मराठी शाळांना मान्यता नाकारण्याचा शासनाचा निर्णय अन्यायकारक आहे का? (आयबीएन लोकमत)

मराठी शाळांच्या प्रश्नाबद्दल आच असणार्‍या प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणसाने पहायलाच पाहिजे असा हा ६ सप्टेंबरचा आयबीएन लोकमत वाहिनीवरील ’आजचा सवाल’ कार्यक्रम झाला. या कार्यक्रमामुळे अनेक दिवसांनी एका महत्त्वाच्या विषयावर एक उत्तम, अभ्यासपूर्ण, मुद्देसूद व निर्भीड चर्चा पाहिल्याचा अनुभव मिळाला. असा अत्युत्तम कार्यक्रम सादर केल्याबद्दल त्या कार्यक्रमाचे सूत्रधार श्री० निखिल वागळे यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

’आजचा सवाल’ कार्यक्रमामधील चर्चेबद्दल अधिक माहिती व त्या कार्यक्रमाच्या चलचित्रणाचा दुवा खाली दिलेल्या दुव्यावरील लेखात उपलब्ध आहे.

अमृतमंथन_मराठी शाळांना मान्यता नाकारण्याचा शासनाचा निर्णय अन्यायकारक आहे का_100907

आता ह्या प्रश्नावर वातावरण तापलेलेच आहे; ते थंड होऊ न देता राज्यशासनाला आपल्या अन्याय्य व अत्याचारी धोरणात आवश्यक त्या सर्व सुधारणा करण्यास भाग पाडेपर्यंत आपण आपला लढा चालूच ठेवायला हवा.

सर्व स्वाभिमानी मराठी नागरिकांना आमच्या या शासनाच्या मराठी शाळांविरोधी धोरणाविरुद्ध लढ्यास यथाशक्य पाठिंबा देण्याची आम्ही कळकळीची विनंती करतो.

– ’शिक्षण अधिकार समन्वय समिती’

(रमेश पानसे, सुनीती सु० र०, सुधा भागवत, सुहास कोल्हेकर, विजय पाध्ये, सलील कुळकर्णी)

(ई-मेल: shi.a.sa.sa@gmail.com)

ता०क० प्रस्तुत विषयावरील अन्य लेख खालील दुव्यावर सापडतील.

महाराष्ट्राच्या सुजाण जनतेस आवाहन (शिक्षण अधिकार समन्वय समिती)

.

13 thoughts on “मराठी शाळांना मान्यता नाकारण्याचा शासनाचा निर्णय अन्यायकारक आहे का? (आयबीएन लोकमत)

 1. माझ्याकडे ३०-४-२०१० चा सामनामधील कात्रण आहे. बातमीनुसार मे १० च्या आत मराठी शाळांना मान्यता देण्याचा मिर्णय घ्यावा, असा आदेश उच्च न्यायालयानं दिल्यां आढळेल. ते कात्रण काढून नंतर पुन्हा लिहीन.
  खरं तर मराठी शाळांना मान्यता हा विषय सरकराच्या अधीन असूच नये. हे काम स्वाभाविकपणंच व्हायला हवं. शिक्षणाबद्दलच्या अटींची पूर्तता झाली म्हणजे पुरेसं असावं. नाही तरी इंग्रजी शाळांत कुठं दर्जेदार शिक्षण मिळतं. जे मिळतं त्याला दर्जेदार म्हणायचं, इतकंच.

  • प्रिय प्रा० राईलकर सर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   गणेशोत्सवामुळे उत्तर देण्यास विलंब होत आहे, याबद्दल क्षमस्व. (बंगालात दुर्गापूजेच्या काळात सर्वत्र अघोषित बंद पाळला जातो. तसाच आपल्याकडील गणेशोत्सवाचा उत्सव !!)

   त्या कात्रणाबद्दल अवश्य माहिती द्यावी. वाट पाहतो.

   औरंगाबाद खंडपीठाच्या निवाड्यात वरवर मातृभाषेतून शिक्षणाबद्दल बरेच लिहिले आहे. अनेकांचे दाखले दिले आहेत. पण शेवटी शासनालाच सर्व विचार करून निर्णय द्या असे सांगून मोकळी वाट करून दिली आहे.

   आजकाल पत्रकार तरी कितपत अभ्यासपूर्वक लिहितात कोण जाणे.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 2. हा कार्यक्रम फारच छान झाला. शिक्षण मंत्र्यांकडे काही तार्किक उत्तरेच नव्हती. त्यांनी एकाच धोशा लावून ठेवला होता. “बृहत आराखडा” आणि गेल्या दहा वर्षापासून हा आराखडा तयार नाही. तर मग इंग्रजी, उर्दू, कन्नड शाळांना परवानगी कशी दिली ? तो आराखडा तीन महिन्यात तयार होईल असे त्यांचे म्हणणे आहे. पण गेली दहा वर्षे त्यांनी बनविला नाही तर तो येत्या तीन महिन्यात कसा तयार होईल ? त्यांच्यावर विश्वास ठेवून बघू या. पण त्यांचा दुसरा तर्क ‘नवीन मराठी शाळांना परवानगी दिली तर त्या अनुदान मागतील म्हणून त्यांना परवानगी नाही’ असा आहे. तर मग पहिले बृहद आराखड्याचे कारण का सांगितले ? आणि एकीकडे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी “सर्वांना शिक्षण सक्तीचे ” असे केंद्र सरकारचे धोरण आहे असे जाहीर केले. धोरण जाहीर केले तर मग मुलांच्या शिक्षणाची आर्थिक तरतूद केलीच असेल ना? मग महाराष्ट्र सरकार मराठी शाळांना अनुदान द्यायला का तयार नाही ? जरी हजारो मराठी शाळा निघाल्या तरी मुले जेव्हढी जन्मलेली आहेत तेव्हढीच शाळेत येणार ना ? आणि तेव्हढ्या मुलांचेच अनुदान शाळा मागणार ना ? कारण शाळांना अनुदान हे विद्यार्थी संख्येवर मिळते. शाळांची संख्या जास्त झाली तर मुलांना ते फायद्याचेच ठरणार आहे कारण त्यांना घराजवळच शाळा मिळतील आणि भविष्यातील मुलांची देखील सोय होईल.
  थोडक्यात , एकाच निष्कर्ष निघतो – तो म्हणजे मराठीचे महत्व मुद्दाम कमी करायचे, म्हणजे लोक आपोआप इतर माध्यमांकडे (इंग्रजीकडे) वळतील त्यामुळे मराठीविषयी समाजात स्वाभिमान कमी होईल व मराठीचा अभिमान जोपासणारे पक्ष (शिवसेना वगैरे ) सत्तेत येवू शकणार नाहीत. परिणामी, सध्याच्या राजकारण्यांना पुन्हा सत्तेत येणे सोपे होईल. ही खरी मेख आहे. ह्याला पुरावा म्हणजे सध्याचे दुसरे एक मंत्री श्री सुनील तटकरे हे परवाच पुण्यात येवून गेले व त्यांनी देखील इंग्रजीचे महत्व अधोरेखित केले. म्हणून सध्याच्या सरकारचा हा घातकी प्रयत्न आपण हाणून पाडला पाहिजे.

  • प्रिय श्री० राजेश पाटील यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   गणेशोत्सवामुळे उत्तर देण्यास विलंब होत आहे, याबद्दल क्षमस्व. (बंगालात दुर्गापूजेच्या काळात सर्वत्र अघोषित बंद पाळला जातो. तसाच आपल्याकडील गणेशोत्सवाचा उत्सव !!)

   आपले प्रत्येक वाक्य पटते. त्यावर आणखी काय बोलणार? आपण पारतंत्र्यात आहोत की काय अशी शंका येण्यासारखी परिस्थिती आहे.

   सुनील तटकरे काय, बाळासाहेब थोरात काय किंवा अशोक चव्हाण काय. हे सर्वच कुठल्याही शिक्षणतज्ज्ञाचा सल्ला न घेता आपली मते इतक्या आत्मविश्वासाने कशी मांडतात याचे आश्चर्य वाटते. अर्थात स्वतःच्या अज्ञानाचे ज्ञान होण्यासही थोडेफार ज्ञान आवश्यक असते म्हणा. म्हणूनच मोठे संशोधक स्वतःला अज्ञानी समजतात व तटकरे, थोरात व चव्हाणांसारखे राजकारणी स्वतःला सर्वज्ञ समजतात.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 3. Let me thank Mr. Wagale for conducting the program without any aggression from any body. It is quite evident that the present govt. is least interested in promoting,preserving or protecting Marathi. It is likely that they me getting directions from their high command. For them the orders from high command are more important than their own mother tongue which obviously has been taught by every individuals mother. If they can not respect the mother’s teachings, what else Marathi people can expect?.
  The agitation needs intensification and Marathi Medium school should get priority over all other regional languages including Hindi.
  During the course of discussions some body quoted suggestion of Mr. Raj Thakare that In all Marathi schools good quality English should be taught from pre primary or primary level and in all English schools good quality Marathi should be taught and should be made compulsory, irrespective whether it is aided or unaided school.

  • प्रिय डॉ० उदय वैद्य यांसी,

   सप्रेम नमस्कार. आपल्या प्रतिमताबद्दल (feedback) आभारी आहोत.

   गणेशोत्सवामुळे उत्तर देण्यास विलंब होत आहे, याबद्दल क्षमस्व. (बंगालात दुर्गापूजेच्या काळात सर्वत्र अघोषित बंद पाळला जातो. तसाच आपल्याकडील गणेशोत्सवाचा उत्सव !!)

   {{It is likely that they me getting directions from their high command.}}
   पण केवळ महाराष्ट्रातील कॉंग्रेसी राजकारण्यांनाच श्रेष्ठी दम मारतात, इतरांना नाही याचे कारण काय? त्यातच सर्व आले. कारण केवळ महाराष्ट्रीय राजकारणीच अशा स्वभाषेच्या विरुद्ध आदेश ऐकतात. आणि त्यांनी तसे केले तरी त्यांना जन्माचा धडा मिळेल असे आपण जनसामान्य काहीच करीत नाही, (ज्याची इतर राज्यांच्या बाबतीत तेथील राजकारण्यांनाच नव्हे तर दिल्लीश्वर श्रेष्ठींनाही जबरदस्त भीती असते). म्हणजे सरते शेवटी मूलभूत आपणा मराठी जनतेचूच आहे, नाही का? आपल्यालाच (बहुसंख्यांना) पुरेसा स्वाभिमान नाही.

   {{The agitation needs intensification and Marathi Medium school should get priority over all other regional languages including Hindi.}}
   या संबंधात आपल्या अनुदिनीवर बरेच लेख आहेत. त्यापैकी खालील लेख पहावेत. (सावकाश इतरांवरूनही दृष्टी टाकावी.)

   https://amrutmanthan.wordpress.com/2010/09/20/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%A6/

   https://amrutmanthan.wordpress.com/2010/09/20/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8/

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • प्रिय श्री० महेश र० कुलकर्णी यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   गणेशोत्सवामुळे उत्तर देण्यास विलंब होत आहे, याबद्दल क्षमस्व. (बंगालात दुर्गापूजेच्या काळात सर्वत्र अघोषित बंद पाळला जातो. तसाच आपल्याकडील गणेशोत्सवाचा उत्सव !!)

   आपल्या उत्स्फूर्त पाठिंब्याबद्दल अत्यंत आभारी आहोत. ह्या अनुदिनी (ब्लॉग) वर लक्ष ठेवावे. लेख वाचत जावे. मराठी माणसाच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर आम्ही आपल्यासारख्या तळमळीच्या वाचकांना उद्देशून लिहितच असतो. त्यालाच आम्ही हाक मारतो आहोत, बोलावत आहोत, पाचारण-आमंत्रण-आवाहन करत आहोत असे समजून ज्या-ज्या बाबतीत इच्छा होईल, आणि जेव्हा-जेव्हा, जसे-जसे शक्य होईल तेव्हा, तसे यथाशक्ती मदतीस धावून यावे. जेव्हा प्रत्यक्ष भाग घेणे शक्य नसेल तेव्हा आपल्या मनःपूर्वक शुभेच्छा, आशीर्वाद तरी नक्कीच द्यावेत.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 4. First of all, sorry for using english as I could not find Marathi language option on this site.

  I would like to ask the Education and Chief Minister of Maharashtra that Marathi is the State language of Maharashtra. As per rules every government transaction and correspondence should be done in Marathi only. But this govt is not following any norms laid down in the constitution and instead of encouraging people to use Marathi as its basic language, trying to close marathi schools. Such a stupid CM and Education minister has never happened so far in this State. At the same time people have also accepted the fad of convent schools (where the english language it self is not spoken gramatically correct). This all should stop at once. Some politicals parties though not right in their other activities, are trying and portraying to play marathi card fof their political gain. But they are not doing anything in this regard. People should also question them and force them to starg agitation against the govt. At the most individuals like us have very limited option to do anything against this govt. once we vote them to power. So we must think thrice before voting to any particular political party. Hope this govt wakes up and takes its Decision on Marathi school back, at once.

  • प्रिय श्री० रवींद्र अवसरे यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   गणेशोत्सवामुळे उत्तर देण्यास विलंब होत आहे, याबद्दल क्षमस्व. (बंगालात दुर्गापूजेच्या काळात सर्वत्र अघोषित बंद पाळला जातो. तसाच आपल्याकडील गणेशोत्सवाचा उत्सव !!)

   आपल्या पत्रातील वाक्यन्‌ वाक्य खरे आहे. अर्थात ह्यातील काही मते काही मराठी माणसांनाही पटण्यास, पचण्यास कठीण आहेत. पण आम्हाला तरी पूर्णपणे पटली.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 5. Me suddha maafi magato karan mala suddha marathi font sapadala nahi reply karayla….mhanun english madhun pan shabda sagale marathich…..mulaat mhanaje aaplya kade kase aahe ki 2 marathi manase pratham bhetali ki hindi tun sambhashan chalu kartat….aapanach jar marathi bolayla laajat asalo tar kay marathi bolayla baaherchi mandali yenar aahet ka? Aapanach marathi tun compulsory bolayla pahije mhanaje samorcha aapoapach marathi tun bolel…. aamcha office madhye 2 marathi lok aahet…khedkar ani deshpande…..me khup vela observe kela ki he doghe bhetale ki hindi tunach bolayla chalu kartat….me 2-3 vela tyanna ya varun hatakla suddha…even bahercha rajya tun ithe dhanda karayla aaleli mandali…tyan cha shi suddha aaple marathi lok hindi tun bolayla chalu kartat….mala vatate te jar ikade dhanda karayla aalet tar tyanni ithali local bhasha shiklich pahije…aani aapan sudha tyancha shi marathi tunach bolale pahije….me tari he sarva saddhya follow karato…..

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s