तीन दिवसांच्या अंतराने प्रसिद्ध झालेल्या या दोन बातम्या तमिळ आणि महाराष्ट्रातील शासनकर्त्यांमधील टोकाचा फरक दाखवून देतात. एकीकडे लोकशाहीतील तत्त्वांप्रमाणे अधिकाधिक सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व्यवहार लोकांच्या भाषेतून करण्याची कळकळ दिसते; तर दुसरीकडे सवंग लोकानुनय व त्या निमित्ताने आपल्या शैक्षणिक व इतर सर्वच क्षेत्रांतील धंद्यांना अनुकूल अशी परिस्थिती निर्माण करण्याचा अंतस्थ हेतू ठेवून केलेली कारस्थाने ह्याद्वारे मोठाच परस्परविरोध स्पष्ट होतो.
दैनिक सकाळने दिलेली दोन वृत्ते व त्यासंबंधित लेख खालील दुव्यावर वाचण्यास उपलब्ध आहेत.
अमृतमंथन_तमिळ आणि मराठी शासनकर्त्यांची तुलना_100916
आपली मते लेखाखालील स्तंभात अवश्य नोंदवा.
– अमृतयात्री गट
ता०क० या विषयासंबंधातील इतर लेख खालील दुव्यांवर सापडतील.
शहाणा भारत आणि वेडा जपान (ले० प्रा० मनोहर राईलकर)
English not the medium – Malaysia’s dilemma
महाराष्ट्राच्या सुजाण जनतेस आवाहन (शिक्षण अधिकार समन्वय समिती)
Study Tamil to get jobs: Karunanidhi (Sify News)
मातृभाषेचं मानवी जीवनातलं स्थान (ले० प्रा० मनोहर राईलकर)
तमिळ भाषेत वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षण (वृत्त: दै० डेक्कन क्रॉनिकल, २० फेब्रु० २०१०)
“मराठी शाळा म्हणजे सरकारवर ओझे” आणि “शासकीय व्यवहारात १००% मराठी” (वृत्त: दै० सामना, ६ जाने० २०१०)
.
धन्यवाद प्रा राईलकर!!
“मतांसाठी गांधीजी हवेत पण त्यांची रास्त मते नकोत”. हेच सत्य आहे!
प्रिय श्रीमती अपर्णा लळिंगकर उपाख्य ’शांतिसुधा’ यांसी,
सप्रेम नमस्कार.
गणेशोत्सवामुळे उत्तर देण्यास विलंब झाला, याबद्दल क्षमस्व. (बंगालात दुर्गापूजेच्या काळात सर्वत्र अघोषित बंद पाळला जातो. तसाच आपल्याकडील गणेशोत्सवाचा उत्सव !!)
गांधीजींचे नाव सांगणारे आपले शासनकर्ते दारूबंदी करणे तर सोडाच उलट दारू गाळण्याच्या कारखान्यांना अनुदान देताहेत. मातृभाषेमधून शिक्षणास उत्तेजन देणे तर सोडाच, उलट मराठी शाळा संपवण्याच्या मागे लागले आहेत. अनुदानित मराठी शाळांनाही पाच वर्षांत अनुदान दिलेले नाही. एवढे करूनही गांधीजींचा वारसा सांगायला तयार.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
[…] […]
[…] […]