प्रमाणभाषा आणि बोलीभाषा यांच्यातील भेद समजून घेऊन प्रमाणभाषेच्या नियमांच्या आवश्यकतेबद्दल काही निश्चित विचार मांडणारा एक अभ्यासपूर्ण आणि विचारप्रवर्तक लेख.
प्रस्तुत लेखात लेखकाने मांडलेल्या मुद्द्यांचा त्याने भाषाशास्त्र, इतिहास, संस्कृती, इतर भाषांशी तुलना इत्यादी अंगांनी केलेला अभ्यास हा स्पष्टपणे दिसून येतो आणि म्हणूनच या लेखातील प्रत्येक मुद्दा हा गंभीरपणे विचार करण्याचा ठरतो.
लेखकाने मांडलेले सर्वच मुद्दे वाचकांना कदाचित पटले नाहीत तरी प्रत्येकाला त्या सर्वच मुद्द्यांचा गांभीर्याने विचार करून त्यांच्याशी आपली मते ताडून घेऊन आपल्या मतांत योग्य तो बदल/सुधारणा नक्कीच करावी लागेल.
मराठीची प्रमाणभाषा आणि मराठीच्या लेखनाचे व व्याकरणाचे नियम हे विषय ज्यांना जिव्हाळ्याचे वाटतात अशा प्रत्येकाने काळजीपूर्वक वाचलाच पाहिजे असा हा लेख आहे.
’भाषा आणि जीवन’ या ’मराठी अभ्यास परिषद पत्रिके’च्या ’हिवाळा २०११’च्या अंकातील ’मराठी प्रमाणभाषेच्या लेखनाविषयीची माझी संकल्पना’ हा श्री० दिवाकर मोहनी यांचा हा लेख खालील दुव्यावर उपलब्ध आहे.
अमृतमंथन_मराठी प्रमाणभाषेच्या लेखनाविषयीची माझी संकल्पना_110709
आपली मते लेखाखालील चर्चा चौकटीत अवश्य मांडा.
– अमृतयात्री गट
ता०क० ’मराठी भाषेच्या व्याकरणाचे नियम शून्य असावेत’ अशी क्रांतिकारक मोहीम सुरू केलेल्या मंडळींच्या प्रतिपादनामधील पोकळपणा आणि सातत्याचा व एकवाक्यतेचा अभाव दाखवून देणारा एक अभ्यासपूर्ण लेख खालील दुव्यावर वाचू शकता.
मराठीच्या शोधात गांगरलेले गांगल (ले० सत्त्वशीला सामंत, लोकसत्ता, २३ डिसेंबर २०१०)
.
[…] […]
[…] […]
[…] […]