मराठी ज्ञानभाषा व्हायला पाहिजे – कमल हासन (वृत्त: दै० डीएनए, ९ मे २०१०)

“मराठी संस्कृती ही तमिळ संस्कृतीप्रमाणेच प्राचीन आणि महान आहे. शिवाय (लोकसंख्येने) ते एक मोठे राज्य आहे. (अशा परिस्थितीत) त्यांनी आपल्या संस्कृतीच्या बाबतीत हिंदी चित्रपटांपुढे गुढघे टेकून पूर्णपणे हार मानली आहे ही खरोखरच खेदजनक गोष्ट आहे. तमिळ लोकांमध्ये असलेला स्वभाषेबद्दलचा अभिमान मराठी लोकांमध्ये का नाही ह्याचे कारणच मला समजत नाही.” मराठी चित्रपटात अभिनय करण्याची इच्छा व्यक्त करताना हल्लीच कमल हासन ह्या लोकप्रिय तमिळ चित्रपट अभिनेत्याने वरीलप्रमाणे उद्गार काढले.

संबंधित वृत्त खालील दुव्यावर पहावे.

अमृतमंथन_मराठी ही ज्ञानभाषा व्हायला पाहिजे-कमल हासन_090510

.

आपली मते लेखाखालील रकान्यात अवश्य मांडावीत. (कोणाला कमल हासनच्या कोड्याचे उत्तर माहित असल्यास ते आम्हा सर्वांना नक्कीच सांगावे.)

– अमृतयात्री गट

.

2 thoughts on “मराठी ज्ञानभाषा व्हायला पाहिजे – कमल हासन (वृत्त: दै० डीएनए, ९ मे २०१०)

  1. मराठी ज्ञानभाषा होणे आवश्यक आहे, पण तसे होण्यासाठी मूलभूत विचारांची आणि विचारपद्धतींची परंपरा मराठीत रूढ होणे जरूर आहे. केवळ इंग्रजी ज्ञान भाषांतरित होणे पुरेसे नाही.

    • प्रिय श्री० मनोहर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      उत्तरास विलंब झाल्याबद्दल क्षमा असावी.

      त्याचसाठी तर मराठी शाळा टिकल्या पाहिजेत. इंग्रजी शाळांत शिकून मराठी भाषेत कितपत मूलभूत (original) ज्ञाननिर्मिती, साहित्यनिर्मिती होणार?

      इंग्रजीमधील किंवा इतर भाषांतील ज्ञान आपण नक्की घ्यावे. पण ते पचवून मग आपल्या भाषेत मूलभूत संशोधनही व्हावे, जसे जपान, इस्रायल व इतर अनेक देशांनी केले व करीत आहेत.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s