कोकणातील पर्यावरण आणि लोकभावनांकडे अक्षम्य दुर्लक्ष (डॉ० माधवराव गाडगीळ समिती)

इतर भागांच्या विकासाचे ओझे कोकणाने का घ्यायचे, असा प्रश्‍नही समितीने विचारला आहे. “रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना दर वर्षी केवळ १८० मेगावॉट विजेची गरज आहे. सध्या येथील सर्व ऊर्जा प्रकल्पांतील एकूण उत्पादन ४५४३ मेगावॉट आहे. हे जिल्हे त्यांना पुरणारी वीज उत्पादित करीत असून, उरलेली वीज देशासाठी देत आहेत. मुंबईला आणखी विजेची गरज असेल, तर मलबार हिल भागात कोळशावर आधारित ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे एखाद्याने सुचविले, तर त्यात गैर काय?” असेही समितीने म्हटले आहे.

जैववैविध्याने संपन्न असलेल्या पश्‍चिम घाट भागातील पर्यावरणरक्षण आणि जीवसृष्टी संवर्धनाच्या दृष्टीने केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाने ही समिती स्थापन केली आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा संपूर्णपणे आढावा घेण्याचे आदेश या समितीला देण्यात आले होते. या भागातील पर्यावरणाचे संवर्धन, रक्षण आणि पुनरुज्जीवन या दृष्टीने शिफारशी करण्यासही समितीला सांगण्यात आले होते. समितीचे प्रमुख ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी त्यासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा ४ ते ११ ऑक्‍टोबर या काळात दौरा केला. तेथील वस्त्यांना भेटी दिल्या, उद्योगांच्या प्रतिनिधींची, नागरिकांची, शास्त्रीय आणि तांत्रिक तज्ज्ञांची आणि वेगवेगळ्या समाजांतील प्रतिनिधींची भेट घेऊन त्यांची मते जाणून घेतली. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारीही त्यांच्यासोबत होते. सर्व आढावा घेतल्यानंतर समितीने सादर केलेल्या अहवालात नोंदविलेली निरीक्षणे धक्कादायक आहेत.

डॉ० माधवराव गाडगीळ समितीच्या अहवालाचा दैनिक सकाळच्या ११ डिसेंबर २०१० दिवशीच्या अंकातील त्रोटक वृत्तांत खालील दुव्यावर वाचू शकता.

अमृतमंथन_कोकणातील पर्यावरण आणि लोकभावनांकडे अक्षम्य दुर्लक्ष_101212

या विषयात अधिक स्वारस्य असणारी पर्यावरणप्रेमी मंडळी डॉ० माधवराव गाडगीळांचा इंग्रजीमधील मूळ अहवाल खालील दुव्यावर वाचू शकतात.

Ratnagiri Sindhudurg Environmental Study Tour Report_Madhav Gadgil Committee

वाचकांना काही शंका किंवा सूचना असल्यास त्यांनी त्या प्रस्तुत लेखाखालील चौकटीमध्ये नोंदवाव्यात. त्यातील विशेष शंका/सूचनांच्या बद्दल अभिप्राय देण्यास आपण डॉ० माधवराव गाडगीळांना विनंती करू.

– अमृतयात्री गट

.

1 thoughts on “कोकणातील पर्यावरण आणि लोकभावनांकडे अक्षम्य दुर्लक्ष (डॉ० माधवराव गाडगीळ समिती)

आपला अभिप्राय इथे नोंदवा.