“…… हा युक्तिवाद म्हणजे हिंदी भाषिक गटाच्या बहुमताच्या जोरावर इतर सर्व भाषिकांवर हिंदी सक्तीने लादण्याचा प्रयत्न आहे, याचीही स्पष्ट कल्पना इतर भाषिकांना आली. त्यामुळे झाले काय की, एरवी हिंदीच्या बाजूने असणारे अन्यभाषिक सभासदही विरोधी पक्षाला जाऊन मिळाले. या व अशा भूमिकेमुळेच हिंदीला राष्ट्रभाषेचे स्थान गमवावे लागले आणि केवळ official language – कामकाजाची भाषा या बिरुदावर समाधान मानावे लागले.”
‘भारतीय संविधान व राजभाषा हिंदी’ ह्या लेखातून घेतलेला हा अंश आपले मित्र व विस्तृत मराठी वाचन असलेले श्री० विजय पाध्ये ह्यांनी हा लेख पाठवला आहे. प्रस्तुत लेखांश इतका स्वयंस्पष्ट आहे की त्यावर अधिक भाष्य करण्याची आवश्यकताच नाही. शिवाय प्रकृत लेखातील विचार तेवीस वर्षांनंतरही आजच्या राजकीय संदर्भात तेवढेच सयुक्तिक व लागू आहेत. अवश्य वाचा.
संपूर्ण लेख खालील दुव्यावर उपलब्ध आहे.
अमृतमंथन_हिंदीवाल्यांचे उघडे पडलेले दबावतंत्र_ले० वि०भि० कोलते_100815
या विषयावर बरेच चर्वितचर्वण झालेले आहे. आता राजकारणी, समाजकारणी, नेते, भूतकाळातील घटना, चुका यांना दोष देण्याऐवजी आपण – तुम्ही आणि आम्ही मराठीप्रेमी सामान्यजन – व्यक्तिशः व एकजूट करून काय करू शकतो यावर आपण विचार करूया. आपले विचार लेखाखालील स्तंभात नक्की मांडा.
– अमृतयात्री गट
ता०क० अमृतमंथनाच्या नवीन वाचकांसाठी अमृतमंथनावरील वरील लेखामधील हिंदी-राष्ट्रभाषेच्या घोळासंबंधी इतर लेख खालील दुव्यावर उपलब्ध आहेत.
“हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही” – केंद्र सरकारचा अधिकृत निर्वाळा (ले० सलील कुळकर्णी)
हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा! (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, १५ नोव्हें० २००९)
एकच अमोघ उपाय – मराठी एकजूट !! (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, २० डिसें० २००९)
काही लेखांच्या इंग्रजी आवृत्त्या:
Hindi, the National Language – Misinformation or Disinformation?
Hindi Will Destroy Marathi Language, Culture and Identity in Mumbai and Maharashtra (Tamil Tribune)
.
नमस्कार,
‘आता राजकारणी, समाजकारणी, नेते, भूतकाळातील घटना, चुका यांना दोष देण्याऐवजी आपण – तुम्ही आणि आम्ही मराठीप्रेमी सामान्यजन – व्यक्तिशः व एकजूट करून काय करू शकतो यावर आपण विचार करूया.’
आपण मराठी बातमीपत्र, कादम्बर्या,ग्रंथ वाचू शकतो. मराठी नाटक व इतर कार्यक्रम पाहू शकतो. आपसांत नेहमी मराठीत बोलु शकतो. मराठी चित्रपट, टीव्ही कार्यक्रम पाहू शकतो. मराठीत ब्लागिन्ग करू शकतो.
प्रिय श्री० शां० भास्करभट्ट यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपले म्हणणे पटते. केवळ इतिहासातच रममाण होऊ नये. केवळ इतिहासाच काथ्याकूट करणे, दोषारोप करणे यातही वेळ घालवू नये. परंतू इतिहासाकडे पूर्णतः काणाडोळाही करू नये. इतिहासापासून धडे नक्कीच घ्यावेत. श्रेष्ठ, आदर्श माणसांची उदाहरणे लक्षात ठेवावीत. तसेच पूर्वी झालेल्या चुका भविष्यकाळात टाळण्याचा प्रयत्न करावा.
{{आपण मराठी बातमीपत्र, कादम्बर्या,ग्रंथ वाचू शकतो. मराठी नाटक व इतर कार्यक्रम पाहू शकतो. आपसांत नेहमी मराठीत बोलु शकतो. मराठी चित्रपट, टीव्ही कार्यक्रम पाहू शकतो. मराठीत ब्लागिन्ग करू शकतो.}}
हे सर्व खरेच. ते अधिकाधिक प्रमाणात, सर्व क्षेत्रात करणे आवश्यक आहे. पण त्याहूनही बरेच काही केले पाहिजे. त्याचीही आपण चर्चा करू.
आज भाजी विकत घेणे, रेल्वेचे तिकिट घेणे, कॉल सेंटरवर चौकशी करणे, रस्त्यात कोणाला पत्ता विचारणे, दुकानात वस्तू विकत घेणे, बॅंकेची कामे करणे, कर्ज काढणे, इन्शुरन्स घेणे, टॅक्सीमधून फिरणे, इंटरव्ह्यू देणे, अशा दैनंदिन आयुष्यातील सामान्य गोष्टी देखील मराठीच्या ज्ञानाशिवाय होऊ शकतात. उलट हल्ली शहरात मराठीत बोलल्यास ही कामे होणारही नाहीत. मग परभाषकांना मराठीची तुच्छता वाटणे व आपल्याला न्यूनगंड वाटणे हे त्याचे स्वाभाविक परिणाम आहेत.
सामान्य जनतेला स्थानिक भाषेत सेवा देण्याचा आपण विचारच करत नाही. त्यामुळे त्यांनाही न्यूनगंड वाटू लागतो व आपल्याला मराठीचा काहीच उपयोग नाही, इंग्रजी किंवा निदान हिंदी तरी आले तरच आपल्याला रोजगार व समाजात मान मिळेल असा त्यांचा ग्रह होतो.
म्हणजेच काय तर आज प्रथम प्राधान्याने आपण आपल्या राज्यात आपल्या भाषेची आवश्यकता वाढवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. मराठी येत नसेल तर बहुतेक कुठल्याही (अगदी उच्चशिक्षित पदे सोडली तर) प्रकारचे काम शक्यच होणार नाही अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे.
हा उहापोह आपण खालील लेखात काही प्रमाणात केलेला आहेच.
https://amrutmanthan.wordpress.com/2009/12/21/एकच-अमोघ-उपाय-मराठी-एकजूट/
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
‘भारतीय संविधान व राजभाषा हिंदी’ ह्या लेखातून घेतलेला हा अंश आपले मित्र व विस्तृत मराठी वाचन असलेले श्री० विजय पाध्ये ह्यांनी हा लेख पाठवला आहे.
ha lekh vachala aani kahi varshapurvi mi vachalelya eka lekhachi aathavan jhali.
tyat ” Dr,Babasaheb Aambedakar yani rashtra bhasha mhanun SANSKRIT cha swikar karava asa prastava maandala hota.pan—-” ase mhatale hote.
kharaecha ase jhaale asate tar ti ek uttam samapark bhasha jhaali asati aani tyat kaahi adachan aali nasati.
mala satat Hibru bhashechi aathavan yete.
प्रिय श्री० सावधान यांसी,
सप्रेम नमस्कार.
उत्तर देण्यास झालेल्या विलंबाबद्दल क्षमस्व.
खरे आहे. संस्कृत ही एकच भाषा भारतीय भाषांमध्ये एकात्मता साधू शकते. पण सध्या तमिळमधून संस्कृत शब्द निवडून-वेचून काढून टाकण्याची मोहीम चालू आहे. त्यामुळे त्यांना हे कितपत पचले असते सांगता येत नाही.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
नमस्कार,
आपले प्रयत्न फार प्रशन्सनीय आहेत.
“आज प्रथम प्राधान्याने आपण आपल्या राज्यात आपल्या भाषेची आवश्यकता वाढवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. मराठी येत नसेल तर बहुतेक कुठल्याही (अगदी उच्चशिक्षित पदे सोडली तर) प्रकारचे काम शक्यच होणार नाही अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे.”-
एवढेच काय? मराठीने सीमोल्लंघन केले पाहिजे. मराठी वांग्मयांत फार मधुर आणि इतरांना आवडतील अश्या गोष्टी आहेत. मराठी भाषा, वांग्मयांचे प्रसिद्धीकरण आवश्यक आहे. बाहेर जेंव्हा मराठीला मान मिळेल, आपोआप इथेही त्याचे मान वाढेल (जेंव्हा परदेशांत आपल्या संस्कॄतीची प्रशन्सा होते आपल्याला त्यांत गर्व वाटतो). यासाठी मराठींनी देखील सीमोल्लंघन केले पाहिजे. आपल्या वांग्मयाबद्दल, कर्तबगार मराठीं बद्दल, महराष्ट्राशी जुळलेल्य प्रत्येक गोष्टीबद्दल बाळगलेले प्रेमाचे सीमोल्लंघन. यासाठी बांगालींपेक्षा चांगले उदाहरण नाही. महराष्ट्रांतल्य प्रत्येक चांगल्या गोष्टीला पुरेपूर प्रसिद्धी लाभण्यासाठी प्रयत्नांचा कळस केला पाहिजे.
प्रिय श्री० शां० भास्करभट्ट यांसी,
सप्रेम नमस्कार.
उत्तर देण्यास झालेल्या विलंबाबद्दल क्षमस्व.
आपले विधान खरोखरच अत्यंत महत्त्वाचे आहे. बंगाली गीतांजलीचे भाषांतर झाल्यामुळेच तिचे महत्त्व जगाला समजले. तमिळमधील साहित्य परभाषांत भाषांतरित करण्यासाठी राज्यशासनाने निधी उपलब्ध करून दिलेला आहे. अशाच प्रकारचा संकल्प अशोक चव्हाण हे सांस्कृतिक मंत्री असताना सुमारे तीन वर्षांपूर्वी राज्य शासनाने सोडला होता. पण त्यासाठी गठित करायची समितीही कधी ठरवली गेली नाही.
महाराष्ट्रातील सर्वच उत्तमोत्तम गोष्टींना जगभर प्रसिद्धी मिळवून दिली पाहिजे, हे देखील अत्यंत योग्य व महत्त्वाचे विधान. अर्थात राज्यशासनास अशी कामे कुचकामी वाटतात.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट