महाराष्ट्रात निपाणी नाही, परंतु निपाणीत महाराष्ट्र (वृत्त: दै० लोकसत्ता १९ एप्रिल २०१०)

“येथील मराठी माणसांच्या बोलण्यात, व्यवहारात, शिक्षण क्षेत्रात मराठी भाषेला अव्वल स्थान दिल्याने येथे कन्नडची भेसळ नाही. अगदी शंभर टक्के मराठी अस्मिता आणि मराठी बाणा.”

आपले मित्र श्री० विजय पाध्ये यांनी धाडलेले हे लोकसत्तेमधील कात्रण स्वयंस्पष्टच आहे. लाजेने मान खाली घालण्यापेक्षा दुसरे आपण काय करू शकतो?

संपूर्ण लेख खालील दुव्यावर वाचा.

अमृतमंथन_महाराष्ट्रात निपाणी नाही, परंतु निपाणीत महाराष्ट्र_290410

.

आपल्या प्रतिक्रिया लेखाखालील रकान्यात नोंदवा.

– अमृतयात्री गट

.


4 thoughts on “महाराष्ट्रात निपाणी नाही, परंतु निपाणीत महाराष्ट्र (वृत्त: दै० लोकसत्ता १९ एप्रिल २०१०)

 1. Nipanee ch naahee baryaa ch itar Maharashtraatlyaa mansaane bodh ghenyaa saarkhe aahe raajyaa baaher che barech khetra,
  SARKARNE PARAT GAADHAVPANAA KELAA CH.
  MARATHI MANTRAALAY,
  BINAA SANSKUTEE,
  PAISE VALEES PARYATANA KADE ANI GARIBILAA AAPLYAA ASHRAYAAT,TADNYAAN CHEE AKKAL KUTHE ASTE?
  MENDUT KAA BOGDYAAT?

 2. स.न.वि.वि.
  खालील पत्र लोकसत्तेकडे पाठवले होते. ते प्रसिद्ध झाले नाही.
  १९ एप्रिल २०१०
  प्रिय संपादक ‘लोकसत्ता’ यांस,
  स.न.वि.वि.
  खालील पत्र कृपया ‘लोकमानस’ मध्ये प्रसिद्ध करावे.
  निपाणीत महाराष्ट्र असा जाणवला…!
  आपल्या आजच्या (१९ एप्रिल २०१०) अंकातील ‘लोकमानस’ मधील श्री. चंद्रकांत पाटणकर यांचे पत्र, मला एकदा बंगळूरूमधील कानडी कुटुंबात निपाणीमुळे चपातीचा लाभ झाला होता,ही सुखद याद देणारे होते. ते सर्व वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी हे पत्र.
  मी काही वर्षांपूर्वी काही कार्यालयीन कामानिमित्त कर्नाटक, तमिळनाडू यांच्या दौ-यावर होतो.त्यात एकदा बंगळूरूमध्ये गेलो असताना माझ्या कानडी सहकारी मित्राने, श्री. मूर्ती यांनी आपल्या घरी भोजनाचे आग्रहाने आमंत्रण दिले.त्या दहा पंधरा दिवसात मी रोज इडली, डोसा आणि सांभार यांना कंटाळलो होतो. मूर्ती यांच्या घरी जेवायला बसल्यावर मला आश्चर्याचा आणि आनंदाचा धक्काच बसला. कारण समोर ताटात चपाती, बटाट्याची भाजी, वरण, भात आणि आपल्याकडे करतात तशी खोब-याची चटणी व कोशिंबीर असा अस्सल म-हाटी थाट होता. मूर्ती यांची आई व पत्नी हे पूर्णपणे कानडी असल्यावर हे कसे काय जमले, हा प्रश्न मला पडला. आणि तो सर्वांनी ओळखून मूर्ती यांच्या वहिनीला पुढे बोलावून त्यांची माझी ओळख करून दिली. मूर्ती यांचे एक धाकटे बंधू आणि त्यांची पत्नी हे आपल्या नोकरीनिमित्ताने निपाणी येथे दहा एक वर्षे राहत होते. त्यामुळे त्यांना थोडी फार मराठी भाषा कळत होती आणि बहुतेक सर्व महाराष्ट्रीय खाद्य पदार्थ माहित होते तसेच उत्तम प्रकारे करता येत होते.म्हणून मूर्ती यांच्या आईवडलांनी माझी तेथे झालेली अडचण लक्षात घेउन मुद्दाम आपल्या दुस-या सुनेकडून मला खास मराठी जेवण करण्याचा घात घातला होता. त्यांच्या पुत्राचा माझ्यासारखा मित्र आपली घरगुती जेवणाने संतुष्ट व्हावा, ही त्यांची इच्छा होती. ती निपाणीमुळे पुरी झाली.त्या वरणभाताची आज या पत्रामुळे आठवण झाली. तेव्हा महाराष्ट्रात निपाणी नाही, परंतु निपाणीत महाराष्ट्र मला असा दिसला, नव्हे जाणवला.
  मंगेश नाबर
  ७ लृष्ण बिल्डींग क्र. १, गोखले सोसायटी लेन, परळ, मुंबई ४०००१२.
  दूरध्वनी क्र. २४१३५७५५, ९७५७३९३५९८

  • प्रिय श्री० मंगेश नाबर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   उत्तरास विलंब झाल्याबद्दल क्षमा असावी.

   निपाणीच्या मंडळींना महाराष्ट्रातील मराठी मंडळींपेक्षा मराठीचे प्रेम व अभिमान खचितच अधिक आहे.

   हल्लीच आमच्या ओळखीच्या ग्वाल्हेरमध्ये अनेक पिढ्या स्थायिक असलेल्या एका कुटुंबाकडून मुलाच्या लग्नाची पत्रिका मिळाली. पूर्णपणे मराठीत आहे. पण मुंबई-पुण्यातील आमचे अनेक नातेवाईक मात्र हल्ली इंग्रजीत लग्नपत्रिका छापतात.

   मराठी सणही हल्ली बृहन्महाराष्ट्रातील मराठी मंडळी अधिक उत्साहाने व अभिमानाने साजरे करतात.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s