स्वातंत्र्यदेवीची विनवणी आणि समजावणी

सुमारे १४ वर्षांपूर्वी कविवर्य कुसुमाग्रजांची ‘स्वातंत्र्यदेवीची विनवणी’ ही कविता प्रसिद्ध झाली होती. सर्व मराठीजनांच्या पुनर्स्मरणार्थ ती ह्या अनुदिनीवर पुन्हा सर्वांसमोर ठेवावी असा विचार करीत असतानाच आपले आणखी एक अत्यंत स्वाभिमानी मराठीप्रेमी मित्र सुशांत देवळेकर ह्यांनी कुसुमाग्रजांच्या त्याच कवितेचे सद्यकालानुरूप केलेले ‘स्वातंत्र्यदेवीची समजावणी’ हे पुनर्लेखन वाचनात आले. आता दोन्ही कविता समांतरच प्रसिद्ध करीत आहोत.

कविता खालील दुव्यावर उपलब्ध आहेत.

अमृतमंथन_स्वातंत्र्यदेवीची विनवणी आणि समजावणी_सुशांत म्हणे_180410

.

आपल्या भावना, आपली मते ह्या लेखाखालील रकान्यात अवश्य नोंदवा.

– अमृतयात्री गट

.

4 thoughts on “स्वातंत्र्यदेवीची विनवणी आणि समजावणी

  • प्रिय श्री० भास्करभट्ट यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   जनतेला हुरूप येण्यासाठी प्रोत्साहनपर बोल सांगणे हे जसे योग्य ठरते तसेच कधीकधी त्यांना सत्य स्थितीचे भान करून देणे हेदेखील आवश्यक आहे. त्यासाठी कधीकधी वक्रोक्तीचाही वापर केला जातो. सत्य कटु असले तरी त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करणे हेदेखील कुठल्याही संवेदनशील लेखक-कवीला शक्य नसते. लोकाग्रणींनी वेळ व परिस्थिती पाहून योग्य व अधिक परिणामकारक मार्गाचा अवलंब करावा हे उत्तम. त्याबद्दल एकच सूत्र सांगता कसे येईल?

   अनेक थोर कवी व लेखकांना कधीकधी निराशा, दुःख, वेदना, चीड, विषाद, खंत, चिंता, भय अशा भावनांनी ग्रासले आहे व तसे त्यांनी आपल्या वाङ्‌मयकृतीमध्ये स्पष्टपणे व्यक्तही केले आहे.

   कुसुमाग्रजांनी मूळ कविता लिहिल्यावर त्यांना समाजातील सत्य परिस्थितीमुळे कधीच खंत वाटली नसेल असे आपण म्हणू शकतो का? मराठी भाषेची अवस्था व तिची शासनाकरवी होत असलेली अवहेलना पाहून तात्यासाहेब शिरवाडकर (कवी कुसुमाग्रज) यांनी “मराठी भाषा ही फाटक्या वस्त्रानिशी मंत्रालयाच्या दाराशी सोनेरी मुकुट लेऊन उभी आहे” असे जे म्हटले होते ते फारशा अभिमानाने, कौतुकाने व विशेषतः “ताठ मानेने” म्हटले असेल का?

   ह्याच अमृतमंथन अनुदिनीवरील कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची खालील कविता अवश्य वाचा आणि त्यातील भावना आपल्यासारख्या स्वाभिमानी मराठ्याच्या हृदयाला भिडते की नाही, काळजाला बोचते की नाही, ते सांगा.

   https://amrutmanthan.wordpress.com/2009/12/29/’अखेर-कमाई’-कवी-कुसुमाग्/

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट
   ता०क० आपल्या पत्राला कवी सुशांत (आपल्या बहुमानकारक पदवीप्रमाणे – कुसुमाग्रजानुज) ह्यांनी आपल्या पत्रास खालील प्रमाणे उत्तर दिले आहे.

   —————

   भास्करभट महाशयांची प्रतिक्रिया वाचली. कवितेतला उपरोध त्या महाशयांना एक तर कळला नसावा किंवा जास्त बोचला असावा. आशावादी काय किंवा निराशावादी काय केवळ शब्दांनी किंवा कवितांनी आहे ही परिस्थिती बदलणार नाही. ती बदलण्याचे मार्ग वेगळे आहेत.

   त्या महाशयांना हव्या तशा ‘येथून पुढे बरे होईल’ अशा आशयाची कविता रचली तरी ‘तुम्हाला वास्तवाची दाहकता जाणवलेली नाही’ असं म्हणणारं कुणी निघणारंच नाही असं नाही. तेव्हा ‘उगी राहावे’ हे बरे.

   बाकी कुसुमाग्रजानुज हा शब्द आवडला. पण माझी तेवढी लायकी नाही इतकं तरी मला कळतं.

   – सुशांत

 1. Dhanyavad. tasech, udbhavalelya avaanchit kushanka va dukhaavalelya bhaavanaan baddal khed. ‘ugee rahave’ asaa aashay muLeech navhataa. nissandeh tumchi kavita zabardast aahe.
  PaN, hota hota pahaat.. kharanch ka kaaL raatra jhaalee? Duritaanche timir raahile, ‘tamaso ma’ andhaaraat haravali?
  krushak aatmaahutatmyaanchee chaLvaL pahaavat naahee. mhaNoon ‘Jagoo nakaa’ paahila ki rahaavat naahee. Badal ghadaviNyaachi taakat kavitet zaroor asaavee. Ervhee dasbodh, gnyaaneshwari ityaadi gadhyach nasaavee?

  • प्रिय श्री० भास्करभट्ट यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   उत्तरास झालेल्या विलंबाबद्दल क्षमस्व.

   आपल्या भावना आम्ही सर्वच (अमृतमंथन परिवाराचे सदस्य) जाणतो. आपली खंत, मनातील डाचणी, दुःख हे सर्व आम्ही सर्व तसेच अनुभवतो आहे. त्यातून मार्ग काय? आपण प्रत्येकाने यथाशक्ती आपापले योगदान देत राहिले पाहिजे.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s