राईट बंधूंच्या आधी विमानोड्डाण करणारा भारतीय !!

आधुनिक जगातील पहिले विमानोड्डाण अमेरिकेच्या राईट बंधूंच्याही अगोदर एका भारतीयाने केले होते. विश्वास बसत नाही? होय !! मुंबईतील वेदविद्या पारंगत श्री० शिवकर बापूजी तळपदे ह्यांनी भारद्वाज मुनींच्या ’वैमानिक शास्त्र’ या पुरातन ग्रंथावरून एका विमानाची निर्मिती केली व मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर सर्व लोकांसमक्ष १८९५ वर्षाच्या जून महिन्यात त्या विमानाचे उड्डाण करून दाखवले. प्रस्तुत मानवविरहित विमान १५०० फूट उंच उड्डाण करून मग ते जमिनीवर खाली आले. (पुढे १९०३ या वर्षी म्हणजे तब्बल ८ वर्षांनी विमानविद्येचे जनक मानल्या जाणार्‍या अमेरिकेच्या राईट बंधूंच्या विमानाने केवळ १२० फूटाचे उड्डाण केले होते.)

शिवकर तळपदे यांच्या शोधाबद्दल व एकंदरीतच प्राचीन काळातील भारतीय ग्रंथांमध्ये उपलब्ध असलेल्या आधुनिक ज्ञानाबद्दलची माहिती खालील लेखात वाचा.

अमृतमंथन_राईट बंधूंच्या आधी विमानोड्डाण करणारा भारतीय_100906

आपले विचार, आपली मते प्रस्तुत लेखाच्या खालील स्तंभात अवश्य मांडा.

– अमृतयात्री गट

ता०क० भारतातील प्राचीन ज्ञानपरंपरेबद्दलचे हे इतर लेखही कदाचित आपल्याला आवडतील. एक दृष्टिक्षेप टाकून पहा.

भारतीय ज्ञानपरंपरा (Indian Knowledge Traditions) (इंग्रजी लेख)

Quotes on India & Indian Knowledge System (इंग्रजी लेख)

.

59 thoughts on “राईट बंधूंच्या आधी विमानोड्डाण करणारा भारतीय !!

  • प्रिय श्री० गौरव यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   गणेशोत्सवाच्या धंदलीत उत्तर देण्यास झालेल्या विलंबाबद्दल क्षमा असावी.

   आपल्या अभिप्रायाबद्दल आभार. भारतीयांना अभिमानास्पद अशा अनेक गोष्टी आहेत. आपण त्याचा प्रसार करायला पाहिजे. भारतीयांचा स्वतःबद्दलचा न्यूनगंड कमी व्हायला त्यामुळे मदत होईल.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 1. होय. खूप जुनी माहिती आहे ही. बहुतेक यावर एक पुस्तकही आहे.
  पुढे हे तळपदे दिवाळखोरीत गेले त्यामुळे त्यांनी त्याचा अभ्यास/यंत्र/विमान हे विकून टाकलं असंही वाचल्याचं आठवत आहे.

  • प्रिय श्री० आल्हाद महाबळ यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   गणेशोत्सवाच्या धंदलीत उत्तर देण्यास झालेल्या विलंबाबद्दल क्षमा असावी.

   माहिती जुनी आहे हे खरेच. पण इतक्या लोकांनी त्याबद्दल लिहूनही आपल्याला त्याबद्दल फारसे माहित नाही व ती गोष्ट माहित होऊनही आपल्यापैकी अनेकांना केवळ संशयास्पदच नव्हे तर ठामपणे खोटी अफवाच वाटते ह्याचेच वैषम्य वाटते.

   आपण त्या पुस्तकाची माहिती देऊ शकाल काय?

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 2. हि गोष्ट बऱ्याच वर्ष्यापासून आपल्याला सांगितली जाते, पण हि फक्त एक अफवा होती आणि ह्या बातमीला कुठलाच पुरावा नाही. काही ठिकाणी तर मी ना. गोखले ह्या घटनेला उपस्थित असण्याचा उल्लेखही पहिला आहे पण गोखल्यांच्या कुठल्याच संधर्भात ह्या घटनेचा उल्लेख नाही….

  • प्रिय श्री० नयन राऊत यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   गणेशोत्सवामुळे उत्तर देण्यास विलंब होत आहे, याबद्दल क्षमस्व. (बंगालात दुर्गापूजेच्या काळात सर्वत्र अघोषित बंद पाळला जातो. तसाच आपल्याकडील गणेशोत्सव !!)

   एका अत्यंत कठीण विषयाला आपण हात घातला आहे. अशा विषयांत खरं म्हणजे आपण फार दुरभिमानही बाळगू नये किंवा अगदी न्यूनगंडावर आधारित तुसडेपणाही बाळगू नये. पण या दोन टोकांमध्ये संतुलन साधणे फार कठीण असते. आपण (बहुतेक सर्व) सर्वसामान्य माणसे आहोत. आपल्याला पुरेसे ज्ञान पुरेसा अभ्यास नसतो व त्यामुळे बर्‍याच वेळा आपापल्या पूर्वग्रहांप्रमाणे आपला या किंवा त्या बाजूला तोल जातो.
   दुरभिमान आणि न्यूनगंड यांमध्ये तोल कसा सांभाळायचा? अभिनिवेश आणि अनास्था यामध्ये सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न कसा करायचा? (How to strike a balance between self-righteousness and cynicism?)
   या विषयावर आमची मते लवकरच एका लेखाद्वारे मांडणार आहोत. लेखातील मते पटली तर घ्यावीत अन्यथा सोडून द्यावीत. अशी सर्व मते व्यक्तिसापेक्ष असतात, ही त्रिकालाबाधित सत्ये नव्हेत. त्यामुळे त्यांपैकी हे मत योग्य, ते अयोग्य असे ठामपणे सिद्ध करणे फार कठीण असते. पण विज्ञान हे मात्र त्रिकालाबाधित सत्यच असायला हवे.

   असो. लेख लिहिण्यासाठी आम्हाला थोडा वेळ द्यावा, ही विनंती.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 3. चौपाटीवर सर्व लोकांसमक्ष १९९५ वर्षाच्या जून महिन्यात त्या विमानाचे उड्डाण करून दाखवले. प्रस्तुत मानवविरहित विमान १५०० फूट उंच उड्डाण करून मग ते जमिनीवर खाली आले. (पुढे १९०३ या वर्षी म्हणजे तब्बल ८ वर्षांनी विमानविद्येचे जनक मानल्या जाणार्‍या अमेरिकेच्या राईट बंधूंच्या विमा

  आपली ईथे एक घोड चुक आहे. आपल्याला १९९५ ऐवजी १८९५ म्हणायचे तर नाही ना ?

  • प्रिय श्री० प्रभाकर कुलकर्णी यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   गणेशोत्सवामुळे उत्तर देण्यास विलंब होत आहे, याबद्दल क्षमस्व. (बंगालात दुर्गापूजेच्या काळात सर्वत्र अघोषित बंद पाळला जातो. तसाच आपल्याकडील गणेशोत्सवाचा उत्सव !!)

   आपले म्हणणे अगदी योग्यच आहे. ती चूकच आहे. तिला घोडचूक म्हणायचे की गाढवपणा, नजरचूक म्हणायचे की धांदरटपणा हे वाचकांनीच ठरवावे. (शाळेत असताना अशाच धांदरटपणामुळे गणिताच्या परीक्षेत अनेकवेळा आकड्यांच्या गल्लती करून हातचे गुण घालवल्याबद्दल आईचा ओरडा खाल्लेला आठवला. आज मौज वाटते. आभार.)

   लेख प्रकाशित झाल्यावर चूक लक्षात आली होती. पण “अमृतमंथनाचे वाचक सूज्ञ आहेत. त्यांना चूक लगेच लक्षात येईल व ते गैरसमज करून घेणार नाहीत.” अशी खात्री असल्यामुळे एका चुकेसाठी संपूर्ण लेख पुन्हा प्रकाशित करण्याचा आळस केला.

   असो. चूक, भूल द्यावी घ्यावी.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • जर तळपदे याना विमान बनवता आले होते तर त्यानी आपल्या पोथी मध्ये विमानाची रचना कशी केली होती व त्या विमानाचे फोटो व ते कश्या ने आकाशाने उडत होते

   • प्रिय श्री० मनोज यांसी,

    सप्रेम नमस्कार.

    पत्राबद्दल आभार.

    आपण कुठल्या पोथीच्या संबंधात हे विधान केलेत ते लक्षात आले नाही. तळपद्यांनी प्राचीन ग्रंथातील काही युक्त्यांचा अभ्यास करून विमान बनवले आणि प्रत्यक्ष उडवले, असा वृत्तांत आहे. त्यांनी लिहिलेली टिपणे गहाळ करण्यात आली असा कॅप्टन आनंद जयराम बोडस यांनी केलेला उल्लेख इथे उद्धृत केलेला आहे. (अशाच प्रकारे भारतीय जगदीशचंद्र बोसांचे नाव दडपून ब्रिटिशांनी रेडिओचा जनक म्हणून इंग्रज मार्कोनीचे नाव प्रसिद्ध केले गेले, हे आता सर्वमान्यच आहे. इतिहास जेते लिहितात. गुलामांनी त्यांचेच कौतुक करायचे. असो.) अधिक सविस्तर माहितीसाठी बोडसांचे ‘प्राचीन भारतीय विमानशास्त्र’ हे पुस्तक अवश्य वाचावे. स्वतः एक प्रसिद्ध आणि निष्णात वैमानिक आणि वैमानिक-प्रशिक्षण-संस्थेमध्ये ज्येष्ठ प्रशिक्षक असलेल्या बोडसांनी गेल्या वर्षी मुंबई विद्यापीठात भरलेल्या भारतीय विज्ञान परिषद (२०१५) इथे केलेले याच विषयावरील भाषणही बरेच गाजले, खळबळजनक ठरले.

    अधिक माहितीसाठी आपण त्यांचे पुस्तक वाचावे आणि शंकासमाधानासाठी प्रत्यक्ष त्यांच्याशीच संपर्क साधावा, हे उत्तम.

    क०लो०अ०

    – अमृतयात्री गट

 4. आपणां भारतीयांचं जुनं दुखणं परत उसळलं..आमच्याकडे अणुशास्त्र,विमान,रॉकेट,चुंबक,मिसाईल सगळं सगळं होतं.. As usual हे ज्या जुन्या ग्रंथात होतं तो जळला,मुस्लिमांनी लुटला. As usual मूळ बनवलेलं विमान काळाच्या उदरात गडप. Now Thanthangopal.

  लेखामगची भावना जेन्युईन आहे. पण मानव विरहीत विमान हा काही राईट बंधूंचा शोध नव्हे. ‘हवेहून जड एरोफ़ॉईल वापरुन मानवासहित’ विमान हा राईट बंधूंचा शोध होता.

  लगेचच जिवाची बाजी लावून अनेक चाचण्या,सुधारणा करुन विमान हा ‘वाह्तुकीचा practical feasible मार्ग’ बनवला गेला.माफ़ करा आपण भारतीय,मी धरून,फक्त श्रेयभक्त आहोत.डॉक्युमेंटेशन,प्रोटोटाईप काही काही मेंटेन केलेले नाही.अहो तो जुना ग्रंथ आहे अजून? त्यावरुन राईट ब्रदर्सच्या त्या किरकोळ 120 फ़ूट उड्डाणानंतर इतक्य वर्षात भारतात स्वत:ची बनावट असलेली किती विमाने तयार झाली? एखादे हायब्रीड ट्रेनी लेव्हलचे विमान सोड्ल्यास? शून्य..तेच शून्य जी आमची गणिताला देणगी आहे.

  एवढ्या काळात ते पोचले सुपरसोनिक आणि स्पेस शटलमधे. आणि आम्ही चापसतोय जुनी फ़ड्ताळं. पणजोबांच्या पोथ्या धुंडाळत. उपरोधाबद्दल सॉरी.मी non technical पण विमानक्षेत्राशी संबंधित असल्याने सेन्सेटिव्ह वाटले. बॉटमलाईन हीच की जग गेलं पुढे.आपल्याकडे आहे न अक्कल? मग ‘माझे आजोबा सर्वात शक्तिमान’ हा बालिश विचार सोडून एखादे चार सीटर विमान तरी आपले आपले पूर्ण बनवूया.ही कळकळ…..

  • प्रिय श्री० गद्रे साहेब यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   गणेशोत्सवामुळे उत्तर देण्यास विलंब होत आहे, याबद्दल क्षमस्व. (बंगालात दुर्गापूजेच्या काळात सर्वत्र अघोषित बंद पाळला जातो. तसाच आपल्याकडील गणेशोत्सवाचा उत्सव !!)

   दुरभिमानाचं जुनं दुखणं पुन्हा उसळलं म्हणावं, की गुलामगिरीचं विष अधिकाधिक भिनत चाललंय म्हणावं, काहीच कळत नाही.

   एका अत्यंत कठीण विषयाला आपण हात घातला आहे. अशा विषयांत खरं म्हणजे आपण फार दुरभिमानही बाळगू नये किंवा अगदी न्यूनगंडावर आधारित तुसडेपणाही बाळगू नये. पण या दोन टोकांमध्ये संतुलन साधणे फार कठीण असते. आपण (बहुतेक सर्व) सर्वसामान्य माणसे आहोत. आपल्याला पुरेसे ज्ञान, पुरेसा अभ्यास नसतो व त्यामुळे बर्‍याच वेळा आपापल्या पूर्वग्रहांप्रमाणे आपला या किंवा त्या बाजूला तोल जातो.

   दुरभिमान आणि न्यूनगंड यांमध्ये तोल कसा सांभाळायचा? अभिनिवेश आणि अनास्था यामध्ये सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न कसा करायचा? (How to strike a balance between self-righteousness and cynicism?)

   या विषयावर आमची मते लवकरच एका लेखाद्वारे मांडणार आहोत. लेखातील मते पटली तर घ्यावीत अन्यथा सोडून द्यावीत. अशी सर्व मते व्यक्तिसापेक्ष असतात, ही त्रिकालाबाधित सत्ये नव्हेत. त्यामुळे त्यांपैकी हे मत योग्य, ते अयोग्य असे ठामपणे सिद्ध करणे फार कठीण असते. पण विज्ञान हे मात्र त्रिकालाबाधित सत्यच असायला हवे.

   असो. लेख लिहिण्यासाठी आम्हाला थोडा वेळ द्यावा, ही विनंती.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

   • हे माझे मत स्केप्टिक आहे हे मान्य. पण त्यातला कडवटपणा किंवा खोचकपणा टाळून आतला मुद्दा पाहिला तर खरा असल्याचं लक्षात येईल.
    शिवकर, भारद्वाज मुनी आणि विमान ही सर्व अफवा किंवा अस्तित्वात नसलेले काहीतरी आहे असे मी कुठेच म्हटलेले नाही. केवळ नवा शोध लागल्यावर मग उठून तो आमच्याकडे आधीच कसा लागला होता हे सांगण्याची असंख्य उदाहरणे आपल्यालाही सापडतीलच. त्याला आक्षेप हा लिमिटेड मुद्दा होता. सामान्य असलो तरी भौतिक शास्त्राचा इतपत अभ्यास (त्यात पदवी घेतल्याने आणि छंद म्हणूनही) मला नक्की आहे की कुठले दावे अचाट आणि अफाट आहेत ते समजावे. भारतीय मन हे तात्विक बाबींमध्ये फार तेज आहे. पूर्वी पासून “अणू”, “शून्य”, “कालप्रवास” (Time travel) अशा तत्वाधारित संकल्पना भारतीयांनी जरूर विकसित केल्या आहेत. ते खूप महत्वाचे योगदान आहेच. त्यातही बुद्धी लागतेच. पण आपण ज्यात मार खातो ते प्रोटोटायपिंग, practical application, engineering, reproducible documentation या सर्व गोष्टी आपण मान्य का करत नाही तेच कळत नाही..असो.

    Rally brothers ला ते विमान विकले असले तर मग (जर त्यात काही सबस्टेन्स असता तर) ion mercury इंजिनवाले विमान किंवा तसा काही प्रगत डेरीव्हेटीव खूप पूर्वीच युरोपियन देशांनी बाहेर आणला असता. शिवाय आयन प्रपल्शन इंजिनचे तत्वच असे आहे की त्यापासून मिळणारा दाब इतका कमी असतो कि निर्वात स्पेसमधेच तो काहीसा उपयोगात आणला जाऊ शकतो (आणि स्पेसक्राफ्ट अवकाशात जागच्या जागी हलवून पोझिशन अड्जस्ट करण्यापुरतीच ती वापरली जातात.)

    राईट बंधूंचे काम उगीच उणावण्याचा सूरही लेखात होता. त्यांनी जे दीर्घ चिकाटीने श्रम केले आणि जोखीम उचलली त्याच्या एक हजारांशही आपल्या देशात झाले नाही आणि आता मात्र त्यांचे (फक्त) किती फूट उडाले आणि आमचे हे गहाळ विमान (मानव विरहीत बरे का..) किती हजार फूट याची तुलना?

    • प्रिय श्री० नचिकेत यांसी,

     सप्रेम नमस्कार.

     गणेशोत्सवामुळे उत्तर देण्यास विलंब झाला, याबद्दल क्षमस्व. (बंगालात दुर्गापूजेच्या काळात सर्वत्र अघोषित बंद पाळला जातो. तसाच आपल्याकडील गणेशोत्सवाचा उत्सव !!)

     एकीकडे स्वतःच्या पत्रातील स्केप्टिसिझम, कडवटपणा, खोचकपणा मान्य करतानाच राईट बंधूंना उणे मानण्याबद्दल आपला आक्षेप आहे असे दिसते.

     जगदीशचंद्र बोसांचा रेडियोसंबधित शोध दडपून टाकून मार्कोनीला रेडियोचा जनक म्हणून जाहीर केले ही वस्तुस्थिती आता उघडकीस आली आहे; हे आपल्यालाही नक्कीच माहित असेल. तसेच या बाबतीत असण्याची शक्यता फेटाळून लावता येईल असे वाटत नाही. व लेखात व्यक्त केलेली शक्यता असेल तर राईट बंधूंना मिळालेल्या मानाचा खरा मानकरी दुसराच ठरेल (तो पहिला व राईट बंधू दुसरे मानकरी ठरतील), ही गोष्ट प्रस्तुत लेखात लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात राईट बंधूंना कमी लेखण्याचा प्रश्न इथे येत नाही. त्यांच्या पहिले असण्यासंबंधीच्या शंकेचा उल्लेख लेखात केला आहे.

     आपल्या लेखातील कडवटपणा, खोचकपणा टाळून (दुर्लक्षित करून) त्यातील मुद्दा (मूळ हेतू) पाहावा अशी आपली अपेक्षा आपण व्यक्त केली आहे. तेव्हा {{आमचे हे गहाळ विमान (मानव विरहीत बरे का..)}} हे आपले विधानही आम्ही खोचक, कडवट, स्केप्टिक मानत नाही. पण मग त्याच प्रमाणे प्रस्तुत लेखातही (तसा खरंतर उद्देश नसूनही) जरी आपल्याला दीर्घ चिकाटीने काम करणार्‍या राईट बंधूंना कमी लेखण्याचा रॉंग प्रयत्न वाटला तरीही त्याकडे काणाडोळा करून एका भारतीयाने केलेल्या उत्तम प्रयत्नाकडे वाचकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे हे लक्षात घ्यावे ही नम्र विनंती.

     आता थोडेसे “आमचे हे गहाळ विमान (मानव विरहीत बरे का..)” या आपल्या राईट विधानाबद्दल. कॅप्टन आनंद जयराम बोडस यांच्या “प्राचीन भारतीय विमानशास्त्र” या पुस्तकातील उल्लेखाप्रमाणे International Civil Aviation Organisation (ICAO) या आंतरराष्ट्रीय संस्थेनुसार विमानाची व्याख्या “जे हवेपेक्षा जड आहे आणि हवेमध्ये तरंगते किंवा उडते त्याला विमान म्हणावे” अशी आहे. त्यात दुर्दैवाने मानवासह किंवा मानवरहित असण्याबद्दलचा संबंध जोडलेला नाही.

     आपल्या आधीच्या पत्राच्या उत्तरात लिहिल्याप्रमाणे यावर आणखी एक सविस्तर लेख लिहिण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो लेख देखील आपले (पूर्वीचे) राज्यकर्ते इंग्रज किंवा इतर पाश्चात्यांच्याचा कमीपणा करण्यासाठी नाही आहे हे लक्षात घेऊनच वाचावा ही विनंती.

     मध्यंतरीच्या काळात खालील लेखांवर दृष्टिक्षेप टाकावा ही विनंती. त्यामुळे दीड दोनशे वर्षांपूर्वीच्या राज्यकर्त्या इंग्रजांचा भारतीय संस्कृती व विज्ञानाबद्दलचा दृष्टिकोन व त्यानंतरच्या अभ्यास-संशोधनानंतर पाश्चात्य विचारवंत, शास्त्रज्ञ, संशोधक, विद्वान यांच्या प्राचीन भारतीय संस्कृती व विज्ञानाबद्दलच्या दृष्टिकोनात झालेला प्रचंड बदल लक्षात यावा.
     http://wp.me/pzBjo-sP
     http://wp.me/pzBjo-mz
     http://wp.me/pzBjo-sE

     (आम्हा भरतीयांच्या मनातही तसे काही घडेल अशी आशा करायला जागा आहे का? पाश्चात्यांचे अनुकरण म्हणून तरी आपण तसे करू काय?) वस्तुतः आम्हा भारतीयांचा स्वतःच्याबद्दलचा दृष्टिकोन, स्वाभिमान, अस्मिता हे सर्व मात्र स्वातंत्र्यानंतर अधिकाधिक खालावत चालले आहेत व इंग्रजी, इंग्रजांचा व पाश्चात्यांचा आदरयुक्त वचक वाढतच चालला आहे असे दिसून येते. आम्हा मराठी मंडळींनी तर इंग्रजी आणि इंग्रजांच्या जोडीला हिंदी व हिंदीकर यांचीही गुलामी पत्करली आहे. त्याबद्दल आपण काय करावे?

     क०लो०अ०

     – अमृतयात्री गट

  • प्रिय श्री० महेश र० कुलकर्णी यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   गणेशोत्सवामुळे उत्तर देण्यास विलंब होत आहे, याबद्दल क्षमस्व. (बंगालात दुर्गापूजेच्या काळात सर्वत्र अघोषित बंद पाळला जातो. तसाच आपल्याकडील गणेशोत्सवाचा उत्सव !!)

   आपले म्हणणे अगदी योग्यच आहे. ती चूकच आहे. तिला घोडचूक म्हणायचे की गाढवपणा, नजरचूक म्हणायचे की धांदरटपणा हे वाचकांनीच ठरवावे. (शाळेत असताना अशाच धांदरटपणामुळे गणिताच्या परीक्षेत अनेकवेळा आकड्यांच्या गल्लती करून हातचे गुण घालवल्याबद्दल आईचा ओरडा खाल्लेला आठवला. आज मौज वाटते. आभार.)

   लेख प्रकाशित झाल्यावर चूक लक्षात आली होती. पण “अमृतमंथनाचे वाचक सूज्ञ आहेत. त्यांना चूक लगेच लक्षात येईल व ते गैरसमज करून घेणार नाहीत.” अशी खात्री असल्यामुळे एका चुकेसाठी संपूर्ण लेख पुन्हा प्रकाशित करण्याचा आळस केला.

   असो. चूक, भूल द्यावी घ्यावी.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 5. लेखामध्ये या प्रयोगाची माहिती लोकमान्य टिळकांनी केसरी वृत्तपत्रात छापली होती, असा उल्लेख आला आहे. केसरी वृत्तपत्राचे ते पान संदर्भासाठी उपलब्ध आहे का?

  • प्रिय डीडी यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   गणेशोत्सवामुळे उत्तर देण्यास विलंब होत आहे, याबद्दल क्षमस्व. (बंगालात दुर्गापूजेच्या काळात सर्वत्र अघोषित बंद पाळला जातो. तसाच आपल्याकडील गणेशोत्सवाचा उत्सव !!)

   केसरीचे पान आज उपलब्ध असणे फारच कठीण दिसते आहे. स्वतः टिळक मंडळींनादेखील ते पान सापडेल की नाही कोण जाणे !!

   आपण आपापल्या समजानुसारच निष्कर्ष काढायचे. अर्थात १००% सिद्धता होणे कठीणच आहे. या लेखावर बर्‍याच उलट्यासुलट्या प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यांबद्दलही एखादा लेख लिहावा असा बेत आहे.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 6. मी याच ब्लॉगपोस्टवर आधी कॉमेंट देऊन विचारले होते, की ह्या विमानोड्डाणाची माहिती केसरी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती, ते केसरी वर्तमानपत्र संदर्भासाठी उपलब्ध आहे का? पण माझी ती कॉमेंट प्रकाशित झालेली दिसली नाही. मला या बातमीबद्दल संशय आहे म्हणून मी हा प्रश्न विचारला असे नसून, मला अधिक अभ्यासासाठी त्याची माहिती हवी आहे. बाकी याबाबतीतली माझी मते मी सविस्तरपणे आधीच http://tinyurl.com/38433av या ब्लॉगपोस्टवर दिली आहेत. ती जिज्ञासूंनी जरूर वाचावीत.

  • प्रिय डीडी यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   गणेशोत्सवामुळे उत्तर देण्यास विलंब झाला, याबद्दल क्षमस्व. (बंगालात दुर्गापूजेच्या काळात सर्वत्र अघोषित बंद पाळला जातो. तसाच आपल्याकडील गणेशोत्सवाचा उत्सव !!)

   आपल्या आधीच्या पत्राला लिहिलेल्या उत्तराप्रमाणे स्वतः केसरी दैनिकाच्या सध्याच्या व्यवस्थापनालाही एवढे जुने अंक मिळतील की नाही याबद्दल दाट शंका वाटते. ह्या सर्व वादाबद्दल आमची मते स्पष्ट करण्यासाठी आणखी एक लिहिणार आहोत. जरूर वाचावा.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० स्मित गाडे यांसी,

     सप्रेम नमस्कार.

     माहितीबद्दल आभारी आहोत. प्रयत्न करून पहायला हवा. मागे आमचे एक मित्रवर्य काही माहितीसाठी तिथे गेले होते. तेव्हा त्यांना आलेला अनुभव एखाद्या सरकारी कार्यालयाप्रमाणेच भावनाशून्य, निरुत्साही असा होता असे कळले. असो. कदाचित वेगवेगळ्या माणसांची वर्तणूक वेगवेगळी असेल. कारण अशा संस्थांमध्ये निश्चित असे ग्राहकविषयक धोरण नसते.

     क०लो०अ०

     – अमृतयात्री गट

   • स्मित गाडे यांस,
    आपण दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे. मी पुण्याला गेले, तर केसरीवाड्यात जाऊन ती बातमी शोधण्याचा प्रयत्न करेन. आणि शक्य झाले तर त्या बातमीचा एखादा फोटो / झेरॉक्स प्रतीची स्कॅन केलेली इमेज आंतरजालावर टाकेन. बघू या पुण्याला जायचे कधी जमतेय ते!

    • प्रिय श्रीमती देवयानी देवकर यांसी,

     सप्रेम नमस्कार.

     आपली उत्साहपूर्ण प्रतिक्रिया वाचून अत्यंत आनंद झाला. आपले पत्र श्रीमती स्मिता गाडेंसाठी येथे प्रसिद्ध करीत आहे. आपल्या प्रयत्नांच्या फलश्रुतिबद्दल नक्की कलवावे. आतुरतेने वाट पाहत आहोत. आपल्या प्रयत्नांना उत्तम यश लाभो अशी सदिच्छा सर्व अमृतमंथन परिवाराच्या वतीने व्यक्त करतो.

     क०लो०अ०

     – अमृतयात्री गट

  • प्रिय डीडी यांसी,

   सप्रेम नमस्कार. मूळ लेखात आणखी काही भर घातली आहे. पुन्हा वाचून पहा. कदाचित आपल्याला स्वारस्य वाटेल.

   आता त्यात उल्लेख केलेल्या कॅप्टन आनंद जयराम बोडसांच्या ’प्राचीन भारतीय विमानशास्त्र’ या पुस्तकात आपल्याला काही अधिक माहिती व आणखी पुस्तकांचे संदर्भ सापडतील.

   याच विषयावरील नवीन लेखही प्रसिद्ध करणार आहोत. तोदेखील प्रसिद्ध झाल्यावर वाचावा.

   आभारी आहोत.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • प्रिय श्री० अजय कुंजीर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपले म्हणणे अगदी योग्यच आहे. ती चूकच आहे. लेख प्रकाशित झाल्यावर चूक लक्षात आली होती. पण “अमृतमंथनाचे वाचक सूज्ञ आहेत. त्यांना चूक लगेच लक्षात येईल व ते गैरसमज करून घेणार नाहीत.” अशी खात्री असल्यामुळे एका चुकेसाठी संपूर्ण लेख पुन्हा प्रकाशित करण्याचा आळस केला.

   असो. चूक, भूल द्यावी घ्यावी.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • प्रिय श्री० नचिकेत गद्रे यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   ही तर आपण फारच चांगली माहिती सांगितलीत. आपल्या पत्रावरून आपल्याला व्यक्तिशः कॅप्टन आनंद जयराम बोडस यांच्याबद्दल अतीव आदर असल्याचे लक्षात येते. ४०-४५ वर्षे विमानक्षेत्रात एक तज्ज्ञ वैमानिक म्हणून घालवलेल्या कॅप्टनसाहेबांनी स्वतः प्राचीन भारतीय शास्त्रांचा अभ्यास करण्यात ३२-३५ वर्षे घालवली आहेत. म्हणजे त्यांचा अभ्यास अंदाजाने मोडीत काढण्याएवढा अगदीच तकलादू नसावा असे आम्ही सर्व मानतो.

   मी स्वतः कॅप्टन आनंद बोडस यांचे एक दीर्घ व्याख्यान (लेक्चर) ऐकले आहे. त्यांचा भारतीय ज्ञान-विज्ञान परंपरेबद्दलचा सखोल अभ्यास व त्यातून निर्माण झालेला तीव्र अभिमान ह्या दोन्ही गोष्टींची स्पष्ट जाणीव त्यांच्या व्याख्यानातून होते. त्यांच्या ’प्राचीन भारतीय विमानशास्त्र’ ह्या पुस्तकात देखील (ते स्वतःच्या पुस्तकांना ग्रंथ म्हणतात आणि ते योग्य देखील आहे) त्यांच्या या भावना जागोजागी प्रतीत होतात. त्याखेरीज समर्थ रामदास स्वामी व आचार्य अत्रे ही देखील त्यांची पूज्य श्रद्धास्थाने असल्याचे त्यांनी पुन्हापुन्हा बोलून दाखवले.

   शक्यतो सर्वत्र शुद्ध मराठी बोलणे व आपली सहीदेखील मराठीत करणे हे देखील त्यांच्या स्वाभिमानी स्वभावाचेच पैलू. हल्ली जसे धेडगुजरी मराठी बोलले वा लिहिले जाते; तसे ते झोपेतही बोलणार नाहीत. “मराठी बोलताना योग्य मराठी शब्द उपलब्ध/रूढ असतानाही इंग्रजी किंवा हिंदी शब्द वापरले तरच आपल्याला सुशिक्षित समजले जाईल अन्यथा आपल्या शिक्षणाबद्दल, हुशारीबद्दल संशय घेतला जाईल अशा भोंदू (pseudo), न्यूनगंडग्रस्त, मनाने अजूनही इंग्रजांची गुलामी करणार्‍यांपैकी मी नाही” असे मत ते स्पष्टपणे व्यक्त करतात. (आपल्यालाही त्यांच्या या अशा स्वाभिमानी स्वभावाचा अनुभव असेलच. आणि ते सर्व विचारात घेऊनच आपण त्यांना आदराचे स्थान दिले असेल अशी खात्री आहे.)

   इतर विषयांबद्दल जाऊ दे पण केवळ आपल्या या प्रस्तुत लेखातील नायक (किंवा खलनायक?) शिवकर बापूजी तळपदे ह्यांच्या विमानोड्डाणाच्या प्रकरणाबद्दल त्यांनी केलेल्या विवरणामधील काही विधाने केवळ मासल्यासाठी प्रस्तुत लेखात उद्धृत केली आहेत, ती कृपया नक्की पहावीत. (प्रस्तुत लेखात ही भर नुकतीच घालण्यात आली आहे. कृपया लेख पुन्हा उघडून पहावा.)

   विमानशास्त्राव्यतिरिक्त बोडससाहेबांनी ’श्री गणपती अथर्वशीर्ष आणि विज्ञान’, ’आचार्य वराहमिहिर’, असे एकूण ९-१० ग्रंथ लिहून आपले आजोबा नव्हे तर खापर-खापर ……. पणजोबा सर्वात शक्तिमान असल्याच्या विविध क्षेत्रातील श्रेयभक्तीच्या दुखण्यांचे पुरावे सादर केले आहेत. आम्ही आपले आय०आय०टी०चे ज्ञानही त्यांच्या ज्ञानापुढे फिके समजतो. (आम्ही आय०आय०टी०मध्ये शिकलेल्या ’श्रॉडिंजचे समीकरण’ या हमखास नापास करणार्‍या प्रकरणाचा जनक नोबेल पारितोषिक विजेता श्रॉडिंजर याने केलेले वेदांतील quantum physicsच्या ज्ञानाचे कौतुक ऐकले की त्याचा आमच्या पणजोबांचे एवढे भरभरून कौतुक करण्यात काय डाव आहे असा प्रश्न आम्हाला पडत असे.)

   बोडससाहेब अभ्यासाच्या बाबतीत गंभीर आहेत पण त्याचबरोबर अत्यंत विनोदी शैलीत चर्चा करतात. (हा आचार्य अत्रेंचा प्रभाव असावा.) मात्र कोणी अभ्यास न करता केवळ वरवरच्या ज्ञानाच्या आधारावर आपल्या अभ्यासाबद्दल संशय घेतो आहे किंवा तुच्छतेने, छद्मीपणाने शेरे मारतो आहे असे वाटले तर ते त्याची त्याहून अधिक धारदार ’अत्रे’करी शैलीत चंपी करतात.

   आपण ज्यांना गुरूस्थानी मानता अशा कॅप्टन बोडसांशी या विषयाबद्दल नक्की अभ्यासपूर्ण चर्चा करावी. आम्हालाही उत्तरे कळवा. उपकृत होऊ.

   आपल्या शंकांमुळे आमचाही या विषयावरील गृहपाठ किंचित अधिक पक्का झाला, त्याबद्दल मनापासून आभार. अर्थात ’प्राचीन भारतीय विज्ञान परंपरा’ हा विषयप्रांत एवढा विस्तृत व गहन आहे की त्यातील एकेका छोट्याछोट्या विषयालाही एकेक आयुष्य पुरणार नाही. त्यामुळे शंका घेऊन ते उडवून लावण्यापेक्षा बोडससाहेबांप्रमाणे अभ्यासपूर्वक काही करून दाखवणे शक्य झाले तर आपल्या आयुष्याचे चीज होईल असे मी स्वतः मानतो.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गटसदस्य

 7. On the other side, please let me state one thing. Wright brothers have neither claimed nor credited for first aircraft ever.

  They are credited for first heavier than air feasible aircraft WITH HUMAN.

  So they are no FIRST as you believe.

  Machines that just fly without humans were made by them and many others for years before their experiment.

  Kite for example..

  Though it was with string,there have been manless flights in past before. No problem in giving credit to Shivkar ji for manless type.

  Just ion propulsion engine and comarison with Wright Bros. is not digestable.

  Believe there is nothing skeptic in this..

  Viman gahal..aani manavrahit chee manned aircraft shee tulana..kashahee tone madhe mhatale tari kharech aahe na te?

  Yapudhe tari ase homework chi vahi Shaalechyaa vatet sandanyaachaa prakaar thambvooyaa ani apale shodh jatan karun patent karun tikavooyaa.

 8. Well, its sad that I am probably not able to even put my point in right and balanced words.

  Probably our planes of thoughts are different. Mee kaheetari tuchchhatene ‘udavoon’ lavato ahe ashee tumchi ji kaahi samjoot jhali aahe ti ya sarvaachya mulaashee aahe. Aso.

  ‘Aapla’ abhimaan, ‘tyaanchi’ gulamgiri ya taddan bhougolik ani rajkeey seemaresha science chya field madhe ekada apan anlya ki mag kay bolaave?

  Ho Shrodinger sahebaane aaplya vedaancha adarane ullekh kela..majhya adheechya comments madhe me anu,shoony, kaalpravaas ashaa bharatiy concepts chi poch dili hoti. Quantum mechanics madhe yaach theories cha ullekh Shrodinger ne krutadnypane kela tyaat tyala gulam giri vatali nahi.

  ani tyane pudhe khoop vistaar hee.kela pratyaksh application madhe sarv kahi anale te pardeshi shastrdnyaani.

  Apan ekahee viman kele naho. Yapudhe tari shodh gahal karu nakoya ase me mhanat hoto.

  With apologies,I was not able to even make my feelings reach you. Leave alone proving or convincing.

  I had also said something more but then in selective or defferred comment approval it may have lost meaning.

  You may please not publish this comment too.

  Just wanted to communicate to you that if ‘we’ are different than ‘them’ in science also, then we better accept our shortfall in practical application of knowledge. Else we will stay here arguing for next 100 years over vedas and US UK will implement all theory in them.

 9. Mee phakt sadha Physics graduate ahe.
  Vimana vishayi mhanal tar mee CPL sathi lagnare Aircraft and Engine,navigation vagaire pariksha utteern kelya ahet. Ani viman udavale ahe.

  Evadhya bhandvalavar me garv balgoon charcha karat hoto. Chhadmi tuchch virodh navhe..pan aso.

  arthaat apan IITian ahat he apan sangitalyane ata aplya matala ek vegale vajan prapt jhale. Tumhala jar ion propulsion engine vaprun talpadeni 1500 foot udavale he kadachit khare vatat asel tar amhi vinashart te many karto. Karan IIT itake changale standard kahi aaj tari upalabdh nahi.

  IIT mhatlyavar tumhi naveen yugache vidnyaankarte ahaat. Theory ani practical cha ideal milaph karnarya sansthet shikalele. Haat jodun vinanti karto ki yapudhache shodh sambhallon thevale jatil he bagha ani junya bharteey tatvgyanaat je kahi sapdel tyache ‘practical’ implementation kara. Banava ek poorn bharateey viman. Nidan anek dashake rakhadlela saras vimaan project canadian engine aivaji adhunik bharateey ‘Bharadvaj’ engine install karun revive karnyacha prayatn kara.

  Intel pentium,photon gharoghari nako. Yeu de ‘Anu’ processor. windows nako..yeu de bharat OS. Gharoghari..

  Gharoghari..jagbhar.. Delhi chya eka vigyan sanshodhan kendrat nako.

  Pudhachi tees pastees varshe me jivant ahe. Baghayala milo yatale kahi itakich sadichchha.

 10. दोन महिन्यांपर्यंत माझ्या तीन प्रतिक्रिया आपण प्रकाशित करू नयेत याचा खेद वाटला. तेवढा नमूद करतो.

  आपण आपली बाजू अगदी योग्य त-हेने मांडली आहे त्याबद्दल कौतुकच. माझी बाजू समजा योग्य नसली तरीही माझ्या उर्वरित प्रतिक्रियाही उत्स्फूर्तच होत्या. त्यात आक्षेपार्ह, असभ्य असंही काही नसावं याची मला खात्री आहे.

  दोन महिने हा काळ उत्स्फूर्तता आणि इतर सर्वच बाबतीत मारक ठरण्याइतका मोठा आहे.

  या “सिलेकटीव्ह नेस”मुळे उत्स्फूर्तता जाते आणि प्रतिक्रिया देण्याची इच्छाही.

  • प्रिय श्री० नचिकेत गद्रे यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपला असा समज झाल्याबद्दल खरोखरच वाईट वाटले. आपली शेवटची दोन पत्रे प्रकाशित न करण्याची मुख्य कारणे खरं म्हणजे आपल्या समजुतीच्या बरोब्बर उलटी आहेत.

   प्रस्तुत विषयावरील आपल्या शेवटच्या दोन पत्रांव्यतिरिक्त सर्व पत्रांना उत्तरे देऊन ती प्रकाशित केली होती. पण आता पाहतो तर आपली ३-४ पत्रे अप्रकाशित दिसत आहेत. म्हणजे उत्तरे दिलेल्या पत्रांपैकी सुद्धा १-२ पत्रे राहिली. आमच्या महाजाल जोडणीमधील अडचणींमुळे (अति मंद वेग किंवा जोडणी तुटणे) बर्‍याचदा एखादी क्रिया अडकून राहते व आम्हाला झाली असे वाटली तरी ती झालेली नसते. आणि हे असे आपल्या बाबतीत झालेले दिसते. (उत्तरे दिसली होती ना?)

   आपल्या शेवटच्या दोन पत्रात असभ्य, आक्षेपार्ह असं काहीच नव्हतं हे १०१% खरं आहे. खरं तर पहिल्या काही पत्रांच्या मानाने हळूहळू शेवटच्या (सहाव्या-सातव्या) पत्रात आपल्या परस्पर मतांतील अंतर (दरी) बरीच कमी झालेली दिसते. शिवाय आपली ती पत्रे अत्यंत उमद्या, सौम्य भाषेत लिहिलेली आहेत हे देखील खरंच आहे. खरं म्हणजे आपण काही ठिकाणी अत्यंत नम्रपणे स्वतःला कमीपणा घेऊन काही विधाने केली आहेत. त्यामुळे ती पत्रे व्यक्तिगतच ठेवावी की काय असे आम्हाला वाटत राहिले. एरवी आपली मते आधी कळलेलीच आहेत. म्हणून मुद्दाम पुन्हा प्रसिद्ध केली नाहीत – उगीच विषय कशाला लांबवा? तसे आपल्याला आपल्या विपत्त्यावर पत्राने कळवायला पाहिले होते का? “मौनम्‌ सर्वार्थसाधनम्‌” असे म्हणतात. पण इथे “मौनम्‌ विसंवादसाधनम्‌” असे घडले खरे. अर्थात त्यास आम्हीच जबाबदार. तेव्हा आपली क्षमा मागतो. आपली सर्व पत्रे (चुकीच्या समजुतीने ठेवलेली दोन व नकळत, अनवधानाने राहिलेली १-२) प्रकाशित करीत आहोत. (कृपया पाहून कळवा.)

   कृपा करून राग मानू नये. आपणा सर्वांना मिळून मराठी भाषा, संस्कृती आणि मराठी माणूस यांच्यासाठी यथाशक्ती काही ना काही करायचे आहे, करीत राहायचे आहे. आपल्यातच विसंवाद झाला (मराठी परंपरेनुसार) तर ते कसे शक्य होईल?

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० नचिकेत गद्रे यांसी,

     सप्रेम नमस्कार.

     हुश्श्यऽऽऽ ! डोक्यावरचं ओझं उतरलं; निदान डोक्यावरून खांद्यापर्यंत आलं असं तरी म्हणू !! कारण अजुनही “इतःपर” अशी पुणेरी पाचर मारून ठेवलेली आहेच.

     पण अतःपर काय? (अतःपर = यापुढे, यानंतर, hence, henceforth)

     (आपल्या द्रुत खयालाला नेहमीप्रमाणे आमच्या विलंबित खयालाचे उत्तर !)

     असो. आभारी आहोत.

     क०लो०अ०

     – अमृतयात्री गट

  • प्रिय श्रीमती राही अनिल बर्वे यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या पत्राचा नक्की अर्थ समजला नाही. परंतू तो काहीतरी विनोदी, हलकाफुलक्या चेष्टेचा मुद्दा असावा असे आपण पाठवलेल्या स्मितमुद्रेवरून (smiley) वाटते.

   आभारी आहोत.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 11. अत:पर आपली नवनवी पोस्टे वाचणे आणि पटल्यास पाठिंबा. नाही पटलं तर भांडण करण्याचा हक्क आपण मला देण्याएवढी जवळीक झाली आहेच.

  🙂 by the way..due to goof up in vocabulary, I intended it:par as henceforth..

  Thanks for accurately indicating it.

  • प्रिय श्री० नचिकेत गद्रे यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या (नेहमीप्रमाणे) तत्पर उत्तराबद्दल आभार. आपण विमानचालन करीत असतानाही विमान स्वयंचालन (auto pilot) पद्धतीमध्ये घालून अंकस्थ संगणकावरून (laptop computer) सतत महाजालावरून पत्रांना उत्तरे वगैरे प्रकार अखंड व विनाविलंब चालू ठेवत असता असा आम्हाला दाट संशय आहे.

   असो. आपल्या नेहमीच्या द्रुत खयालाला आम्ही यावेळी अगदीच विलंबित नाही तरी निदान मध्यलयातील उत्तर देतो.

   ———
   नाही पटलं तर आपली मते मांडण्याचा, वाद घालण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. पण त्याबाबतीत आपण बॅ० नाथ पै यांच्यासारख्या हुशार, अभ्यासू, प्रामाणिक पण त्याचबरोबर सुसंकृत व उमद्या टीकाकाराचा आदर्श डोळ्यासमोर ठेवू.

   असो. त्यावरून मराठी माणसाला अभिमान वाटेल अशी एक गोष्ट आठवली. आपल्याला कदाचित माहित असेल. नाथ पैंची कडवट टीका ऐकून पंडित नेहरूही अत्यंत प्रभावित (म्हणजे घाबरे) होत असत. एकदा त्यांनी नाथ पैंना विचारले, “आपल्यासारख्या हुशार, अभ्यासू व प्रामाणिक माणसाने मंत्रीमंडळात सहभागी होऊन आपल्या देशाची सेवा करायला पाहिजे. आपल्याला कसला मंत्री व्हायला आवडेल?” बॅ० नाथ पैंनी तडफदारपणे (पूर्वीचा, आता अस्तित्वात नसलेला मराठी बाणा) नेहरूंना उत्तर दिले, “देशाच्या मंत्रीमंडळात माझा समावेश व्हावा असे आपल्याला खरोखरच वाटत असेल तर त्यासाठी आपल्याला आपली खुर्ची रिकामी करून द्यायला लागेल.” हे ऐकून नेहरूंची अवस्था काय झाली असेल याची कल्पनाच केलेली बरी. गांधीजींकडे रडून, रडी खाऊन वल्लभभाईं कडून हिसकावून घेतलेली खुर्ची नेहरू अशी थोडीच सुखासुखी सोडून देणार होते? पण दिल्लीच्या श्रेष्ठींचे जोडे (प्रत्यक्ष किंवा सूचक पद्धतीने) उचलणारे हे आजचे राजकारणी हा बाणा कुठे विकून आले आहेत कोण जाणे !

   जवळीकीबद्दल म्हणाल तर जो कोणी स्वतःला अमृतमंथन परिवाराचा सदस्य मानतो व त्याच्या मर्यादा मानतो, तो प्रत्येकच आपल्याला जवळचा; त्यासाठी आपली सर्व मते तंतोतंत जुळण्याचे कारण नाही. (घरात, कुटुंबात तरी कुठे एकमत असते? पण नात्याची पथ्ये मात्र पाळावी लागतात. परिवार म्हणजे थोडे विस्तृत, विस्कळित कुटुंबच. तिथेही मतभेद, मतांतरे असणारच.)

   ’इतःपर’ हा आपला शब्द पूर्णपणे चुकीचा नाही असे आम्हाला वाटते. मूळ संस्कृत शब्द ’अतःपर’ असा असून त्याचा अर्थ ’ह्यापुढे’ असा असला तरी बहुधा त्याच्या ’इथवर’ या शब्दाशी असलेल्या ध्वन्य साधर्म्यामुळे मराठीमध्ये ’इत:पर’ असा शब्द ’इथपर्यंत’ अशा अर्थी वापरला जाऊ लागला असा आमचा कयास आहे. (निश्चित व्युत्पत्ती एखाद्या मराठीच्या भाषाशास्त्रज्ञालाच विचारावी लागेल.) तेव्हा आपण वापरला तो शब्द अगदीच चुकीचा नाही असे आम्हाला तरी वाटते. कारण तसाही तो कधीकधी ऐकण्यात आलेला आहे. परोक्ष या संस्कृत शब्दाबद्दल अप्रत्यक्ष या शब्दासारखा कानाला लागणारा अपरोक्ष हा शब्द परोक्षच्या जागी मराठीत जन्माला घातला गेला. तसाच हा ’इतःपर’चा प्रकार असावा. भाषा ही गणिताप्रमाणे चोखपणे नियम पाळीत नाही. त्यातल्या त्यात कितीतरी अधिक चोख भाषा म्हणजे संस्कृत. म्हणून आज आपल्याला सातशे वर्षांपूर्वीची ज्ञानेश्वरी नीटशी समजत नाही, तेव्हाची इंग्रजीही समजत नाही, पण दोन हजार वर्षांपूर्वीची संस्कृत भाषा मात्र बर्‍यापैकी समजते. पाणिनी ऋषींच्या आधीच्या जुन्या वैदिक संस्कृतच्या बाबतीत मात्र अडचणी येतात. अर्थात तरीही इतर भाषांच्या मानाने कमीच. म्हणूनच तर संस्कृत ही संगणकास योग्य अशी एकमेव नैसर्गिक भाषा (natural language – as opposed to the computer programming languages) मानली जाते. एवढ्या जुनी दुसरी कुठलीही भाषा सातत्याने जिवंत राहिलेली नाही. ह्याचे श्रेय आपण आपल्या आजोबांपासून वरच्या सर्व पितरांना द्यायलाच पाहिजे. आपल्या वडिलांच्या व आपल्या पिढीने मात्र मेकॉले नावाच्या पिपाणीवाल्याच्या मागे लागून सर्वावरच पाणी सोडले. ते तेवढे व्हायला नको होते, असे राहून राहून वाटते. संस्कृत-मराठी, भारत-महाराष्ट्र यांच्या बाबतीत अशा अनेक अरुचकर, अनिष्ट घटना घडलेल्या आहेत. अर्थात झाल्या गोष्टीबद्दल पश्चात्‌ शोक करण्यापेक्षा होऊ घातलेल्या गोष्टी कशा सुधारता येतील यासाठी आजच्या (म्हणजे मुख्यतः तुमच्या) पिढीने बुद्धी व श्रम खर्च केले पाहिजेत.

   काही श्रेष्ठ मराठीजनांनी (भूतपूर्व नौदल प्रमुख आवटी आणि दुसरे एक – नाव लक्षात नाही) यांनी स्वतंत्रपणे कालिदासाच्या मेघदूतातील मेघाच्या प्रवासमार्गाचा आकाशातून विमानाने प्रवास करून अभ्यास केला होता व कालिदासाने वर्णिलेली नैसर्गिक परिस्थिती, वने, डोंगर, दर्‍या, नद्या, वस्त्या, पक्षी, हवामान, अंतरे ही कशी अचूक आहेत याचे सखोल अभ्यासात्मक परिशीलन केले होते असे अंधूक आठवते. आपण तसाच एखादा विषय घेऊन काही अभ्यास का करीत नाही? आपले वैमानिकाचे ज्ञान, आपली बुद्धी, चौकसपणा, अभ्यासूवृत्ती, “बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर” ही वृत्ती – असे सर्वच गुण त्यासाठी उपयोगी पडतील, किंबहुना कसाला लागतील आणि त्यातून आपल्याला स्वतःला तर अतीव आनंद मिळेलच पण आम्हा इतर सामान्य भारतीयांच्यासाठी देखील ते ज्ञान फार महत्त्वाचे ठरेल. रामायण, महाभारत, मराठ्यांचा इतिहास, अशोकाचे साम्राज्य, गुप्त साम्राज्य, देवगिरीचे साम्राज्य, इतर प्राचीन संस्कृत साहित्य यांच्या अनुषंगाने आपल्याला अभ्यासासाठी अनेक विषयसूत्रे (themes) मिळू शकतील. त्यातील आवडीचा व योग्य विषय निवडून प्रकल्प करावा. प्रबंध लिहावा. त्यासाठी आजच आमच्या अगाऊ शुभेच्छा. (अनाहूत सल्ला देण्याच्या आगाऊपणाबद्दल आम्ही आपली अगाऊ क्षमा देखील मागतो.)

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • प्रिय श्री० नचिकेत गद्रे यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या तत्पर उत्तराबद्दल आभारी आहोत. तत्परतेच्या बाबतीत आम्ही आपली बरोबरी करूच शकत नाही.

   {{Pan durdaivaane me pilot as career karu shakalo nahee.}}
   आपण वैमानिकत्वाचा व्यवसाय म्हणून स्वीकार केला नसलात तरी आपल्याकडे तत्सबंधी कौशल्य-ज्ञान-क्षमता-पात्रता आहेच ना? मग त्याचा उपयोग आपण नक्कीच करू शकता. आमच्या सारख्याला करीन म्हटले तरी ते शक्य नाही. नौदल प्रमुख आवटीसुद्धा व्यावसायिक वैमानिक नव्हतेच. असो. आपची एवढीच सूचना की आम्हा इतर सामान्यजनांपेक्षा आपल्याकडे काही विशेष, वेगळे ज्ञान-कौशल्य आहे. त्याचा आपल्या उपयोग करून आपण स्वतःचे आयुष्यही सार्थ करू शकता व आपल्या समाजाच्या विशेष लाभाची गोष्ट संप्राप्त (achieve) करू शकता.

   जमीनीवर बसूनही तशा प्रकारचा अभ्यास, संशोधन करू शकता. तसा एखादा विशेष, अनन्यसाधारण उपक्रम सुरू केल्यावर त्याबद्दल अमृतमंथनावरही नक्की लिहावे असे अगाऊ आमंत्रण आम्ही आजच देऊन ठेवतो.

   आपण तसा उपक्रम लवकरात लवकर सुरू करावा व त्यात आपल्याला उत्तम यश लाभो अशी शुभेच्छा व्यक्त करतो.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • प्रिय श्री० नचिकेत गद्रे यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   कॅप्टन भावेंच्या त्या मेघदूतच्या पडताळणीच्या उपक्रमाबद्दल एखादा टीकात्मक (टीका या शब्दाचा मूळ, चांगला अर्थ घ्यावा) लेख (दीर्घ लेख) का लिहित नाही? अमृतमंथनाच्या वतीने जाहीर आमंत्रण देतो.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • प्रिय श्री० श्रीनिवास चिरपुटकर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या दोन्ही पत्रांना हे एकच समाईक उत्तर देतो.

   आपल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहोत. लेखाखालील चर्चाचौकटीमधील चर्चा वाचलीत का? विविध वाचकांनी विविध मते व्यक्त केली आहेत. अवश्य वाचा.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० श्रीनिवास चिरपुटकर यांसी,

     सप्रेम नमस्कार.

     आपल्या पत्राबद्दल आभारी आहोत. आपण अमृतमंथनावरील नवीन लेख ह्यांच्याबद्दल विपत्राद्वारे थेट सूचना मिळवण्यासाठी जी सोय आहे तिचा उपयोग करून घ्यावा, ही विनंती.

     क०लो०अ०

     – अमृतयात्री गट

  • प्रिय श्री० स्वप्निल यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   अभिप्रायाबद्दल आभार.

   अमृतमंथनावरील इतर लेखांवरही नजर घालावी. बरे वाटतील ते वाचावेत. आवडतील ते मित्रमंडळींना अग्रेषित करावेत. आपले प्रतिमत (feedback) लेखाखालील चर्चा चौकटीत लिहावा.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • प्रिय श्री० विराज नाईक यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपले निरीक्षण अचूक आहे. ती कारकुनी चूक राहून गेली खरी.

   अमृतमंथनावरील इतर लेखांवरही नजर घालावी. बरे वाटतील ते वाचावेत. आवडतील ते मित्रमंडळींना अग्रेषित करावेत. आपले प्रतिमत (feedback) लेखाखालील चर्चा चौकटीत लिहावा.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 12. या विषयाशी संबंधित असलेली अजून थोडी माहिती इथे देत आहे.

  इजिप्तमध्ये सराका येथे प्राचीन इजिप्शियन कालातील विमानसदृश पण पक्ष्याच्या आकारातली छोटी प्रतिकृती सापडल्याची नोंद आंतरजालावर उपलब्ध आहे. तसेच दक्षिण अमेरिकेत प्राचीन प्री-कोलंबिअन काळातील विमानसदृश आकाराच्या सोन्याच्या छोट्या प्रतिकृती सापडल्याची नोंदही आंतरजालावर आहे. यासंबंधी अधिक माहितीसाठी खालील दुवे पहावेत.

  http://www.bibliotecapleyades.net/esp_aviones_precolom02.htm

  • प्रिय श्रीमती देवयानी देवकर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपण पुरवलेल्या माहितीबद्दल आभार. आपण दिलेली माहिती अमृतमंथनच्या वाचकांसाठी इथे प्रसिद्ध करीत आहोत.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s