भाषा आणि संस्कृतीच्या संबंधाबाबत लोकमान्य म्हणतात, “मराठीच कशाला, कोणत्याही भाषेचं असंच आहे. तिच्या विकासाला हातभार लावते ती संस्कृती. त्या संस्कृतीचा जवळून परिचय व्हायला हवा. नाही तर ती भाषा अवगत झाली असं म्हणता येणार नाही.”
भाषा आणि संस्कृतीचे नाते अतूट असते. भाषा ही माणसाला त्याच्या मातृसंस्कृतीशी जोडणारा नाळ असते. सुदृढ संस्कृतीशिवाय कुठल्याही भाषेचा परिपोष होऊ शकत नाही. तर भाषा ही संस्कृतीच्या अभिव्यक्तीचे एक महत्त्वाचे वाहन असते. तिच्याद्वारे ती इतर संस्कृतींशी देवाणघेवाण करून स्वतः संवृद्ध, संपन्न होत असते. त्यामुळेच संस्कृती जाणून घेतल्याशिवाय भाषा समजत नाही व भाषा नष्ट झाली तर संस्कृतीचाही र्हास होतो.
आपले अमृतयात्री मित्र श्री० विजय पाध्ये यांनी पाठवलेला लोकमान्यांचा संपूर्ण लेख खालील दुव्यावर वाचावा.
अमृतमंथन_भाषा आणि संस्कृती_ले० लोकमान्य टिळक_110906
आपली मते प्रस्तुत लेखाखालील चर्चाचौकटीत अवश्य नोंदवा.
– अमृतयात्री गट
ता०क० याच विषयाशी संबंधित असलेले खालील लेखही वाचून पहावेत.
स्वा० सावरकर आणि ’महापौर’चा जन्म (दै० सामना दि० २२ ऑक्टोबर २०१०)
च्यायला, आपल्या भाषेत असं ठेवलंय तरी काय? (ले० अतुल तुळशीबागवाले)
महेश एलकुंचवार यांचे विश्व मराठी साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषण
Mahatma Gandhi’s Thoughts on Medium of Education
मराठीचा उत्कर्ष – कसा करावा? (ले० प्रा० मनोहर राईलकर)
.