श्री० भरत गोठोसकर यांचा एक अभ्यासपूर्ण, कळकळीने लिहिलेला लेख पुनर्प्रसिद्ध करीत आहोत. त्यांनी मांडलेले मराठी भाषेचे महत्त्व सांगणारे सर्व मुद्दे योग्य आणि सत्यच आहेत. त्यानुसार मराठी भाषेला या जगात कितीतरी अधिक मान व आदर प्राप्त व्हायला हवा. पण वस्तुस्थिती तशी नाही. याची कारणेही आपण शोधायला हवीत व त्यावरील तोडगा कृतीत आणण्यासाठी आवश्यक तो स्वाभिमान, निश्चय, खंबीरपणा आपण दाखवायला हवा. गोठोसकरांनी गुगलला लिहिलेल्या पत्रावर सही करून आपण मराठी स्वाभिमानाच्या मोहिमेची सुरुवात करूया.
श्री० भरत गोठोकरांचा लोकसत्तेच्या दिनांक २० जुलै २०११च्या अंकात प्रसिद्ध झालेला लेख व त्याबद्दलचे विवेचन खालील दुव्यावर वाचनासाठी उपलब्ध आहे.
अमृतमंथन_गुगलला मराठीचे वावडे का_110806
वाचकांनी गोठोस्करांच्या निवेदनावर अवश्य सही करावी. शिवाय या विषयीची आपली मते खालील चर्चाचौकटीत अवश्य नोंदवावीत.
– अमृतयात्री गट
ता०क० भाषिक व सांस्कृतिक अस्मिता याबद्दलचे काही लेख खालील दुव्यांवर उपलब्ध आहेत. आपण ते सवडीने निश्चितपणे वाचावेत.
’मणभर कर्तृत्वाचा कणभर देश’ (ले० सुधीर जोगळेकर, लोकसत्ता)
जगाची भाषा (?) आणि आपण (ले० सुधन्वा बेंडाळे)
इंग्रजी भाषेचा विजय (ले० सलील कुळकर्णी)
जपाननं विज्ञानावर प्रभुत्व कसं मिळवलं (ले० प्रा० मनोहर राईलकर)
मायबोलीप्रेम प्रथम, धंदा दुय्यम (पत्र: दै० लोकसत्ता, १ फेब्रुवारी २०१०)
Hindi Will Destroy Marathi Language, Culture and Identity in Mumbai and Maharashtra (Tamil Tribune)
’स्व-तंत्र’ शब्दाविषयीची जपानी संकल्पना – एक छोटासा किस्सा (प्रेषक: अनय जोगळेकर)
85% of Shops Comply with Nameboard Norms in Chennai (The Hindu, 22 June 2010)
.
मराठीचे वावडे गुगललाच कशाला मराठी लोकांनाही तेवढेच आहे. एख साधा सराठी माणूस आपण फक्त मराठी बोलायचं याची काळजी घेऊ शकत नाही, तर मधे मधे इंग्रजी शब्द पेरणे हे त्याला त्याच्या दृष्टीने महत्त्वाचं वाटतं. साधं एखाद्याला काहीतरी ‘आठवण करतो’ म्हणाय़चं असलं तरी तो मी तुला ‘रिमाइंड केलं’ असं म्हणेल. त्यामुळे अशा जागतिक स्तरावरील एखाद्या गोष्टीसाठी आग्रह धरण्यापूर्वी मराठी लोकांची ही इंग्लीश प्रेमाची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. मी भाषांतराचे काम करतो आणि हे काम करत असताना माझ्या भाषांतराचे जेव्हा कोणीतरी मराठीच माणूस ग्राहकांच्वया वतीने पुनरावलोकन करतो तेव्हा माझे मराठीशब्द बदलून त्या जागी हिंदी शब्द टाकतो किंवा सुचवतो असा अनुभव आहे. याच्यावर काही उपाय आहे का? म्हणून मराठी माणसाची ही मानसिकता बदलल्याखेरीज बाकी सर्व प्रयत्न अपुरे ठरण्याची शक्यताच अधिक आहे.
प्रिय श्री० अनिलराव करंबेळकर यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपल्या पत्राबद्दल आभार. आपले मत १०१% खरे आहे. आपल्या मताशी जुळणारे व त्यासंबंधातील विविध पैलूंबद्दल चर्चा करणारे बरेच लेख या अमृतमंथन अनुदिनीवर विद्यमान आहेत. उदाहरणार्थ नुकताचे प्रसिद्ध झालेला प्रा० महेश एलकुंचवार यांच्या भाषणावर आधारित असलेला लेख व त्याखाली सुचवलेले लेख वाचून पहा.
महेश एलकुंचवार यांचे विश्व मराठी साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषण –} http://wp.me/pzBjo-Gs
वेळोवेळी आपले विचार, मते, सूचना निश्चितपणे कळवीत जा.
आभारी आहोत.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
Nothing is the Impossible in this world and so includ our marathi language in u r google immediatly.
प्रिय श्री० अनिलराव गुडेकर यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपल्या पत्राबद्दल आभार. या जगात अशक्य असेकाहीच नाही (Nothing is impossible) हे विधान सत्य अशाच लोकांच्या बाबतीत ठरते ज्यांच्या मनात स्वाभिमान व प्रामाणिक जिद्द आहे, डोक्यात हुशारी आहे आणि मनगटात बळ आहे. आपणा मराठी माणसांना हे कितपत लागू होते याबद्दल आम्ही साशंक आहोत. देव करो आणि आपले वचन सत्यात उतरो.
आभारी आहोत.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
माझ्या मते….. गुगल ला दोष देण्या आधी मला काही प्रश्न आहेत… आपल्यापैकी किती जण गुगल च्या सेवा मराठीतून वापरणे पसंत करतात..?????? किती जण गुगल च्या सेवा मराठीतून वापरतात?????? किती जण गुगलच्या गुगल इन माय लेन्ग्वेज मध्ये गुगल च्या सेवा मराठीत होण्यासाठी योगदान करतात????? आपल्यापैकी किती जण जरा मराठी भाषा प्रथम स्थानी मानतात?????? किती जण सर्व कार्यालयात जाऊन ठणकावून मराठीतच बोलणे करतात????… किती जणांना समोरचा मराठी माणूस दुसऱ्या भाषेत उगाचच बोलत असेल तर राग येतो?????
माझ्या मते आत्ता सर्वात जास्त मराठीसाठी सेवा गुगलच देत आहे.
आपणच थोडा विचार केलं पाहिजे ……… तमिळ तेलगु या भाषा लगेच सर्व ठिकाणी उपलब्ध का होतात??? कारण तिथले लोकं सर्व ठिकाणी त्यातून लिहिणे वाचणे ऐकणे पसंत करतात!!!! बऱ्याचश्या इंग्रजी वाहिन्यांचे चे तेलगु तमिळ भाषांतर TataSky, DishTV उपलब्ध करून देतात. मराठी दर्शकांची संख्या जास्त असली तरी मराठी भाषांतर का सुरु होत नाही????? याचे मूळ कारण आपल्यातच आहे यात इतरांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही…! आपण सर्वांनी जर मराठी अग्रस्थानी धरून वापरणे सुरु केले तर ह्या सगळ्यांना झक मारत सर्व सेवा मराठी उपलब्घ करून देणे भाग पडेल….!
तांत्रिक गोष्टी…
मराठी भाषे ची रचना अतिशय क्लिष्ट असल्याने ती इतक्या सहज रित्या Google Translate मध्ये समाविष्ट करणे शक्य नाही…..!
मराठी मध्ये एका शब्दाला अनेक अर्थ असतात!
शब्दाच्या पुढच्या मागच्या शब्दाने सुद्धा एखाद्या शब्दाचे अर्थ बदलतात!!!
मराठी व्याकरणा बाबत आपल्यातच वाद आहेत….!
माझ्या मते गुगल भारतीय भाषांवर खूप काम करत आहे…
नवीन गुगल ट्रान्सलेट हिंदी चे खूप चांगले भाषांतर परिणाम देते….
इतर कुठल्याही देवा हिंदी भाषांतराची सेवा देत नाही तमिळ, तेलगु गुजराथी या भाषा सुद्धा नाही…!
आणि जर कोणी देत असेल तर ते त्यामागचे तंत्र गुगलचेच वापरतात…
गुगल ने मराठी टंकलेखन सेवा प्रसिध्द केली…!
गुगलने Google Marathi IME सेवा सुरु केल्यानेच सर्वांना मराठीतून लिहिणे सोपे झाले
………………
Google News – मराठीत उपलब्ध करावे — पूर्णपणे मान्य…!
माझ्या मते आपण आपल्यात बदल केले तर ह्या गोष्टी लगेच शक्य होऊ शकतात
प्रिय श्री० प्रशांत दांडेकर यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपल्या पत्राबद्दल आभार.
आपण मांडलेले मराठी माणसाच्या स्वाभिमानाच्या बाबतीतील मुद्दे योग्य आहेत आणि ते त्याच्या न्यूनत्वाचे आणि औदासिन्याचेच निदर्शक आहेत. ते सर्व मुद्दे सत्यच आहेत आणि त्यांचा उल्लेख आम्ही लेखातील भाष्यामध्येही केलेला आहे.
मराठीच्या क्लिष्टपणाबद्दलचे आपले तांत्रिक मुद्दे मात्र पटले नाहीत. आपण सांगितलेले सर्व दोष इतरही सर्व भाषांत विद्यमान आहेत. सर्वच भाषांची काही वैशिष्ट्ये असतात. ती नवीन भाषा शिकणार्याला त्रासदायक ठरू शकतात. संस्कृत भाषा ही सर्वाधिक नियमबद्ध आहे. संस्कृतसंबंधित इतर भारतीय भाषादेखील इंग्रजीसारख्या भाषांहून कितीतरी अधिक बर्या असे म्हणावे लागेल. इंग्रजी भाषेला फ्रेंच, जर्मन इत्यादी लोकेही नावे ठेवतात. इंग्रजीची स्पेलिंगे, उच्चार, व्याकरण, वाक्यरचना इत्यादींमधील स्वैरता पाहता तिच्यात नियमांपेक्षा अपवादच अधिक आहेत असे वाटते. इंग्रजीमधील वाङ्मय आणि इंग्रजी भाषेची भाषाशास्त्रीय जडणघडण यांची गल्लत करू नये.
इस्रायलची लोकसंख्या सुमारे ७४ लाख आहे, तर महाराष्ट्राची लोकसंख्या त्याच्या १४-१५ पट आहे. हिब्रू भाषा ही पासष्ट वर्षांपूर्वी मृतभाषा मानली जात होती. आज तीमध्ये उच्च शिक्षण प्राप्त केलेले शास्त्रज्ञ १२० कोटी लोकसंख्या असलेल्या (इस्रायलच्या १६० पट) भारताहून अधिक संशोधन करतात आणि नोबेल पारितोषके मिळवतात. अशा भाषेकडे गुगल दुर्लक्ष करूच शकत नाही.
चीनी भाषेत आठ वर्षाच्या मुलालाही आपले साधे, मूलभूत, स्वतःपुरते, किमान विचार व्यक्त करण्यापुरते लेखन करण्यासाठीही काही हजार मुळाक्षरे (चित्राक्षरे) शिकावी लागतात. इतकी वर्षे कोणी चीनी भाषेकडे ढुंकूनही पहात नव्हते. पण गेल्या दोन तीन दशकांत चीनी शिकणार्यांची संख्या अचानक प्रचंड प्रमाणात वाढली तिचे कारण काय? ती भाषा अचानकपणे अक्लिष्ट, सुलभ तर नक्कीच झाली नाही.
असो. या विषयावर एखादा प्रबंधही कोणी लिहू शकतील. पण प्रस्तुत लेखाचा त्याच्याशी काहीच संबंध नाही.
भाषा क्लिष्ट किंवा अक्लिष्ट असणे यावर गुगल कंपनीचे व्यवस्थापन ती भाषांतरास घ्यावी की नाही हे ठरवत नाही. ते फक्त व्यावसायिक, व्यापारी विचार करतात.
तेव्हा दोष का निर्माण झाला ह्यावरच केवळ लक्ष केंद्रित न करता आता आपण तो दोष कसा दुरुस्त करता येईल यावर लक्ष आणि प्रयत्न केंद्रित करू. श्री० भरत गोठोसकरांनी केलेला प्रयत्न त्याच दिशेने आहे असे आम्हाला वाटते. आणि म्हणूनच त्याला आपल्या अमृतमंथनावर प्रसिद्धी देऊन आम्ही खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला.
आपण सर्वांनीच आपापल्या परीने, आपापल्या क्षेत्रात मराठीचा वापर, महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करू या. अर्थात याची सुरुवात जिथे, जेव्हा शक्य तिथे विशेषतः महाराष्ट्रात सर्वकडे मराठीतच आवर्जून बोलणे व लिहिणे आणि इतरांना तसे करण्याचा आग्रह धरणे ह्या गोष्टीपासून करूया.
आपण खालील लेख वाचला आहे काय? इंग्रजीबद्दलची ही माहिती आपण सर्वांनी नक्कीच जाणून घ्यायला हवी. त्यामुळे स्वभाषाभिमानाने आपली भाषा आपण कुठून कुठे नेऊ शकतो ह्याचा प्रत्यय येईल.
https://amrutmanthan.wordpress.com/2009/10/04/इंग्रजी-भाषेचा-विजय-ले०-स/
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
maraThee maNoos mhanaje shandh maaNus …swataache v swataachyaa kuTumbeeyanchech vichar karaNaaraa…….shivaji janmaavaa pan to dusaryaachyaa gharaat ..ashee bhavana asaNaaraa …aaNee mhaNoon marathichi v marathi manasaachee sagaLi kaDech galchepi hot aahe….v jo pryant ase chalaNar to paryan asech hot rahanaar.
प्रिय श्री० अनिल गुडेकर यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपली मते पूर्णतः सत्य आहेत असे मानले तरी केवळ शिव्याशाप देऊन काय होणार? त्यातून मार्ग काढण्याचा आपण प्रत्येकाने यथाशक्ती प्रयत्न केला पाहिजे.
शिवाजी महाराजांच्या वेळची परिस्थिती याहूनही वाईट होती. त्यातून पन्नास वर्षांत किती सुधारणा होऊ शकली? स्वातंत्र्याच्या काही दशके आधी आपल्याला स्वातंत्र्य मिळेल असे फारसे कोणाला वाटत नव्हते. पण काही लोकांच्या जिद्दीमुळेच ते घडले.
तेव्हा परिस्थिती सुधारावी अशी इच्छा असणार्याने धीर सोडून उपयोग नाही. बर्याचदा उद्वेग वाटतो हे खरे आहे. पण तो बाजूला सारून पुन्हा कामास लागले पाहिजे.
महाजालावर अधिकाधिक प्रमाणात मराठीत लिहिणे हा देखील त्याच दिशेने केलेला प्रयत्न ठरेल.
आपण खालील लेख वाचला आहे काय? इंग्रजीबद्दलची ही माहिती आपण सर्वांनी नक्कीच जाणून घ्यायला हवी. त्यामुळे स्वभाषाभिमानाने आपली भाषा आपण कुठून कुठे नेऊ शकतो ह्याचा प्रत्यय येईल.
https://amrutmanthan.wordpress.com/2009/10/04/इंग्रजी-भाषेचा-विजय-ले०-स/
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
हा सह्यांसाठी बनवलेल्या पिटीशनचा दुवा फेस बुक वर दिला तर बऱ्याच लोकांना माहिती होईल. सगळ्या वाचकांनी कृपया आपापल्या फेसबुक पेज वर हा दुवा द्यावा http://www.petitiononline.com/gmarathi/
प्रिय श्री० महेंद्र यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपली सूचना चांगली आहे. सर्व वाचकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करतो.
आपण प्रत्येकाने यथाशक्ती हातभार लावू.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
@अमृतयात्री
क्लिष्टपणा बद्दल चे आपले मुद्दे पटले….
मला म्हणायचे इतकेच आहे कि…. उगाच दुसऱ्याला दोष देण्यात अर्थ नाही….! मला गुगल ला उगाचच दोष देणे पटले नाही कि जे मराठी साठी बाकीच्या सेवांच्या तुलनेत जास्त सेवा पुरवतात…..!
गुगल प्रमाणे सर्व बाकी कंपन्यांना सुद्धा असे पत्र पाठवण्यात यावे….
गुगल ला वावडे का हे शीर्षक योग्य नाही….!
आपल्याला मराठीचे व्यावसायिक महत्त्व वाढविले पाहिजे हे आपण मायाजालावर (internet) मराठी जास्त वापरले कि आपोआप होईल…आणि सर्वांना मराठीत सेवा पुरवणे फायद्याचे ठरेल….
सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे आपणा ज्या सेवा मराठीत उपलब्ध असतील त्या मराठीतून वापरल्या पाहिजेत….! व आपल्या मित्रपरिवारात त्यासाठी आग्रह धरला पाहिजे….!
प्रिय श्री० प्रशांत दांडेकर यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपल्या त्वरित उत्तराबद्दल आभार.
{{मला म्हणायचे इतकेच आहे कि…. उगाच दुसऱ्याला दोष देण्यात अर्थ नाही….!}}
मान्य. सर्वथा योग्य.
{{गुगल प्रमाणे सर्व बाकी कंपन्यांना सुद्धा असे पत्र पाठवण्यात यावे….}}
आधी गुगलने केले की इतरांना ते दाखवणे सोपे जाईल. आणि प्रत्येक वेळी गोठोसकरांवरच अवलंबून राहू नये. आपणही निरनिराळ्या संस्थांना कळवूया.
{{गुगल ला वावडे का हे शीर्षक योग्य नाही….!}}
लोकसत्तेमधील मूळ लेखाचे शीर्षक तसेच ठेवले आहे. शिवाय लेखात त्यांनी सर्व बाजू मुद्देसूदपणे मांडल्या आहेत. आधी मराठीचे महत्त्व सांगून मग स्वतःच “आता प्रश्न असा पडतो की, गुगलने मराठीला वळचणीला का टाकले?” या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.
देवनागरीमधील सर्वच लेखन हे हिंदी समजले जाते. तेव्हा नुसते लेखन वाढवून उपयोगाचे नाही तर ते हिंदी नाही आणि मराठी ही हिंदीची बोली नाही हे स्पष्ट करून त्या सर्वांना सांगायलाच पाहिजे. अन्यथा आपण सुचवल्याप्रमाणे आपण महाजालावर भरपूर लेखन करू पण ते सर्व हिंदीच्या महत्त्वाला बळकटी आणणार असेल तर त्यामुळे फायदा न होता उलट तोटाच होईल.
मराठी माणसाच्या मनातही मराठी ही हिंदीच्या खालची, कमी योग्यतेची, कमी महत्त्वाची, न्यूनता असलेली भाषा आहे, असा (त्याच्या स्वतःच्याही नकळत) समज झालेला असतो. त्यामुळे घराबाहेर पाऊल ठेवल्यावर तो आपल्याच राज्यात, बर्याचदा मराठी माणसाशी देखील हिंदी (किंवा इंग्रजीत) बोलू लागतो. मराठी माणसाने स्वतःच्या मनातील न्यूनगंड आधी घालवून लावून तिथे स्वाभिमानाची स्थापना करायला हवी. हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा आहे, असा कुप्रचार करूनही आपले नेते मराठी माणसाचा न्यूनगंड वाढवीत असतात. त्यासाठी खालील लेख वाचा व अधिकाधिक मित्रांना वाचायला द्या.
https://amrutmanthan.wordpress.com/2009/10/04/इंग्रजी-भाषेचा-विजय-ले०-स/
https://amrutmanthan.wordpress.com/2009/11/15/हिंदी-ही-राष्ट्रभाषा-एक-च/
https://amrutmanthan.wordpress.com/2010/01/02/हिंदी-ही-भारताची-राष्ट्र/
https://amrutmanthan.wordpress.com/2009/12/21/एकच-अमोघ-उपाय-मराठी-एकजूट/
https://amrutmanthan.wordpress.com/2010/01/25/hindi-the-national-language-–-misinformation-or-disinformation/
गोठोसकरांनी एक महत्त्वाचे पाऊल उचललेले आहेच. आपणापैकी प्रत्येकाने देखील यथाशक्ती लहानमोठी पावले उचलून मराठीची दिंडी खांद्यावरून जगभरात फिरवू.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
इथे पहा , अजूनही लोकांना नीट समजलेले नाही.. https://www.facebook.com/kbmahendra/posts/147309575354098?notif_t=share_comment
प्रिय श्री० महेंद्र यांसी,
सप्रेम नमस्कार.
या मंडळींना लिप्यंतर (transliteration) आणि भाषांतर (translation) यातील फरक समजलेला नाही आहे. तो उदाहरणांसह समजून सांगावा. सुरूवातीला असे लोकशिक्षण करावे लागणारच. आपण इतरांकडून शिकत असतो. तसेच इतरांना शिकवतही राहिले पाहिजे. ती देखील समाजाची, भाषेची सेवाच ठरेल.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट