विचारमंथन – लागणे या शब्दाचे किती अर्थ लागतात?

प्रत्येक भाषेत असे अनेक शब्द असतात की ज्यांचे संदर्भाप्रमाणे वेगवेगळे अर्थ होतात. भाषेवर प्रभुत्व असणारे कवी ह्या अलंकाराचा उत्तम उपयोग करून घेतात. काव्यातील किंवा आलंकारिक भाषेतील या प्रकाराला श्लेष असे म्हणतात. संस्कृत भाषेतील काव्यांत तर अशा उदाहरणांची रेलचेल आहे. मराठीमधील बहुतेक लोकप्रिय विनोदी लेखक, चिं० वि० जोशी, आचार्य अत्रे, पु० ल० देशपांडे इत्यादींनीही मुख्यतः शाब्दिक कोटींवर म्हणजे श्लेषावरच भर दिलेला दिसतो.

संपूर्ण लेख खालील दुव्यावर वाचावा.

अमृतमंथन – लागणे या शब्दाचे किती अर्थ लागतात_100809

जमलेले विविध अर्थ वेळोवेळी संकलित करून एकत्रितपणे खालील धारिणीमध्ये प्रसिद्ध केले जातील.

विचारमंथन_लागणे शब्दाचे विविध अर्थ_100805

’लागणे’ या धातूपासून निर्माण होणार्‍या विविध क्रियापदांचे आपल्याला सुचवायचे असलेले अर्थ, त्यांची सुस्पष्ट उदाहरणे व आवश्यकतेप्रमाणे स्पष्टीकरण किंवा टिपण या लेखाखालील रकान्यात अवश्य मांडावेत.

– अमृतयात्री गट

ता०क० श्लेषाची आणखी काही मनोरंजक उदाहरणे या अमृतमंथनावरील पु०ल० देशपांडे आणि आचार्य अत्रेंच्या खालील विनोदी किश्शांमध्ये सापडतील.

पु० ल० देशपांडेंचे किस्से

आचार्य अत्र्यांचे किस्से

.

16 thoughts on “विचारमंथन – लागणे या शब्दाचे किती अर्थ लागतात?

  1. १. (पत्ता) लागणे- पत्ता सापडणे, मिळणे. खूप भटकून चौकशी केल्यावर साहेबांच्या घराचा पत्ता सापडला. बरेच दिवस झाले मन्याचा काही थांगपत्ताच लागत नाही आहे.

    २. अनुभवास येणे.- आजचे जेवण फार तिखट लागले. हॊटेलातील आंघोळीचे पाणी तसे गारच लागले.

    ३. दुःखाचा, वेदनेचा, यातनेचा, अनुभव होणे.- तिने केलेला अपमान त्याच्या जिव्हारी लागला.

    ४. अर्थ लागणे- अर्थ सापडणे की समजणे की अर्थाचा शोध लागणे की अर्थ लक्षात येणे? शब्दकोश पहावा लागेल. इतर मित्रांचे काय मत?

    शरद

    • प्रिय शरद यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या सूचनांबद्दल आभारी आहोत. लागणे या शब्दाच्या पन्नासावर शब्दच्छटा अपेक्षित आहेत.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  2. 1] lagane–malamalne ya arthi
    Goli ghetali naahi tar mala S.T.lagate.
    2] lagane- suruvat karane ya arthi
    Radha, chal aatap,Abhyasala laag.
    3] lagane – saap chavne ya arthi
    Aho,kaaku kaay jhala vo ? Aho, yamila sakali shetat “paan lagal” navha kaa?
    4] lagane -labha hone, sapadane ya arthi,
    aho, nashibata asal tar LAGAL Ki PANI vihirila. Kashala chinta karatay?

    • प्रिय श्री० पुरुषोत्तम कुलकर्णी यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      वा !! उत्तम !! आपण वेगवेगळे चार अर्थ सांगितलेत. त्यापैकी तिसरा ऐकला नव्हता. ’पान लागलं’ म्हणजे साप चावला असा अर्थ आहे का? पान म्हणजे काय?

      आपण दिलेल्या उदाहरणांवरून आपल्या भाषेला ग्रामीण, निसर्गाला जवळच्या असणार्‍या जीवनाचीही पार्श्वभूमी लाभली आहे असे वाटते. खरं म्हणजे मराठी भाषा ही शहरांपेक्षाही नागरीतर भागातच अधिक चांगली, अधिक शुद्ध स्वरूपात (प्रमाणित असेलच असे नाही) बोलली जाते. अशा भागात अस्तित्वात असलेले मराठीमधील कितीतरी शब्द शहरीजनांना माहितही नसतात.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० पुरुषोत्तम कुलकर्णी यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      श्रीमती शुद्धमती राठी यांना लिहिलेल्या पत्राप्रमाणे आपण या सर्व विचारमंथनामधून ’लागणे’ या शब्दाचे विविध अर्थ नोंदवणारी शब्दकोशसदृश यादी (एक्सेल तक्त्यामध्ये) प्रसिद्ध करणार आहोत. वानगीदाखल काही नोंदी दिलेल्या आहेतच. अंतिम यादीचे स्वरूप शब्दकोशाप्रमाणे औपचारिक व अचूक असावे व यादीमधील अर्थ शब्दकोशाप्रमाणे सुस्पष्ट व निःसंदिग्ध असावेत आणि त्यांत पुनरुक्ती नसावी. शिवाय प्रत्येक अर्थासाठी किमान एक उदाहरण (शब्दाचा अर्थ सुस्पष्ट करणारे अर्थपूर्ण वाक्य) सुद्धा अवश्य द्यावे. हे सर्व आपले आधीच ठरले आहे.

      कृपया आपल्या यादीवरून दृष्टी टाकून ती योग्य प्रकारे अद्यतनीत कराल काय? कदाचित अर्थाच्या पुनरावृत्तीमुळे काही अर्थ कमी झाले तरी हरकत नाही. पण आपण शेवटी एक उत्तम नमूना निर्माण करू. अर्थात हे सर्व आपल्यासारख्या अमृतमंथन परिवारातील विद्वान सदस्यांच्या साहाय्याशिवाय व प्रयत्नांशिवाय शक्यच नाही.

      वाट पाहतो.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

        • प्रिय श्री० सावधान यांसी,

          सप्रेम नमस्कार.

          उत्तर देण्यास झालेल्या विलंबाबद्दल क्षमस्व.

          श्री० मनोहरांना दिलेले उत्तरच आपल्याला देतो.

          आम्हा सर्वांच्या ज्ञानात भर पडली. महाराष्ट्राच्या कुठल्या भागातील किंवा कुठल्या बोली भाषेतील हा वाक्प्रचार आहे? याबद्दलचा एखाद्या पुस्तकातील किंवा कोशातील संदर्भ माहित आहे का?

          क०लो०अ० .

          – अमृतयात्री गट

  3. 1. supaaree laagaNe.
    2. jhaaDaalaa phool laagaNe.
    3. laagale tar malaa vichaar.
    4. dagaD laagaNe.
    5. soor laagaNe.
    6. keeD laagaNe.
    7. kaaTaa laagaNe.
    8. phaLyaavar naav laagaNe.
    9. gharaavar paaTee laagaNe.
    10. toMDaalaa kaaLe laagaNe.
    11. divaa laagaNe.
    12. khaaraT laagaNe.
    13. bhaajee tikhaT laagaNe.
    14. bhaajeelaa ajoon meeTh laagel.
    15. reDiovar gaaNe laagaNe.
    16. rastyaavar gardee laagalee.

    • प्रिय श्रीमती शुद्धमती राठी यांसी,

      सप्रेम नमस्कार व सुस्वागतम्‌ l

      आपल्या पत्राबद्दल आभार. आपली वाटच पाहत होतो. मराठी भाषा विज्ञान, व्याकरण, शब्दार्थ हे सर्व आपले आवडते क्षेत्र. त्यात सर्व मिळून विहार करू. पण तसे करू लागण्याआधी आपल्यासारख्या अनुभवी व विदुषीचे साहाय्य “लागेलच”.

      लेखात लिहिल्याप्रमाणे आपण या सर्व विचारमंथनामधून ’लागणे’ या शब्दाचे विविध अर्थ नोंदवणारी शब्दकोशसदृश यादी (एक्सेल तक्त्यामध्ये) प्रसिद्ध करणार आहोत. वानगीदाखल काही नोंदी दिलेल्या आहेतच. अंतिम यादीचे स्वरूप शब्दकोशाप्रमाणे औपचारिक व अचूक असावे व यादीमधील अर्थ शब्दकोशाप्रमाणे सुस्पष्ट व निःसंदिग्ध असावेत आणि त्यांत पुनरुक्ती नसावी. शिवाय प्रत्येक अर्थासाठी किमान एक उदाहरण (शब्दाचा अर्थ सुस्पष्ट करणारे अर्थपूर्ण वाक्य) सुद्धा अवश्य द्यावे. हे सर्व आपले आधीच ठरले आहे.

      कृपया आपल्या यादीवरून दृष्टी टाकून ती योग्य प्रकारे अद्यतनीत कराल काय? कदाचित अर्थाच्या पुनरावृत्तीमुळे काही अर्थ कमी झाले तरी हरकत नाही. पण आपण शेवटी एक उत्तम नमूना निर्माण करू. अर्थात हे सर्व आपल्यासारख्या अमृतमंथन परिवारातील विद्वान सदस्यांच्या साहाय्याशिवाय व प्रयत्नांशिवाय शक्यच नाही.

      वाट पाहतो.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  4. 17. bharatee-ohoTee laagaNe.
    18. naaT/panavatee/vaaT laagaNe
    19. dRuShT laagaNe
    20. bhoot laagaNe.
    21. Dhagaalaa kaL laagaNe.
    22. jaLoo laagaNe
    23. divaa laagaNe.
    24. rastyaavar divyaache khaaMb laagaNe.
    24. rastyaavar dukaan laagaNe.
    25. paaNyaalaa utaar laagaNe.
    26. chaDhaachaa rastaa/ghaaT laagaNe._
    27. khiDakee laagaNe.
    ..

    • प्रिय श्रीमती शुद्धमती राठी यांसी,

      आधीच्या पत्रोत्तरात लिहिल्याप्रमाणे आपण या सर्व विचारमंथनामधून ’लागणे’ या शब्दाचे विविध अर्थ नोंदवणारी शब्दकोशसदृश यादी (एक्सेल तक्त्यामध्ये) प्रसिद्ध करणार आहोत. वानगीदाखल काही नोंदी दिलेल्या आहेतच. अंतिम यादीचे स्वरूप शब्दकोशाप्रमाणे औपचारिक व अचूक असावे व यादीमधील अर्थ शब्दकोशाप्रमाणे सुस्पष्ट व निःसंदिग्ध असावेत आणि त्यांत पुनरुक्ती नसावी. शिवाय प्रत्येक अर्थासाठी किमान एक उदाहरण (शब्दाचा अर्थ सुस्पष्ट करणारे अर्थपूर्ण वाक्य) सुद्धा अवश्य द्यावे. हे सर्व आपले आधीच ठरले आहे.

      कृपया आपल्या यादीवरून दृष्टी टाकून ती योग्य प्रकारे अद्यतनीत कराल काय? कदाचित अर्थाच्या पुनरावृत्तीमुळे काही अर्थ कमी झाले तरी हरकत नाही. पण आपण शेवटी एक उत्तम नमूना निर्माण करू. अर्थात हे सर्व आपल्यासारख्या अमृतमंथन परिवारातील विद्वान सदस्यांच्या साहाय्याशिवाय व प्रयत्नांशिवाय शक्यच नाही.

      वाट पाहतो.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  5. पान लागणे हा साप चावणे याला पर्याय आहे. नाव घेताच सैतान हजर या गृहीताप्रमाणे सापाचा प्रत्यक्ष उल्लेख करणे टाळले जाते. सापाचे तोंड पानाच्या आकाराचे असल्याने हा वाक्प्रचार रूढ झाला असावा.
    प्रत्येक अर्थच्छटा कशी रूढ झाली असावी याचा अंदाज घेणेही मनोरंजक आहे.
    आपल्या उपक्रमाला शुभेच्छा. नागरी आणि ग्रामीण या शब्दाना प्रमाणभाषा व बोलीभाषा हे अधिक योग्य पर्याय आहेत असे मला वाटते.

    • प्रिय श्री० मनोहर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      उत्तर देण्यास झालेल्या विलंबाबद्दल क्षमस्व.

      आम्हा सर्वांच्या ज्ञानात भर पडली. महाराष्ट्राच्या कुठल्या भागातील किंवा कुठल्या बोली भाषेतील हा वाक्प्रचार आहे? याबद्दलचा एखाद्या पुस्तकातील किंवा कोशातील संदर्भ माहित आहे का?

      {{नागरी आणि ग्रामीण या शब्दाना प्रमाणभाषा व बोलीभाषा हे अधिक योग्य पर्याय आहेत असे मला वाटते.}}
      मान्य. पण नागरी आणि ग्रामीण हेच दोन भाषाभेद नाहीत. विविध व्यवसायातील लोकांच्याही वेगवेगळ्या पारिभाषिक संज्ञा व त्यांची परिभाषा म्हणजेच बोली असते. मुंबईसारख्या मूळ संस्कृतीची खिचडी झालेल्या ठिकाणी मराठीत साधेसोपे व प्रस्थापित असलेले योग्य शब्द अस्तित्वात असतानाही विनाकारण हिंदी व इंग्रजी शब्द वापरण्याच्या खोडीमुळे त्यांची एक वेगळीच बोलीभाषा बनते. एका भागातील बोलीभाषा राज्याच्या दुसर्‍या भागातील लोकांना समजत नाही. म्हणूनच तर प्रमाण भाषेची आवश्यकता भासते. इंग्रजीच्याही अनेक बोलीभाषा आहेत. त्यामुळेच सर्वांना समजेल अशी प्रमाण इंग्रजीची आवश्यकता असते.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  6. 1]Dola lagane-jhop yene yaa arthi.
    gaadi chalavatana dola lagane bare navhe.
    2]dohale lagane.–khnyachi iccha hone ya arthi.
    aata 7va mahina lagalay,dohale lagalet tila.
    3] mahina lagane.-kiti divasachi garodar ya arthi.
    4]var dhap lagane– antim ghatika/maranachi vel yene ya arthi
    tyana var dhap lagaliy ,jaa lavakr.

    • प्रिय श्री० सावधान यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      उत्तर देण्यास झालेल्या विलंबाबद्दल क्षमस्व.

      सर्वच अर्थ योग्य आहेत. अशा विविध अर्थच्छटा सर्वांपुढे मांडल्याबद्दल आभार.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  7. पान लागणे हा शब्दप्रयोग सर्पदंशासाठीच केला जातो. ज्याचा दंश झाला तो साप विषारी आहे की बिनविषारी हे समजण्यासाठी दंश झालेल्या ठिकाणी विड्याचे पान लावून धरण्याची (निदान कोकणप्रांतात तरी) प्रथा आहे. ते काळपट झाले तर चावलेला साप विषारी असल्याचे समजावे व पान काळे पडले नाही तर तो साप साधा, बिनविषारी असे समजावे. ही प्रथा अजूनही चालू आहे की नाही ते सांगता येत नाही.

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s