पूर्व बंगालमध्ये घडून आलेले धर्मभेदातीत सांस्कृतिक प्रबोधन (ले० आनंद हर्डीकर)

हर्डीकरांनी लेखात सादर केलेला इतिहास हा बव्हंशाने सर्वज्ञात आहे. त्याच ऐतिहासिक घटनांचा आधार घेऊन लेखकाने मांडलेले विचार आपल्याला याच सिद्धांताकडे घेऊन जातात की ’माणसाच्या मनात धर्मरूढींपेक्षादेखील लोकसंस्कृती अत्यधिक दृढपणे रुजलेली असते आणि माणसाच्या रक्तात धर्मबंधुत्वापेक्षादेखिल भाषाबंधुत्वाचे नाते अत्यंत दाटपणे भिनलेले असते’. हाच सिद्धांत अधोरेखित करण्यासाठी युनेस्कोने स्वभाषा व स्वसंस्कृतीसाठी हौतात्म्य पत्करणार्‍या बांगलादेशी जनांचा २१ फेब्रुवारी हा स्मृतिदिन ’जागतिक मातृभाषा-दिन’ म्हणून घोषित केलेला आहे, याकडेही हर्डीकरांनी वाचकांचे लक्ष वेधले आहे. ’कुठल्याही सुसंस्कृत आणि प्रबुद्ध समाजाच्या दृष्टीने धर्मापेक्षादेखील (इथे धर्म या शब्दाचा इंग्रजीमधील रिलिजन एवढाच मर्यादित अर्थ अभिप्रेत आहे) स्वभाषा व स्वसंस्कृति हे त्या समाजाच्या अस्मितेचे मूलभूत घटक असतात आणि ते पूर्णतः धर्मभेदातीत असतात’ हा या लेखाचा महत्त्वपूर्ण निष्कर्ष आपण सर्वांनीच लक्षात घेतला पाहिजे. 

दिनांक ११ डिसेंबर २०११च्या ’रविवारच्या लोकसत्ते’च्या अंकातील श्री० आनंद हर्डीकर यांचा हा उत्कृष्ट लेख पुनःप्रसिद्ध करीत आहोत. लेख वाचण्यासाठी खालील दुवा उघडावा.

पूर्व बंगालमध्ये घडून आलेले धर्मभेदातीत सांस्कृतिक प्रबोधन

आपले प्रतिमत (feedback) या लेखाखालील चर्चाचौकटीत अवश्य नोंदवावे.

– अमृतयात्री गट

.

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s