पानिपताच्या ओल्या जखमा (लेखकाचे मनोगत)

“शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यावर ज्याचा ऊर अभिमानाने भरून येत नाही आणि पानिपताचे नाव घेताच ज्याला दु:खाने हुरहूर लागत नाही, तो मराठी मनुष्यच नव्हे!…”

“या कादंबरीच्या निमित्ताने सदाशिवरावभाऊ यांची एक लेचापेचा, नवशिका सेनापती अशी जनामनात रुजवली गेलेली प्रतिमा पार पुसून गेली. पानिपत म्हणजे केवळ एक अशुभ घटना, बाजारगर्दी अशा रूढ कल्पनांनाही धक्का बसला. पानिपत हे त्या अर्थी पानिपत नसून तो एक ’पुण्यपथ’ असल्याचा साक्षात्कार लोकांना हळूहळू का होईना होऊ लागला आहे…”

पानिपताच्या महासंग्रामाला येत्या जानेवारीत अडीचशे वर्षे पूर्ण होत आहेत अन्‌ मराठी वाङ्‌मयात इतिहास घडविणार्‍या “पानिपत’ कादंबरीची तिसावी, खास स्मृतिविशेष आवृत्ती राजहंस प्रकाशन (२० डिसेंबर) प्रकाशित करत आहे.  यानिमित्ताने कादंबरीकार विश्‍वास पाटील यांनी जागवलेले हे ध्यासपर्व!

आपले अमृतमंथन परिवारसदस्य श्री० प्रसाद परांजपे यांनी पाठवलेले ’पानिपत’ कादंबरीबद्दलचे पानिपतकार विश्वास पाटील यांचे १९ डिसेंबर २०१० च्या ’दैनिक सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेले  स्वगत खालील दुव्यावर अवश्य वाचा.

अमृतमंथन_पानिपताच्या ओल्या जखमा_लेखकाचे स्वगत_101224

आपले प्रतिमत (feedback) लेखाखालील चौकटीत अवश्य नोंदवा.

– अमृतयात्री गट

ता०क०

पानिपतविषयक आणखी एक उत्तम लेख.

पानिपतयुद्धाचे युद्धशास्त्रीय विश्लेषण (ले० मेजर जनरल निवृत्त शशिकांत पित्रे)

पानिपतकाळापासून हरियाणात स्थायिक झालेल्या मराठ्यांच्या वंशातील एका मराठी पठ्ठ्याची विजयगाथा वाचा खालील दुव्यावर.

पानिपताच्या मराठी पठ्ठ्याची सुवर्णझळाळी (दै० सकाळ, १५ ऑक्टोबर २०१०)

.


9 thoughts on “पानिपताच्या ओल्या जखमा (लेखकाचे मनोगत)

 1. पानिपतची लढाई मराठे हरले हे म्हणणे तपासून पाहण्याची गरज आहे. यानंतर खैबरखिंडीतून हल्ला झाला नाही आणि पानिपतानंतरच मराठ्यानी आपला दरारा आसेतुहिमाचल प्रस्थापित केला हे श्री. पाटील विसरले आहेत.

  • प्रिय श्री० मनोहर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   मराठ्यांचा राजकीय दृष्ट्या पराभव झाला तरी त्यात आपण समजतो तेवढी मराठ्यांची मानहानी झाली नाही. अनेक बाबी विपरित घडल्यामुळे, दैवाने साथ न दिल्यामुळे तसे घडले पण तरीही त्यालाही अनेक सकारात्मक बाजू आहेत असे पानिपतकार विश्वास पाटलांचे म्हणणे दिसते.

   “पानिपत म्हणजे केवळ एक अशुभ घटना, बाजारगर्दी अशा रूढ कल्पनांनाही धक्का बसला. पानिपत हे त्या अर्थी पानिपत नसून तो एक ‘पुण्यपथ’ असल्याचा साक्षात्कार लोकांना हळूहळू का होईना होऊ लागला आहे.” ह्या विधानांतून त्यांना काहीसे आपल्या म्हणण्याप्रमाणेच सुचवायचे आहे असे वाटते.

   त्यापेक्षा विशेष वेगळे सांगणारे काही ऐतिहासिक मुद्दे/पुरावे आपल्याकडे असले तर अवश्य मांडा. प्रत्येक मराठी माणूस उत्सुकतेने वाचेल.

   क०लो०अ०

   -अमृतयात्री गट

 2. काय योयायोग आहे पहा!
  मी माझी जुनी कागदपत्रे पहात होतो व त्यात मला आम्ही दिल्लीला करोलबाग मराठा मित्रमंडळातर्फ़े मराठी शिशुविहाराच्या मदतीसाठी ९ एप्रिल १९६५ रोजी सप्रू हाऊसमध्ये केलेल्या श्री. न. चिं. केळ्कर लिखित “तोतयाचे बंड” ह्या नाटकाची स्मरणिका सापडली.
  त्या नात्यप्रयोगात तोतयाची (सुखनिधानची) भूमिका मी केली होती. नाटकाच्या तालमी चालू असतांना १२ मार्च १९६५ रोजी “पानिपताची रणधुमाळी” ह्या शीर्षकाखाली मी एक पोवाडा लिहिला होता. त्याचीही प्रत सापडली. नाटकाच्या प्रयोगात तो म्हटला गेला होता.
  तो पोवाडा जरासा मोठा असल्यामुळे येथे लगेच उतरणे शक्य नाही, पण स्वतंत्रपणे pdf मध्यॆ मी तो लवकरच लिहून काढणार आहे. ज्यांना तो वाचण्य़ाची इच्छा असेल त्यानी त्यांचा ई-मेल पत्ता मला कळाविल्यास मी त्यांना तो पाठवीन.
  बाळ संत

  • प्रिय श्री० बाळ संत यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या पत्राबद्दल आभार.

   आपण सांगितलेली माहिती इथेच प्रसिद्ध करीत आहोत. आपल्या पोवाड्याची वाट पाहतो.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • श्री० कल्पेश कोथळे यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   खरे आहे. पानिपताची घटना दुर्दैवी असली तरी लांछनास्पद, मराठ्यांनी तोंड लपवावे अशी नाही. पानिपत पुस्तकाचा हाच संदेश आहे. ही गोष्ट सर्व मराठी माणसांच्या मनात ठसवायला हवी.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • श्री० बाळासाहेब संत यांसी,

   सादर नमस्कार.

   होय. त्यांच्या कडून त्याची प्रत मिळाली व ती खाली सादर केली आहे. पोवाडे, देशभक्तिपर गीते इत्यादींच्या द्वारे पूर्वी देशाभिमान, निष्ठा इत्यादी भावनांचे तरुण पिढीवर संस्कार होत असत. म्हणून आज इतकी वर्षें परदेशात राहूनही आपल्या त्या भावना तशाच दृढ आहेत. दुर्दैवाने आज तोही मार्ग खुंटला आहे ह्याचे वाईट वाटते. नव्या पिढीवर पाश्चात्य संस्कृतीमधल्या योग्य त्या गोष्टी बाजूला सारून अनिष्ट गोष्टींचे संस्कारच झपाट्याने होत आहेत याची तीव्र खंत वाटते.

   पानिपताची रणधुमाळी
   पानिपताची रणधुमाळी रात्र ती काळी महाराष्ट्राच्या इतिहासातली
   बांगडी लक्श लक्श फुटली आसवं डोळ्यांची नाही खळली
   मायभू हाय हाय खचली रं जी जी जी मायभू हाय हाय खचली !! धॄ !! रं जी s जी s s जीs s s
   घेऊन हातावर शीर लढले रणवीर मराठे एक जात शूर
   गाजवली खूप त्यांनी तलवार सोडला नाही त्यांनी धीर
   परि फिरलं रे त्यांचं तकदीर जी s जी s !! १ !!
   धन्य धन्य भाऊसाहेब सदाशिव बाळ विश्वास आणि अधिक कित्येक
   प्रत्येकानं घेतले बळी अनेक एकएकाचं किति करावं कवतिक
   हुतात्मे सारे मराठॆ नेक जी s जी s !! २ !!
   सह्याद्रिच्या काळ्या फत्तरांतीं हिरे माणकं मोती चमकती उज्वल किती
   झाला जड काय तयांचा भार म्हणुन केला का त्यांचा अपहार
   एक ठॆवायचा होता भाऊवीर जी s जी s !! ३ !!
   काय त्याचं आठवावं रूप त्याचा हूरूप शौर्य अनूप बुद्धी अप्रूप
   दरारा त्याचा अटकेपर्यंत काळ गनिमाचा तो कॄतांत गोरगरिबांचा भगवंत
   व्हायचा नाही असा पुन्हा संत रं जी s जी s s !! ४ !!
   बाळ संत
   ९ मार्च १९६५
   १२ एप्रिल १९६५ रोजी सप्रु हाऊस, दिल्ली येथे झालेल्या « तोतयाचे बंड «  ह्या नाटकासाठी केलेला पोवाडा

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s