“खुद्द साहेबाच्या देशातही इसवीसन १६५१ पर्यंत इंग्रजी बोलली जात नव्हती. तेव्हा युरोपवर फ्रेंच भाषेचे वर्चस्व होते. शेवटी इंग्लंडच्या राजाला इंग्लंडमधील सर्व व्यवहार इंग्रजीतच होतील असा वटहुकूम काढावा लागला. त्यातून पुढे औद्योगिक क्रांती झाली व इंग्रज सर्व जगात पसरले. त्यांच्या विजिगिषू वृत्तीने त्यांनी जग जिंकले. आम्हाला साहेबाकडून काही घ्यायचे असेल तर ही विजिगिषू वृत्ती घ्यायला हवी. त्याऐवजी आपण त्यांची भाषा उरावर घेऊन बसलो आहोत.”
आपले मराठीप्रेमी वाचक प्रसाद परांजपे यांनी पाठवलेले संपूर्ण लेख खालील दुव्यावर वाचा.
अमृतमंथन_इंग्रजी जरूर शिकू, मराठीला मारण्याची काय गरज_100630
.
स्वाभिमानी मराठी माणसाच्या दृष्टीने हे सर्व अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत. लेख वाचून आपली मते लेखाखालील रकान्यांमध्ये अवश्य नोंदवा.
– अमृतयात्री गट
.
चुकीची माहिती :
खरी माहिती अशी आहे.
सन १०६६ मध्ये नॉर्मंन्डीच्या विल्यमने इंग्लंडच्या हॅरॉल्ड राजाचा पराभव केला आणि इंग्लंडवर फ़्रेन्च भाषा लादली. पण ती भाषा फक्त उच्चवर्गापुरती मर्यादित राहिली. सामान्य जनता इंग्रजीच बोलत होती. १२०४ म्ध्ये नॉर्मन लोकांचा पराभव झाला आणि इंग्लंड स्वतंत्र झाले. पण आत आलेली फ़्रेन्च भाषा फारशी कमी झाली नाही. १३०४ मध्ये इंग्रजी परत पूर्ववत स्थापन झाली, आणि १४०० सालानंतर फ़्रेन्च पूर्णपणे परागंदा झाली.
प्रिय श्रीमती शुद्धमती राठी यांसी,
सप्रेम नमस्कार.
प्रस्तुत लेखात नोंदलेले तपशील हे जगभरात मान्य असलेल्या इतिहासाला धरूनच आहेत. आपण खालील लेख वाचला आहे का?
https://amrutmanthan.wordpress.com/2009/10/04/इंग्रजी-भाषेचा-विजय-ले०-स/
त्यात संदर्भिलेल्या “The Triumph of the English Language” या पुस्तकातही अगदी अशीच माहिती सविस्तरपणे दिलेली आहे. पुस्तक amazon.com वर विक्रीला ठेवले आहे. अवश्य वाचा.
आपण “चुकीची माहिती. खरी माहिती अशी आहे.” असे जे म्हणता त्याचा विश्वसनीय संदर्भ द्याल का? तो आपण प्रसिद्ध केला तर जगभरच्या इतिहासकारांचा गैरसमज दूर करू शकाल. तो एक महत्त्वाचा ऐतिहासिक शोध ठरेल.
मागे आपण अमेरिकेची राष्ट्रभाषा इंग्रजी नसल्याबद्दल काही अधिकृत पुरावे देणार होता. त्याचीही आठवण ठेवावी.
आपल्या उत्तराची उत्सुकतेने वाट पाहतो.
आभार.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
डॉ. अनिल अवचटांच्या मुद्द्यांना उत्तरे :
इंग्रजी जरूर शिकू, मराठीला मारण्याची काय गरज? – डॉ. अनिल अवचट
* मराठी भाषा ‘जिवंत’ राहण्यासाठी आपल्या मुलांना मराठीतून शिकवणे ही पहिली पायरी आहे.– घरी मराठी बोलले की मराठी आपोआप जिवंत राहील, त्यासाठी मराठीतूनच शिक्षण घेतले पाहिजे असे नाही. महाराष्ट्रात राहणार्या अमराठींचे काय? मराठीतून शिक्षण घेतले की त्यांची भाषा मरते का? ती जशी जगते तशी मराठीही जगेल.
* मराठी भाषेत (मातृभाषेत) मुलांनी शिक्षण घेतले नाही तर हळूहळू ती निश्चितच ‘मरणपंथाला’ लागेल.–जगातल्या कुठल्याच देशात मातृभाषेतून शिक्षण मिळत नाही, हे मी अनेक आकडेवार्या आणि उदाहरणे देऊन सिद्ध केले आहे. ज्यांनी परभाषेतून शिक्षण घेतले त्यांच्या भाषा मरणपंथाला लागल्या नाहीत.
* मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले तरी घरी त्यांना मराठी शिकवता येईल.–इंग्रजी माध्यमाच्या शाळेत स्थानिक भाषा शिकवली जाते. मराठीच शिकायचे असेल तर आणि घरी जमत नसेल तर भाषाशिक्षणाच्या अनेक संस्था आहेत.
* उत्तम मराठी पुस्तकांच्या वाचनाची गोडी मुलांना लावा. घरातच हा संस्कार व्हायला हवा.–हे मान्य. मराठी पुस्तके वाचायला लावाच आणि इतर भाषांतली पुस्तके वाचावी असाही आग्रह धरा.
* आपले दैनंदिन सर्व व्यवहार; म्हणजे शुभेच्छापत्रे पाठविणे, पत्रव्यवहार इत्यादी सार्या गोष्टी मराठीतून करता येतील. — शुभेच्छापत्रे पाठवणे आणि अन्य पत्रव्यवहार असला दैनंदिन(?) व्यवहार आपण मराठी लोकांशीच करणार आहोत का?
* एक भाषा म्हणून इंग्रजी शिकण्यात काहीच हरकत नाही; पण त्यासाठी मराठीचे पाय ओढण्याची काय गरज?– इंग्रजी शिकली की मराठीचे पाय ओढले जातात? हे तर्कट अजब आहे.
* खरं तर डॉक्टरकी, इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठीही इंग्रजीची काहीच गरज पडू नये.–म्हणजे घेतलेल्या शिक्षणाची महाराष्ट्राबाहेर शून्य किंमत. त्यां शास्त्रात दैनंदिन होणार्या प्रगतीशी पूर्ण फारकत. आपण आपल्या कूपातच डुबक्यांचा सराव करत राह्यचे.
* व्यवस्थित प्रयत्नांनंतर जगातली कोणतीही भाषा कोणालाही सहा महिन्यांत शिकता येते. मग त्यासाठी इंग्रजीचे एवढे अवडंबर कशाला माजवायचे?– मग सहा महिन्यांत मराठी शिकून दाखवा ना! त्यासाठी मराठी माध्यमातून शिक्षण कशाला घ्यायचे? जमले तर, आपल्या राजकर्त्यांना, जाहिरातदारांना, तसेच चित्रवाणीच्या वाहिन्यांवर पडद्याच्या तळाशी चलपट्ट्या चिकटवणार्यांना मराठी शिकवून दाखवले तर मानता येईल.
ता. क.: मूळ लिखाणातले चुकीचे मराठी लेखन जमेल तेवढे सुधारले आहे.
प्रिय श्रीमती शुद्धमती राठी यांसी,
सप्रेम नमस्कार.
पत्राबद्दल आभार. आपले पत्र प्रसिद्ध करीत आहोत. प्रत्येक वाचक आपापल्या गृहिततत्त्वांप्रमाणे व मतांप्रमाणे त्याबद्दल निष्कर्ष काढू शकतो.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
[…] […]