निर्लज्ज राजकारणी आणि गळचेपी मराठी शाळांची (दै० लोकसत्ता)

उच्चभ्रू मराठी मंडळींनी मराठीला केव्हाच वार्‍यावर सोडली. पण जी काही थोडी पालक मंडळी आपल्या पाल्यांना हिरीरीने मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी व आपले संस्कार करण्यासाठी उत्सुक आहेत त्यांनाही मराठीतून शिक्षणाची दारे बंद करणारे हे शासन कर्नाटक किंवा गुजराथ अशा परराज्याचे नव्हे तर आमच्याच महाराष्ट्र राज्याचे आहे हे पाहून चीड येते. मराठी जनतेवर राज्य करताना मराठी भाषा व संस्कृतीची अधोगती करणार्‍या शासनाला या राज्यावर एक दिवसही राज्य करण्याचा अधिकार नाही !!

संपूर्ण लेख खालील दुव्यावर वाचावा.

अमृतमंथन_निर्लज्ज राजकारणी आणि गळचेपी मराठी शाळांची _दै० लोकसत्ता_100719

ह्या गंभीर समस्येतून कसा मार्ग काढता येईल, शासनाचे हे कपटकारस्थान कसे हाणून पाडता येईल, ह्याविषयी काही विचार असल्यास लेखाखालील रकान्यात अवश्य मांडा. ह्या विषयावर व्यापक विचारमंथन होणे अत्यावश्यक आहे. त्यातूनच एखादे जनआंदोलन उभे राहू शकेल.

– अमृतयात्री गट

ता०क० वरील विषयाच्या संबंधित असे काही लेख खालील दुव्यांवर वाचू शकता.

अनधिकृत शाळा – शिक्षण खात्याची हुकूमशाही (ले० डॉ० रमेश पानसे)

सर्वप्रथम मातृभाषेत शिकणे हीच सर्वोत्तम पद्धत (ले० स्वामीनाथन एस० अंकलेसरिया अय्यर, टाईम्स ऑफ इंडिया)

पालकांनी चालवलेला बालकांचा छळवाद (ले. प्रा० मनोहर राईलकर)

मराठी शाळांची थडगी उभारण्याचं धोरण थांबवा (ले० प्रा० दीपक पवार, मराठी अभ्यास केंद्र)

.

16 thoughts on “निर्लज्ज राजकारणी आणि गळचेपी मराठी शाळांची (दै० लोकसत्ता)

  • प्रिय श्री० अनिल शांताराम गुढेकर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या प्रतिमताबद्दल (feedback) आभारी आहोत. आपण मांडलेली मते योग्यच आहेत. मराठी माणसामधील स्वाभिमानाचा अभाव, न्यूनगंड तसेच हिंदी व इंग्रजीपुढे दबून जाण्याची मानसिकता यामुळे इतर सर्व घोटाळे निपजले आहेत. त्या मानाने तमिळ, बंगाली इत्यादी समाजात अजुनही स्वाभिमान बर्‍याच प्रमाणात टिकून आहे.

   तमिळांची मानसिकता व त्यामुळे असणारी त्यांच्या राज्यातील परिस्थिती याबद्दल आपण खालील लेख प्रसिद्ध केलेले आहेत. वाचून आपली मते अवश्य मांडावीत.

   –> तमिळ भाषेत वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षण (वृत्त: दै० डेक्कन क्रॉनिकल, २० फेब्रु० २०१०)
   –> 85% of Shops Comply with Nameboard Norms in Chennai (The Hindu, 22 June 2010)

   आभारी आहोत.

   क०लो०अ०

  • प्रिय श्री० संजय नाईक यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आभारी आहोत. आपले विचार इथे नक्की मांडावे. आपण सर्वांनी मिळून यावर विविध अंगांनी विचार करू. अर्थात शासन एवढे बेरड आणि मग्रूर झाले आहे की केवळ निषेध व्यक्त करून त्यांच्यावर काही परिणाम होईल असे वाटत नाही. आपल्याला कृती करावीच लागेल असे वाटते. बहुधा रस्त्यावरही उतरावे लागेल. आपण सर्वांनी तयार राहिले पाहिजे.

   आज अशा परिस्थितीत गेल्या शतकातील मोठमोठ्या नेत्यांप्रमाणे नेत्यांची त्रुटी तीव्रतेने जाणवते.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 1. ह्या लेखातून मांडलेले विषय फारच योग्य आहेत. सध्याच्या सरकारच्या धोरणातून अजून एक शोध नक्कीच लागला की ‘नैसर्गिक वाढ’ ही फक्त इ ७ वी पर्यंतच होत असते, इ ८ वी पासून ती पूर्णपणे थांबून जाते, निदान शालेय शिक्षणाच्या बाबतीत तरी! इ ७वी पर्यन परवानगी असणाऱ्या शाळांची व त्यातील विद्यार्थ्यांची सरकारने खरोखरच गळचेपी चालवलेली आहे हे नक्की!
  सध्या मराठीतून १२ वी पर्यंतचे शिक्षण अगदी शास्त्र विषय सुद्धा असे वाचनात आले, पण या सगळ्याचा उपयोग कधी तर जेव्हा मराठी माध्यमाच्या शाळा अस्तित्वात राहतील तेव्हा! विद्यार्थी व पालक यांना कोणत्या शाळेतून शिक्षण घ्यायचे याचा पूर्ण अधिकार आहे. तेव्हा विनानुदानित मराठी शाळांना परवानगी नाकारणाऱ्या शासनाने याचा नक्कीच विचार करायला हवे की हळू हळू महाराष्ट्राचे अस्तित्वच भारताच्या नकाशातून नाहीसे होईल आणि याला जबाबदार प्रथमतः आपले शासनच राहील. काय करायच्या आहेत मराठी पाट्या जर वाचता येणारी नवीन पिदीच राहणार नसेल तर! तेव्हा शासनाने त्यांच्या या आडमुठी धोरणांचा पुनर्विचार करावा.

  • प्रिय डॉ० आनंदिनी क्षीरसागर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या प्रतिमताबद्दल (feedback) अत्यंत आभारी आहोत. आपल्या मतांशी आम्ही सर्वच पूर्णपणे सहमत आहोत.

   श्री० संजय नाईक यांच्या पत्राला लिहिलेले उत्तर पाहावे. अशा नालायक शासनाच्या विरुद्ध कायदेभंगाचीच चळवळ सुरू करावी लागेल.

   या अनुदिनीवर ’०३.३ शिक्षणक्षेत्रात मराठी’ या उपवर्गाखालील लेख नक्की वाचून पाहावेत. त्यांबद्दल आपले विचार मांडावेत. आपल्याजवळ या विषयी बरेच काही सांगण्यासारखे आहे याची आम्हाला कल्पना आहे. अमृतमंथन परिवारातील इतर बांधवांनाही आपले विचार समजावेत. त्यावर आपण सर्वजण मिळूनच विचार करू.

   आभारी आहोत.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • प्रिय श्री० पुरुषोत्तम कुलकर्णी यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपली चीड खरीच आहे. आम्हा सर्वांच्या भावना आपल्यासारख्याच आहेत. पण आपण मांडलेल्या मतांपुढे एक पायरी जाऊन आम्हाला असे वाटते की भारतातील सर्वच राज्यांतील राजकारणी भ्रष्ट, स्वार्थी, नालायक, आहेत. राजपत्रित अधिकारी म्हणजे त्यांनी पोसलेली श्वानमंडळी. मालकाने हाडूक टाकल्यावर शेपटीचा गोंडा घोळवणार व सामान्य माणसावर धावून जाणार, वेळप्रसंगी त्याचेच लचके तोडणार. पण भाषा, संस्कृती, स्वाभिमान अशा मुद्द्यांच्या बाबतीत इतर राज्यांत ते नक्कीच अधिक जबाबदारीने व संवेदनशीलतेने वागतात. बंगाल, तमिळनाडू किंवा तत्सम इतर राज्यांत अशा मुद्द्यांच्या बाबतीत सर्व राजकीय पक्ष सामान्यांच्या प्रश्नांवर एकत्र येतात, त्यांच्या भावना समजावून घेतात, जनतेची बाजू घेतात. त्याविरुद्ध जाण्याची कोणाचेही धाडस होत नाही. का? तर त्यांच्यावर जनतेचा अंकुश असतो. महाराष्ट्रात सामान्य माणूसच आपल्या अधिकारांबद्दल उदासीन आहे. त्याला स्वाभिमान, स्वाधिकार या शब्दांचे अर्थच समजेनासे झाले आहेत. त्यामुळेच राजकारणी व शासकीय अधिकारी यांचे फावले आहे. म्हणजे शेवटी सर्व दोष महाराष्ट्रातील तुम्हां-आम्हांसारख्या सामान्यांचाच आहे. आपण सामान्यजन जर स्वतःच्या न्याय्य अधिकारांबद्दल, स्वतःच्या स्वाभिमानाबद्दल जागृत झालो तरच ह्या परिस्थितीत सुधारणा घडेल.

   त्यासाठी आवश्यक असेल तर आपण निषेध मोर्च्यांसाठी रस्त्यावरही उतरू.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 2. महाराष्ट्रातल्या मुलांच्या शिक्षणाची ही अशी वाट याचे एकमेव कारण म्हणजे महाराष्ट्रातील शिक्षणतज्‍ज्ञांची वारेमाप पैदास. इतर प्रांतात असे बेसुमार शिक्षणतज्ज्ञ वा शिक्षणमहर्षी नाहीत. १९४७ पूर्वीचा महाराष्ट्राचा प्रदेश शिक्षणाच्या बाबतीत पुढारलेला होता, तो आता इतका का मागासावा? बिहारमधून जितके आय ए एस होतात त्यांच्या एक दशांशही महाराष्ट्रातून होत नाहीत. आणि जे होतात त्यांच्यातल्या अनेकांची मातृभाषा मराठी नसते.
  भाषा शिक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्र-गुजराथपेक्षा इतर सर्व प्रांत आघाडीवर आहेत. हिंदी मुलुखात महाराष्ट्रात दिसते तसे रस्त्यावरच्या पाट्यांवर अशुद्धलेखन आढळणे फारच दुर्मीळ. कारण तिथे जी भाषा शिकवतात ती तिथल्या शिक्षकांना चांगल्या रीतीने लिहिता येते. सुदैवाने मला मध्य प्रदेशात आणि उत्तर प्रदेशाच्या पश्चिम भागात भरपूर फिरायला मिळाले. त्यामुळे या बाबतीतले माझे निरीक्षण नक्की विश्वसनीय आहे.

 3. Mai Marathi baddal kai lihu. Aho aplaych manasani tila tadipar karaiche tharavalel ahe. Me marathi ahe ase char lokat sangayala kami pana manato. Pan tyla he kalat nahi ki yach marathini tyana kiti mothe kele ahe. Aai shivay mulala kahi arth ahe ka he sadhi gosht yana kalat nahi. Marathi he apli sarvanchi Aai ahe and jo marathi bolayala, jagayala lajato, jo thichi aan, baan, shaan thewat nahi to maharashatrat rahaila nalayak ahe. Apan nusate tharavale ki sarva kahi marathitun karayache tar bagha kai konachi bishad, marathi baddal kahi wakade bolayachi. Asa diwas yene hach shivaji maharajana trivar mujara hoi – jai bhavani jai shivaji, jai maharashatra

  • प्रिय श्री० विश्वास बेंद्रे यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपण म्हणता आहात ते खरे आहे. पण हे सर्व बदलण्याचा आपण प्रयत्न करू, सुरुवात स्वतःपासूनच करून. मग ही साथ सर्वत्र पसरविण्याचा प्रयत्न करू. जगातील अनेक आधी अनपेक्षित असलेल्या महत्त्वाच्या घटना अशाच सुरू झाल्या आहेत. स्वतः शिवाजी महाराजांनी जे साध्य केले ते आधी कुठे अपेक्षित होते?

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 4. tamil bhaashik sammelan jhale tewhaa tamil hi abhijaat bhaashaa asun ti sanskrut paasun nirmaan jhaaleli naahi ase vaachale.baatamit pudhe asehi mhatale hote ki “president a p j abdul kalaam hyaani ase sansadet he saangitale. kalaamaa vishayi aadar raakhunhi ase vatate ki, kewal president aahet mhanun koni ase bolu naye.
  pratibhaatai ase karatil ka?

  • प्रिय श्रीमती रुता यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   सुमारे पन्नास वर्षांपूर्वी तमिळ ही सर्वाधिक संस्कृतशब्द असलेली भारतीय भाषा होती असे तेव्हा ऐकले होते. त्यानंतर द्रविड चळवळ सुरू झाली व तमिळमधून एकेक संस्कृत शब्द वेचून काढून टाकण्यात आला, तांदळातील खड्याप्रमाणे. आज तमिळमध्ये फारच कमी संस्कृतशब्द उरले आहेत. करुणानिधींनी तर महिन्यांची नावे (चैत्र, वैशाख इत्यादी) व इतरही संस्कृतशी संबंध असलेल्या संज्ञा व संकल्पनांची नावे बदलण्याचे मध्यंतरी घोषित केले होते.

   तमिळ ही अत्यंत प्राचीन भाषा आहे हे देखील खरे आहे. उत्तरेमध्ये संस्कृत भाषा प्रचलित असताना दक्षिणेकडे तमिळ (किंवा तिला जवळचीच) भाषा प्रचलित असू शकेल. म्हणजे ती केवळ संस्कृतपासून निर्माण झालेली नसेलही. पण हिंदू समाजाच्या बहुतेक सर्वच धार्मिक व सामाजिक संकल्पना, संज्ञा, नावे या संस्कृत भाषेशीच निगडित असल्यामुळे तमिळ भाषेमध्येही अनेक शब्द संस्कृतमधून (तत्सम किंवा तद्भव) आलेले आहेत हे तर नक्कीच. करूणानिधींचे स्वतःचे नाव संस्कृतवर आधारित नाही का? लोकांना भडकावण्यासाठी राजकारणी नेहमीच राईचा पर्वत करतात, अतिशयोक्ती करतात, टोकाची भूमिका घेतात. महाराष्ट्रातही अनेक ऐतिहासिक विषयांत इतिहासाचा स्वैर विपर्यास करणे चालू नाही काय? आणि राजकीय कारणांमुळे अशा मंडळींना कोणी आव्हान देत नाही.

   क०लो०अ०

   अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s