Namibia’s language policy is ‘poisoning’ its children (The Guardian, UK)

Up to 30 languages are spoken in Namibia, 14 of which have a full orthography (system of writing), but in 1990, when the country gained independence from South Africa, Afrikaans, which had functioned as a lingua franca, was jettisoned in favour of English.

Harris points to higher success rates of school students in South Africa and Botswana, two of Namibia’s neighbours where children learn in their home language. 

भारताच्या वाट्यास येणारे शिक्षणक्षेत्राच्या संबंधातील अनुभव नामिबियाहून फारसे वेगळे नाहीत. किंबहुना भारताची प्रचंड लोकसंख्या व अनेक प्रगत भारतीय भाषांचे अस्तित्व यांमुळे शिक्षणाचा प्रश्न भारताच्या बाबतीत अधिकच गुंतागुंतीचा झालेला आढळतो. भारताच्या स्वातंत्र्याला ६५ वर्षे (नामिबियाची केवळ १२ वर्षे) होऊनही भारतातील उच्च शिक्षण तर सोडाच, पण शालेय शिक्षणप्रसाराचेदेखील नैराश्यजनक प्रमाण, शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती आणि त्याच्या परिणामस्वरूप भारतात होणार्‍या संशोधनाचे क्षुल्लक प्रमाण अशा गोष्टी पाहता महात्मा गांधींच्यासारख्या श्रेष्ठ पुढार्‍यांनी दिलेले इशारे, कोठारी आयोग, राष्ट्रीय एकात्मता आयोग इत्यादि आयोगांचे निष्कर्ष, विविध भारतीय व आंतरराष्ट्रीय शिक्षणतज्ज्ञांचे सल्ले इत्यादींचे महत्त्व व योग्यता अधिकाधिक पटत जाते.

भारतानंतर स्वातंत्र्य मिळवलेल्या व हिब्रू या ’मृत’ समजल्या जाणार्‍या भाषेला राष्ट्रभाषा ठरवून त्यातच शालेय व उच्चशिक्षण करीत असलेल्या इस्रायल देशाने केलेली शिक्षणक्षेत्र व त्याच्याशी निगडित अशा संशोधनासारख्या क्षेत्रांत केलेली प्रगति पाहून इंग्रजीधार्जिण्या धोरणाचा लवकरात लवकर फेरविचार व्हायला हवा हे अधिकच स्पष्ट होते. पण तज्ज्ञांचा सल्ला न मानता भारतीय भाषांची कुचंबणा करून इंग्रजी पुंगीवाल्यामागे धावणार्‍या भारतातील केंद्रीय व राज्य सरकारांना कधी जाग येणार?

आफ्रिकेतील नामिबिया या देशाचा अनुभव फार बोलका आहे. त्याबद्दलचे ’दी गार्डियन’ व ’सकाळ’ या दैनिकांतील लेख खालील दुव्यावर वाचा.

Amrutmanthan_Namibia’s language policy is ‘poisoning’ its children_120115

आपली मते या लेखाखालील चर्चाचौकटीत अवश्य मांडा.

– अमृतयात्री गट

ता०क० याच विषयावरील अमृतमंथनावरील इतर काही लेख खालील दुव्यांवर उपलब्ध आहेत.

Mahatma Gandhi’s Thoughts on Medium of Education  –}  http://wp.me/pzBjo-w8

English not the medium – Malaysia’s dilemma  –}  http://wp.me/pzBjo-nD

सर्वप्रथम मातृभाषेत शिकणे हीच सर्वोत्तम पद्धत (ले० स्वामीनाथन एस० अंकलेसरिया अय्यर, टाईम्स ऑफ इंडिया)  –}  http://wp.me/pzBjo-fZ

मातृभाषेचं मानवी जीवनातलं स्थान (ले० प्रा० मनोहर राईलकर)  –}  http://wp.me/pzBjo-oB

विकसित देशांतील विद्यार्थी शिक्षणासाठी इंग्रजीवर अवलंबून नाहीत  –}  http://wp.me/pzBjo-Fs

भारतीय भाषा आणि इंग्रजीचे स्थान (ले० डॉ० इरावती कर्वे)  –}  http://wp.me/pzBjo-ou

शहाणा भारत आणि वेडा जपान (ले० प्रा० मनोहर राईलकर)  –}  http://wp.me/pzBjo-kv

.

3 thoughts on “Namibia’s language policy is ‘poisoning’ its children (The Guardian, UK)

    • प्रिय श्री० अरविंद वैद्य यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या भावना, आपली तळमळ समजू शकतो.

      जोपर्यंत भारतीय राजकारणी मंडळी स्वतःला सर्वज्ञ समजून विविध विषयातील तज्ज्ञांचा सल्ला न घेता किंवा त्यांनी वेळोवेळी व्यक्त केलेल्या मतांकडे सोयीनुसार दुर्लक्ष करून निर्णय घेत राहतील तोपर्यंत आपली अशीच अधोगति होत राहणार. सर्वच परदेशी तज्ज्ञ, शिक्षणाचे धोरण ठरवण्यासाठी नेमलेला कोठारी आयोग, राष्ट्रीय एकात्मता आयोग व अनेक शिक्षणतज्ज्ञांनी मातृभाषेचे महत्त्व पुनःपुन्हा सांगूनदेखील आमचे राजकारणी मातृभाषेचे खच्चीकरण करण्याच्याच मागे आहेत. कारण त्यांच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा व महाविद्यालयाचे धंदे जोरात चालले पाहिजेत.

      मायबोलीतून शिक्षण या विषयावर अमृतमंथनावर अनेक लेख प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांच्यावर नजर टाकावी.

      खालील लेखदेखील वाचून पाहावेत.

      https://amrutmanthan.wordpress.com/2010/08/31/महाराष्ट्राच्या-सुजाण-जन/

      उच्च न्यायालयाकडून महाराष्ट्र शासनास आणखी एक थप्पड –} http://wp.me/pzBjo-tV

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s