आपले मराठीप्रेमी मित्र श्री० सुशांत देवळेकर व श्री० आशिष आल्मेडा ह्यांनी युनिकोडानुकूल मराठी टंकातून संगणकावर लिहिण्याविषयी दिलेली पुढील अत्यंत उपयुक्त माहिती सर्व नवशिक्यांना उपयोगी ठरावी.
१. आपल्या संगणकावर मराठीत सहज काम करा.
२. युनिकोडाच्या साहाय्याने संगणकावर मराठी कसे वापरावे?
३. संगणकावर मराठी टंकलेखन करण्यासाठी बर्याचदा इन्स्क्रिप्ट ह्या पद्धतीच्या कळपाटाचा आराखडा वापरला जातो. त्याची ओळख करून देणारी दृक्श्राव्य शिकवणी:
http://yunikodatunmarathi.blogspot.com/2010/12/blog-post.html
४. संगणकावर युनिकोडातून मराठी लिहिण्यासाठी इन्स्क्रिप्टाच्या आराखड्याव्यतिरिक्तचे इतर पर्याय वापरण्यासाठी मराठी आयएमई कसे वापरायचे ह्याविषयीची दृक्श्राव्य शिकवणी:
http://yunikodatunmarathi.blogspot.com/2010/12/blog-post_11.html
आपल्या शंका, सूचना ह्या लेखाखालील चौकटीत माडू शकता. मूळ लेखकाच्या लेखकांना आपण उत्तरे देण्याची विनंती करू.
– अमृतयात्री गट
ता०क० ह्या विषयासंबंधित अमृत्मंथनावर पूर्वी प्रकाशित झालेला आणखी एक लेख.
संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल
.
नमस्कार,
या माहितीपूर्ण लेखाबद्दल श्री देवळेकर इत्यादींचे अभिनंदन. स्वतःचे संगणक असेल तर नक्कीच या लेखांत सांगितलेले पर्याय अत्यंत उपयुक्त आहेत. कित्येकदा आपण साइबरकेफ़े चा किंवा अश्या संगणका चा वापर करतो जिथे यूनिकोड कार्यरत नसते, शिवाय एक्सपीची चकती ही जवळ नसते. उदाहरणार्थ ज्या संगणकावर मी हे टंकलेखन केले तिथे ही असाच प्रकार आहे. यावर तोड म्हणून मी महाजालावरून http://www.azhagi.com येथून मोफ़त अळगि यूनिकोड एडिटर उतरवून घेतली. इथे टन्कन करून मी त्याचा महाजालावर कुठेही उपयोग करू शकतो. फ़क्त वर लेखांत सांगितल्याप्रमाणे ‘मंगल’ या टंकावर ‘र्य’ नाही म्हणून ते मी अगोदरच ‘सेव्ह’ केलेल्या धारिकेतून काढून वापरतो. वाटते तितके अवघड नाही.
जऱ केवळ छोटेसे लेख लिहायचे असेल तर यापेक्षा ही सरळ उपाय म्हणून सुरेशभट.इन सारख्या मराठी संकेतस्थळांत रचना करून त्याला अन्यत्र ‘कापी’/’पेस्ट’ करून पहा. हे तर फ़ार सोपे आहे.
जोपर्यंत सोयीस्कर मराठी कळ्पाट मिळत/बनविले जात नाहीत तो पर्यंत इंग्रजी कळपाटाचा उपयोग करून तरी मराठीत लहान-सहान रचना करण्यांत आनंद घ्यावे.
भविष्यात जर भारतीय भाषांकरिता सोयीस्कर असलेले ‘इन्स्क्रिप्ट’ कळपाट सर्वसाधारण वापरात आणायचे असेल तर त्याला यूनिकोडशी चांगलं जोडून त्याचा भरपूर प्रचार झाला पाहिजे.
प्रिय श्री० शां० भास्करभट्ट यांसी,
सप्रेम नमस्कार.
बर्याच दिवसांनी आपली भेट झाली. कुठे प्रवासात होता का? अमृतयात्रेमध्ये सतत साथ देऊन सह-अमृतयात्री होण्याचे वचन आपण देऊन चुकला आहात. आता त्यातून सुटका नाही. असो.
आपण सुचविलेल्या संस्थळाला धावती भेट दिली. तिथे लिप्यंतर करतात असे वाटते. तशी इतरही अनेक संस्थळे आहेत. स्वतः गूगलचे खालील संस्थळ पहा.
http://www.google.com/transliterate/Marathi
पण त्यात थेट टंकन करण्याचे काही विशेष फायदे आहेत ते मिळणार नाहीत. अर्थात बहुतेक सर्व (निदान ९०%) शब्दांचे काम होऊन जाते.
मंगल टंकात कार्य व अधिकार्याला असे दोन्ही र+य (र्य आणि र्य) आहेत. पण ते उमटवण्यास आपण टंकन करण्यासाठी वापरत असलेल्या सॉफ्टवेयरला जमले पाहिजे.
इनस्क्रिप्ट कळपाट युनिकोडशी व्यवस्थित जमवलेले आहेत. कदाचित त्याला काही मर्यादा असतील. पण मोठ्या अडचणी नाहीत. आपल्याला काही शंका असल्यास आपण त्या विषयातील तज्ज्ञांकडून सोडवून घेऊ.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
[…] […]
varil uttamach aahe. pan ithech malaa marathi lipitun lihitaa yet naahi tar facebook var maraathi kase lihu? g mailchyaa tokadyaa jaaget lekh kasaa lihun vartamaan patraalaa paathavu? krupyaa savistar , email var paathavile tar bare hoil !!
प्रिय श्री० शरद शेवडे यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपल्या शंका आणि अडचणी मिटल्या का?
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
Respected sir I facing some problems like writing problem. When i am going to write (karyalay)for it i m not getting the right key for it
प्रिय श्री० खान इफ्तेकार बशीर यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपण कुठल्या पद्धतीने मराठी-देवनागरी लिपीत लिहीत आहात? जर ध्वन्याधारित (बराहाप्रमाणे) पद्धतीने लिहीत असल्यास कार्यालय हा शब्द kAryAlaya असा लिहिता येतो. स्वतः खात्री करून घ्यावी.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट