गीतारहस्य मराठीत का लिहिले, असे पदवीपरीक्षेच्या काही विद्यार्थ्यांनी विचारले असताना टिळक म्हणाले की, “मराठीत लिहिले कारण मला गीतेचा कर्मयोग माझ्या लोकांना शिकवायचा आहे. इंग्रजांना वा युरोपियनांना शिकवायचा नाही. कर्मयोगाचा आमच्या लोकांना साफ विसर पडला आहे. आमची दैनावस्था हा कर्मयोग विसल्याचा परिणाम आहे. इंग्रज वा युरोपिअन हे कर्मयोगी आहेत. यामुळेच त्यांचा उत्कर्ष आज सर्वत्र दिसतो.” टिळकांच्या या अभिप्रायात आजही काही बदल करण्याची गरज नाही.
सौ० अमिता राजाध्यक्ष (मुक्काम अमेरिका) ह्यांनी सुचवलेल्या रविवार ७ नोव्हेंबर २०१० दिवशीच्या लोकसत्तेतील श्री० प्रशांत दीक्षित यांच्या ह्या अभ्यासपूर्ण लेखातील महत्त्वाचा अंश खालील दुव्यावर वाचनास उपलब्ध आहे.
अमृतमंथन_गीतारहस्य-तत्वज्ञानातील लेणे_ले० प्रशांत दीक्षित_101215
– अमृतयात्री गट
ता०क० लोकमान्यांचा आणखी एक लेख अमृतमंथनावर उपलब्ध आहे, त्याचा दुवा खालीलप्रमाणे.
पिठांत मीठ (ले० लोकमान्य टिळक)
.