आय०आय०एम० मध्ये महाराष्ट्राचा (व मराठी माध्यमाचा) झेंडा (दै० लोकसत्ता)

“मराठी माध्यमातून शिक्षण घेतल्याचा मला अभिमान आहे. मराठी माध्यमातून शिकल्यामुळेच कोणताही विषय समजावून घेण्याची सवय मला जडली. परकीय भाषेपेक्षा मातृभाषेतील शिक्षण अधिक महत्त्वाचे असल्याचा आमच्या कुटुंबियांचा विश्वास असून माझा लहान भाऊसुद्धा मराठी माध्यमातून शिक्षण घेत आहे.”

प्रत्येक महाराष्ट्रीयाला अभिमानास्पद अशी ही बातमी खालील दुव्यावर वाचा. हे वृत्त आपले मराठीप्रेमी मित्र श्री० सागर विद्वांस यांनी पाठवले आहे.

अमृतमंथन_आय०आय०एम० मध्ये महाराष्ट्राचा (व मराठी माध्यमाचा) झेंडा_110122

– अमृतयात्री गट

ता०क० मातृभाषेतून शिक्षण या विषयावरील विवेचनात्मक लेख खालील दुव्यांवर वाचू शकता.

Mahatma Gandhi’s Thoughts on Medium of Education

पालकांनी चालवलेला बालकांचा छळवाद (ले. प्रा० मनोहर राईलकर)

सर्वप्रथम मातृभाषेत शिकणे हीच सर्वोत्तम पद्धत (ले० स्वामीनाथन एस० अंकलेसरिया अय्यर, टाईम्स ऑफ इंडिया)

मातृभाषेचं मानवी जीवनातलं स्थान (ले० प्रा० मनोहर राईलकर)

Lord Macaulay’s Psychology: The Root Cause behind British India’s Baneful Education System

या विषयासंबंधित इतरही लेख आहेत. अमृतमंथनावर नजर फिरवून पहा.

आपले विचार, अभिप्राय संबंधित लेखाखालील चौकटीत अवश्य मांडा.

.

2 thoughts on “आय०आय०एम० मध्ये महाराष्ट्राचा (व मराठी माध्यमाचा) झेंडा (दै० लोकसत्ता)

  1. इंग्रजीच्या मोठेपणाचं दडपण आपल्या मनावर कसं असतं ते पहा. संदर्भ मराठी वातावरणात राहूनसुद्धा असं म्हणण्यात मराठीमुळं नुकसान होऊ शकतं असं सुचवलं जातं. इथं ‘राहूनसुद्धा’ ऐवजी ‘राहिल्यामुळेच’ असं असायला हवं, असं मला वाटतं.

    • प्रिय राईलकर सर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपण म्हणता ते अगदी खरं आहे. आपण नेहमी बचावात्मक भूमिकेतूनच बोलतो. आपला स्वाभिमान व्यक्त करताना देखील आपण घाबरत घाबरत, कोणी दरडावेल की काय असा विचार करतच मनातले विचार मांडतो. याला कारण म्हणजे महाराष्ट्रात स्वाभिमान म्हणजे संकुचितपणा असा पूर्णपणे चुकीचा ग्रह आपण करून घेतला आहे. असे इतर राज्यांत व इतर देशांत आढळत नाही.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s