महाराष्ट्राच्या सार्वभौम जनतेस निवेदन – डॉ० रमेश पानसे

“या पत्रकाच्या बेकायदेशीरपणाचे आणि परिणामाचे गांभीर्य सरकारला नसेल तर सार्वभौम जनतेने, सरकारने केलेल्या ’कायदेभंगा’स आपणही कायदेभंग करून उत्तर देण्याची वेळ आली आहे. आपल्याच सरकाराविरुद्ध दंड थोपटून उभे राहण्याची वेळ आज आली आहे.”

डॉ० रमेश पानसे सरांचे हे निवेदन वजा आवाहन म्हणजे त्यांच्या “अनधिकृत शाळा – शिक्षण खात्याची हुकूमशाही” ह्या लेखातील पार्श्वभूमीप्रमाणे टाकलेले पुढील पाऊल आहे. मराठी भाषा, संस्कृती आणि अस्मिता टिकवण्याची प्रामाणिक इच्छा असणार्‍या आपण प्रत्येकाने त्यांना या चळवळीत सक्रिय पाठिंबा दिलाच पाहिजे.

’शिक्षण मिळणे’ हा प्रत्येक बालकाचा मूलभूत अधिकार आहे हे घटनेने व केंद्रसरकारने हल्लीच गठित केलेल्या शिक्षणाच्या अधिकाराच्या कायद्यानेही मान्य केले आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून अनुदान न मागता कोणी मराठी माध्यमातून शिक्षण देण्याची तयारी दाखवत असेल तर त्याला मनाई करून त्याच्यावर फौजदारी गुन्ह्याची कारवाई करून दंड व कारावासाची शिक्षा करण्याची धमकी आपले राज्य शासन कसे देऊ शकते? शासनाने शाळा योग्य प्रकारे चालवण्याबद्दल नियम जरूर करावेत. पण फक्त राज्यभाषा मराठीमध्येच नवीन शाळा किंवा पुढील वर्ग चालू करण्यास बंदी घालण्याचा नियम राज्यशासन कसा करू शकतो? ब्रिटिशांनी देखील भारतीय भाषांतील शाळांना कधी अशी निंद्य वागणूक दिली नव्हती.

पानसे सरांचे संपूर्ण निवेदन खालील दुव्यावर वाचू शकता. ते वाचा व अधिकाधिक मित्रांपर्यंत पोचवा.

अमृतमंथन_महाराष्ट्राच्या सार्वभौम जनतेस निवेदन_डॉ० रमेश पानसे_100721

पानसे सरांनी स्वतः शिक्षणक्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. आदिवासी बालकांच्या शिक्षणासाठी त्यांनी चालवलेली ग्राममंगल ही संस्था व त्यांचा द्विभाषाप्रकल्प ह्यांच्या द्वारे त्यांनी महाराष्ट्रातील शिक्षणापासून वंचित असलेल्या बालकांचे शिक्षण, संस्कार व सर्वांगीण विकास यासाठी भरीव काम करीत आहेत.

आपले राज्यशासन अशीच आडमुठेगिरी करून आपल्याच मुळावर येणार असेल तर त्याविरुद्ध आपल्याला आंदोलन उभारायलाच लागेल. शासनाच्या बेकायदेशीर कायद्यांविरुद्ध कायदेभंगाची चळवळ करायलाच लागेल. तयार रहा.

मराठी माध्यमाच्या शाळांनाच लक्ष्य करणार्‍या राज्यशासनाच्या बेकायदेशीर दंडेलशाहीवरचा बुरखा फाडणारा पानसे सरांचा याआधीचा लेख खालील दुव्यावर वाचा.

अनधिकृत शाळा – शिक्षण खात्याची हुकूमशाही (ले० डॉ० रमेश पानसे)

आपल्या प्रतिक्रिया, पाठिंबा, सूचना लेखाखालील रकान्यात अवश्य मांडा. पानसे सरांपर्यंत नक्की पोचवू.

– अमृतयात्री गट

ता०क० राज्यशासनाच्या मराठी शाळांना परवानगी नाकारण्याच्या आणि त्याचबरोबर इंग्रजी शाळा चालवणार्‍यांपुढे पायघड्या घालणार्‍या आपल्याच राज्याच्या शासनाच्या धोरणाबद्दल जनतेने व त्रस्त पालकांनी व्यक्त केलेल्या भावना खालील लेखात वाचा.

निर्लज्ज राजकारणी आणि गळचेपी मराठी शाळांची (दै० लोकसत्ता)

.

23 thoughts on “महाराष्ट्राच्या सार्वभौम जनतेस निवेदन – डॉ० रमेश पानसे

  • प्रिय श्री० पुरुषोत्तम कुलकर्णी यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   होय. सर्वच राजकीय पक्षांनी अपेक्षाभंग, विश्वासघात केल्यावर आता आपण सामान्य माणसांनीच कृती करण्याची वेळ आली आहे.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 1. Satte pudhe shahanpan nasate…..pan jangragrti karun jan hi gagrut hot nahi….ashaveli hataat shastr ghevuse vaTate pan shikshit asalyamule te manala paTat nahi…..aani lekhanit talvaripeksha jast shakti aahe mhanun lekhani zijzvato….lekhanitar zijatech pan tya barobar aapale dhairhi zijate, khachte…..aani mag vayomana barobar aapanahi te sahan karavyache shikato….hyala jivan ase nav aahe.

  • प्रिय श्रीमती शमा/शामा पत्की यांसी, (नाव चुकीचे लिहिल्यास राग मानू नये.)

   आपण मांडलेला मुद्दा महत्त्वाचा आहे. अशा सामाजिक प्रश्नांच्या बाबतीत काही भाग जनतेने करायचा असतो, तर काही भाग शासनाने. मात्र शासन जर मुळातच मराठी शाळांविरुद्ध असले, शिवाय इतरही सर्व क्षेत्रात मराठीकडे दुर्लक्ष करीत असले, रोजगारासाठीही मराठीला गौण मानत असले तर सामान्य माणसाला चुकीचा संदेश जातो व तोही मराठीला पाठिंबा द्यायला कचरतो.

   उदा० “शाळेमधील अभ्यासक्रमात स्थानिक भाषा अनिवार्य असावी का” हा विषय तमिळनाडू, कर्नाटक, बंगाल इत्यादी स्वाभिमानी राज्यांत चर्चेचा मुद्दा होऊच शकत नाही. कोणी परप्रांतीय त्या धोरणाविरुद्ध बोललाच तर त्याची शंभरीच भरली. पण महाराष्ट्रात मात्र मूळात शासनच कचखाऊ असल्यामुळे इतरांचे फावते.

   खालील लेख वाचला होता का? आता ज्या शाळांना सातवीपर्यंत अनुमती देऊन पुढील वर्गांना अनुमती नाकारली आहे, व शाळा चालवल्यास फौजदारी गुन्हा दाखल करून मोठा दंड व कारावास देऊ असे शासनाने सांगितल्यावर अशा शाळांत खालील वर्गांत तरी पालक आपल्या मुलांना घालतील का? शासन विचारपूर्वक धोरणीपणाने मराठी शाळा बंद करण्याच्या मागे आहे. असे उदाहरण आपल्याला इतर राज्यांत किंवा इतर देशांत आढलल्यास कृपया आम्हालाही सांगा.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • प्रिय श्रीमती रुता चित्रे यांसी,

   होय. तोही एक चांगला मार्ग आहे. आपण पानसे सरांना कळवूच. विविध मार्गांच्या शक्याशक्यतेबद्दल व प्रभावीपणाबद्दल त्यांचा अनुभव अधिक आहे. ते योग्य तो निर्णय घेतीलच.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 2. Pratyek jilhyat aapala kruti gat tayar hou shakel kaay?
  pakshanirapeksha kruti karane Aavashyak asel.
  jar ase jhaale tar pratyek jilhadikari karayalayasamor sakhali uposhanacha karyakram Aakhava ase mala vatate.
  Yacha upayog phakt janajagruti karanyapuratacha hoil. Aapan marathipremi mhanun kiti sajag aahot, jaage aahot , marathichi nikad aapalayala kiti vatate.yachi aapoaap chachapani hoil.
  Mi ashya Ahinsak Aandolan karayat sakriy sahabhag Denyas tayar aahe. Mi aapalyala Majhe sahakarya Pune yethe Deu shaken.
  http://savadahan.wordpress.com
  NY-USA[Pravasat]

  • प्रिय श्री० पुरुषोत्तम कुलकर्णी यांसी,

   आपल्या विचारपूर्ण आणि तळमळीने केलेल्या सूचनांबद्दल अत्यंत आभारी आहोत. सूचना पानसे सरांपर्यंत अवश्य पोचवू.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • प्रिय श्री० भरत पर्ते यांसी,

   आपले जळजळीत विचार सत्य आहेत. आपला सर्वांचा अनुभव तसाच आहे. पण यातून मार्ग कसा काढायचा? त्या राजकारण्यांच्या हातातच आपले आयुष्य द्यायचे की आपणही आपले आयुष्य ठरवण्याचा प्रयत्न करायचा? त्यासाठी काय करता येईल?

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 3. Sorry for writing late but I was very busy.It is indeed shocking to read the stance taken by the state government with regard to the marathi medium schools.The notification provides for the imposition of fine as well as imprisonment and it will surely make a rational man wonder that the Nazi regime was much better than this democratically elected government.The other issue being screening of malayalam,tamil and gujarati films as regional films on the jet airways flights originating from Mumbai, thereby giving marathi a cold shoulder. The political parties who claim to be the torchbearers of the protection of Marathi language,heritage and culture have maintained a guarded silence on this issue, now that the elections for the legislative assembly are over. This so called torchbearers will again start their vociferous campaign when Mumbai goes for the civic polls in 2012.The marathi people should know by now that no political party will come to their aid as each party is bent on serving their own selfish interests.The only option is a selfless struggle without any political interference within the ambit of the law and without adhering to any unwarranted violence thereby promoting a spirit of brotherhood among the entire marathi community
  leaving aside all the caste and class differences and with one common agenda that WE ALL ARE MARATHI.

  Shailesh Ghag.

  • प्रिय श्री० शैलेश घाग यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   अगदी योग्यच बोललात.

   – शासनाची मोगलाईच चालली आहे.
   – सर्वच राजकारणी नालायक व स्वार्थी. सामान्य जनतेचे, स्थानिक लोकांचे प्रश्न कोणालाच जाणवत नाहीत. सर्वचजण खोटा देखावा करून फक्त सत्ता आणि पैसा कमावण्याच्या मागे आहेत.
   – जातीभेद व इतर भेद बाजूला ठेऊन सर्व मराठी माणसांनी केवळ ’मराठी’ या एकाच मुद्द्यावर एकत्र येऊन जनतेचा लढा सुरू करायला पाहिजे, हे आपले म्हणणे १०० टक्के खरे आहे. तसे झाले तर आणि तरच ह्यातून काही मार्ग निघू शकेल.

   क०लो०अ०

   अमृतयात्री गट

 4. green peace ya sansthene ek form tayar karun hajaro lokana swaksharisathi paathavun tyachi prat vihit divashi sambadhitakade pathavanyacha upakram rabavala. Tyacha darativar AMRUTYATRI Gatane Ek Nivedan tayar karun Maharashtrache shikshan mantri Aani Rashtrapati yana Pathvanyacha upkram rababava Aani ya kami Maharashtratil Samajsevakanaa Sahabhagi karun gheta yeil kaay te pahave.He sangane sopa aahe pan amalat aanatana kaay kashta padatat yaachi mala purn jaaniv aahe.pan ek suchanaa mhanun suchavat aahe.
  Aanna hajare yaachya maunaachi dakhal Maha. sarakar ghete mag ya kaami tyancha kaahi upayog karun gheta yenaar naahi kaay?
  Naahi tar Marathi Preminche Sakhali Uposhanas Suruvat karavi tyatun Ek chanagali chalaval ubhi rahu shakel.
  http://savadhan.wordpress.com
  NY_USA[pravasat]

  • प्रिय श्री० सावधान यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   महाराष्ट्र शासनाला प्रा० पानसेंनी निवेदन दिलेले आहे. आम्हीही त्यांना पाठिंबा दिलेला आहे. शासन हल्ली मराठी माणसाच्या प्रश्नाकडे दुर्लक्षच करते. त्यामुळे चळवळीचाच मार्ग अनुसरावा लागेल असे दिसते आहे.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 5. Mr. Panse,
  Greetings,
  I have been reading ,hearing regularly about said problems,but few EXPERTS like,Renu Gavaskar,Renu Dandekar also should accept the blame,
  If NRMI(NON RESIDENT MAHARASHTRIAN iNDIAN),OR any other person contact’s them with idea of supporting their establishment,or keen to start the same type in their own area,with their help,they just do not bother,as they need to keep it as proto type,and media publicity through media is their prim objective,and BHUSHAN,RATNA is ultimate.
  There is no shortage of funds with Public sector undertakings,or with MNC’S but they need to stay transparent,
  That’s where most of the MAHARASHTRIANS fail,
  It’s time to think on this PROJECT PROTOTYPES,makers and those give them undue publicity.
  I may be wrong,but it’s based on my observations,what SADHANA is doing,
  except Mr. Dabholkar nobody has accepted to hav recd. my letters,
  thats what is the real problem.
  Your problems are created by you alone,and you will stay with them till you start AKRAMAK way.

 6. मराठी शाळांना नव्याने वैभव प्राप्त करून द्यावे लागेल ???? मराठी शाळेत उत्तम इंग्रजी शिकवायला हवे …….व्याकरणावर भर दिला पाहिजे ……..शिक्षणाची पद्धत बदलायला हवी …. जेव्हा पालकांना विश्वास वाटेल, कि मराठी शाळेत उत्तम इंग्रजी शिकवितात. तेव्हा त्यांच्या मानतील शंका दूर होतील ….होते काय कि मराठी माध्यमात इतिहास / भूगोल / गणित / शास्त्र हे सर्व मराठी मध्ये शिकवतात आणि १० वी नंतर तेच तेच शब्द असतात पण इंग्लिश मधून…….. म्हणून जर संबंधित विषयांचे महत्वाच्या शब्दांचे इंग्रजी मधील शब्द मराठी शब्द पुढे कंसात टाकून दिले कि विद्यार्थ्यांच्या चटकन लक्षात येईल…..होते असे कि अक्षांश / रेखांश / छेद / लसावी / मसावी आणि या सारखे इतर विषयातील शब्द हे तसेच ११/१२ ला गणितात आणि इतर विषयात येत असतात पण विद्यार्थ्यांना असे वाटते कि आपण काही तरी नवीन शिकतो / वाचतो आहे आणि त्यांना नव्याने तयारी करावी लागते ………सांगायचा मुद्दा हा आहे कि वेगवेगळ्या इयत्तांमधील संबंधित विषयातील शब्दकोश बनवून ते वाटले पाहिजेत ..५ वीतल्या विद्यार्थ्यांना ५ वी विषयीचे आणि ६ वितल्याना..इंग्रजी माध्यमातील मुले हि काही खूप हुशार असतात असेही नाही…१ ली तला इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या मुलाचे ज्ञान हे सारखेच असते …..पण शिकवण्यात झालेल्या बदलामुळे त्यातील दरी हि अधिकाधिक खोल होत जाते ……हे सर्व मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून लिहिले आहे …धन्यवाद

  • प्रिय श्री० प्रसाद नागरे यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   गणेशोत्सवामुळे उत्तर देण्यास विलंब झाला, याबद्दल क्षमस्व. (बंगालात दुर्गापूजेच्या काळात सर्वत्र अघोषित बंद पाळला जातो. तसाच आपल्याकडील गणेशोत्सवाचा उत्सव !!)

   आपली मायबोलीबद्दलची कळकळ आपल्या पत्रावरून समजते. पण आपल्या काही विधानांच्या बाबतीत आम्हाला आपल्याला मुद्दे विचारार्थ सुचवावेसे वाटतात. आपण इंग्रजीचे महत्त्व निष्कारण अवास्तव प्रमाणात वाढवले आहे हे लक्षात घेऊन आपण विचार करायला हवा. ह्या उत्तरातील विचार पटले तर घ्या, अन्यथा दुर्लक्ष करा.

   {{मराठी शाळेत उत्तम इंग्रजी शिकवायला हवे}}
   १. मराठीतर माध्यमाच्या शाळेत मराठी चांगले शिकवायला नको का? परप्रांतात राहणार्‍या पाहुण्यांनी त्या प्रांताची भाषा शिकून घ्यायलाच पाहिजे व तेथील संस्कृतीशी एकजीव व्यायलाच हवे. हे आपल्या घटनेचेच सूत्र आहे. खालील लेख वाचला नसल्यास वाचावा.

   http://wp.me/pzBjo-9W

   २. दुर्दैवाने सध्याच्या परिस्थितीत आपण म्हणता त्याप्रमाणे पुढे इंग्रजी शिकायचे असल्यामुळे आपल्याला इंग्रजीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हे खरे.
   ३. मात्र मातृभाषेमध्ये संकल्पना लवकर व अधिक पक्केपणाने समजतात हे जगभरातील शिक्षणतज्ज्ञ म्हणतात. या अनुदिनीवरही ह्याबद्दल अनेक लेख प्रकाशित केले आहेत. त्यांच्यावर दृष्टी टाकावी. अंकलेसरिया स्वामिनाथन अय्यर यांचा खालील लेखही नक्की वाचावा.

   http://wp.me/pzBjo-fZ

   ४. एकदा संकल्पना पक्क्या झाल्यावर त्या दुसर्‍या कुठल्याही भाषेत व्यक्त करण्यास फार कठीण नसते. भारतात इंग्रजीमध्ये शिकलेला अभियंता जपानमध्ये वास्तव्यास गेल्यास तो सर्व शाळा-कॉलेजमधील शिक्षण पुन्हा जपानीमध्ये घेत नाही. जर्मन, स्विडिश, रशियन शास्त्रज्ञांच्या शोधाचा अभ्यास इंग्लिश मुले इंग्रजीतून, जपानी मुले जपानीमधून व इस्रायली माणसे हिब्रूमधून करतात पण आपण मात्र इंग्रजीतून करतो.

   {{म्हणून जर संबंधित विषयांचे महत्वाच्या शब्दांचे इंग्रजी मधील शब्द मराठी शब्द पुढे कंसात टाकून दिले कि विद्यार्थ्यांच्या चटकन लक्षात येईल…..होते असे कि अक्षांश / रेखांश / छेद / लसावी / मसावी }}
   १. जपान, इस्रायल, जर्मनी, रशिया, स्वीडन, स्पेन, ग्रीस, ब्राझिल, चीन इत्यादी जगभरातील प्रगत/प्रगतीशील देशांमध्ये असेच शिक्षण दिले जाते असे इंग्रजीच्या कुबड्या वापरून आपल्याला वाटते का?
   २. विज्ञानातील संज्ञाचे अर्थ व त्यांच्या मागील संकल्पना मातृभाषेद्वारेच अधिक लवकर व पक्क्या समजतात. उदा० जर एखाद्या मराठी मुलाने पहिल्यांदाच शब्द ऐकला तर – अन्ननलिका, श्वासनलिका, त्रिभुज प्रदेश, समद्विभुज त्रिकोन, स्त्रीरोगतज्ञ हे मराठी शब्द अधिक स्पष्टपणे, सहज, आपोआप समजतील की oesophagus, trachea, delta, isosceles triangle, gGyaenacologist हे परभाषेतील शब्द लवकर, सहजस्पष्ट होतील? आपल्या देशात आपण स्वातंत्र्यानंतर ६० वर्षांनी सुद्धा आपल्या भाषांत उच्चशिक्षण देऊ शकत नाही व जुन्या जेत्यांच्या भाषेवरच अवलंबून राहतो ह्याबद्दल आपल्याला अभिमान नाही तर लाज वाटायला पाहिजे. .

   {{१ ली तला इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या मुलाचे ज्ञान हे सारखेच असते …..पण शिकवण्यात झालेल्या बदलामुळे त्यातील दरी हि अधिकाधिक खोल होत जाते ……}}
   १. मराठीमध्ये मिळालेले ज्ञान व इंग्रजीतील ज्ञान यात गुणात्मक फरक असतो काय? ज्ञान हे साध्य आहे व भाषा हे केवळ साधन. साध्य आणि साधन ह्यांमध्ये गल्लत करता कामा नये. जपानमधील नोबेल पारितोषिक विजेत्याला फारसे काहीच इंग्रजीचे ज्ञान नसते. म्हणजे त्याचे त्याच्या विषयातील ज्ञान हे कमास्सल समजायचे का?
   २. आमच्या शाळेतील पूर्णपणे मराठीत शिकलेली मुले आयआयटी, वैद्यकीय, सीए, पीएचडी असे शिक्षण घेऊन भारतात व जगभरात नोकरी-धंदा-उद्योगात उत्तम रीतीने प्रस्थापित झालेली आहेत. अर्थात प्रत्येकाचा व्यक्तिगत अनुभव वेगळा असू शकतो. आमच्या वेळी मराठी शाळा उत्तम होत्या. आज मराठी शाळांना म्हणजे कमीतकमी शिक्षणशुल्कातच शाळा चालवावी लागल्यामुळे व अनुदान घेतल्यावर शासनाचे निर्बंध लादून घ्यायला लागल्यामुळे कदाचित बर्‍याच अडचणी जाणवत असतील. त्याला मराठी शाळांकडे पाठ फिरवणारे मध्यमवर्गीयच जबाबदार आहेत.

   वरील उत्तरात आपली मते खोडून काढायचा उद्देश नाही तर आम्ही वेगळा काळ पाहिल्यामुळे आम्हाला शिक्षणात भाषेचा काहीच दोष आहे असे वाटत नाही हे लक्षात आणून द्यायचे आहे. उलट मातृभाषेला पर्याय नाही असेच वाटते. आपण विनाकरण इंग्रजीला अवाजवी महत्त्व देतो, शासन, शिक्षण, न्यायदान, समाजव्यवहार इत्यादी सर्व क्षेत्रांत तिला डॊईजड करून ठेवतो आणि मग तिला जगात पर्यायच नाही असा निष्कर्ष काढतो. आपल्या राजकारण्यांना अक्कल नाही, त्यांचा स्वार्थ सर्व ठिकाणी आड येतो, पण आपण त्यांनी उभारलेल्या संकुचितपणाच्या पडद्यामधून आरपार पलिकडे पाहिले पाहिजे.

   वरील मुद्दे पटले तर घ्या. नाहीतर सोडून द्या. मात्र गैरसमज करून राग मानू नये, ही नम्र विनंती.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s