Conformityला प्रतिशब्द सुचवण्यासाठी आवाहन (प्रश्नकर्ता: श्री० मंगेश नाबर)

अमृतमंथन परिवारातील एक सदस्य श्री० मंगेश नाबर यांनी conformity या इंग्रजी शब्दासाठी मराठी प्रतिशब्द विचारला आहे. भाषाप्रेमी अमृतयात्रींनी मंगेशरावांना योग्य शब्द सुचवावेत असे आवाहन.

याबद्दलची चर्चा या नोंदीखालील चर्चाचौकटीत करूया. आपल्या सूचना देताना शक्य असल्यास संदर्भ, पुरावे, कारण इत्यादीही द्यावेत.

– अमृतयात्री गट

18 thoughts on “Conformityला प्रतिशब्द सुचवण्यासाठी आवाहन (प्रश्नकर्ता: श्री० मंगेश नाबर)

 1. कोणत्याही परभाषेतील शब्दाला प्रतिशब्द सुचवताना तो शब्द कोणत्या संदर्भात आला आहे किंवा वापरावयाचा आहे हे माहीत असणे आवश्यक असते. तरीसुद्धा कन्फ़र्मिटी या इंग्रजी शब्दासाठी मराठीत अनुरूपता, मिळताजुळता असणे. किंवा अभिसंगती असे काही शब्द सुचवता येतील.
  मात्र, कन्फ़र्मल=यथारूप; कन्फ़र्मेशन = दुजोरा, खात्री, पडताळणी वगैरे.

  • प्रिय श्रीमती शुद्धमती राठी यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपले उत्तर योग्य वाटते. प्रसिद्ध करीत आहोत. पाहूया इतर मित्रांना काय म्हणायचे आहे ते.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • अनुरूपता हाच शब्द कन्फर्मिटी ह्या शब्दासाठी चपखल वाटतो.तो शब्द संस्कृतमधून तत्सम रूपात आलेला आहे आणि तसाच रूढ आहे. मराठीत त्या शब्दाचा अर्थ सांगायचा झाला तर मिळताजुळता असा सांगता येईल, परंतु जर शब्दावली, किंवा प्रतिशब्द म्हणून सुचवायचा झाला तर अनुरूपता हाच शब्द योग्य म्हणावा लागेल. अभिसंगती हा शब्द मात्र ओतीव किंवा टांकसाळीतून काढलेला वाटतो. तो रूढ होणं कठीण वाटतं.महाराष्ट्र शासनानं (भाषा संचालनालय) प्रकाशित केलेल्या कोशांमध्ये हाही एक शब्द दिलेला आहे, परंतु तो कितपत वापरला जातो ह्याची शंका आहे.

   • प्रिय श्री० विजय पाध्ये यांसी,

    सप्रेम नमस्कार.

    आपले विचारपूर्ण विवेचन चर्चापीठावर प्रसिद्ध करीत आहोत.

    क०लो०अ०

    – अमृतयात्री गट

  • प्रिय श्री० श्रीनाम यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपण शब्दाचे विश्लेषण करून मांडलेली उपपत्ती (theory) वाचकांपुढे ठेवत आहे.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • प्रिय श्री० संजय नाईक यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   होय. हाही शब्द जवळपास येऊ शकेल असे वाटते. शेवटी हे सर्व ’form = रूप’ याच्याशीच तर निगडित आहे.

   आपण पुरवलेली ही संशोधनात्मक माहिती इतर वाचकांच्या समोर ठेवूया. आभार.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • प्रिय श्री० बाळ संत यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   समरूपता, अनुरूपता, रूपैक्य…

   ’Form’ या शब्दामुळे सर्व प्रतिशब्द ’रूप’ या शब्दाभोवतीच पिंगा घालतील असे दिसते.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • प्रिय श्री० अविनाश जगताप यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आभारी आहोत. अनुरूपता, समरूपता, रूपैक्य, साजेसेपणा, समानार्थीत्व… अशी ही यादी जमली आहे.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 2. शुद्ध सुधारित उच्चार आणि अर्थ :
  Confirmation(कॉन्फ़र्‌मेशन): पुष्टी
  Conformatiom(कॉन्फ़ॉर्‌मेशन): आकार, रचना
  ConformiTee(कॉन्फ़ॉर्‌मिटी) : एकरूपता.

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s