विकसित देशांतील विद्यार्थी शिक्षणासाठी इंग्रजीवर अवलंबून नाहीत (सलील कुळकर्णी)

’इंग्रजीच्या शिक्षणाशिवाय भारत जागतिकीकरणाच्या स्पर्धेत मागे पडेल’ असा हल्ली युक्तिवाद केला जातो. पण तसे असेल तर जपान, इस्रायल तसेच जर्मनी, फ्रान्स यांसारखे युरोपातील सर्वच इंग्लंडेतर देशांचा एव्हाना गेली साठ वर्षे इंग्रजीची घट्ट कास धरलेल्या भारताच्या मानाने खूपच अपकर्ष व्हायला हवा होता.

आपले मित्र श्री० सलील कुळकर्णी यांनी दैनिक सकाळला लिहिलेल्या पत्रापैकी ११ जुलै २०११ या दिवशी अर्धा भागच प्रसिद्ध झाला असला तरी ते संपूर्ण पत्र मुळातून इथे प्रसिद्ध करीत आहोत. पत्र खालील दुव्यावर वाचावयास मिळेल.

विकसित देशांतील विद्यार्थी शिक्षणासाठी इंग्रजीवर अवलंबून नाहीत

आपली मते प्रस्तुत लेखाखालील चर्चाचौकटीत अवश्य लिहा.

– अमृतयात्री गट

ता०क० शिक्षणाची माध्यमभाषा या विषयावरील आणखी काही लेख खालील दुव्यांवर वाचावयास मिळतील.

Lord Macaulay’s Psychology: The Root Cause behind British India’s Baneful Education System (Article in English)

Mahatma Gandhi’s Thoughts on Medium of Education (Article in English)

इंग्रजी भाषेचा विजय (ले० सलील कुळकर्णी) (मराठीतील लेख)

जगाची भाषा (?) आणि आपण (ले० सुधन्वा बेंडाळे) (मराठी लेख)

’मणभर कर्तृत्वाचा कणभर देश’ (ले० सुधीर जोगळेकर, लोकसत्ता) (मराठी लेख)

English not the medium – Malaysia’s dilemma (Article in English)

.

5 thoughts on “विकसित देशांतील विद्यार्थी शिक्षणासाठी इंग्रजीवर अवलंबून नाहीत (सलील कुळकर्णी)

  • प्रिय श्री० रविकुमार हिवाळे यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या अभिप्रायाबद्दल व शुभेच्छांच्याबद्दल आभार.

   दोन-चार मराठी माणसांनी काहीतरी करून मराठी समोरील प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी एक चळवळच उभी राहिली पाहिजे. तुम्ही-आम्ही आपले समविचारी मित्र, अशा सर्वांनी एकत्र येऊन मराठी भाषा व मराठी संस्कृतीच्या जोपासना व संवर्धनासाठी व्यक्तिगत व सामाजिक पातळीवर काम केले पाहिजे. तसेच शासनावर दबाव आणून अनेक उपयुक्त गोष्टी घडवून आणल्या पाहिजेत.

   खाली अमृतमंथनावरील काही लेखांचे दुवे खाली दिलेले आहेत. सवड काढून अवश्य वाचा. आपले प्रतिमत (feedback) आपण लेखाखाली नोंदवू शकता.

   लोकसत्तेमध्ये प्रसिद्ध झालेले काही लेख.

   इंग्रजी भाषेचा विजय (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता ४ ऑक्टोबर २००९) –}  http://wp.me/pzBjo-8x  

   हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा! (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, १५ नोव्हें० २००९) –} http://wp.me/pzBjo-9W  

   https://amrutmanthan.wordpress.com/2010/01/02/हिंदी-ही-भारताची-राष्ट्र/ http://wp.me/pzBjo-e8

   एकच अमोघ उपाय – मराठी एकजूट !! (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, २० डिसें० २००९) –} http://wp.me/pzBjo-d8  
    
   क्रेडिट कार्डच्या व्यवहारावर अधिशुल्क वसूल करणे बेकायदा (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, ४ एप्रिल २०११) –}  http://wp.me/pzBjo-DI  

   अंतर्नाद मासिकात प्रसिद्ध झालेले काही लेख.

   हिंदी वाक्यम् प्रमाणम् ! (ले० सलील कुळकर्णी) –}  http://wp.me/pzBjo-BF  

   मायबोलीचे प्रेम म्हणजे अन्य भाषांचा द्वेष नव्हे (ले० सलील कुळकर्णी) –}  http://wp.me/pzBjo-Kp  

   आपल्या आईचा मान आधी आपणच राखला पाहिजे (‘अंतर्नाद’ दिवाळी अंकातील लेख) — }  http://wp.me/pzBjo-Iv  

   अमृतमंथनावरील इतर काही लेख.

   Mahatma Gandhi’s Thoughts on Medium of Education –} http://wp.me/pzBjo-w8  

   https://amrutmanthan.wordpress.com/2009/11/22/’मणभर-कर्तृत्वाचा-कणभर-द/

   https://amrutmanthan.wordpress.com/2009/10/31/जगाची-भाषा-आणि-आपण-ले०-सुध/

   https://amrutmanthan.wordpress.com/2010/08/31/महाराष्ट्राच्या-सुजाण-जन/

   https://amrutmanthan.wordpress.com/2010/01/27/मराठीचा-उत्कर्ष-कसा-कराव/

   Lord Macaulay’s Psychology: The Root Cause behind British India’s Baneful Education System –} http://wp.me/pzBjo-uH

   https://amrutmanthan.wordpress.com/2010/07/11/मातृभाषेचं-मानवी-जीवनातल/

   https://amrutmanthan.wordpress.com/2010/04/04/बॅंकिंग-क्षेत्रामधील-भाष/

   “मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…” या विषयावरील लेख, चर्चा व विचारमंथनासाठी “अमृतमंथन” या अनुदिनीवरील लेख खालील दुव्यावर वाचू शकता.
   https://amrutmanthan.wordpress.com/

   आपले घोषवाक्य आहे – मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…

   मराठी संस्कृती व तिच्याच अनुषंगाने भारतीय संस्कृती. सर्व लेख मुख्यतः याच सूत्राला धरून असतात. मराठी माणसाचा ’स्वाभिमान म्हणजे संकुचितपणा’ हा गैरसमज दूर करून त्याचा न्यूनगंड नाहीसा करण्याचा हा प्रयत्न आहे.

   आपण प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करून स्वभाषाप्रेम, स्वसंस्कृतिप्रेम, स्वाभिमान या भावनांचा सतत प्रसार करीत राहिले पाहिजे.

   अमृतमंथनावर असे इतर अनेक लेख आहेत. जेव्हा जेव्हा सवड मिळेल तेव्हा सहज फेरफटका मारावा, लेखांवर दृष्टी टाकावी. स्वारस्य वाटतील ते लेख संपूर्ण वाचावेत, त्याखाली आपली मते नोंदवावीत. आवडलेले लेख मित्रमंडळींना अग्रेषित करावेत. अमृतमंथन परिवाराच्या संस्कृतीत बसणार्या अधिकाधिक लोकांना जवळ आणणे, त्यांची एकजूट घडवणे हा आपल्या चळवळीचा एक उद्देश आहेच.

   मराठीच्या उत्कर्षासाठी आपण सतत एकमेकांच्या संपर्कात राहून यथाशक्ती, यथाशक्य प्रयत्न करीत राहू.

   क०लो०अ०

   ता०क० अमृतमंथनावरील नवीन लेखांबद्दल नियमितपणे माहिती मिळवण्यासाठी आपण मुखपृष्ठावरील Follow या सुविधेचा उपयोग करू शकता. 

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 1. जर्मन फ़्रेन्च जपानी इत्यादि भाषा सहा ते बारा महिन्यात शिकतात तर आमच्या मुलांना इन्ग्रजी साठी चौदा वर्षाचा वनवास देण्याची गरज वाटत नाही

  • प्रिय श्री० दिलीप बोकिल यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या पत्राबद्दल आभार.

   आपले म्हणणे खरे आहे. ज्ञान केवळ इंग्रजीतूनच मिळू शकते ही पूर्णतः चुकीची कल्पना आहे. अनेक संशोधक, नोबेल पारितोषिक विजेते जर्मनी, जपान, इस्रायल, फ्रांस, रशिया, बेल्जियम, इत्यादी देशांतील असतात. त्यांचे शिक्षण आपापल्या मातृभाषांतूनच झालेले असते, इंग्रजीतून नव्हे. दळणवळणासाठी आवश्यक वाटल्यास इंग्रजी शिकावी. कोणी जर्मनीमध्ये वास्तव्यास जाणार असेल तर त्याने जर्मन भाषा शिकावी. पण ज्ञान हे मातृभाषेतूनच घेतले पाहिजे. जगभरातील शिक्षणतज्ज्ञ (अगदी इंग्लंडातीलही) तेच म्हणतात.

   अमृतमंथनावरील इतर लेखही वाचून पाहावेत.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s