महाराष्ट्र शासनाच्या भाषा संचालनालयाच्या स्थापनेमागची उद्दिष्टे, एकेकाळी त्यांनी केलेले उत्तम काम आणि आज शासनाच्या अनास्थेमुळे त्याला आलेली अवकळा यांच्याबद्दलचा एक अभ्यासपूर्ण आणि अनुभवावर आधारित असा लेख.
“आता विधेयके मांडतानाच ती मराठीतून मांडली जातात. मराठीमधील राज्य-अधिनियम हे मूळ अधिनियम (ऍक्ट) असून इंग्रजी अधिनियम हे अनुवादित असल्याचे मानले जाते. संचालनालयाचे सर्व राज्य-अधिनियम, निवडक केंद्रीय अधिनियम (एकूण १२७) ‘न्यायव्यवहार कोश’ नामक न्यायविषयक परिभाषेचा कोश, निवडक न्यायनिर्णय इतकी या विषयावरील सामुग्री प्रकाशित केली आहे. एवढया सामुग्रीच्या साहाय्याने कायद्याचे मराठीतून शिक्षण आणि कनिष्ठ न्यायालयांमध्ये मराठीतून काम करणे हे दोन्ही साध्य करता येईल.
उपरोक्त तिन्ही क्षेत्रांमध्ये संचालनालयाने किती महत्त्वाची कामगिरी बजावली आहे याची आता कल्पना यावी. कायदे, अहवाल इत्यादींचा मराठी अनुवाद, परिभाषा कोश निर्मिती, राज्य शासनाच्या राजपत्रित व अराजपत्रित कर्मचार्यांसाठी मराठी भाषा परीक्षांचे आयोजन, मराठी टंकलेखन/लघुलेखन परीक्षांचे आयोजन अशी अनेकविध कामे संचालनालयाने केली आहेत.”
संपूर्ण लेख खालील दुव्यावर वाचावा.
अमृतमंथन_भाषा संचालनालय – काल आणि आज_110703
आपले प्रतिमत (feedback) लेखाखालील चर्चाचौकटीत अवश्य मांडा.
– अमृतयात्री गट
.