मराठीच्या शोधात गांगरलेले गांगल (ले० सत्त्वशीला सामंत, लोकसत्ता, २३ डिसेंबर २०१०)

“समारोपादाखल मी गांगल यांची आजवरची भूमिका वेळोवेळी कशी बदलत गेली आहे ते थोडक्यात सांगते…”

“गांगल यांना मतस्वातंत्र्य आहे व त्यांना आपल्या मताचा प्रचार करण्याचाही अधिकार आहे. पण त्यांना अपुर्‍या अभ्यासानिशी विपर्यस्त माहितीचा समाजात प्रसार करण्याचा अधिकार मात्र निश्चित नाही. गोबेल्सचे प्रचारतंत्र चांगले अवगत असल्याने ते वारंवार लोकांची दिशाभूल करणारे असे लेख लिहितात…”

मराठी भाषेच्या व्याकरणाच्या नियमांबद्दल, युनिकोडवर आधारित टंक वापरून संगणकावर लिहिण्याबाबत श्री० शुभानन गांगल थोड्या-थोड्या कालांतराने भन्नाट व वरवर क्रांतिकारी वाटणार्‍या कल्पना मांडतात. त्यांचा विविध माध्यमांतून सामान्य जनतेवर वर्षाव करतात. अशी मते पुन्हापुन्हा ऐकून सामान्य जनतेलाही गांगरून जायला होते. त्यांच्या जवळजवळ प्रत्येक लेखाला संबंधित क्षेत्रातील विद्वानांनी उत्तरे दिली आहेत. त्यांच्या मते गांगलांची विधाने केवळ अभ्यासावर नाही तर अज्ञानावर आधारित आहेत. तसेच त्यांचे अनेक मुद्दे त्यांच्या स्वतःच्याच पूर्वीच्या मुद्द्यांच्या विपर्यस्त असतात. हे सर्व ह्या तज्ञांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. पण गांगलसाहेब तज्ञांच्या लेखांना मुद्देसूद उत्तरे देण्याच्या भानगडीत पडतच नाहीत व सामान्य जनतेच्या मनात मात्र गोंधळ निर्माण करतात आणि त्यायोगे आपली पुस्तके, सीडी इत्यादी खपवण्याचा प्रयत्न करतात.

गांगलांच्या अशाच प्रकारच्या २४ ऑक्टोबर २०१० च्या लोकसत्तेमधील लेखाला मराठी साहित्य व भाषाशास्त्राच्या व्यासंगी सौ० सत्त्वशीला सामंत यांनी दिलेले उत्तर दिनांक २३ डिसेंबरच्या लोकसत्तेमध्ये प्रसिद्ध झाले आहे. आपण ते खालील दुव्यावर वाचू शकता.

अमृतमंथन_मराठीच्या शोधात गांगरलेले गांगल_ले० सत्त्वशीला सामंत

आपली मते या लेखाखालील चौकटीत अवश्य मांडावीत.

– अमृतयात्री गट

ता०क० मराठीची प्रमाणभाषा आणि मराठीच्या लेखनाचे व व्याकरणाचे नियम हे विषय ज्यांना जिव्हाळ्याचे वाटतात अशा प्रत्येकाने काळजीपूर्वक वाचलाच पाहिजे असा आणखी एक लेख खालील दुव्यावर वाचू शकता.

मराठी प्रमाणभाषेच्या लेखनाविषयीची माझी संकल्पना (ले० दिवाकर मोहनी)

.

9 thoughts on “मराठीच्या शोधात गांगरलेले गांगल (ले० सत्त्वशीला सामंत, लोकसत्ता, २३ डिसेंबर २०१०)

  • प्रिय श्रीमती शुद्धमती राठी यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   सत्त्वशीला सामंतांचा लेख गांगलांच्या एकूणच सतत बदलत जाणार्‍या तत्त्वनिष्ठेबद्दल आहे. या आधीही गांगलांनी अनेकदा असे मराठी भाषेच्या व्याकरणात क्रांती घडवण्याचे आव आणले व आपल्या पुढल्याच लेखात आधीच्या लेखामधील मुद्द्यांशी विपरित असे मुद्दे मांडले. गांगलांनी एकेकाळी मराठी शुद्धलेखनाचे सर्वच नियम रद्द करावे अशी क्रांतीकारी घोषणा केली. त्यावर बरीच चर्चा केली. पण पुढे ते सर्व बारगलले. पुढे युनिकोडवर टीका केली व युनिकोड टंक मोफत मिळत असतानाही आता ते लोकांमध्ये युनिकोडचा प्रसार करून आपल्या युनिकोडच्या सीड्या विकत आहेत. अर्थात त्यांच्या धंद्याला आमचा विरोध नाही. पण तसे करताना त्यांनी लोकांची दिशाभूल करू नये एवढीच इच्छा.

   आपल्याला हवा असलेला गांगलांचा लेख लोकसत्तेच्या संस्थळावर मिळू शकेल.

   क०लो०अ०

   -अमृतयात्री गट

 1. लेख वाचला. आणि आवडला.
  थोडं विषयांतर.. मला लेखकांच्या जुन्या कविता वाचतांना बरेचदा चुकीचे ह्रस्व दीर्घ वापरलेले दिसतात- जे नियम गद्य प्रकारासाठी आहेत ते कवितेसाठी नाहीत असे का?

  • प्रिय श्री० महेंद्र कुलकर्णी यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या प्रश्नावर व इतर आनुषंगिक मुद्द्यांवर चर्चा करणारा लेख खालील दुव्यावर प्रसिद्ध केला आहे. वाचून पहा.

   ’निरंकुशाः कवयः’ व इतर काही मुद्दे (ले० सलील कुळकर्णी) –} http://wp.me/pzBjo-Hb

   आपल्या प्रश्नामुळे बरेच महत्त्वाचे मुद्दे चर्चेला आले, त्याबद्दल आपले आभार.

   क०लो०अ०

   अमृतयात्री गट

  • प्रिय श्री० महेंद्र कुलकर्णी यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आमच्या विलंबित उत्तराला दिलेल्या आपल्या तत्पर प्रतिसादाबद्दल आभार.

   लेख थोडा पसरट झाला आहे. काही जणांना कदाचित थोडा कंटाळवाणा वाटू शकतो. पण श्रीमती शुद्धमती राठी यांना लिहिलेल्या उत्तरात उल्लेखल्याप्रमाणे आपल्या प्रश्नाच्या अनुषंगाने इतरही काही संबंधित मुद्दे स्पष्ट करायचे असल्यामुळे लेख हेतुपुरस्सरच थोडा विस्तारला. आपल्या प्रश्नाला लिहिलेल्या उत्तरामुळे आपल्या मनात काही नवे प्रश्न उभे राहिले असल्यास अवश्य कळवावे. आम्ही यथाशक्य उत्तर देण्याचा प्रयत्न करू.

   क०ओ०अ०

   – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s