निरनिराळया क्षेत्रांत संशोधन करणार्या वैज्ञानिकांकरता जागतिक संशोधनाची अद्यावत माहिती उपलब्ध व्हावी याकरता जपाननं एक अफाट यंत्रणा उभारली आहे. जगात कोणत्याही देशात, कोणत्याही भाषेत कोणत्याही विज्ञानशाखेत काहीही संशोधनात्मक माहिती आली की ती अगदी अल्प काळात जपानी संशोधकांना स्वभाषेत उपलब्ध करून देण्याची अगदी साधी सोपी यंत्रणा जपाननं उभारली आहे.
प्रा० मनोहर राईलकर ह्यांचा संपूर्ण लेख खालील दुव्यावर वाचावा.
अमृतमंथन_जपाननं विज्ञानावर प्रभुत्व कसं मिळवलं_ले० प्रा० मनोहर राईलकर_101211
आपले प्रतिमत (feedback) लेखाखालील चौकटीत अवश्य मांडा.
– अमृतयात्री गट
ता०क० अशाच विषयावरील काही इतर लेख खालील दुव्यांवर वाचू शकता.
जगाची भाषा (?) आणि आपण (ले० सुधन्वा बेंडाळे)
’मणभर कर्तृत्वाचा कणभर देश’ (ले० सुधीर जोगळेकर, लोकसत्ता)
.
“जपानने विज्ञानावर प्रभुत्व कसे मिळवले?”
प्राo मनोहर राईलकर वैचारिक लिखाण लिहिताना बोली भाषा वापरू नये हा कुठल्या भाषेच्या शुद्धलेखनाचा साधा नियम कधी शिकणार? जपानीत वैज्ञानिक ग्रंथ असेच बोलीभाषेत लिहितात का?–शुद्धमती
प्रिय श्रीमती शुद्धमती राठी यांसी,
सप्रेम नमस्कार.
दुसर्या लेखकाच्या लेखाची भाषा, आशय किंवा इतर कुठल्याही गुणावगुणाबद्दल बरीवाईट मते असण्याचा आपला अधिकार मान्य आहे. त्याचबरोबर प्रत्येक लेखकाला आपापल्या लेखाची भाषा, आशय इत्यादींची पद्धत ठरविण्याचा अधिकार आहे. इतर वाचकांनाही तो आवडला किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाने आपापला अधिकार स्वतंत्रपणे, दुसर्याच्या अधिकारावर गदा न आणता उपयोगात आणावा. त्यात काहीच अयोग्य नाही.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
वरील अभिप्रायातील कुठल्या हा शब्द कुठल्याही असा वाचावा.–SMR
[…] जपाननं विज्ञानावर प्रभुत्व कसं मिळवल… […]
[…] जपाननं विज्ञानावर प्रभुत्व कसं मिळवल… […]