महाराष्ट्रातच स्वभाषेबद्दल विशेष अनास्था दिसून येते. येते. राज्यात गावोगावी, खेड्यापाड्यात जाणार्या परिवहन महामंडळाच्या तिकिटांवर मराठीमध्ये तपशील का नाही? कर्नाटक एस०टी०ची तिकिटे जर कन्नड व इंग्रजी भाषेत आहेत तर महाराष्ट्रात ती फक्त इंग्रजीतच का? इंग्रजी ही महाराष्ट्राची राज्यभाषा केव्हापासून झाली?
संपूर्ण लेख (तिकिटाच्या नमुन्यासह) खालील दुव्यावर वाचा. आपले वाचकमित्र श्री० प्रसाद परांजपे आणि डॉ० उमेश करंबेळकर यांनी स्वतंत्रपणे याच विषयावर माहिती पाठवली होती.
अमृतमंथन_एस०टी० महामंडळाची तिकिटे इंग्रजीतच_100807
आपण प्रत्येकाने खालील दुव्यावरील त्यांच्या संकेतस्थळावरील पृष्ठावर आपली निषेधपर प्रतिक्रिया नोंदवावी ही आग्रहाची विनंती.
(http://www.msrtc.gov.in/msrtc_live/grievance.html)
टीप: कुठलेही विशेष चिन्ह (special character) वापरू नये. प्रश्नचिन्ह (?) हे सुद्धा घेत नाही. फक्त रोमी मूळाक्षरे, अंक व पूर्णविराम चालतो. (त्यांना प्रश्न विचारलेले आवडत नसावेत.)
आपले प्रतिमत (feedback) या लेखाखालील स्तंभात अवश्य मांडावे. अशा प्रकरणांच्या बाबतीत काय करता येईल यावर अवश्य चर्चा करू.
– अमृतयात्री गट
.
सप्रेम नमस्कार.
महामंडळाच्या संकेतस्थळावर जाऊन मी मराठी मध्ये तक्रार नोंदवायला सुरूवात केली तर ते संकेत स्थळ कोणताही देवनागरी मजकूर स्विकारत नाहीये. हे खूपच अति आहे. “तुम्ही तुमची तिकीटे आणि गाड्यांच्या फलकांवरील गावांची नावे मराठीत का लिहीत नाहीत?” ही तक्रार मला इंग्रजीत लिहायची नाही. म्हणून तक्रार नोंदवू शकत नाही. क्षमस्व.
क लो आ
अपर्णा लळिंगकर
खाली मी लिहीलेल्या मराठी तक्रारीचा मथळा देत आहे.
राज्य परिवहन महामंडळाची तिकीटे ही संगणकीकृत असली तरी तिकीटे ही मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांत असावीत. इतर माहामंडळांच्या गाड्यांची तिकीटे ही त्या त्या राज्याची राज्य भाषा आणि इंग्रजी अशा दोन भाषां मधून असतात. महाराष्ट्रातच मराठीत तिकीट का नाही? महाराष्ट्रात मराठी भाषेचा वापर संगणक प्रणालीं मध्ये व्यवस्थित करता येतो. मग आपल्या या संकेत स्थळावर पूर्णपणे मराठी भाषा का वापरलेली नाही? मराठी भाषेचा वापर जर शासकीय संस्थांनीच केला नाही तर बिगर शासकीय संस्थांचं काय? राज्यसरकारचा मराठीच्या वापरा संदर्भातील आदेश जर शासकीय संस्थाच पाळत नसतील तर इतरांकडून काय अपेक्षा ठेवता येणार?
माझा इंग्रजी किंवा इतर भारतीय भाषांना विरोध नाही. पण जर मराठी भाषा इतकी समृध्द आहे, तुमचे जास्तीत जास्त प्रवासी सुध्दा मराठी आहेत, तुमच्या गाड्या या महाराष्ट्रातील गावागावांमधून जातात तर तिकीटावर इंग्रजी का?
साधी ही तक्रार नोंदवताना मी माझं नाव आणि विषय देवनागरीत लिहीला तर तुमचं संकेतस्थळ देवनागरीला स्पेशल कॅरेक्टर्स म्हणून स्विकारत नाहीये. म्हणून मला इच्छा नसतानाही माझं नाव इंग्रजीतच लिहावं लागलं.
प्रिय श्रीमती अपर्णा लळिंगकर यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपल्या भावना, आपली चीड आम्ही नक्कीच समजू शकतो. महाराष्ट्रात ठायीठायी अशी कारणे घडतात. पण आपले म्हणणे, आपल्या भावना दुसर्यापर्यंत पोचणे हे महत्त्वाचे आहे. त्यांनी मराठी राज्यात, बहुसंख्य मराठीजन असलेल्या उद्योगक्षेत्रात असूनही मराठीमधून दळणवळणाचा मार्ग बंद केला म्हणून आपण त्यांना तसे मोकळे सोडायचे का? मुळीच नाही. आपल्या तीव्र भावना आपण त्यांच्यापर्यंत पोचवायलाच पाहिजेत.
राईलकर सर पुण्याबाहेरील मुलाकडे रहायला गेल्यावर त्यांच्या संगणकावरील मराठी लेखन चालत नव्हते. मग ते स्वस्थ कसे बसणार? आवडत नसले तरीही त्यांनी रोमी लिपीतून मराठी पत्रे लिहिणे सुरू केले. एरवी मराठी बोलतानाही ते परभाषी शब्द कटाक्षाने टाळतात.
तसेच वेळ पडल्यावर आपल्या मराठीप्रेमाच्या भावना बथ्थड शासकीय संस्थेच्या बेपर्वा नोकरशहांच्या कानात ओतण्यासाठी नाईलाजाने झाले तरी रोमी लिपीतून मराठीत लिहावे लागेल असे आम्हाला वाटते.
कृपया विचार व्हावा.
आपण प्रत्येकजण त्यांना निषेधपर पत्र पाठवू. त्यांची संख्या जेवढी मोठी होईल तेवढी चांगली. एरवी उत्साहाने आघाडीवर राहणार्या आपल्यासारख्या मराठी सवंगड्याचे पत्र जायलाच हवे.
टीप: कुठलेही विशेष चिन्ह (special character) वापरू नये. प्रश्नचिन्ह (?) हे सुद्धा घेत नाही. फक्त रोमी मूळाक्षरे, अंक व पूर्णविराम चालतो. (त्यांना प्रश्न विचारलेले आवडत नसावेत.)
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
मध्यंतरी मी परळ ते बारामती असा प्रवास एस.टी. बसने केला. मी तिकीट “परळ” असे मागितले, तर एस.टी.मध्ये सर्वत्र “परेल” असे लिहिलेले आढळले. बाकी एस.टी. स्थानकावर सर्वत्र मराठीचे राज्य दिसते.
प्रिय श्री० मंगेश नाबर यांसी,
सप्रेम नमस्कार.
एस०टी०, बी०ई०एस०टी०, पोलिस खाते, टपालखाते, मुंबई गोदी, भायखळा मंडई हे पारंपारिकरीत्या मराठी माणसाचे गड. पण तेही ढासळत चालले आहेत. इतर ठिकाणी आपल्याच घरी मराठी मालकाला भिकारी ठरवले जाते.
एस०टी० गाड्यांवरील सामाजिक आशयाच्या घोषणा बर्याचदा हिंदीमध्ये असतात. शिवनेरी (वातानुकूलित) गाड्यांवर बाहेर व आत बर्याचदा बरीच नावे, माहिती इंग्रजीमध्ये असते. (आंध्र, कर्नाटकाच्या गाड्यांवर गाडीची नावपट्टी सोडता इतर सर्व ठिकाणी तेलुगू/कानडीच दिसते.) १०० टक्क्यांच्या ऐवजी मराठीचे ९९ टक्के पालन झाले तरी आपण त्याबद्दल निषेध व्यक्त केला पाहिजे. बर्याचदा सवयीने आपल्याला मराठीची उपेक्षा केल्याचे लक्षातही येत नाही. खाडीजवळ राहिल्यावर काही काळाने खाडीचा वास जाणवेनासा होतो, तसाच हा प्रकार.
जागृत रहा. एस०टी० च्या सुलभ शौचालयातही मराठीला टाळून हिंदी दिसता कामा नये.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
मी खालील तक्रार एस.टी. कडे नोंदविण्याचा प्रयत्न केला :-
मध्यंतरी मी परळ ते बारामती असा प्रवास एस.टी. बसने केला. मी तिकीट “परळ” असे मागितले, तर एस.टी. मध्ये सर्वत्र “परेल” असे लिहिलेले आढळले. बाकी एस.टी. स्थानकावर सर्वत्र मराठीचे राज्य दिसते. मग हाच दुजाभाव का ?
मंगेश नाबर
तेव्हा खालील संदेश आला आणि माझी तक्रार नोंदवू शकलो नाही.
– Subject contains special characters or exceeded 250 characters.
– Message body contains special characters or exceed 4000 characters length.
प्रिय श्री० मंगेश नाबर यांसी,
सप्रेम नमस्कार.
याच लेखाखाली सौ० अपर्णा लळिंगकर यांनी आपल्याप्रमाणेच उद्वेग व्यक्त केला आहे. त्यांना लिहिलेले उत्तर वाचावे व कृपया इंग्रजी तिकिट व इंग्रजी मधूनच तक्रार नोंदवण्याची सक्ती याबद्दल कृपया निषेध नोंदवावा. (यासाठी रोमी लिपीतून मराठी भाषेतील पत्र लिहावे लागेल.) तेवढा त्रास कृपया आपल्या मायबोलीसाठी नक्की घ्यावा.
टीप: कुठलेही विशेष चिन्ह (special character) वापरू नये. प्रश्नचिन्ह (?) हे सुद्धा घेत नाही. फक्त रोमी मूळाक्षरे, अंक व पूर्णविराम चालतो. (त्यांना प्रश्न विचारलेले आवडत नसावेत.)
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
मी निषेध नोंदवला आहे महाराष्ट्र् सरकारच्या वेबसाईट वर.
प्रिय श्री० महेंद्र परांजपे यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार. हे आपल्या आईचे काम आहे. आपल्या आईच्या आदरासाठी, तिच्या न्याय्य अधिकारांसाठी, आपण एकजुटीने आंदोलन करायलाच पाहिजे.
आपण अमृतमंथन परिवाराचे नवीन सदस्य आहात काय? तसे असल्यास आपले स्वागत आहे. आपण सर्व मराठीप्रेमी बांधव एकजुटीने, जिद्दीने लढलो तर आपण नक्कीच ही परिस्थिती बदलू शकू. पण एकजूट केली नाही, एकमेकांना सहकार्य केले नाही तर आपण अधिकाधिक घसरतच जाणार व आपल्याच घरात आपल्याला नोकर म्हणून रहावे लागणार.
आपण खालील लेख वाचला का?
https://amrutmanthan.wordpress.com/2009/12/21/एकच-अमोघ-उपाय-मराठी-एकजूट/
मराठी भाषा व संस्कृतीच्या प्रश्नांबद्दल इथे अनेक लेख आहेत. सवडीने वाचावे व आपले प्रतिमत (feedback) लेखाखाली मांडावे. त्यावर चर्चा करू.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
khare aahe
प्रिय मराठीसूचीकार,
सप्रेम नमस्कार.
आपल्या अनुमोदनाबद्दल आभारी आहोत.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
आपण सुचवल्याप्रमाणे मी खालील तक्रार इंग्रजीत लिहिली :-
Subject :- Use of Marathi in ST Buses & tickets
Message :- I was surprised during my recent journey from Paral, Mumbai to Baramati when the the board on the bus and ticket says Parel instead of Paral in Marathi. When Marathi is used all over in Maharashtra as common state language, why not in ST buses and tickets?
Mangesh Nabar
Code :- OCDAOC
तरीही खालील संदेश आला आणि माझी तक्रार नोंदवू शकलो नाही.
– Subject contains special characters or exceeded 250 characters.
– Message body contains special characters or exceed 4000 characters length.
प्रिय श्री० मंगेश नाबर यांसी,
सप्रेम नमस्कार.
महामंडळाच्या संकेतस्थळावरील सॉफ्टवेअर मिस्टर बॉब ऍडम ऊर्फ श्री० बाबा आदम यांनी बनवलेले असल्यामुळे त्याला मराठी-देवनागरीचे वावडे आहे. मजकूर रोमी लिपीतच लिहावा लागतो. (भाषा मराठी चालते.) शिवाय महामंडळाला शंका व टीका खपत नसल्यामुळे मजकूरात प्रश्नचिन्ह (?), उद्गारवाचक चिन्ह (!) इत्यादी घातल्यास त्यांना स्पेशल कॅरॅक्टर्स (अनिष्ट चिन्हे) ठरवून आपले टिपण अस्वीकृत केले जाते. तेव्हा इंग्रजीतून (रोमी लिपीमधून) मराठी भाषेत लिहिताना आपण केवळ पूर्णविरामच वापरू शकतो.
पुन्हा प्रयत्न करून पहावा.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
romi lipit nishedha nondavala aahe.
mi pan yethe devanagari vaparu shakat naahi ya sanaganakavar.
NY-USA [madhun]
http://savadhan.wordpress.com
प्रिय श्री० पुरुषोत्तम कुलकर्णी यांसी,
सप्रेम नमस्कार.
आभार, मराठी एकजूट पालल्याबद्दल.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
tumhee maraathee lok,kendra sarkaarche putale jaaltaa,
Lane jaaltaa,pan SUDHAKAR PAREECHAARAKAAN CHE PRATEENIDHEE ASLELYAA MAHAAPRABANDHAKANAA,KHETRIY PRABANDHAKANAA,VIBHAAGIY PRABANDHAKAANAA,
CHAPLAA HAAR,
CHAPPAL TURE,KAA GHAALAT NAAHEE?
RAMSHASTREE PRABHUNYAANCHE VANSHAJAA NO TYAANCHYAA SAARKHEE KAAME KARAA.
UGAACH ITHE VEL GHAALAVNYAA PEKSHAA,
SABAL KRUTEE KARAA.
TEVDHEE ajinkytaaraa HIMMAT Daakhwaal,?
MaaDhw.
m.s.r.t.c. chyaa adikaaryaanaa apaaplyaa gavaat thokun kaadhaa.
प्रिय श्री० मा०ध्व० यांसी,
सप्रेम नमस्कार.
मुंबई सेंट्रलला बसलेले त्यांचे उच्चाधिकारी, महामंडळाचे राजकीय प्रमुख (अध्यक्ष) आणि संबंधित राजकीय मंत्री यांना ठोकायला पाहिजे.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
AAMHEE SUDHAAKAR PAREECHAARAKAANCHAA POOTALAA,
DASRYAACHYAA DIWSHEE HUBLICHYAA RAKAA KAARYAALAYAA SAMOR JAALNYAA CHE NISCHIT KELE AAHE,
RAKAA HUBLIS TASHEE SOOCHANAA PAN SPEED POSTANE PAATHAWLEE AAHE,PAN AJUN OOTAR NAAHEE.
Same info is posted on MSRTC.FACEBOOK.COM
But looks as if PR deptt of MSRTC IS NOT THE PUBLIC,IT LOOKS PUBLICK.
mi pathavalelya viropala khalilpramaane uttar aale aahe.
From: Public Relation officer Under Website MSRTC.GOV.IN
Date: Tue, Aug 10, 2010 at 7:28 AM
Subject: Re: MSRTC Website Feedback : s t chi tikite
To: kpurushd@gmail.com
Tickete MARATHIS upalabdha aahet. Aapan conductorla MARATHI ticket denyas sangave
—– Original Message —–
From: kpurushd@gmail.com
Date: Monday, August 9, 2010 11:59 pm
Subject: MSRTC Website Feedback : s t chi tikite
To: “Public Relation officer Under Website MSRTC.GOV.IN”
> aapan aapali tikite marathit chapalyas aamhala aanand cha vatel.
> NY-USA
—
pdkulkarni
प्रिय श्री० पुरुषोत्तम कुलकर्णी यांसी,
सप्रेम नमस्कार.
याला प्रत्युत्तर सोपे आहे. त्यांनी राजकीय चलाखीचे (वरवरचे) उत्तर दिले आहे. पण त्यात काही अर्थ नाही. जरा विचार केल्यावर त्यातील फोलपणा सहजच समजून यावा.
कर्नाटक राज्याच्या बसमध्ये कानडीमधील तिकिट मागावे लागते का? तसेच तमिळनाडू राज्यात तमिळ, फ्रान्समध्ये फ्रेंच व जपानमध्ये जपानीमध्ये तिकिट मागावे लागते का?
राज्यभाषा मराठीतील माहिती प्राधान्याने प्रत्येक तिकिटावर असलीच पाहिजे, इतर कुठल्याही परराज्याच्या (हिंदी) किंवा परदेशाच्या (इंग्रजी) भाषेत असो वा नसो.
महामंडळाच्या बसवर क्रमांक, सूचना मराठीत असतात तेही उद्या मागायला लावाल काय?
अशा लोचट, स्वाभिमानशून्य नोकरशहांना व त्याच्या मंत्रालयातील पितरांना खरोखरच सामान्य पातळीची अक्कलही राहिली नाही काय?
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
m. s. r.t.c che adhikaari shasanache nokar aahet.te apalech konotari bhau,bahin,kaka,maam,chulate aahet.tyanaa marun kaay sadya honar? marayachecha asel tar ha NIRNAY ghenare aani rabavayalaa sanaganare AMDAR,Khasadar yanaa gherav ghala,chapala har ghala, kaale phasa pan Maru naka, Ahinsak marag kenvhahi chanagala. Karn he hi aapalecha natewaik aahet.
प्रिय बिघाली पाटील यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपले मत चुकीचे नाही. मरामापमं’च्या कर्मचार्यांना ठोकून काहीच फायदा नाही कारण ते केवळ हुकुमाचे ताबेदार आहेत. महामंडळाचे उच्चाधिकारी, संबंधित खात्याचे मंत्री, शासनाच्या मराठीविरोधी धोरणास फारशा प्रभावी पद्धतीने विरोध करण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरलेले विरोधी पक्ष हे सर्वच अधिक जबाबदार आहेत.
पण तसं म्हटलं तर या राजकारण्यांवर जनतेचा काहीच अंकुश का नाही? इतर राज्यांप्रमाणे भाषा व संस्कृतीच्या बाबतीत ते जनतेच्या भावनांचा आदर का करीत नाहीत? आणि तसे न केल्यास आपल्याला राजकारणातून संन्यास घ्यावा लागेल अशी भीती का वाटत नाही? याला कारण म्हणजे आम्ही महाराष्ट्रीय जनताच स्वतःच्या अधिकारांबद्दल, स्वाभिमानाबद्दल फारशी जागरूक नाही, आग्रही नाही. म्हणजे सरतेशेवटी हा सर्व दोष आपलाच आहे.
अशा हतबलतेच्या भावनेमुळेच मनात चीड निर्माण होते. माध्वरावांचा राग हा अशा परिस्थितीबद्दलच आहे असे आम्हाला वाटते.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
कालच मी माझ्या गावाहून ठाण्यापर्यंतचा प्रवास केला.
इथेही काही वेगळी परिस्थिती नाहीये.
तक्रार तर नोंदवली आहे, पण ती विचारात घेण्याची शक्यता फारच कमी वाटतेय.
मला तर शंका आहे कि अश्या online प्रतिक्रिया बघितल्या जात असतील कि नाही?
प्रिय श्री० सागर यांसी,
सप्रेम नमस्कार.
आम्ही केलेल्या तक्रारीस एक विचित्र, मूर्खपणाचे उत्तर मिळाले. त्यावर लिहिलेल्या पत्रास उत्तर नाही.
पण तरीही आपण पत्रे लिहावीत लोकांना काही गोष्टी आवडत नाहीत हे त्यांच्या लक्षात आणून दिल्यास बर्याच वेळा पुढे ते काळजी घेतात.
आपण काहीच न केल्यास त्यांच्या वर्तणुकीमध्ये काहीच फरक पडणार नाही, उलट तशीच वृत्ती वाढेल हे मात्र निश्चित.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
teal jaun chalani hanuya ki
प्रिय श्री० अजय कुंजीर यांसी,
सप्रेम नमस्कार.
अवश्य करा. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने, यथाशक्ती कृती करावी.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
aho mazi takrar ghetach nahi ho? mala b lay rag alaya tya lokancha
प्रिय श्री० अजय कुंजीर यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपली तक्रार त्यांच्या संस्थळावर रोमी लिपीत नोंदताना कुठलेही विशेष चिन्ह (special character) वापरू नये. प्रश्नचिन्ह (?) हे सुद्धा घेत नाही. फक्त रोमी मूळाक्षरे, अंक व पूर्णविराम चालतो. (त्यांना प्रश्न विचारलेले आवडत नसावेत.)
क०लो०अ०
– अमृतयात्री गट