“देशाचे तुकडे करण्याआधी माझ्या देहाचे तुकडे करा”, “Vivisect me before you vivisect India” असं निग्रहपूर्वक म्हणणार्या गांधीजींनी हा विश्वासघात जड मनानं स्वीकारला. पण हा विश्वासघात कुणी केला? ह्या प्रश्नाचं उत्तरही कॉंग्रेसचे मुख्य सचिव दिग्विजयसिंग यांनी शोधावं.
“कॉंग्रेसचे मुख्य सचिव दिग्विजयसिंग यांनी अयोध्या प्रकरणाबद्दल बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांसारख्या हिंदुत्ववादी संघटनावर आपला विश्वास नसल्याचे म्हटल्याबद्दल दि० २१ सप्टेंबर २०१० सकाळमधील बातमीमध्ये उल्लेख आहे. “बाबरी मशीद पाडणार नाही, अशा आशयाचं दिलेलं आश्वासन त्यांनी पाळलं नाही,” असंही कारण दिग्विजयसिंगांनी दिलं आहे. त्या आरोपाबद्दल त्या संघटना काय ते पाहून घेतील. दिग्विजयसिंगांचं हे वक्तव्य त्यावेळी उच्च न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वीचं होतं. पण आता तो आला आहे. त्याचे काय निष्कर्ष आहेत, ते ज्यानं त्यानं पाहावेत.
पण पूर्वीचा एक प्रसंग आजच्या पिढीला माहीत असण्याचा संभव नाही. फाळणी पाहिलेल्या माझ्या सारख्या ८२ वर्षाच्या वृद्धाला जी माहिती आहे आणि काही काळानंतर जी ग्रंथरूपानं उपलब्ध झाली, ती त्यांना देणं माझं कर्तव्य आहे.”
प्रा० राईलकरांचा पूर्ण लेख खालील दुव्यावर वाचावा.
अमृतमंथन_विश्वासघाताचे विस्मरण_ले० प्रा० मनोहर राईलकर_101014
आपल्या अभिप्रायांना/शंकांना प्रा० राईलकर सरांकडून उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करू. पण त्यास थोडा वेळ लागेल.
– अमृतयात्री गट
.
ति प्रा राईलकर सर,
सा. न.
कॉंग्रेसी नेत्यांकडून दुसरी कोणती अपेक्षाच ठेवायची नाही. आणि आपण जे संदर्भ वगैरे देतो त्या पुस्तकांच्याच विश्वासार्हतेवर शंका उपस्थित करणारे महाभाग निघतील. कारण ते कॉंग्रेसी नेत्यांबद्धल आहे. हेच अगदी नरेंद्र मोदींच्या बाबतीत. त्यांच्याबाबतीत निधर्मी (?) प्रसारमाध्यमं ज्या काही वावड्या उठवतात ते सगळं काळ्या दगडावरच्या रेघे सारखं सत्य पण कालिंदी रणधेरी आणि एम व्ही कामत लिखित “नरेंद्र मोदी, आर्कीटेक्ट ऑफ मॉडर्न स्टेट” हे पुस्तक खोटं असं या लोकांचं म्हणणं असतं. झोपलेल्याला जागं करता येतं पण झोपेचं सोंग घेतलेल्याला नाही.
आपलं (भारत देशाचं) दुर्दैव दुसरं काय.
कळावे,
अपर्णा लळिंगकर
प्रिय सौ० अपर्णा लळिंगकर यासी,
सप्रेम नमस्कार.
आपल्या पत्राबद्दल आभार.
आज स्वतःला निधर्मी, जातीभेद न मानणारे, इतरांना संकुचित म्हणणारे सर्वच पक्ष, विशेषतः कॉंग्रेस, जनता पक्षाची विविध सोंगे, तसेच मुलायम, लालू, मायावती यांचे पक्ष हे सर्वाधिक धर्म व जात मानणारे पक्ष आहेत. त्यांचे प्रत्येक धोरण व प्रत्येक माणसाची निवड ही धर्म व जातीवर अवलंबून असते. रा० स्व० संघ, कम्यूनिस्ट, व शिवसेना-मनसे यांच्यामध्ये जातीयवाद बराच कमी आढळतो.
आपले पत्र राईलकर सरांना अग्रेषित करीत आहे. उत्तरास कदाचित विलंब होईल.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
सप्रेम नमस्कार.
प्रा० राईलकर सरांचे उत्तर.
———————–
तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण आजवर त्या पुस्तकावर कुणी आक्षेप घेतला नाही. कारण त्या पिढीतल्यांना सत्य माहीतच होतं. पण घेतला तर त्यावर कुणीच काही म्हणू शकणार नाही. पण त्या सर्वांचे पुरावे त्या पुस्तकात दिलेच आहेत.
मराठी पुस्तक माझ्याकडे आहे. मूळ इंग्रजी नाही. आणि भगवानदास गुप्त तर तेव्हा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षच होते. त्याचं पत्रक प्रसिद्धही झालं होतं. आणकी एक. म. गांधीच्या खुनात रा.स्व.संघाचा कोणही स्वयंसेवक नसल्याचं प्रस्थापित झालं, तेव्हा त्यांनी तसं पं. नेहरूंना सांगितलं. इतकंच नव्हे तर, संघाचे लोक देशभक्तच आहेत, असा दाखलाही त्यांनी दिला. पण हेही खोटं आहे, असं म्हणू शकतात. आपली बहुसंख्या जनता अज्ञानी असल्याचा हा लाभ आहे.
मनोहर
———————–
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
नमस्कार,
सिंह उंदिरासारखे वागताहेत हे तर गुरुजींनी चांगले स्पष्ट केले. तरी एक शंका आहे. जर का फाळणी झाली नसती, तर का हा हिन्दु राष्ट्र राहिला असता? गांधींचे स्वप्न तोडणारे, त्यांचा विश्वासघात करणारे, स्वार्थापायी त्यांचं नाव सुद्धा वापरणारेच नसते का राज्य करीत? मग हा इतका वैमनस्य दोन समुदायांत राहिला नसता का? तो बनवून ठेवण्याचा प्रयत्न ह्या उंदरांन्नी केला नसता का? अश्यांत ह्या गुरूंना अन कसाबांना नकली व्हिसा ही लागला नसता अन लपून-छपून वार-संहार ही करावे लागले नसते. ह्या उंदिरांच्या बिळांतच राहून हे घूस अजूनही माजलेले नसते? मन्दिर बनवायचा संकल्प तरी घेता आला असता का? पांचजन्यांत कितीकदा “जिथे हिन्दु समुदाय कमी होतो तिथे राष्ट्राला धोका निर्माण होतो”अश्या आशयांचे लेख आपण वाचलेच असतील. मग फाळणी झाले ते बर्रे की वाईट? आणि सर्वांत विशेष, रा.स्व्.सं.चीच खरी सिंहगर्जना असे किती हिंदूंना वाटते?
प्रिय श्री० शंकर भास्करभट्ट यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपल्या पत्राबद्दल आभार.
आपण ज्येष्ठ व अनुभवी आहात. आपण ज्या लेखाच्या अनुषंगाने प्रतिमत दिले आहे तोही प्रा० राईलकरांसारख्या ज्येष्ठ, अनुभवी व्यक्तीने लिहिलेला. तेव्हा आपल्या पत्रास त्यांनीच उत्तर द्यावे हे योग्य.
आपले पत्र राईलकर सरांना अग्रेषित करीत आहोत. उत्तरास कदाचित विलंब होईल. थोडी वाट पाहावी.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
सप्रेम नमस्कार.
प्रा० राईलकर सरांचे उत्तर.
———————–
अमुक झालं असतं तर काय झालं असतं, असल्या प्रश्नांना काहीही अर्थ नसतो.
तरीही तसे प्रश्न आपल्या मनात येतातच. पण त्यांचं नेमकं उत्तर कोण सांगू शकेल? १९४६ साली महाराष्ट्राचं एक लाखाचं एक शिबिर व्हायचं होतं. हजारो स्वंयंसेवक कित्येक दिवस अक्षरशः राबत होते. त्या काळी संघात प्रत्यक्षात नसलेले कित्येक हिंदू भेदरले होते. आणि त्यांनी (त्यात कॉंग्रेसजनही होते) त्या शिबिराकरता वर्गणीही भरली होती. त्या काळची समाजातील भावना आपला त्राता फक्त संघच आहे, अशी बनली होती. पण त्या शिबिरावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोरारजी देसाईंनी बंदी घातली. आम्ही फार हळहळलो, अगदी निराश झालो होतो. पण इलाज नव्हता. कारण, आपापसात युद्ध नको म्हणून बंदीचा स्वीकार संघानं केला.
सांगण्याचा मुद्दा असा की ते शिबिर झालं असतं तर कदाचित (?) विभाजन झालं नसतं, असंही पुष्कळजण म्हणायचे. मी त्यावेळी लहान (वय १८ वर्षं) होतो. म्हणजे आजच्याइतका परिपक्व नव्हतो.
तरी ही उत्तरं निरर्थक आहेत. कारण इतिहास बदलता येत नाही. घडलं ते सारं सत्तालोलुपांच्या हावेमुळंच हे नक्की. जशास तसं हे धोरण काँग्रेसमधील स. वल्लभभाईंशिवाय कुणीच अंगीकारलं नव्हतं. त्यांचीही एक कथा आहे. पुन्हा कधी तरी. अथावा गेल्या वर्षीच्या धर्मभास्करच्या दिवाळी अंकातला दादूमियांचा (डॉ. नेने) लेख मिळवून वाचा.
मनोहर
———————–
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
I personally feel that the signatories on the “Bharat-Pakistan” bifurcation papers ( i.e. Gandhi & Nehru) aught to have been sent to Andaman to suffer rigorous imprisonment there immediately after independence!Instead, they have been revered beyond their capabilities.These two guys have made our people suffer toooooooo much!
A M Govilkar
प्रिय श्री० अरविंद गोविलकर यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपल्या पत्राबद्दल आभार.
आपण ज्येष्ठ व अनुभवी आहात. आपण ज्या लेखाच्या अनुषंगाने प्रतिमत दिले आहे तोही प्रा० राईलकरांसारख्या ज्येष्ठ, अनुभवी व्यक्तीने लिहिलेला. तेव्हा आपल्या पत्रास त्यांनीच उत्तर द्यावे हे योग्य.
आपले पत्र राईलकर सरांना अग्रेषित करीत आहोत. उत्तरास कदाचित विलंब होईल. थोडी वाट पाहावी.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
हिंदू भ्रमित झाला आहे — त्यात हिंदू स्त्रिया तर आपल्याच वेष्टनात एव्हड्या गुंतल्या आहेत की त्यांना कसली जाणीवच नाही! वास्तविक पाहता परकीय आक्रमानांना सर्वात जास्त बळी हिंदू स्त्रिया झालेल्या आहेत तरी सुद्धा त्यांना जाणीव नाही याची !! क्वचित काही स्त्रिया मानसिक रीत्या घराबाहेर पडून याविषयी जागृत आहेत. बाकी सर्व भावनेच्या भरात कोन्ग्रेस ला मते देतात व त्यांचे लोक निवडून येतात …आज देशाचे तीन तुकडे करून देखील कोन्ग्रेस ताठ मानेने उभी आहे त्याचे कारण हेच आहे. आता हिंदूंनी प्रेरित होवून काम करणे अत्यंत आवश्यक आहे !!
प्रिय श्री० राजेश पाटील यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपल्या पत्राबद्दल आभार.
आपले पत्र राईलकर सरांना अग्रेषित करीत आहोत. उत्तरास कदाचित विलंब होईल. थोडी वाट पाहावी.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
सप्रेम नमस्कार.
प्रा० राईलकर सरांचे उत्तर.
———————–
मी तुमच्याशी सहमत आहे. त्या काळाची आठवण झाली तरी मन उदास होतं. गलबलतं. श्(आमच्या एका शाखेत ९० सिंधी मुलं आली होती. एकाएकी?) इतकंच कशाला, तो लेख लिहितानाही मन उदासच होत गेलं. काय करणार? हिंदू डोळे उघडून पाह्यलाच तयार नाही.
तुम्हाला शक्य झालं तर गेल्या वर्षीचा धर्मभास्करचा दिवाळी अंक पैदा करा. त्यातला दादूमियांचा (डॉ. नेने) ह्याचा लेख वाचा. तुमच्या माहितीत थक्क करणारी भर पडेल.
मनोहर
———————–
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
Sorry for writing in English as I don’t know how to write in Marathi font here.
I don’t think Digvijay Singh deserves any importance. He is a defeated and frustrated politician who has no chance to come up in his own state – Madhya Pradesh. He is being used as a parrot by the Congress High Command to gather Muslim votes. His Batla House statement, his attack on RSS, BJP, Narendr Modi, Ayodhya verdict are all for pleasing Muslims. It is a pity that Muslims are getting fooled by this man. There are better politicians in the Congress itself to whom Muslims can look to for guidance.
Yeszhwant Karnik.
प्रिय श्री० यशवंत कर्णिक यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपल्या पत्राबद्दल आभार.
आपण ज्येष्ठ व अनुभवी आहात. आपण ज्या लेखाच्या अनुषंगाने प्रतिमत दिले आहे तोही प्रा० राईलकरांसारख्या ज्येष्ठ, अनुभवी व्यक्तीने लिहिलेला. तेव्हा आपल्या पत्रास त्यांनीच उत्तर द्यावे हे योग्य.
आपले पत्र राईलकर सरांना अग्रेषित करीत आहोत. उत्तरास कदाचित विलंब होईल. थोडी वाट पाहावी.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
सप्रेम नमस्कार.
प्रा० राईलकर सरांचे उत्तर.
———————–
तुमचं बरोबर आहे. त्यांना महत्त्व नाहीच देत. आणि माझा लेख ते कुठं वाचायला बसलेत. हा लेख आपणा सर्वांकरताच आहे.
मनोहर
———————–
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
प्रा. राईलकरांचा हा लेख त्यांच्या इतर लेखांप्रमाणेच माहितीपूर्ण व विश्वसनीय आहे. प्रत्यक्ष हा इतिहास जगलेले त्यांच्यासारखे वडीलधारे जाणकार आहेत तोपर्यंत अशी महिती नव्या पिढीपुढे येऊ तरी शकते.
काही वर्षांनंतर भारताचा इतिहास लिहिणारे तर हेही विसरून जातील आणि मग सत्तेवर सतत येत रहिलेले व लोकांची दिशाभूल करणारे करंटे लोक असत्यमेव जयते हेच ब्रीदवाक्य वापरून राज्यशासन स्वतःच्या स्वार्थासाठी राबवीत रहातील. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर मुंबईसह महाराष्ट्र निर्मितीसाठी स्वतंत्र भारतात मराठी भाषिकांना केवढा लढा द्यावा लागला हे सध्या अस्तित्वात असलेले कांग्रेस सरकार मराठी भाषेची कशी दुर्दशा करीत आहे त्यावरून ते सोयीस्कर विसरलेले दिसतात, हे उदाहरण काय दाखविते?
मराठी भाषेचे भवितव्य आजच्या परिस्थितीत तरी मला चागले दिसत नाही.
बाळ संत
सप्रेम नमस्कार.
प्रा० राईलकर सरांचे उत्तर.
———————–
श्री. संत,
सप्रेम नमस्कार.
माझ्याबद्दल काढलेल्या गौरवोद्गारांबद्दल आपला मी आभारी आहे. पण वेळोवेळी निरनिराळ्या बातम्यांचा संग्रह करावा, पुस्तकांतील माहिती ससंदर्भ जपून ठेवावी, ही समज मला यायला खूप उशीर झाला. त्यामुळं माझ्याकडे आवश्यक ते सर्वच संदर्भ उपलब्ध असतातच, असं नाही. जे आहेत, त्यांच्या आधारे जेवढं लिहिता येईल, तेवढं अचूक लिहायचा प्रयत्न करतो. पण आता स्मृतीही कधी कधी दगा देते. तेव्हा संभाळून घ्या. तुम्हाला शक्य असेल तर धर्मभास्कर नियमानं वाचीत जा. विशेषतः त्यात येणारे दादूमियांचे (डॉ. नेने) लेख वाचल्याशिवाय राहू नका. कदाचित, तुम्ही वाचीतही असाल. पण, मला माहीत नसल्यानं लिहिलं आहे. ते अगदी ससंदर्भ आणि प्रखड लिहीत असतात. जर तुम्हाला गेल्यावर्षींचा (२००९) दिवाळी अंक मिळाला तर त्यांचा लेख अवश्य वाचा. धक्कादायक पण सत्य अशी कितीतरी माहिती तुम्हाला मिळेल.
आपला,
मनोहर
———————–
क०लो०अ०
– अमृतयात्री गट