महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातच राज्यातील शेकडो मराठी शाळा अनधिकृत ठरवून त्या बंद करण्याचा फतवा सरकारने जारी केल्यानंतर सर्वत्र संतापाचा भडका उडाला. पुणे, नाशकात शिक्षक, पालक आणि विद्यार्थी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले. ‘मराठी शाळा टिकू द्या’, ‘मराठीतून आम्हाला शिकू द्या…’, ‘राज्य सरकार हाय हाय…’ अशा गगनभेदी घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयांवर त्यांनी धडक मोर्चे काढले. मराठीचा अवमान करणार्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, असा जळजळीत सवाल करीत विद्यार्थी आणि शिक्षकांनी सरकारच्या अध्यादेशाची होळी केली. (दैनिक सामना)
सविस्तर वृत्त खालील दुव्यावर वाचा.
अमृतमंथन_निदर्शने यशस्वी केल्याबद्दल पुण्यातील जनतेचे आभार
सर्व मराठीप्रेमी वाचकांनी ह्या विषयाबद्दल आपल्या मित्रबांधवात अधिकाधिक जागृती घडवण्याचा प्रयत्न करावा व प्रत्येकाने आपल्या मायबोली मराठीतील शाळांवर आपल्याच राज्यात होत असलेल्या दडपशाही विरुद्ध चालू केलेल्या या मोहिमेस यथाशक्य हातभार लावावा ही नम्र विनंती.
– अमृतयात्री गट
ता०क० या मागची पार्श्वभूमी जाणून घ्यायची असल्यास खालील दुव्यावरील लेख वाचावा.
महाराष्ट्राच्या सुजाण जनतेस आवाहन (शिक्षण अधिकार समन्वय समिती)
.