मात्र स्वभाषेच्या अभिमानाविषयी सर्व राजकीय पक्षांचे दृढ एकमत असते.

सर्वोच्च न्यायालयानेदेखील महात्मा गांधी व भारतीय राज्यघटनेचा हवाला देऊन कुठल्याही राज्यात स्थानिक राज्यभाषेचे महत्त्व सर्वोच्च आहे, असेच तत्त्व ठासून सांगितले आहे .

दि० ४ फेब्रुवारी २०१२च्या काही मराठी व इंग्रजी दैनिकांमधील बातम्या व त्याविषयीचे विश्लेषण खालील दुव्यावर पहा.

अमृतमंथन_विद्यार्थ्यांना ‘तमिळ’ शिकावीच लागेल_120205

आपल्या प्रतिक्रिया या लेखाखालील चर्चाचौकटीत अवश्य नोंदवा.

– अमृतयात्री गट

ता०क० या विषयी सविस्तर चर्चा खालील लेखांतही केलेली आहे. अवश्य वाचा.

हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा! (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, १५ नोव्हें० २००९)

तमिळ आणि मराठी शासनकर्त्यांची तुलना

Study Tamil to get jobs: Karunanidhi (Sify News)

Hindi Will Destroy Marathi Language, Culture and Identity in Mumbai and Maharashtra (Tamil Tribune)

तमिळ भाषेत वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षण (वृत्त: दै० डेक्कन क्रॉनिकल, २० फेब्रु० २०१०)

.

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s