घरात शाळा – लोकसत्तेमधील लेखांचे परीक्षण (ले० अपर्णा लळिंगकर)

दि. १२ जूनच्या चतुरंग मध्ये “घरीच शिक्षण किंवा होम स्कुलिंग” या संकल्पनेवर आधारीत घरात शाळा हा शुभदा चौकर यांचा, तसेच या संकल्पनेचं उदाहरण विस्ताराने सांगणारा प्रयोगाची पायवाट हा वंदना अत्रे यांचा आणि शिकतं घर हा अमरजा जोशी यांचा प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण या संकल्पनेवर आधारित एका शाळेची माहीती सांगणारा असे तिनही लेख वाचनात आले. सर्वशिक्षा अभियानातील घोटाळे, विविध शालेय मंडळांचे अभ्यासक्रम त्यातून पुढे येणारे गुणांचे राजकारण, एकूणच महाग होत चाललेले शिक्षण आणि ढासळत चाललेला शैक्षणिक दर्जा या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर हे लेख आशादायकच वाटतात. पण लेख वाचताना माझ्या मनात काही प्रश्नांनी पिंगा घालायला सुरूवात केली. त्यांचाच थोडा उहापोह या प्रतिसादा मध्ये करत आहे.

१२ जून २०१०च्या लोकसत्तेच्या चतुरंग पुरवणीमधील ’घरात शाळा’ या एका नाविण्यपूर्ण संकल्पनेबद्दलचे तीन लेख वाचून आपल्या अमृतयात्री परिवारामधील एक नियमित वाचकसदस्य अपर्णा लळिंगकर यांचे कुतुहल जागृत झाले व त्यावर अधिक विचार करून त्यांनी त्यांबद्दलचे आपले परीक्षण पाठवले आहे. आपल्यालाही ते सुरस वाटावे.

संपूर्ण लेख खालील दुव्यावर उपलब्ध आहे.

अमृतमंथन_घरात शाळा – लोकसत्तेमधील लेखांचे परीक्षण 100624

.

लोकसत्तेमधील मूळ लेख खालील दुव्यांवर उपलब्ध आहेत.

घरात शाळा (ले० शुभदा चौकर)

http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=77182:2010-06-11-07-46-59&catid=194:2009-08-14-02-31-30&Itemid=194

प्रयोगाची पायवाट (ले० वंदना अत्रे)

http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=77181:2010-06-11-07-45-35&catid=194:2009-08-14-02-31-30&Itemid=194

शिकतं घर (ले० अमरजा जोशी)

http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=77180:2010-06-11-07-40-25&catid=194:2009-08-14-02-31-30&Itemid=194

.

आपले प्रतिमत (feedback) लेखाखालील रकान्यात अवश्य नोंदवा.

.

– अमृतयात्री गट

.

18 thoughts on “घरात शाळा – लोकसत्तेमधील लेखांचे परीक्षण (ले० अपर्णा लळिंगकर)

   • श्री हर्षद, शाळेला पर्याय नाही हे खरंय पण त्याचं सध्याचं स्वरूप बदललं पाहीजे. औद्योगिकरण झालं तेव्हाची गरज ओळखून शालेय शिक्षणाचा आणि पर्यायाने एकूण शिक्षण व्यवस्थेचा पाया (सेवा करणे, कारकुनी करणे) असा बांधला गेला. आताची गरज ही मिळवलेल्या ज्ञानाच्या आधारे नवे शोध लावण्याची आहे. तरी अजुनही आपल्याकडे कारकुन तयार करणारे शिक्षणच दिले जाते. सध्याचे मोठ्या प्रमाणात बाहेर पडणारे अभियांत्रिकी पदवीधर हे एक प्रकारची कारकुनीच करत आहेत…संगणक प्रणाली लिहीण्याची. प्रत्यक्ष नविन शोध आपल्याकडे कितपत लावले जातात? तसे मुळात खर्‍या संशोधक वृत्तीच्या लोकांना प्रोत्साहन दिले जात नाही. कारण संशोधक वृत्ती लहानपणापासून जोपासावी लागते….की जे आपल्या शालेय शिक्षण पध्दतीमध्ये नाहीये. कारण त्यासाठी प्रश्न विचारायला लागतात. प्रश्न विचारायची मुभादेखील द्यावी लागते. प्रश्नांना उत्तेजन दिले की अजुन प्रश्न पडतात. आपल्याकडे सध्या घोकंपट्टीचा बाजार चालू आहे. मुलांमध्ये चौकस बुध्दी निर्माण करावी लागेल……प्रोत्साहन द्यावं लागेल…..सुरूवातीला प्रश्न विचारणार्‍याला…….आणि त्यानंतर चांगला प्रश्न विचारण्याला. संगणकाचा वापर योग्य त्याप्रकारे करून हे साध्य कसं करता येईल हाच मुख्य प्रश्न आहे.

    • सप्रेम नमस्कार.

     शांतिसुधा (अपर्णा लळिंगकर) यांचा मुद्दा पटण्यासारखा आहे. त्या स्वतः शिक्षणक्षेत्रातच संशोधन करतात.

     भारतीय शिक्षणपद्धतीत नक्कीच काहीतरी मूलभूत दोष आहेत हे नक्की. इंग्रजांकडून मिळालेल्या शिक्षणपद्धती, शासनव्यवस्था, न्यायव्यवस्था, संसदपद्धती हे सर्व आपण जसेच्या तसे घेतले पण त्यातील दोष कमी करण्याचा किंवा काही चांगल्या गोष्टी नव्याने त्यात आणण्याचा फारच प्रयत्न केला. खरं म्हणजे आपल्या राज्यघटनेने बर्‍याच सुधारणांसाठी पाया तयार केलेला आहे. पण अशा उत्तम राज्यघटनेच्या पायावर अंमलबजावणीचे मजले चढवताना आपण घटनेला अभिप्रेत असलेल्या बर्‍याच मूलभूत तत्त्वांकडेच दुर्लक्ष केले व राजकारण्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी घटनेचा उपयोग करून घेतला. अनेक वेळा घटनेतील योग्य तरतूदी बदलून तिचे विडंबनच केले. (उदा० राजीव गांधींनी प्रसिद्ध शहाबानो खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दडपून टाकण्यासाठी केलेली घटनादुरुस्ती.) स्वतः इंग्लंडनेही आपल्या कायद्यात, शासनववस्थेत व शिक्षण पद्धतीत बर्‍याच सुधारणा केल्या. पण आपण पुरेशा सुधारणा न केल्यामुळे किंवा अयोग्य सुधारणा केल्यामुळे आपली अधोगतीच झाली आहे. आपल्या देशात कुठलीही चांगली गोष्ट परिणामकारक न ठरण्याला असलेले मूलभूत कारण म्हणजे भ्रष्टाचार. पण कुठल्याही पक्षाचे सरकार आले तरी त्यांनी भ्रष्टाचारावर मूलभूत व कठोर उपाय करणे टाळलेच आहे. शिक्षणक्षेत्रातही अधोगतीच होत आहे. त्यामुळेच १०० कोटीच्या भारताने इस्रायल, जपान व इतर अनेक लहान देशांच्या मानाने काहीही मूलभूत संशोधन केलेले नाही. सॉफ्टवेयर मधील body shopping म्हणजे कंत्राटी मजूर-पुरवठा करण्याचे थोडे उदात्त-सुधारित स्वरूप. बिहारी लोक ज्या कारणांसाठी मुंबई व इतर ठिकाणी जातात, किंवा केरळी मजूर मध्यपूर्वेच्या देशांत जातात; त्याच कारणांसाठी आपले सॉफ्टवेयर अभियंते परदेशात स्वस्तात कामे करून इथल्या मानाने अधिक पैसे कमावतात व मग इथल्या सामान्य माणसांहून रूबाब दाखवतात. त्यात फार अभिमानास्पद असे जेवढे वाटते तेवढे काही नक्कीच नाही.

     हा सर्व आपल्या शिक्षणपद्धतीचाच पराभव आहे. अर्थात त्यावर उपाय काय हा विषय वेगळा. त्याबाबतीतही शिक्ष्णतज्ज्ञांची मते आपल्या राजकारण्यांना व सामान्य जनतेला पटत नाहीत. तेव्हा हे दुष्टचक्र असेच चालू राहणार असे दिसते.

     क०लो०अ०

     – अमृतयात्री गट

 1. नमस्कार,
  मुलांना स्वतः पालकांच्या देखरेखीत शिक्षण मिळाले तर संस्कृति ला धोका नाहीच। १९८०-८१ मध्ये मी काटोल इथल्या नबिरा महाविद्यालयात शिकत असतांना सगळ्यांचे आवडते इंग्रजीचे प्राध्यापक श्री राव यांनी आपल्या घरात आपल्या मुलांवर यशस्वी रित्या हा प्रयोग केला। इंग्रजी, चेस यांत मुलांनी नैपुण्य प्राप्त केले तसेच त्यांचे सद्व्यवहार, आदर, सहनशीलता इत्यादि गुण इतरांकरीता उदाहरण झाले। यशाचे मापदंड(?) म्हणायचे तर त्यांना कशा करिता ही फार धडपड करावी लागली नाही। पुणे किंवा दिल्ली ला नव्हते म्हणून जे काही फरक तेवढेच।

  २००२ वर्षी मदनपल्ली इथल्या ऋषि व्याली स्कूल ला दोन दिवस मामां कड़े राहिलो आणि विद्यार्थ्यांचे कार्यक्रम पहायला मिळाले। ती जरी सगळी श्रीमंतांची मुलं असली तरी सामान्यांना तसले प्रयोग आपल्या मुलांवर, जवळ ठेवून आपल्या निगरानीत करिता येइल। आपल्या मुलात अथवा मुलीत काही विशिष्ट गुण आहेत किंवा असावे असे जर आपल्याला वाटत असेल आणि अश्या संस्थेत पाठवायची ताकत नसेल तर होम स्कूलिंग उत्तम उपाय आहे असे वाटते।

  तरी या माहितीबद्दल व सुरस परीक्षण बद्दल धन्यवाद।

  • प्रिय श्री० भास्करभट्ट यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या विचारपूर्ण अभिप्रायाबद्दल आभार. आपले विचार लेखिकेपर्यंत पोचवू. पाहूया त्यांना काय म्हणायचे आहे ते.

   – अमृतयात्री गट

   ता०क० आपण देवनागरीत उत्तम मराठी लिहिता. हे सर्व आम्हाला पूर्वी हुकले.

   • नमस्कार श्री भास्करभट्ट,

    सर्वप्रथम आपल्या सविस्तर अभिप्रायासाठी आभार.

    “मुलांना स्वतः पालकांच्या देखरेखीत शिक्षण मिळाले तर संस्कृति ला धोका नाहीच।”>> अगदी खरं आहे…..पण हे अशाचवेळी शक्य आहे जिथे पालक त्या क्षमतेचे असतील…..सगळेच पालक तेवढ्या क्षमतेचे असतील असे नाही. आपण अगदी घरा घरांतून बघतो आहोत की आपल्या सोडून इतर सर्व संस्कृती बर्‍याचवेळा घरात जोपासल्या जातात. पुन्हा पालकांकडे नुसता पैसा असून उपयोग नाही. आपल्या पाल्याला देण्यासाठी तेव्हढा वेळ पाहीजे. कित्येक घरांमध्ये मुलांच्या कटकटी पासून दूर राहण्यासाठी त्यांना टी व्ही वर कार्टून लावून दिले जाते. सध्याच्या संयुक्त कुटुंब पध्दती मध्ये मुलांबरोबर आई-वडिलांनी उपयुक्त वेळ घालवणे खूपच दुर्मीळ होवून बसलं आहे. एकाच घरातील सगळ्या व्यक्ती एकाच वेळी जेवायला बसणं आणि टीव्ही समोर लागलेला नसताना बसणं हे शक्यच होत नाही. त्यामुळे पालकांनी मुलांना स्वत: शिकवणं आणि चांगले संस्कार देणं हे खूपच आदर्शवत आणि अवघड आहे.

    तुम्ही दिलेलं ८०-८१ सालातील उदाहरण छानच आहे. पण त्यामुळे घरीच शिक्षण देणे हे सर्वांसाठी शक्य आहे का याचं उत्तर मिळत नाही.
    “ऋषि व्हॅली” या शाळेतील मुलांचा तुमचा अनुभव चांगला आहे हे चांगलच आहे. पण हे सगळं तुमच्या समोर. त्या मुलांचं वागणं इतर मुलांमध्ये गेल्यावर कसं आहे हे महत्त्वाचं आहे. माझी खात्री आहे ती मुलं इतर मुलांमध्ये मिसळणार नाहीत किंवा त्यांना ते खूपच अवघड जाईल. माझ्या माहीतीतील एका शाळेतील मुलं सुरूवातीलाच निवड चाचण्यां मधून निवडून घेतात. त्यामुळे मुलां मध्ये एक प्रकारची आम्ही कुणीतरी वेगळेच आहोत ही भावना वाढीस लागलेली मी पाहीले आहे.

    होमस्कूलिंग ही संकल्पना चांगली आहे. पण अमेरिकेत ती जरी खूप आवडली असली म्हणजे आपल्याकडे सुध्दा ही संकल्पना रूजेलच आणि सर्वसमावेशक (सगळ्यांसाठी उपयुक्त) अशी असेल असं वाटत नाही. मधे “डीसर्प्टींग क्लास” हे पुस्तक (अमेरीकन शिक्षण पध्दती मध्ये इनोव्हेशन संगणक प्रणालीचा वापर करून करता येईल या संदर्भात आहे) वाचनात आलं. त्याचं परीक्षण वेळ मिळाला की लिहीणार आहेच. त्यातील मह्त्त्वाचा मुद्दा म्हणजे ते असं म्हणतात की कोणताही शैक्षणिक बदल हा त्या त्या देशाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक पध्दतींचा विचार करूनच व्हावा म्हणजे परिणाम कारक ठरतो.

    सध्या घाईत आहे म्हणून इतकच लिहीते. पुन्हा भेटूच.

    पुन्हा एकदा धन्यवाद आपल्या प्रतिमता बध्दल.

    क लो अ

    अपर्णा लळिंगकर

 2. I read three articles. I agree with advantages home learning can have over schooling model we have? but can one think of it as policy? it needs very extensive involvement from parents. And millions of households across the country cannot have such parents. the other point is schools readily provides interaction with larger social pool, can this alternative offers it? at best, these cases can serve as anecdotes and prove limitations of present schooling.

  • प्रिय श्री० किरण लिमये यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   पत्राबद्दल आभार. आपली शंका रास्तच आहे. केवळ आर्थिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर तेवढे सुशिक्षित, सक्षम, उत्साही आई-वडिल असणे व त्यांना मुलांसाठी तेवढा वेळ खर्च करणे शक्य असणे ह्या दृष्टीनेही ही काही फार सर्वसामान्य गोष्ट नक्कीच नाही. पण तरीही हा एक चांगला पर्याय म्हणून लोकांच्या लक्षात आणून देणंही महत्त्वाचं आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी त्याचा विचार नक्की करावा; असाच उद्देश लेखिकेचा (सर्वच लेखकांचा) असावा.

   आपली लेखिकामैत्रिण याबद्दल काय म्हणते तेही पाहू.

   – अमृतयात्री गट

 3. श्री. किरण लिमये यांस,

  आपल्या प्रतिमता बध्दल धन्यवाद. आपण मांडलेले मुद्दे बरोबर आहेत. आणि यासगळ्यावर आत्ताच विचारप्रक्रीया चालू व्हावी असे वाटते म्हणूनच वरील परीक्षण वेळात वेळ काढून लिहीले. सध्या घाईत आहे म्हणून आता थांबते. पुन्हा भेटूच.

  धन्यवाद,

  अपर्णा लळिंगकर

 4. नमस्कार,
  अपर्णा ताईंना धन्यवाद कळवतो। श्रीयुत लिमएंचे म्हणणे अगदी बरोबर आहे। तरी नव्या शैक्षणिक नीतीत होम स्कूलिंग चं पर्याय असावं असं वाटतं। सुशिक्षित, बौद्धिक सम्पदा असलेले, वेळ देऊ शकणारे, विशिष्ट कलां विषयक आसक्ति ठेवणारे पालक (दोघं पैकी जरी एक) शिक्षण प्रणाली किंवा संस्थांना दोष देतांना आढळतात। बदलत्या संस्कृति ला बळी पडतोय अशी चिंता व्यक्त करतांना दिसतांत। त्यांना प्रोत्साहन का देऊ नए होम स्कूलिंग स्वीकरायला? यांतले लाभ म्हणजे –
  १ प्रशासनावर ओझं कमी होईल। फ़क्त कौंसलर ठेवावे लागतील प्रगतीची नोंद घ्यायला आणि हे पहायला की ‘सर्वांना शिक्षण’ या धोरणा अंतर्गत किमान टप्पे गाठले जात आहेत. एका शहरात २००० असे विद्यार्थी असतील तर एक शाळा कमी होईल.
  २ डबल शिक्षण (शाळेत पैसा, वेळ घालवावे मग सगळ्याच विषयां करीता ट्यूशन ला इकडे तिकडे जा) बंद होईल.
  ३ वाचवलेल्या वेळात खेळ, हौशी पूर्ण होतील, नातेवाइकान्ना भेटता येईल, एखाद्या प्रदर्शनीला जाता येइल. हे पण आवश्यक आहेच.
  ४ बदली झाली, पुन्हा एडमिशन, बिल्डिंग फंड, कोणतं मीडियम, स्तर, मिळेल की नाही इत्यादि पासून चिंता मुक्ति होईल.
  ५ कला घराण्यातील विद्या, कास्तकारी, दुकानदारी इत्यादि मनात रुजवायाला घर हेच उत्तम.
  ज्या काळी सर्वां करीता शिक्षण नव्हते तेंव्हा फ़क्त होम स्कूलिंग होत असे। ती डिज़ायनर शिक्षण पद्धति आजच्या एवढी महाग नव्हती।
  केवल शाळा दूर आहे म्हणून जे पालक (शहरांतले श्रमिक, गावातले कृषक इत्यादि) मुलांना पाठवू शकत नाहीत त्यांच्या घरीच शाळा घेऊन जावी लागेल अगदी मिशंरीं सारखं. सर्वांना बस किंवा ऑटो करायला प्रशासनाला जमेल काय? त्यांना जर मोफत होस्टल दिले तर मोठ्या प्रमाणावर अक्षराभ्यास होईल, नाव लिहू शकतील पण त्यांना जीविकोपार्जन विद्या पासून दूर ठेवणे होईल. आपल्या शिक्षण संस्था म्हणजे फार मोठ्या कारकून कारखाने हे अगदी खरे. आपला देश अजून ही कृषि प्रधान आहे। नीति प्रस्तावनेत या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत।
  ‘ऋषि व्याली स्कूल’ जि.कृष्णमूर्तींच्या शिक्षण विषयक विचारांवर आधारित शाळा आहे । विद्यार्थ्यांना आवडत्या विषय, विद्यांमध्ये वैशिष्ट्य, उत्कृष्टता गाठण्यास मदत केली जाते। काहीही थोपवले जात नाही। त्यांना आपसांत मिसळण्याचा स्वतः आपले कार्यक्रम ठरविण्याचा अभ्यास होतो। आपल्या संस्कृति बद्दल मात्र काहीही शिकवले जात नाही। म्हणजे कृष्णमूर्ती यांच्या मते थोपवली जात नाही।
  अमृतयात्री, आपल्या कौतुके बद्दल आभार। बरेच काळ झाले म्हणून असं होम स्कूलिंग करून पुन्हा मराठी चा अभ्यास करतोय।

  • प्रिय श्री० भास्करभट्ट यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपण खरोखरच एक उत्तम संकल्पना माडली आहे. औपचारिक शालेय शिक्षणाला हा पर्याय द्यायला हरकत नाही. अर्थात पुन्हा त्याचा दर्जा राखण्यासाठीसुद्धा नियमावली करायला लागेल. परीक्षा घ्याव्या लागतीलच. पण नक्कीच करण्यासारखा हा प्रयोग आहे.

   आपल्या संस्कृतीबद्दल फारच कमी शाळांत शिकवले जाते, हे एक कटु सत्य आहे. पण एकंदरीतच ३१ डिसेंबरला जागताना आपण कोजागिरी विसरलो व मदर्स डे पाळताना (एखादे शुभेच्छापत्र पाठवून) आपण पिठोरीचा मातृदिन विसरलो. सर्वश्रेष्ठ परंपरा हाच तर भारतीयांचा सर्वात मोठा ठेवा आहे.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 5. There is no doubt over advantages a home schooling ( better word be learning at home) can offer to an individual. Schools cannot inculcate values, but they are targeted to skills. How can we set a common examination at some point of time (say, at 10th) for children who are from traditional schooling and children who are from home schooling. Till which level home schooling should be permitted?
  The burden a good student in urban school face is of coaching classes and (with all due respect to various tasks teachers have to do) decreasing teaching quality. I guess good alternative will be experiments where group of parents can come together and start teaching to group of children in neighborhood.
  Loss of customs, like Kojagiri, is not due to schools or educations. It is lifestyle impact.
  In globalized world, we need workers which will be similar in their skill sets. Most of the labor in society is paid for skills which will be substitutable and fit to modern technology. Hence they ought to be similar. With all ills of schooling, the advent we have made in terms of opportunities of consumption and seeking knowledge has major chunk of this ultra-competitive and methodological schooling.
  Home schooling will suit few children and few parents. Even 2000 in one city, seems to me, is big number. And these parents will mostly be from same financial class.

  • प्रिय श्री० किरण लिमये यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   हा पर्याय अधिकृतपणे स्वीकारायचा असल्यास त्यावर बराच विचार करावा लागेल हे खरेच.

   क०लोअ०

   – अमृतयात्री गट

 6. sir,
  rapidly emerging trend in schools is not focused either on inculcating values or skills but, it is, purely business viz. creating a brand name , selling it, eliminating competition etc. which are all usually corporate strategies. Education has already become a business and there is big money pouring in from vested interests. Looking at new concepts gaining ground in the young minds of our future generation (for eg. anything that is not branded is not GOOD) we can foresee that the child not studying in such branded schools will learn nothing but a feeling of guilt, will develop only inferiority complex, will assume second class citizen status even before he/ she ultimately becomes one. As ill effects of polarization of society permeate into the education sector, by and by, we may also see educational institutions being categorized as capitalist, socialist and extremist controlled because the notorious nexus between money & politics can not be broken.
  when we are talking about workers with skill sets to suit modern technology we also have to consider the penetration of technology benefits. agriculture will continue to be the sector on which our major population will depend upon for their livelihood.
  Take for eg. how we have used technology. The TV was introduced on large scale as a technology aid to farmers. What actually is pushed down their throats is the ‘lifestyle dream’ which they can’t afford. In Yavatmal (also other districts of Vidarbha) we can see the results. policies are manipulated using loopholes & real benefits of technology are only enjoyed by the elite and the rural rich. proper employability of the educated with desired skill sets is still a far cry in India. While churning out such poorly skilled graduates we could be depriving them of the traditional skills they would otherwise learn in their own society.
  children are occupied in school and related activities for good part of the day, and day after day. The school age is the right time for moulding the right way. I still fondly remember my 2 years spent at Sanskar vidyalaya in 75-76. Teachers can definitely give much more than just skills for ‘living’. They can impart skills for ‘right living’. Our problems today are that we are only busy in ensuring a ‘living’. Schools formed under corporate culture can’t do any thing more than this. Durgabai deshmukh was a school dropout but later did home schooling and successfully established a career in legal practice before she renounced it for social service. Yes, 10th examination could be the common stage. Anyway government is mulling no exams upto 10th across the country. If there are exams before that, there can be an online option for urban home schooling students.
  Since already the education is getting polarised as GOOD & BAD. The new policy must ensure ‘right to GOOD education’, be it in traditional school or in home learning.

  • प्रिय श्री० शां० भास्करभट्ट यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपल्या टिपणातील जवळजवळ प्रत्येकच वाक्य अधोरेखित केले पाहिजे. अत्यंत महत्त्चाचे विश्लेषण आपण मांडले आहे.

   {{we can foresee that the child not studying in such branded schools will learn nothing but a feeling of guilt, will develop only inferiority complex, will assume second class citizen status even before he/ she ultimately becomes one. }}
   आपले हे एक विधानही अत्यंत अर्थगर्भ आहे. दोन-तीनशे रूपयांना मिळणार्‍या चपला-बूटांपेक्षा दोन-तीन हजारांना मिळणारे चपला-बूट किचितच अधिक चांगले असतात. निदान दहापटीने चांगले तर नक्कीच नाहीत. पण तीनशे रूपयाच्या unbranded बुटांचा दर्जा वाढवून साडेतीनशे रूपये किंमत ठेवली तर त्यांना गिर्‍हाईके मिळणे दुरापास्त होईल. पण तीन हजाराचे साडेतीन हजार केले तर ते अधिक किंमतीचे म्हणजे अधिक चांगले (निदान अधिक दिखाऊ) असे मानून त्याचा खप जोरात चालतो. दादा कोंडकेच्या ढोपरापर्यंतच्या चड्ड्या पाहून हसणारे नंतर बाहेरच्या देशातून बर्मूडा चड्ड्यांची फॅशन आल्यावर त्यांना भरपूर पैसे देऊन त्या आनंदाने विकत घेऊन वापरू लागले. मराठी शाळांना महिना दहावीस रूपये फी वाढ करणेही कठीण असते. पण ब्रॅंडेड इंग्रजी शाळा वर्षाला पन्नास हजारावरून पाऊण लाखावर एका उडीत पोचू शकतात. शिवाय अनुदानित शाळांतील कर्मचार्‍यांना शासकीय दराने पगार द्यावा लागतो, जे बंधन विना-अनुदानित श्रीमंती शाळांना नाही. शिवाय आपल्या स्वाभिमानी राज्य शासनाने गेल्या पाच वर्षांत पगाराव्यतिरिक्त खर्चाचे अनुदान दिलेलेच नाही व पगाराचे अनुदानही फार उशीराने दिले जाते. जनतेने कर वेळेवर भरले नाहीत तर त्यांना दंड. पण शासनाने मात्र कसेही वागावे. अशाने अनुदानित मराठी शाळांचा दर्जा खालावला नाही तरच नवल. आणि मग इंग्रजी शाळांचा दर्जाच चांगला असतो म्हणजे इंग्रजी भाषेमध्येच ज्ञान घेता येते असे जगावेगळे अजब निष्कर्ष काढायला आपण मोकळे.

   असो. आपल्या विचारप्रवर्तक पत्राबद्दल आभार.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 7. नमस्कार,
  माझी लाम्ब अशी प्रतिक्रिया चिकाटी ने वाचून समजून घेतल्या बद्दल धन्यवाद. Branded तेच बरे असे सध्याच्या तरुण व किशोर वयस्कांची मानसिकता पाहतोच आहोत. तसेच इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणेच बरे असे समजणारे तर फार मोठ्या प्रमाणावर आहेत. पण मी त्यांत नाही असे स्पष्ट करू इछितो. इंग्रजीत शिक्षण घेणे काही कमीपणाचे आहे असे मला वाटत नाही। मी स्वतः प्राथमिक शिक्षण महानगर पालिकेच्या शाळेत हिंदी माध्यमे तर माध्यमिक दोन वर्षं ही मराठी माध्यमे केले. हाई-स्कूल पासून इंग्रजीत शिक्षण घेतले याचाही माला फायदा झाला हे स्वीकारतो.
  सध्या ची प्रवृत्ति तुम्ही टीका केली तशीच होत चालली आहे. त्या मुळे जे विद्यार्थी अश्या (Branded) शाळेत जात नाहीत त्यांना कोणती ही उणीव भासू नए याची एक मोठी जबाबदारी आहे हेच मला म्हणायचे आहे. ज्यांचे उदर-निर्वाह नोकर्या, पगारांवर अवलंबून असते त्यांनी इंग्रजी चा द्वेष करण्याचा धाडस अजून तरी करू नए.
  इंग्रजी शिकणे, शिकवणे एक वेगळी गोष्ट. शिक्षणाचे व्यवसायीकरण मात्र पुढे मोठे प्रश्न उभारणार असे वाटते. त्या कोमल वया पासूनच इतका अंतर समजून घेण्याची शक्ति असते का त्यांच्यात? मी माझ्या मुलाला तो प्राइमरीत असतांना एवढ्यावरून एका कॉन्वेंट मध्ये टाकले नाही कारण तिथे मुलांना आई वडील कार मध्ये पाठवत असत. नागपुर महापालिकेच्या कित्येक शाळा बंद करावे लागतील असे वाटते. मी पाहतोय, भोवतालचे कमी मिळकत असलेले देखील आपल्या मुला-मुलींना काही करून कॉन्वेंट मध्येच टाकतात, महापालिकेच्या शाळेत नाही. कारण काय असावे?

  • प्रिय श्री० शां० भास्करभट्ट यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपण पत्रात शेवटी विचारलेल्या प्रश्नाला आपल्या पत्रात सुरूवातीस दिलेले उत्तरच लागू होईल. ब्रॅंडिंग व त्यामुळे इंग्रजी शाळांबद्दल वाटणारा खोटा कौतुकयुक्त आदर व मराठी शाळांबद्दलचा न्यूनगंड, दुसरे काय?

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s