सिंगापूरमधील तिसर्या विश्व-मराठी-साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात मांडलेले विचार मराठी माणसाच्या वैचारिक अंधार्या परिस्थितीत प्रदीप ठरावेत. लोकसत्ता आणि लोकमत या मराठी दैनिकांनी एलकुंचवारांचे भाषण बर्यापैकी विस्ताराने प्रसिद्ध केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. इतर काही दैनिकांनी ते बरीच काटछाट करून प्रसिद्ध केले तर काहींनी स्वतःस अडचणीचे ठरतील असे भाषाशुद्धीचे मुद्दे वगळून ते भाषण प्रसिद्ध केले.
मराठी भाषेच्या दुर्दशेबद्दल आपण नेहमीच चर्चा करीत असतो. त्यासाठी शासनाचे दुर्लक्ष, इंग्रजी भाषेचे आक्रमण, जागतिकीकरण, मराठी माध्यमातील शाळांची दुरवस्था, अशी विविध कारणे आपण पुढे करीत असतो. पण आपण कठोर आत्मपरीक्षण करीत नाही, किंबहुना तसे करायला आपण कचरतो. आधी उल्लेखिलेल्या सर्वच कारणांचा आपल्या भाषेवर जो परिणाम झाला आहे, तो आपल्याच स्वतःच्या अनास्थेमुळे, औदासिन्यामुळे, स्वाभिमानशून्यतेमुळे व कर्तव्यशून्यतेमुळे, हे सत्य आपण नाकारले तर या समस्येवर तोडगा तर निघणार नाहीच, उलट ती मराठीसाठी अधिकाधिक जीवघेणी ठरत जाणार यात शंका नाही.
आपल्या मनातील अनेक प्रश्नांना उत्तरे देणारे आणि प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणसाने वाचलेच पाहिजे असे श्रेष्ठ मराठी नाटककार प्रा० महेश एलकुंचवार ह्यांचे हे भाषण खालील दुव्यावर वाचावयास मिळेल.
अमृतमंथन_महेश एलकुंचवार यांचे अध्यक्षीय भाषण_110814
या महत्त्वाच्या विषयाच्या बाबतीतील आपल्या मनातील शंकाकुशंका, विचार, माहिती, सूचना, योजना यांच्याबद्दल या लेखाखालील चर्चाचौकटीत अवश्य लिहा.
– अमृतयात्री गट
ता०क० याच विषयासंबंधातील इतर काही लेख वाचनासाठी खालील दुव्यांवर उपलब्ध आहेत.
Mahatma Gandhi’s Thoughts on Medium of Education
मराठीचा उत्कर्ष – कसा करावा? (ले० प्रा० मनोहर राईलकर)
खरंच आपण स्वतंत्र झालो आहोत का? (ले० प्रा० मनोहर राईलकर)
मातृभाषेचं मानवी जीवनातलं स्थान (ले० प्रा० मनोहर राईलकर)
.
Tags: अस्मिता, दैनिक, भाषाभिमान, मराठी, मराठी अस्मिता, मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी माध्यम, मराठी संस्कृती,मराठीची चळवळ, मराठीचे प्रश्न, महाराष्ट्र, महेश एलकुंचवार, मातृभाषा, मायबोली, लोकमत, लोकसत्ता, विश्व मराठी साहित्य संमेलन, सिंगापूर, स्वाभिमान, MAHARASHTRA, MARATHI, MARATHI LANGUAGE, MOTHER TONGUE, PRIDE, SELF ESTEEM
.
[…] Older » […]
[…] […]
[…] « Newer Older » […]