English not the medium – Malaysia’s dilemma

मलेशियामध्ये सध्या देशपातळीवर चालू असलेल्या एका महत्त्वाच्या चर्चेमधील एक सुरस लेख. विषय: सेमी-इंग्रजी माध्यमाची पद्धत  (गणित व विज्ञान या विषयांसाठी इंग्रजी भाषेचे माध्यम). मलेशियातील या समस्येचे स्वरूप बरेचसे आपल्यासारखेच दिसते आहे. पण एकच मुख्य फरक म्हणजे तेथील सरकार या चर्चेत सर्वांचे विचार लक्षात घेते आहे व झालेल्या निर्णयामधील चूक मान्य करून ती दुरुस्त करण्यास ते तयार आहे.

संपूर्ण लेख खालील दुव्यावर उपलब्ध आहे.

Amrutmanthan_English not the medium_Malaysia’s dilemma_100613

श्री० स्वामीनाथन अंकलेसरिया अय्यर ह्यांचा अशाच प्रकारच्या विषयासंबंधीचा अमृतमंथनावर पूर्वी प्रसिद्ध झालेला लेख आपण खालील दुव्यावर पाहू शकता.

सर्वप्रथम मातृभाषेत शिकणे हीच सर्वोत्तम पद्धत (ले० स्वामीनाथन एस० अंकलेसरिया अय्यर, टाईम्स ऑफ इंडिया)

.

आपले विचार खालील रकान्यांत अवश्य मांडा.

.

– अमृतमंथन गट

.

9 thoughts on “English not the medium – Malaysia’s dilemma

  • प्रिय श्रीमती अपर्णा लळींगकर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   उत्तर देण्यास झालेल्या विलंबाबद्दल क्षमा असावी. जगभरातील शिक्षणतज्ज्ञांच्या मताशी अनुकूल असेच ते प्रतिपादन आहे.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 1. मलेशियात किती भाषा बोलल्या जातात? त्यांतल्या किती भाषिक माध्यमांतून, शाळेचे नव्हे तर, कॉलेजचे शिक्षण घेता येते ही माहिती दिली असती तर बरे वाटले असते. मलेशिया देशाचे क्षेत्रफळ व त्यांतील भाषांची संख्या यांची भारताशी आणि येथील भाषांच्या वैविध्यतेशी तुलनाच होऊ शकत नाही. त्यामुळे मलेशियासारख्या फुटकळ देशाची उदाहरणे आपणां सर्वांच्या दृष्टीने कुचकामाची आहेत.–SMR

  • प्रिय श्रीमती शुद्धमती राठी यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   कुठल्याच एका देशाची दुसर्‍या कुठल्याही देशाशी तुलना होऊ शकत नाही हे खरेच. पण तरीही हिंदुस्थानी संस्कृतीच्या देशांचे ठळक अपवाद सोडता इतर कुठल्याही देशाने इंग्रजीपुढे गुडघे टेकून आपली शिक्षणव्यवस्था, शासनव्यवस्था, न्यायव्यवस्था, संसदव्यवस्था, पोलिसव्यवस्था अशा सामान्याच्या जीवनाशी जवळून संबंध येणार्‍या विविध संस्था देशातील बहुसंख्यांना कळत नसलेल्या परदेशी भाषेतच चालवण्याचा हट्ट धरलेला नाही. स्वतः इंग्लंडातही अशाच प्रकारे फ्रेंचचे स्तोम माजवण्याचा मूठभर उच्चभ्रू स्वार्थी माणसांचा प्रयत्न जनतेने निग्रहाने हाणून पाडला.

   मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व अत्यधिक मानणार्‍या जगभरातील शिक्षणतज्ज्ञांचे मत आम्हाला पटत नाही. आमच्याच घटनेतील मूलभूत तत्त्वे आम्ही विसरलो आहोत. इंग्रजीपेक्षाही मातृभाषेला महत्त्व देणार्‍या इतर देशांचे प्रश्न सोपे व आमचेच अत्यंत कठीण असे आम्ही मानतो. आमची भाषा-संस्कृती-समाजव्यवस्था विसरून आम्ही इंग्रजीच्या ओंजळीने त्यांची संस्कृती शिकतो. या सर्वाचे जगातील इतर सर्वांना आश्चर्य वाटते. हे सर्व करायचेच होते तर झगडून स्वातंत्र्य कशाला मिळवले व स्वातंत्र्य म्हणजे नक्की आम्ही काय मिळवले असे प्रश्न त्यांना पडतात. पूर्वीच्या गोर्‍यांच्या ऐवजी अधिक भ्रष्ट असलेले, आमच्याच जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना नाडणारे आमचे लोक राज्यकर्ते म्हणून गादीवर बसवणे एवढेच आपले उद्दिष्ट होते का ते समजत नाही. युनोमध्येही इतर देश आपापल्या भाषेत बोलत असता आम्ही पूर्वजेत्यांच्या भाषेतच बोलतो व त्याबद्दल आम्हाला काहीच लाज वाटत नाही.

   असो. आपल्याला जगभरातील तज्ज्ञांची मते मान्य नाहीत. मातृभाषा हा इंग्रजीला पर्याय नसण्याचे आपले विधान आपण पुनःपुन्हा वेगवेगळ्या शब्दांत मांडले आहे. त्यावर आपण बरीच चर्चा केलेली आहे. आता ती कापूसकोंड्याची गोष्ट आम्ही पुढे वाढवीत नेत नाही.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 2. >>कुठल्याच एका देशाची दुसर्‍या कुठल्याही देशाशी तुलना होऊ शकत नाही हे खरेच.<< हे खरे नाही! युरोपातल्या एका देशाची दुसर्‍या देशाशी तुलना करता येते. भारताची तुलना करायचीच असेल तर अमेरिकेशी करावी. भारतात सहा हज़ारावर भाषा असतील तर अमेरिकेत त्याहून जास्त. जगाच्या सर्व देशांतून लोक अमेरिकेत जाऊन स्थिरस्थावर होतात. असे असले तरीपण, त्या देशात मातृभाषेतून उच्च शिक्षण घ्यायची सोय असेल असे मला वाटत नाही.
  जागतिक स्तरावर इंग्रजीचे महत्त्व किती वाढत चालले आहे ते समजण्यासाठी, हे वाचावे :

  China has launched an English teaching programme and is likely to have more English speakers than India in a decade. In Russia, English has already become the working language. Even in Latin America and parts of Europe, Graddol(author of
  the book"English Next India", published in March 2010) says, English is now being seen as a basic skill, and India would
  get no special benefit once the language is spoken by everyone everywhere.

  But the skewed focus on teaching English would mean a “half-baked education” for many Indians, and could see the
  country losing out to China, the linguist says.

  Graddol suggests using the mother tongue at the primary level and adopting English as a medium of instruction only at the
  secondary level to ensure that the learning process is meaningful.

  He also says consolidating multilingualism could be India’s strength and recommends a three-language formula codified in
  1968. The formula promoted primary education in the mother tongue and the teaching of English, Hindi as well as other
  regional languages at the secondary level.

  The linguist points out another danger. “Smaller languages will decline and regional languages will also lose domains of
  use,” he says.

  Threat to vernaculars:

  In Gujarat, for instance, a poor pass percentage in Gujarati-medium schools compared with English-medium schools has
  led to the closing down of several vernacular schools.

  In Maharashtra too, the mushrooming of English-medium schools has caused a sharp decline in the number of Marathi-medium schools. In Pune, widely regarded as the cultural capital of the state, the number of Marathi-medium schools came down from 719 in 2006 to 604 in 2007, according to the Environment Status Report of 2008.

  The Holy Family School in Andheri, Mumbai, which has both Marathi- and English-medium wings, has seen a steady fall
  in enrolment of students in the vernacular medium over the past five years.

  Principal Francis Swamy recalls children whose fathers farmed their lands or had occupations such as driving buses and
  autorickshaws, and mothers who worked in households as maids. Yet, when many of them pulled their children out of the
  Marathi-medium wing of Swamy’s school, they only moved to an English-medium school. “Such is the craze for English
  that it cuts across class,” Swamy says.

  The National Curriculum Framework for School Education in India, drafted in 2005, also makes a strong pitch for multilingualism. States where English is not the official language have largely seen government-run schools adopt regional languages as the medium of instruction, even as private schools have taught in English.

  Graddol calls for broader reforms in education, including infrastructure, quality of teachers and academic practices.

  “English may be a useful catalyst, but the final goal must lie beyond English,” he says.

  But Meena Kandasamy, a Dalit activist and poet who teaches English at Anna University in Chennai, sees a larger role for
  English in Indian society, one of a link language.

  “Today, people all over the world face similar problems— terror, violence, exploitation —and they need to learn and
  understand from each other’s resistance struggles,” she says. “They are all different stories, but they are also extremely
  similar. If you have to say these stories simultaneously, you would be using English.”

  • प्रिय श्रीमती शुद्धमती राठी यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   १. युरोपातील U.K. हा इंग्रजी बोलणारा देश सोडला तर इतर कुठल्याही देशात देशस्तरीय सार्वजनिक शिक्षणाचे माध्यम म्हणून स्वतःची भाषा सोडून त्याऐवजी इंग्रजी भाषा स्वीकारलेली माहित नाही. शासनव्यवस्था, न्यायव्यवस्था, संसदव्यवस्था, पोलिस, व इतर सर्व सार्वजनिक व्यवस्थांमध्येही स्वभाषेलाच प्राधान्य असते.

   २. आपण दिलेले अवतरण ’टाईम्स ऑफ इंडिया’सारख्या इंग्रजी धार्जिण्या वर्तमानपत्रामधील असेल. पण त्या लेखातही आपल्या शंकेच्या उत्तरांसाठी शोधसूत्रे (clues) सापडतील.

   ३. {{जागतिक स्तरावर इंग्रजीचे महत्त्व किती वाढत चालले आहे}}
   असू दे की. त्याने काय फरक पडतो? आपल्या मातृभाषेव्यतिरिक्त दुसरी भाषा शिकूच नये असे कोणीही म्हणत नाही. परिस्थितीनुसार मातृभाषेव्यतिरिक्त आपल्याला ज्या-ज्या भाषा जिथे-जिथे जेवढ्या-जेवढ्या प्रमाणात आवश्यक किंवा आवडीच्या वाटतील तशा त्या अवश्य शिकाव्यात. आपल्या अवतरणात बहुभाषिकत्वाबद्दल (multilingualism) जो उल्लेख आहेच की. मला फ्रान्स/जर्मनी/जपान/इस्रायल/स्पेनमध्ये कामासाठी नेहमी जायचे/रहायचे तर मी फ्रेंच/जर्मन/जपानी/हिब्रू/स्पॅनिश भाषा शिकणे अगत्याचे ठरेल.

   ४. चिनी लोकांनी आतापर्यंत इंग्रजी न बोलताच इंग्रजी देशांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात धडक मारली. त्यांचे निर्यातीपासून मिळणारे उत्पन्न इंग्रजी जाणणार्‍या भारताच्या अनेक पट आहे. आता इंग्रजी शिकून ते आणखी अनेक पटींनी वाढेल. पण एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी की त्यांनी देशस्तरीय सार्वजनिक शिक्षणाचे माध्यम म्हणून स्वतःची भाषा सोडून त्याऐवजी इंग्रजी भाषा स्वीकारलेली नाही. तिथे शासनव्यवस्था, न्यायव्यवस्था, संसदव्यवस्था, पोलिस, व इतर सर्व सार्वजनिक व्यवस्थांमध्ये यापुढेही स्वभाषेलाच प्राधान्य असेल.

   ५. हल्ली अमेरिकेत, विशेषतः अमेरिकेच्या दक्षिण भागात स्पॅनिश भाषेचे महत्त्व फार वाढू लागले आहे. इंग्रजी व स्पॅनिशनंतर अमेरिकेत आज सर्वाधिक शिकली जाणारी भाषा ही चीनी आहे. खालील दुवा उघडून न्यूयॉर्क टाईम्सची बातमी पहा. (महाजालावर याबद्दल आणखी खूप माहिती मिळेल.)

   http://www.nytimes.com/2010/01/21/education/21chinese.html

   ६. आपल्या अवतरणातील काही अंश:

   {{He also says consolidating multilingualism could be India’s strength and recommends a three-language formula codified in 1968. The formula promoted primary education in the mother tongue and the teaching of English, Hindi as well as other regional languages at the secondary level.}}

   {{Graddol suggests using the mother tongue at the primary level and adopting English as a medium of instruction only at the secondary level to ensure that the learning process is meaningful.}}

   {{English may be a useful catalyst, but the final goal must lie beyond English}}

   भारताच्या राज्यघटनेची आधारभूत तत्त्वे, देशाचे भाषांसंबंधीचे विविध कायदे, त्रिभाषा सूत्र इत्यादी हेच तर तत्त्व सांगतात. आपण ते पुन्हा अधोरेखित करून दाखवल्याबद्दल अत्यंत आभारी आहोत. सर्वप्रथम मातृभाषा (पहिली ते चौथी) आणि मग त्रिभाषासूत्रातील इतर भाषा – राज्यभाषा (मातृभाषेहून वेगळी असली तरीही), नंतर हिंदी व इंग्रजी (पाचवी पासून पुढे) हेच सूत्र भारताच्या शिक्षणपद्धतीने तत्त्वतः स्वीकारले आहे. अर्थात ह्याची जाणीव ज्यांचा पुरेसा अभ्यास करण्याची व समजून घेण्याची कुवत नाही अशा आजकालच्या राजकारण्यांना व तथाकथित समाजकारण्यांना नाही हेच आपले सर्वांचे दुर्दैव आहे, नाही का?

   ७. टाईम्स हे वृत्तपत्र स्वातंत्र्याआधी गोर्‍या साहेबांचे व त्यानंतर सावळ्या (ब्राऊन – भारतीय श्रीमंत, उच्चभ्रू) साहेबांचे खुशमस्करे राहिले आहे. पण तरीही त्यांनी (बहुधा नाईलाजाने) अंकलेसरिया अय्यर यांचा खालील लेख प्रसिद्ध करायलाच लागला.

   https://amrutmanthan.wordpress.com/2010/02/10/सर्वप्रथम-मातृभाषेत-शिकण/

   याही लेखात तसेच म्हटले आहे –

   {{This is not an argument against learning two or three languages. Indeed, children under 8 learn new languages most easily. But research shows that proficiency in one language makes it easier to master a second. Learning the first language expands the cognitive networks of a child’s mind, making it easier to grasp the same concepts in a second language. }}

   {{Once a child has become good in Gujarati, it will more easily become proficient in English. The issue is not one of Gujarati versus English. Rather, good Gujarati is a sound foundation for good English.
   Faced with half-empty classrooms in government schools, some state governments plan to introduce English from Class 1 to win back students. That would be a serious error. 
   English is important. But even more important is reading and writing in your mother tongue.}}

   ८. म्हणजे पुन्हा निष्कर्ष तोच. आपला ग्रॅडॉल किंवा जगभरातील बहुतेक सर्वच शिक्षणतज्ज्ञांचे एका मुद्द्यावर एकमत आहे, जे आपण दिलेल्या आवतरणातही सूचित होते. आभारी आहोत.

   ९. आज भारतीय ज्या भाषेला एकमेव व साक्षात ज्ञानभाषा समजतात त्या भाषेबद्दल स्वतः इंग्रजांची मते काय होती हे वाचा.

   Excerpts from the book “The Triumph of the English Language”. Chapter: The Uneloquent Language (On the State of English in the Sixteenth Century)

   {{That the English language per se was considered uneloquent may be easily deduced from the adjectives most frequently used to describe it: rude, gross, barbarous, base, vile. “Vile” for instance meant only of little or no worth and “base” was equivalent to low, common, vulgar, uncultured.}}

   {{It is interesting to note that the superiority of the French language over “corrupt” English is discovered not only in its sweetness, but also in the fact that the Bible had been translated into it. Nearly a score of years before Tyndale’s work, the English translator implies for the desire of an English translation of the Bible, and the belief that the vernacular would be improving by containing it.}}

   {{Douglas attributes the inability of the vernacular to match the eloquence, or “ornate bewte”, of the Latin to the inadequacy of the English vocabulary, but is also finds the vocabulary inadequet as regards meaning. He is more explicit than most of his contemporaries regarding the nature of the deficiency of his mother tongue, for he cites numerous specific Latin words difficult of translation into English.}}

   स्वतः इंग्लंडमध्ये देखील फ्रेंच ही उच्चभ्रूंची भाषा व लॅटिन ही उच्चशिक्षणाची भाषा समजली जात असे. त्यांना स्वतःच्या मातृभाषेबद्दल (आजच्या भारतीयांप्रमाणे, कदाचित त्याहूनही अधिक) प्रचंड न्यूनगंड वाटत होता. शेवटी ह्याच दोन्ही भाषांना बाजूला सारून इंग्रजांनी स्वभाषेची मुहूर्तमेढ कायदेशीरपणे रोवली आणि मगच तिचा जगभर प्रसार झाला. त्यासाठी त्यांनीसुद्धा ’मातृभाषा सर्वप्रथम’ याच धोरणाचाच भक्कम अंगिकार केला.

   —————

   आता एक आग्रहाची नम्र विनंती.

   आपल्या २-४ ओळींच्या लेखनामध्ये विचारलेल्या प्रश्नांना सविस्तर उत्तर द्यायचं म्हणजे आम्हाला २०-४० ओळी लिहाव्या लागतात. या आधी बर्‍याचदा हे आपण केलं आहे. पण दुर्दैवाने आपले समाधान होत नाही. आपण तेच मुद्दे पुन्हा नवीन शब्दांत मांडता. पुन्हा आम्ही लांबलचक उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो. ही कापूसकोंड्याच्या गोष्टीसारखीच कथा. कदाचित आम्ही स्पष्टीकरणात कमी पडत असू. तेवढी हार आम्ही मान्य करतो. पण कृपया आता यापुढे आपण ही चर्चा थांबवूया. आपण सूज्ञ आहात, सुशिक्षित, सुसंस्कृत, बुद्धिवान आहात. यापुढे आपण नवीन मुद्द्यांवरच चर्चा करूया. तेवढा बदल आपल्याला (सर्वांनाच) आनंददायी वाटावा.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s