हिंदीमुळे मुंबईतील आणि महाराष्ट्रातील मराठी भाषा, संस्कृती व स्वत्व नष्ट होण्याचा धोका (तमिळ ट्रिब्यून)

“ज्या समाजाला आपला इतिहास माहीत नाही, आपलं वाङ्मय, आपल्या परंपरा यांच्याबद्दल अभिमान नाही, तो समाज आपलं स्वत्व, आपली अस्मिताच हरवून बसतो. मराठीच्या रक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारनं आणि महाराष्ट्रातील जनतेनं काही प्रभावी कृती केली नाही तर मराठीला अशी भीषण अवस्था लवकरच येईल, अशी स्पष्ट चिन्हं दिसत आहेत…”

“तेव्हा आज मराठी जनतेपुढं दोनच पर्याय आहेत. मराठी टिकवून धरण्यासाठी काही निश्चित कृतियोजना आखायची अन्यथा महाराष्ट्रात मराठीचा र्‍हास आणि नाश पत्करायचा !!”

वरील अवतरण आहे श्री० तंजाई नलनकिल्ली ह्या तमिळ लेखकाने ’तमिळ ट्रिब्यून’ या मासिकात लिहिलेल्या लेखातील. या लेखात लेखकाने महाराष्ट्रातील परिस्थितीचा बारकाईने केलेला अभ्यास, त्यावरून त्याने मांडलेले स्पष्ट विश्लेषण, सध्याच्या कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्राला सुचवलेले उपाय आणि इतर भारतीय राज्यांना दिलेला इशारा, हे सर्व पाहून लेखकाचे खरोखर कौतुक वाटते व एवढी दूरदृष्टी आज कितीशा मराठी नेत्यांमध्ये आहे याबद्दल शंका वाटते.

प्रत्येक स्वाभिमानी मराठी माणसाने वाचलाच पाहिजे अशा ह्या तमिळ लेखाचे मराठी भाषांतर खालील दुव्यावर उपलब्ध आहे.

हिंदीमुळे मराठी भाषा, संस्कृती नष्ट होण्याचा धोका

लेख सावकाशपणे नीट वाचा, त्यावर चिंतन करा आणि आपल्या मराठी बांधवांच्या बरोबर काही चर्चा-विनिमय करावासा वाटल्यास आपले विचार अगदी अवश्य लेखाखालील रकान्यात मांडा.

– अमृतयात्री गट

.

ता०क०

मूळ इंग्रजी लेख खालील दुव्यावर उपलब्ध आहे.

Hindi Will Destroy Marathi Language, Culture and Identity in Mumbai and Maharashtra (Tamil Tribune)

.

वरील लेखात मांडलेले परिस्थितीचे विश्लेषण व त्यावरील उपाययोजना ह्या बाबी अमृतमंथन अनुदिनीवरील खालील लेखातही चर्चिल्या आहेत.

हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा! (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, १५ नोव्हें० २००९)

एकच अमोघ उपाय – मराठी एकजूट !! (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, २० डिसें० २००९)

 

.

35 thoughts on “हिंदीमुळे मुंबईतील आणि महाराष्ट्रातील मराठी भाषा, संस्कृती व स्वत्व नष्ट होण्याचा धोका (तमिळ ट्रिब्यून)

  • प्रिय श्री० महेंद्र यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   वास्तवाचे कटु दर्शन हे खरेच, पण आपल्या राज्यातील आपल्या भाषेशी, संस्कृतीशी, अस्मितेशी संबंधित असलेल्या या वास्तवाची जाणीव, पर्वा, संवेदना आपल्यालाच नाही आणि ती एक परका माणूस आपल्या डोळ्यासमोर भिंग धरून आपल्याला ते दर्शन घडवीत आहे ही किती दुर्दैवाची गोष्ट आहे !! पण दुसर्‍याने दर्शन घडवल्यावरही आपण ते दर्शन घेणार की त्याकडे काणाडोळा करणार? आधीच उशीर झाला आहे. सरणार्‍या प्रत्येक दिवसामागे परिस्थिती अधिकाधिक बिकट होत आहे. पण स्वतःच्याच सांसारिक सुखांमागे धावणार्‍या सुशिक्षित नागरी मध्यम वर्गीयांना त्याची पर्वा नाही. गावाकडील सामान्य जनतेच्या हिताकडे लक्ष देण्यास कोणाला फुरसत नाही.

   आपल्या देशात नव्वद टक्के जनतेचे भविष्य दहा टक्के जनताच ठरवीत असते.

   आभारी आहोत.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • प्रिय श्री० महेंद्र यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   खरंच आहे. पण महाराष्ट्रावर आज जी पाळी आली आहे ती अजुन तरी तमिळनाडूवर, बंगालवर, कर्नाटकावर आलेली नाही ह्यामागे तेच कारण आहे. पण आज जर ह्या हिंदीच्या दडपशाहीचा काळ सोकावला तर महाराष्ट्राला गिळंकृत केल्यावर तो टप्प्याटप्प्याने उद्या इतर राज्यांचे सुद्धा लचके तोडणार हे समजण्याएवढी दूरदृष्टी नक्कीच त्यांच्याकडे आहे. म्हणूनच तर महाराष्ट्राला या बाबतीत सहकार्य करण्याचे आवाहन लेखकाने केले आहे.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

   • प्रिय सलील,
    स.न.
    आपलं सरकार मराठी शाळा बंद करायला निघालंय. सत्त्व हरवलेला शिखंडी आणि हे सरकार यात काहीच फरक दिसत नाही मला. सरकारची सगळी संकेत स्थळं इंग्रजी मधे आहेत. त्या साठी पण पत्र पाठवलं. मनसे, शिसे च्या साईटवर कॉमेंट दिल्या.. पण कोणीच जागे होत नाहीत..

    • प्रिय श्री० महेंद्र यांसी,

     सप्रेम नमस्कार.

     शिखंडी स्वत्व हरवलेला किंवा पौरुषत्वाच्या दृष्टीने न्यूनता असलेला असला तरी त्याच्यामागे उभा राहून युद्ध करण्यास पराक्रमी अर्जुनासारखा वीरयोद्धा आणि अर्जुनाचे सारथ्य करण्यास, त्याला दिशा दाखवण्यास, त्याला रणनीतीचे धडे देण्यास श्रीकृष्ण होताच की. पण आपणा मराठी जनतेच्या लढाईत आपले सर्वच नेते शिखंडी निपजले आहेत. पण त्यांच्या मागे उभा राहण्यास शूरवीर अर्जुनही कोणी नाही व त्याचे सारथ्य करण्यास दूरदृष्टी श्रीकृष्णही नाही. यामुळेच आपण सर्व असे हतभागी ठरलो आहोत. म्हणूनच आता आपली लढाई आपल्याला स्वतःच लढावी लागेल अशी स्पष्ट लक्षणे आहेत. त्यासाठी आपल्याला वेळ पडल्यास आधुनिक रणभूमीवर म्हणजे बाहेर, रस्त्यावरही उतरून आपल्या जनमताचा जोर शासनकर्त्यांना दाखवून द्यावा लागेल. अशा लढाईसाठी योग्य नेतृत्वाचीच मराठी जनता वाट पाहत आहे.

     क०लो०अ०

 1. नमस्कार,
  स्वहित स्वतःच्या लक्षात न येणे हे दुर्दैव. हितचिंतकांबद्दल तिरस्कार बाळगणे दुर्दैवाचे कळस. कबीर, सूरदास, तुलसीदास इत्यादींच्या कव्याताले भावार्थ फार छान असतांत, तरी हिंदी च्या नावाने ब्रजभाषा, भोजपुरी वगैरे ही पाठ्य पुस्तकांमार्फ़त थोपवणे चालू आहे. फ़क्त इन्ग्रजीला पर्याय म्हणून एक राष्ट्रव्यापी भारतीय भाषेची गरज तर्कसंगत आहे. तेवढे भागवण्याकरिता हिंदीच्या सर्व प्रकारांचे (मारवाड़ी, ब्रजभाषा, भोजपुरी, मैथिलि, उर्दू) कठिण शब्द, खोलवर अभ्यास सीबीएसई च्या पाठ्यक्रमांत प्रत्येक पातळीवर दिसून येते. मला शंकाच नाही याबाबत कित्येक पालकान्नी विरोध प्रकट केलेच असेल. विद्यार्थ्यांत आपसांत होड़ असते तर पालकांच्या मनांत पाल्याचे शिक्षण सुरळीत चालत रहावे याचीच तडफड असते म्हणून असे मुद्दे वर येत नाहीत.
  हिंदी अवगत असून ही कबीर, सूरदास, यांच्या कविता शिकायला धडपड करावी लागते. राज्यांत वापरल्या जाणार्या भाषा त्या राज्यांत प्रधान असाव्या यांत विवाद असूच शकत नाही. आता त्या राज्यांत अशी गरज नसेल तर? गरज असते पण दूरदर्शितेच्या अभावाने ती गोष्ट उशीरा लक्षात येते.
  एखादा नविन कायदा आणून केंद्र सरकार मुंबईला केंद्र शासित करतील का असा प्रश्न असू शकतो आपल्या पुढार्याँपुढे. राजकारण्यान्नी तसेच समाजातल्या सर्वच प्रबुद्ध वर्गान्नी मिळून सोडवावा लागणार आहे हा प्रश्न. तूर्त प्राथमिक शिक्षण तरी मराठीत अनिवार्य करणे साधता येईल असे वाटते।

  • प्रिय श्री० शां० भास्करभट्ट यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   महाराष्ट्राला राजकीय इच्छाशक्तीचीच मोठी कमतरता आहे.

   “हिंदी राष्ट्रभाषा? एक चकवा” या लेखातील खालील उतारा पुन्हा उद्धृत करतो.

   {{भारताची राज्यघटना व इतर कायद्यांच्या आधारावर सर्वोच्च न्यायालयानेही स्थानिक भाषेच्या बाजूनेच निर्णय दिले आहेत.

   महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षणात पाचवी ते दहावीच्या वर्गाना मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरुद्धचा रिट अर्ज फेटाळताना महात्मा गांधींच्या मताचा हवाला देऊन सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ‘वस्तुत: एखाद्या राज्यात वास्तव्य करणार्‍या लोकांना तेथील स्थानिक भाषा शिकण्यास सांगता कामा नये असे प्रतिपादन मुळीच मान्य करता येणार नाही. परक्या प्रदेशात राहताना भाषिक अल्पसंख्याकांनी स्थानिक भाषा शिकून घ्यायला पाहिजे हे तत्त्व पूर्णपणे उचितच आहे. आमच्या मते स्थानिक भाषा शिकण्यास विरोधाच्या भावनेचे पर्यवसान समाजजीवनाच्या मुख्य प्रवाहापासून अलग होण्यात होते आणि त्याचा परिणाम म्हणून राज्यात भाषेवर आधारित विखंडन (तुकडे-तुकडेत पडणे) होते व तसे घडणे ही राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने निंद्य गोष्ट आहे.’ (अर्थात या प्रकरणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयात जिंकूनही आपण निवडून दिलेले राज्यकर्ते तो निर्णय अमलात आणण्याच्या बाबतीत मात्र सपशेल हरलेले आहेत हे महाराष्ट्रीय जनतेचे मोठेच दुर्दैव.) }}

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 2. हा लेख मी त्याच्याच संकेतस्थळावर वाचला होता. वाचतांना मन खिन्न झाले होते.
  आता याबद्दल दुखः करण्यापेक्षा त्यांचे कारणे व उपाय शोधणे महत्वाचे आहे. माझ्या मते, आज काल मराठीचे हे हाल आहेत (तसे ते मागील ५० वर्षात होते की नाही हे माहित नाही.) त्या चे मुख्य कारण म्हणजे मराठीला ’राजाक्षय’ नाही. तो नाही कारण लोकांचा मराठीसाठी हट्ट नाही. हट्ट नाही कारण लोकांचे त्यावाचून काही अडत नाही. अडत नाही म्हणून त्याबद्दल आदर व प्रेम नाही. आता लोकांनाच घेणे-देणे नाही तर सरकार काय मुद्दाम काम करेल. असे हे चक्र चालू राहणार.
  आता भाषेला मान मिळवून देण्यासाठी हे चक्रच कुठुन तरी तोडावे लागेल. नाही तर अधोगतीचा रथ असाच चालत राहील.

  • प्रिय श्री० अक्षय यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या भावना ह्या सर्वच स्वाभिमानी व विचारी मराठीप्रेमी माणसाप्रमाणे आहेत. आपली स्थिती किंकर्तव्यमूढ झालेल्या अर्जुनाप्रमाणे झालेली आहे.

   सतराव्या शतकात शिवाजी महाराज, अठराव्या शतकात पेशवे व इतर पराक्रमी मराठी सरदार यांचा देशभर (पूर्वीचा हिंदुस्थान) वचक होता. एकोणीसाव्या शतकात व विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातही मराठी राजकीय आणि सामाजिक नेत्यांना देशभर आदर होता. स्वातंत्र्य लढ्यातही मराठी, बंगाली व पंजाबी (लाल-बाल-पाल) हेच तर अग्रेसर होते. मराठी साहित्य हे तमिळ, बंगाली साहित्याप्रमाणेच भारतातील सर्वोत्कृष्ट साहित्य मानले जात होते. पण काही कारणाने स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राची गाडी रुळावरून घसरू लागली आणि त्याला कारण म्हणजे आपल्या मनातील स्वाभिमानाची भावना क्षीण होऊ लागली. स्वाभिमानाचे जसे आकुंचन होऊ लागले तसा न्यूनगंड वाढू लागला. आणि मग ते दुष्टचक्र सुरू झाले. आता त्यातून बाहेर पडणे अत्यंत कठीण असले तरी अशक्य मात्र नाही. यासाठीच आपण मधून-मधून खालील लेख वाचून स्वतःचे गळू पाहणारे अवसान पुन्हा सावरून धरूया, पुन्हा धीर एकवटूया व पुढे काय करता येईल त्याचा विचार व कृती करण्याच्या मागे लागूया.

   https://amrutmanthan.wordpress.com/2009/10/04/इंग्रजी-भाषेचा-विजय-ले०-स/

   आपण नमूद केलेल्या दुष्टचक्रात आपण सापडलो आहोत खरे. तो चक्रव्यूह यशस्वीरीत्या भेदून बाहेर पडायचे तर काय करावे ह्याबद्दल विचार व सूचना खालील लेखात मांडल्या आहेत. त्यावरूनही मधून मधून दृष्टी टाकून आपण स्वतःलाच कर्तव्याची पुन्हापुन्हा आठवण करून दिली पाहिजे.

   https://amrutmanthan.wordpress.com/2009/12/21/एकच-अमोघ-उपाय-मराठी-एकजूट/

   अमृतमंथन हे व्यासपीठही केवळ त्या एका उद्देशानेच मुख्यतः निर्माण केलेले आहे. प्रत्येक मराठीप्रेमीने आपले विचार इथे अवश्य मांडावेत. मराठीप्रेमाचा वणवा आपण सर्वत्र पसरवूया.

   क०लो०अ०

   अमृतयात्री गट

  • प्रिय श्री० आर्य यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   भारताच्या राज्यघटनेने या दोन्ही मुद्द्यांवर विचार केलेला आहे. भारताच्या सर्वच प्रमुख भाषा व संस्कृती त्यांच्या वैशिष्ट्यांसह टिकवून धरण्यासाठी, किंबहुना त्यांची सातत्याने प्रगतीही करण्यासाठी घटनेमध्ये आठवे परिशिष्ट घातले आहे. केंद्र सरकार व राज्यशासनाच्या त्यांप्रती असणार्‍या कर्तव्यांबद्दलही उल्लेख केलेला आहे. केंद्र सरकार त्याप्रमाणे थोडेफार करते. पण शेवटी स्वतःच्या भाषेचा व संस्कृतीचा विकास हा त्यात्या राज्यानेच करायला पाहिजे. या बाबतीत महाराष्ट्र राज्य सर्वाधिक उदासीन असावे असे दिसते. केंद्र सरकारच्या म्हैसूर येथील संस्थेच्या भाषाविषयक तरतूदींचा महाराष्ट्र फारसा काहीच फायदा करून घेत नाही. स्वतः तर काहीच करीत नाही. हल्लीच झालेल्या तमिळ संमेलनासाठी तमिळनाडू शासनाने जेवढा खर्च केला तेवढा महाराष्ट्र राज्याने राज्यस्थापनेपासून आजपर्यंतच्या पन्नास वर्षांत एकूण केलेला नाही. महाराष्ट्राचे राजकारणी एफएसआयची गणिते घालण्यात व सोडवण्यातच मश्गूल असतात.

   हिंदी भाषा ही सेतू भाषा म्हणून विकसित करावी हे उद्दिष्ट देखील घटनेमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे. पण स्वातंत्र्यानंतर हिंदी राजकारण्यांनी दादागिरी सुरू केल्यामुळे की काय पण दक्षिणीच नव्हे तर बंगाल, पंजाब (आज्ञाधारक महाराष्ट्र नाही) ही राज्येदेखील बिथरली व सर्वांनी हिंदीचा विरोध केला. त्यामुळे नाईलाजाने आपल्या भाषा-संस्कृतीशी काहीही संबंध नसलेल्या आपल्या जेत्यांच्या इंग्रजी भाषेला आपल्याला हिंदीच्या जोडीने केंद्र सरकारपुरती तरी कार्यालयीन (ऑफिशियल) भाषा म्हणून घोषित करावी लागली. अर्थात ही तडजोड केवळ पंधरा वर्षांसाठीच ठरली होती. पण त्यानंतर ती तडजोड सुधारणे शक्यच झाले नाही.

   क०लो०अ०

   अमृतयात्री गट

  • प्रिय श्री० आर्य यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   देशात अंतर्गत संज्ञापनासाठी एक सेतुभाषा असावी म्हणून राज्यघटनेने हिंदी निवडली आहे ती केवळ त्यातल्या त्यात इतर भाषांहून हिंदी भाषा ही इतर भाषांच्या मानाने अधिक राज्यांत व अधिक लोकांना समजते म्हणून. इतर काही विशेष गुणात्मक कारण असे नाही.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • प्रिय श्री० चंद्रदत्त नवलकर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   हे वाक्य ऐकताच प्रत्येक मराठी माणसाच्या भावना उचंबळून येतात. पण मराठी माणसाने या भावना प्रत्यक्ष कृतीत आणल्या पाहिजेत. मराठी तितुका सर्व मेळवून एकत्र आणायला पाहिजे. तोही केवळ मी-मराठी या एकाच मुद्द्यावर. इतर सर्व भेद बाजूला ठेवून.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 3. It is true that migrants from uttarpradesh and bihar do not make a sincere effort to learn the local language of the state where they work and reside be it maharashtra or goa.My sincere opinion is that,history with reference to mumbai and maharashtra need to be taught in detail in all the schools. how many people in mumbai or maharashtra know about the selfless struggle carried on tirelessely by Senapati bapat,acharya atre,s.m. joshi,s.a.dange,n.g. gore and prabhodankar thackeray during the formation of the state of maharashtra along with mumbai.senapati bapat is confined to senapati bapat marg and so are acharya atre and prabodhankar thackeray confined to acharya atre chowk and prabhodhankar thackeray chowk and udyan.I bet more than 90% of the population might not have even heard of the other three,i,e- s.a. dange, s.m. joshi and n.g. gore. How can a true marathi forget c.d. deshmukh here who threw his resignation as the union Finance minister!can any politician from maharashtra even dream of performing such an act.The sanyukta maharashtra struggle should be included in the school syllabus of each and every school in maharashtra,so that students will come to know how the state of maharashtra came in to being on 1st may 1960 after a long and tireless struggle of the abovementioned great souls at the same time without forgetting the sacrifice of the 105 martyrs both marathi as well as non marathi speakers.The values that are inculcated upon a person in childhood remain forever.similarly the younger generation of today will then start respecting their own language when proper history is taught in schools.Though it is a bit late but we need to start now and protect our state and our beloved language before it faces extinction by uniting ourselves as marathis and thereby forgetting the caste and class differences which have been dividing us for long and by inculcating a spirit of pride and boldness(not to be confused with rudeness)among the marathis.
  I submit my apologies that i have written so long ,but kindly understand that they are my genuine feelings.

  regards.
  Shailesh Ghag.

  • प्रिय श्री० शैलेश घाग यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपले प्रत्येक मत योग्य आहे. आपल्या सूचना महत्त्वाच्या आहेत.

   {{It is true that migrants from uttarpradesh and bihar do not make a sincere effort to learn the local language of the state where they work and reside be it maharashtra or goa.}}
   त्यामागे “आमची हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. म्हणून आमची भाषा देशभरातील सर्वांना यायला पाहिजे. आम्ही कोणाचीही भाषा शिकण्याची आवश्यकता नाही.” असा माज असतो. अशा त्यांच्या अहंकाराची हवाच काढून घेण्यासाठी “हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा !!” हा लेख इथे प्रसिद्ध केला व माहिती अधिकाराखाली केंद्र सरकारकडून तसे पत्र मिळवून प्रसिद्ध केले. अमराठींपर्यंत या भावना पोचवण्यासाठी त्या लेखाचे इंग्रजी भाषांतरही सादर केले. हे सर्व आपण अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवले पाहिजे – मराठी माणसांना स्वतःच्या भाषेबद्दल वाटणारा न्यूनगंड कमी करून त्यांचा स्वाभिमान वाढवण्यासाठी व हिंदी भाषकांचा माज उतरवण्यासाठी. शिवाय इतर भाषकांनाही त्यांनी महाराष्ट्रात राहण्यासाठी मराठी शिकणे व येथील संस्कृतीचा आदर करणे आवश्यक आहे हे पटवून देण्यासाठी.

   {{My sincere opinion is that,history with reference to mumbai and maharashtra need to be taught in detail in all the schools. how many people in mumbai or maharashtra know about the selfless struggle carried on tirelessely by Senapati bapat,acharya atre,s.m. joshi,s.a.dange,n.g. gore and prabhodankar thackeray during the formation of the state of maharashtra along with mumbai… }}
   {{I bet more than 90% of the population might not have even heard of the other three,i,e- s.a. dange, s.m. joshi and n.g. gore. How can a true marathi forget c.d. deshmukh here who threw his resignation as the union Finance minister!}}
   {{but we need to start now and protect our state and our beloved language before it faces extinction by uniting ourselves as marathis and thereby forgetting the caste and class differences which have been dividing us for long and by inculcating a spirit of pride and boldness(not to be confused with rudeness)among the marathis.}}
   आपली सर्वच विधाने एवढी अचूक, महत्त्वाची व हृदयाला भिडणारी आहेत. आपल्या सूचना अत्यंत योग्यच आहेत. आपल्याला एकच विनंती करावी शी वाटते की आपले हेच मत व हेच विचार किंचित्‌ अधिक विस्ताराने मांडलेत तर तो एक सुंदर लेख होऊ शकेल. मराल का प्रयत्न? लेख मराठीत असल्यास बरे होईल.

   आपल्या या उत्तम प्रतिमताबद्दल (feedback) आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 4. According to the present scenario, English (by default) has to be the common language at the national level. Though ‘Amrutmanthan’ says that English is not the ‘cultural’ language of India, it can still be used as a ‘Second Language’ in all states. After all, the present day boundaries of India were decided by the British. Before the British came, a large part of India was being ruled by the Marathas. If not for the British, we would have been happy with Marathi as the national language and Persian as the second language. Marathi would not have faced the crisis then as of today. But now, things are different, and embracing English is the best option for second language. (Please come out of the misconception that English equals Imperialism).

  • प्रिय श्री० पराग सुतार यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   भारत देशातील केवळ ७-८% (व जगातील केवळ १५-१६ टक्के लोक) जी भाषा समजतात ती देशात common language कशी होऊ शकेल? लोकशाहीमध्ये फक्त प्रबळ लोकांनी आपली मते इतरांवर लादणे योग्य नव्हे. आपण देशातील विविध राज्यांतील शहरे सोडून इतर भागात केवळ इंग्रजी बोलून प्रवास करून पाहिल्यास याचे प्रत्यंतर येईल.

   लोकशाही म्हणजे लोकांनी, लोकांसाठी, लोकांतर्फे चालवलेले राज्य. पण ते लोकांच्या भाषेत नसले तर ती कसली लोकशाही?

   तुम्हीआम्ही भारतातील मूठभर सुदैवी लोकांपैकी आहोत. शहरातील चांगल्या सुस्थितील घरात जन्म झाला, चांगले शिक्षण मिळाले, चांगला धंदा-व्यवसाय-नोकरी आहे. पैशाची फार गंभीर भ्रांत नाही. पण म्हणूनच आपल्याला देशातील दुर्दैवी लोकांची कल्पना नसते. आपल्याकडे आपण इंग्रजी शिक्षणावर भर दिल्यामुळे सामान्यांना ते फार कठीण जाते. शहरातील मुलांना तर हल्ली लहान वयापासूनच शिकवण्या लावल्या जातात. पण ते बहुसंख्यांना शक्य नाही. इतर अनेक बाबतीत सामान्य लोकांवर जो जुलूम होतो त्याला आपला कायदा इंग्रजीमध्ये असल्यामुळे सामान्यांना समजत नाही, सामान्यजन व शासम यांच्यात मोठी दरी आहे, हे एक महत्त्वाचे कारण आहे. तसा अनुभव येऊ लागल्यामुळेही स्वतः इंग्रजांनी फ्रेंच भाषेला पिटाळून लावली. ज्याप्रमाणे अमेरिकेतील लोक स्वतःच्या जीवनानुभवावरून संपूर्ण जगाच्या प्रश्नांची उत्तरे ठरवतात व त्याचप्रमाणे ते इतर देशातील प्रश्न सोडवायला जातात आणि तोंडघशी पडतात (अशी अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत) तसेच बर्‍याचदा आपल्या देशात शहरी माणसांनी ग्रामीण बहुसंख्यांच्या विषयीचे निर्णय घेताना होते.

   शिवाय संस्कृतीचे काय? आपली संस्कृती आपण परकी भाषेतून बोलू, शिकवू, चर्चा करू शकतो काय? इंग्रजीच्या अतिरिक्त प्रसारामुळेच आपण आपली संस्कृती, तिच्याबद्दलचा अभिमान विसरत आहोत. इंग्रजी शिकावी पण ती आपल्या मूळ भाषांची जागा घेऊ शकत नाही.

   आम्ही लोकमान्य टिळक, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची मते, महात्मा गांधीजींचे या विषयावरचे चिंतनपर लेख, कोठारी आयोग, राष्ट्रीय एकात्मता आयोग, प्रा० रामजोशींचा बालशिक्षणाचा आयोग, आणि जगभरातील तज्ज्ञांचे (इंग्रजांसकट) या विषयावरील मते यांचा अभ्यास केल्यास आम्हा सुदैवी जनांचा इतर समाजाप्रती पाहण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदलेल.

   इतर देशातील मंडळी भारताला भाषेच्या मुद्द्यावरून नेहमीच हसतात. याच्या कथा आपण ऐकलेल्या नाहीत काय? आपल्याला स्वतःची भाषा नाही, आपण परदेशी पूर्वजेत्यांच्या भाषेतून बोलतो. किंबहुना आपल्याला स्वाभिमानच नाही ही अगदी लांछनास्पद बाब आहे.

   याच भावनेतून इंग्रजांनी फ्रेंच भाषेला हुसकावून लावून स्वभाषेची स्थापना केली. अन्यथा त्यांनी जगभर फ्रेंच भाषेचा प्रसार केला असता व आज इंग्रजीच्या जागेवर फ्रेंच भाषा असती. आज फ्रेंचचे भाषक इंग्रज भाषकांहूनही अधिक असते. कृपया खालील लेख वाचा.

   https://amrutmanthan.wordpress.com/2009/10/04/इंग्रजी-भाषेचा-विजय-ले०-स/

   असो. आपण एक समाज म्हणून आपला आत्मविश्वास गमावून बसलो आहोत हेच दुःख आहे.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 5. eka tamil manasane he lihun marathi bhashakanaa jaage karave ya parate aankhi durdaiv te konate. Marathi maanus tatha maanene jo parayant ubha rahat naahi to paryant he asech chalanaar! tyasathi Rajakaranat Marathi swabhimani manus asana garajecha aahe. je kaahi karavayache te AHINSAK asane avashyak asel. Swatahachay karachay paiashatun nirman keleli sarvajanik aso vaa khajagi aso tya rashtriy sampticha sabhal kart ch aapalyala aandolan karave lagel.
  {Mi ya snaganakavar marathi lihu shakat nahi kshamaswa!}
  NY_USA[pravasat]

  • प्रिय श्री० सावधान यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   मराठीला या बाबतीत चांगले कणखर नेतृत्व नाही हे एक मोठे दुर्दैव आहे.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 6. Saprem Namskar,
  Khare tar kontehi sarkar kahi karel hi apekshach thevne chukiche aahe. Sarkaratil prtyek jan aap aaplya tumbdya bharaychya nadat aahe. Marathi jagte ki marte yache tyana kahi soyar sutak nahi. Aaj aaplya gharala aag lagli aahe. Madat yenyachi apeksha nahi. Ya paristhit aapanch aaple ghar vachvayla pahije. Sahyadri Himalayachya madatila dhavun jato pan aaplya hakkasathi kadhich tath ubha rahat nahi va Dillit Lotangan ghalto he kay darshavate? Shevati yatun Atireki tayar honyachi prakriya suru zali nahi tar khup kahi milavale asech mhanata yeil.
  Kalave,
  Loabh Asava Hi vinanti,
  Sameer Kulkarni

  • प्रिय श्री० समीर कुलकर्णी यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   अगदी नेमके बोललात. सर्वच राजकारण्यांच्या अशा नालायक, स्वार्थी, बेपर्वा, निर्दय, भावनाशून्य वागण्यामुळेच एकीकडे शेतकर्‍यांच्या आत्महत्या होतात तर दुसरीकडे हताश, वैफल्यग्रस्त झालेली माणसे हाती शस्त्रे घेऊन नक्षलवादी होतात. या सर्वाला आपले नेते, आपले राजकारणीच कारणीभूत आहेत.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 7. This is a well-researched article and that too by a tamilian. We should be thankful to him. The institutions like Maharashtra Rashtrabhasha Sabha, Pune, and Rashtrabhasha Prachar Samiti, Wardha, have misleading names which perpetuate the myth that Hindi is the national language, which it is not. These institutions should be renamed as ‘Maharashtra Kamkajachi Bhasha Sabha, Pune, and Kamkajachi Bhasha Prachar Samiti, Wardha, respectively. If these institutions are getting any grants from the Maharashtra Govt., such grants should be discontinued and should diverted towards promotion of Marathi instead.

  • प्रिय श्री० एम० जी० देसाई यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपले मत योग्य आहे. पण ते आपण शासनापर्यंत कसे पोचवायचे? हल्ली विरोधीपक्षातील राजकारणीही जनतेच्या भावनांबद्दल जागरूक नसतात. खरं तर त्यांनी हे मुद्दे मांडायला पाहिजेत.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० एम० जी० देसाई यांसी,

     सप्रेम नमस्कार.

     आपली सूचना अत्यंत योग्य आहे.

     त्यांनी आपल्या संस्थळावर स्पष्टपणे लिहिल्याप्रमाणे आम्ही हा लेख अमृतमंथनावर प्रसिद्ध करण्यासाठी त्यांची अनुमती घेतलेली आहे. पण इतर वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यासाठी त्या दैनिकाने तशी अनुमती घ्यावी लागेल, आम्ही घेऊन चालणार नाही. आपण किंवा आपल्या अमृतमंथन परिवारापैकी कोणाचीही मराठी दैनिकात चांगली ओळख असल्यास त्यांच्याशी त्याविषयी चर्चा करावी. लेखाचे मराठी भाषांतर आम्ही आनंदाने प्रसिद्धीसाठी देऊ.

     क०लो०अ०

     – अमृतयात्री गट

 8. प्रिय अमृतमंथन,
  तुम्ही मांडलेला मुद्दा योग्य आहे परंतु आपण किती दिवस राजकारण्यांना या बद्दल नावे ठेवणार आहोत ? स्वतःत काही बदल घडवून आणणार आहोत कि नाही? यथा प्रजा तथा राजा हे आपल्याला माहित नाही काय? हिंदी भाषेची समस्या हि मुंबैकरांनी स्वताहून निर्माण केलेली आहे. आजही दोन अनोळखी मुंबईकर एकमेकांशी हिंदीतून संवाद साधतात मोबाईल वाजल्यावर कळते कि समोरचाही मराठीच आहे.इतर लोकांना मराठी शिकायची काहीच गरज पडत नाही कारण त्यांच्या अगोदर आपणच हिंदीतून बोलायला सुरुवात करतो. महाराष्ट्राच्या राजधानीत मराठीवाचून काहीच अडत नाही हि वस्तुस्थिती आहे.मराठी माणसांनी न्यूनगंड सोडून समोरचा हिंदी भाषिक आहे कि तमिळ याचा विचार न करता त्याच्याशी बोलताना सर्वप्रथम मराठीतून सुरुवात करावी.स्वतःच्या मुलाला इंग्लिश माध्यमाच्या शाळेत घालून मुंबईत मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडताहेत अशी हाकाटी करणे हा तर शुद्ध दांभिकपणा आहे. मराठी उद्योजक, मराठी उच्चवर्गीय,वरिष्ट अधिकारी यांनी तर जास्तीत जास्त मराठीचा वापर करावा जेणेकरून कमीत कमी त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींना तरी मराठी शिकण्याची गरज निर्माण होईल.’माझिया मराठीचे बोल कौतुके अमृताते पैजा जिंके’ अशी हि ज्ञानदेवांची भाषा आहे तेंव्हा न्यूनगंड सोडा मराठी बोला, हि भाषा अमर आहे आणि राहील.

  • प्रिय श्री० अतुलराव यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या प्रत्येक वाक्यातील अक्षरन्‌ अक्षर खरे आहे. आपल्या राज्यात आपणच आपली भाषा अनावश्यक सिद्ध केलेली आहे. संवाद, माहिती, रोजगार, शासकीय कामे, कार्यालयीन कामे, सामाजिक कार्यक्रम, दैनंदिन समाजव्यवहार अशा सर्व ठिकाणी आपन आपली भाषा अधिकाधिक आवश्यक व उपयोगी सिद्ध करून तिला पर्यायच नाही अशा स्थितीस नेऊन पोचवली पाहिजे. अमृतमंथनावरील खालील लेखात आपण सुचवलेल्या मुद्द्यांवरच चर्चा केलेली आहे.

   हे सर्व आपण प्रत्येकाने वैयक्तिकपणे व एकत्रितपणे केले पाहिजे. दुसरा करीत नाही म्हणून मीही करीत नाही, असे म्हणून काहीच फायदा नाही. एकटा तर एकटा. आपण आपल्या सदसद्विवेकबुद्धीला पटलेल्या मार्गाने सतत प्रयत्न करीत राहिले पाहिजे व आजुबाजूच्या मित्रमंडळी-बांधवांना उद्यूक्त करण्याचा सतत प्रयत्न करीत राहिले पाहिजे. लेख अवश्य वाचा.

   https://amrutmanthan.wordpress.com/2009/12/21/एकच-अमोघ-उपाय-मराठी-एकजूट/

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s