खरंच आपण स्वतंत्र झालो आहोत का? (ले० प्रा० मनोहर राईलकर)

स्वातंत्र्यापूर्वी जेवढा तीव्र स्वाभिमान आपल्यात होता, त्याच्या शतांशानंही तो आज उरला नाही, हे कारण आहे का? इंग्रजी बोलण्यात, घरांची नावं इंग्रजी ठेवण्यात, हवामान प्रतिकूल असूनही इंग्रजांसारखी वेषभूषा करण्यात, निमंत्रणं इंग्रजीतून काढण्यात, अंतर्गत पत्रव्यवहार इंग्रजीतून करण्यात, समिति-वृत्तांत इंग्रजीत देण्यात, नाना प्रकारांनी दास्यवृत्ती टिकवण्याचा, वाढवण्याचा, पुढच्या पिढीपर्यंत पोचवण्याचा, संक्रामित करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असल्याचं पाहणं, आमच्यासारख्या वृद्धांना खंतावून जातं.

प्रा० मनोहर राईलकर यांचा आणखी एक लेख खालील दुव्यावर वाचू शकता.

अमृतमंथन_खरंच आपण स्वतंत्र झालो आहोत का_19042010

.

आपली मते, आपल्या भावना लेखाखालील रकान्यात अवश्य लिहा. शक्य असल्यास राईलकर सरांनाच प्रतिसाद, पत्रोत्तर देण्याची विनंती करू. मात्र आपले पत्र सरांच्या लेखातील नेमक्या मुद्द्यांना (specific points) धरून व नेटके  असावे, ही नम्र विनंती.

– अमृतयात्री गट

ता०क०: प्रा० राईलकरांचे अमृतमंथनावर प्रसिद्ध झालेले स्वाभिमानविषयक इतर लेख आपण खालील दुव्यांवर वाचू शकता.

पालकांनी चालवलेला बालकांचा छळवाद (ले. प्रा० मनोहर राईलकर)

मराठीचा उत्कर्ष – कसा करावा? (ले० प्रा० मनोहर राईलकर)

शहाणा भारत आणि वेडा जपान (ले० प्रा० मनोहर राईलकर)

.

22 thoughts on “खरंच आपण स्वतंत्र झालो आहोत का? (ले० प्रा० मनोहर राईलकर)

  1. मी जिनीव्हात रहातो तरी माझी प्रक्रिया मराठीतून देत आहे.
    सद्यपरिस्थितीत भारतात आपल्या प्रांताच्या बाहेर ज्यांना राष्ट्रीय स्थरावर काम करायचे असेल त्याला इंग्रजी चांगले येणे आवष्यक आहे.मी स्वतः मराठी भाषेतून प्राथमिक शिक्षण घेतले. माध्यमिक (secondary)शिक्षणात चौथीपसून इग्रजी भाषेचे शिक्षण घेतले. साडे बारा वर्षे दिल्लीत नोकरी करून नंतर जिनीव्हात गेली त्रेचाळीस वर्षे फ़्रेंच ्भाषेत सर्व व्यवहार करतो.
    प्राथमिक शिक्षण मात्रूभा्षेतून घेतल्यामुळे इतर भाषा शिकणे सोपे जाते असा ंमाझा वैयक्तिक अनुभव आहे.
    अजूनही मराठीत लिहायला वाचायला काहीही अडचण तर येत नाहीच पण माझॆ विचार मी मराठीतच अधिक चांगल्या रीतीने व्यक्त करू शकतो.
    बाळ संत

    • प्रिय श्री० मोरेश्वर संत यासी,

      सप्रेम नमस्कार.

      आपण नमूद केलेले मुद्दे हे सर्व भाषातज्ज्ञांना मान्य असलेल्या तत्त्वांना धरूनच आहे. पण भारतात पारतंत्र्याचा प्रभाव न गेल्यामुळे आपल्या रक्तात भिनलेली स्वतःबद्दल कमीपणा वाटून घेण्याच्या वृत्तीमुळे आपल्या देशात ह्या तत्त्वांवर विश्वास बसत नाही. असो.

      प्रा० राईलकर सरांचे पत्रोत्तर खाली दिले आहे.

      – अमृतयात्री गट

      ———————–

      श्री० मोरेश्वर (बाळ) संत यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      तुम्हाला माझा लेख आवडला याचा आनंद झाला. तुम्ही तसं कळवलंत याचा आनंद झाला. वाटल्यास लेख आणखी कुणाला तरी वाचायला द्यावा.

      आपला,

      मनोहर

  2. ह्या संदर्भात नम्रपणे नमुद करावेसे वाटते की मराठी साहित्यिक, मराठीचे प्राध्यापक अशा मराठीच्या धुरीणांनीच मराठीवरच्या इंग्रजी अतिक्रमणाला आमंत्रण दिले. आचार्य अत्रे व ना.सि.फडके यांचा परस्परातील पत्रव्यवहार इंग्रजीतून असायचा. प्रा. वसंत कानेटकरांच्या भाषणात निष्कारण इंग्रजी शब्दांचा वापर असायचा. आमच्या महाविद्यालयातील मराठीतील प्राध्यापक महाशयांची अशीच कथा. त्यांच्या व्याख्यानात इंग्रजी शब्दांची (रोजच्या वापरात नसलेल्या)अगदी काळजीपूर्वक पखरण असायची. मराठी बोलताना एखादा शब्द अडला तर त्यांना अडचण वाटत नसे. पण इंग्जी बोलताना काही चुकणार नाही याची ते काळजी घेत.

    • प्रा० राईलकर सरांचे उत्तर.
      ——————————–
      श्री. बिपिन यांस,

      सप्रेम नमस्कार.

      माझ्या लेखावर तुम्ही दिलेली प्रतिक्रिया वाचली. लेखावर प्रतिक्रिया द्याव असं तुम्हाला वाटलं याचा आनंद झाला. तुमचा मी मनःपूर्वक आभारी आहे.

      मी स्वतः इतके दिवस अन्य ठिकाणी होतो. आणि दुस-याचा संगणक वापरणं मला योग्य वाटलं नाही. म्हणून मी तुम्हाला आजवर काही लिहू शकलो नाही.

      तुम्ही दिलेली उदाहरणं पारतंत्र्य काळातली आहेत तेव्हाही कित्येकांना इंग्रजीचा उपयोग करण्यात अभिमान वाटे ही गोष्ट खरी आहे. पण, त्यांची संख्या नगण्य होती. आज त्यांचीच संख्या वाढते हे पाहून पारतंत्र्यात जन्म व शालेय शिक्षण आणि काही कॉलेज शिक्षण झालेल्या माझ्यासारख्या वृद्धाला (८१) खंतावतं. त्या भावनेतूनच मी तो लेख लिहिला. तुमच्यासारखे तरुण ह्या कामात लक्ष घालतील तर आपण
      ख-या अर्थानं मनानंही स्वतंत्र होऊ. इंग्रजी भाषेला आणि आवश्यक तिथं इंग्रजीचा उपयोग करण्याला माझा तात्त्विक विरोध नाही. पण आपलं सर्वच जीवन त्या भाषेनं आक्रमून टाकलं आहे. आणि त्यात आपल्या तरुण मंडळींना अभिमान वाटत असल्याचं दुःख होतं.

      पुन्हा एकदा आपले आभार

    • प्रा० राईलकर सरांचे उत्तर.
      ——————————–
      श्री० अवधूत यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपण एसेम जोशींच्या नावाचं उदाहरण दिलं आहे. पण आजही कित्येकांची आद्याक्षरं इंग्रजीच आढळतात. हे दुर्दैव,

    • श्री० अवधूत व इतर सर्व वाचकांच्या माहितीसाठी.

      सप्रेम नमस्कार.

      महाराष्ट्र राज्य शासनाचे परिपत्रक क्र० OFL-1061-M, dated 10th January 1961 असे सांगते की:
      —————

      अधिकार्‍यांच्या कक्षाबाहेर लावायच्या पाट्यावर लिहिण्याच्या नावासंबंधीचे नियम:

      १. नावाआधी ’श्री०’, ’श्रीमती’, ’कुमारी’ अशा उपाधी लावी नये.

      २. इंग्रजीमधील आद्याक्षरे लिप्यंतर करून देवनागरी (मराठीत) लिहू नयेत.

      उदा० ’Shri Hari Narayan Apte’ हे नाव ’ह० ना० आपटे’ असे लिहावे ’एच० एन० आपटे’ असे नाही.
      ’Shri Fazal Hussain Khan’ – ’फा० हु० खान’ – ’एफ० एच० खान’ असे नाही.
      ’Smt. Rekha Ramchandra Chitre’ – ’रेखा चित्रे’ किंवा ’रेखा रा० चित्रे’
      ———-
      आभारी आहोत.

      – अमृतयात्री गट

  3. नुसतंच ‘सॉरी म्हणण्यापेक्षा ’चुकलो, क्षमा करा’ असं म्हणायला निश्चितच खुप मानिसक धैय लागतं.खरच पूर्वी आपण इंग्रजांना दबून वागत होत,आणि आता इंग्रजीला दबून वागत आहोत.यासह सगळेच मुद्दे पटतात तुमचे…शिवाय तुम्ही लेखात ज्या फ़टक्यांचा उल्लैख केला आहे ते खरच लागत आहेत मनाला..पण एकुणच हया इंग्रजीच भुत इथुन काढण्यासाठी खुप काही कराव लगणार आहे कारण ह्याची बीजे अगदि खोलवर रुजलेली आहेत.इंग्रजी येत नसल्यास समाजात त्या व्यक्तीला हीनच समजले जाते.तसेच आपल्या मराठी भाषेसाठी आग्रहासाठी झटणारया नेत्यांची मुले मात्र इंग्रजी शाळांत शिक्षण घेतात.हयासारखे विरोधाभास आणि मराठीबद्दल आपल्याच मनात असलेला न्युनगंड जोवर संपत नाही तोवर हे असच चालणार….असो खुपच विचार करायला लावणारा लेख आहे हा…

    • राईलकर सरांचे पत्रोत्तर खाली दिले आहे.

      – अमृतयात्री गट

      ———————–

      श्री. देवेंद्र,

      सप्रेम नमस्कार.

      माझ्या लेखावरील तुमच्या प्रतिक्रियाबद्दल आभारी आहे. तुमचं पत्र वाचून आशा निर्माण झाली. आम्ही आता थकलो. मला साडेतीन महिन्यांनी ८१ वर्षं पूर्ण होतील. पण तुम्ही, सलील कुलकर्णी असे तरुण ह्यात लक्ष घालतील तर आपल्याला नक्की यश मिळेल.

      तुम्हाला नवल वाटेल. पण प्रत्यक्ष इंग्लंडलाही अशा अवस्थेतून जावं लागलं होतं. १०६६ साली फ्रांसच्या वायव्य भागातील नॉर्मंडी येथी विल्यम नावाच्या नॉर्मन सरदारानं इंग्लंडवर आक्रमण केलं आणि इंग्लंड जिंकलं. तेव्हापासून इंग्लंडात फ्रेंच भाषेचा संचार सुरू झाला. लोक इंग्लिश भाषेला काय वाट्टेल ती नावं ठेवायचे. सर्वच गुलाम राष्ट्रांची अशी अवस्था होत असावी. अधिक माहितीकरता तुम्ही श्री. सलील कुलकर्णींचा इंग्रजी भाषेचा विजय हा लेख अवश्य वाचा.

      https://amrutmanthan.wordpress.com/2009/10/04/इंग्रजी-भाषेचा-विजय-ले०-स/

      पुनश्च आभार.

      आपला

      मनोहर

    • प्रिय रुता चित्रे यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      असे पाट्यासंबंधीचे कायदे सर्वच राज्यांत आहेत. केवळ महाराष्ट्रातच तो परप्रांतीयांना (व स्वतःला विशालहृदयी म्हणवणार्‍या काही मराठीजनांना देखील) कायदा अन्याय्य वाटतो व त्याविरुद्ध ओरड होते. स्थानिक भाषा, संस्कृती, रूढी ह्यांना परकीयांनी मान देणे हा सर्वमान्य नियम आहे. इतर राज्यांत (व इतर देशांत) असे मुद्दे विवाद्य ठरूच शकत नाहीत. याबद्दल आपण स्वतःच्या न्यूनगंडग्रस्त, लोचट, स्वाभिमानशून्य, उदासीन, स्वभावाखेरीज इतर कशाला दोष देऊ शकतो?

      आणि लोकशाहीत यथा प्रजा तथा राजा या नियमाप्रमाणे आपल्याला स्वार्थी व स्वाभिमानशून्य असेच शासन मिळते. शासनाच्या पाठिंब्याशिवाय असे कायदे, नियम अंमलात आणणे कठीण असते. आपण बहुसंख्य सामान्यांनी याविरुद्ध सतत आवाज उठवला तर कदाचित शासन थोडेसे बधेल. आपण शक्य त्या सर्व मार्गांनी आपला निषेध व्यक्त करीत राहिले पाहिजे.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  4. आज आपण खरोखरच स्वतंत्र झालो कां? खरोखरच एक चमत्कारिक प्रश्न व ज्याचे उत्तर प्रत्येक जिवंत माणसाला शोधायचे.

    लेखक: आदरणीय (निवृत्त) प्राध्यापक मनोहर राईलकर सर (वय 82+)
    हे माझे वरिष्ठ ई-मित्र आहेत.
    उपजिविकेचा पेशा : प्राध्यापक. अनेक वर्ष गणित हा विषय त्यांनी असंख्य मुलांना शिकवला.

    महाविद्यालय: सर परशुराम महाविद्यालय, पुणे

    मेंदू व स्मृती आजही तल्लख.

    समाजाबद्दल असणारी आस्था या लेखातूत ओतप्रोत वहाते.

    त्यांचा मी विद्यार्थी होऊ शकलो नाही याबद्दल नितांत खंत.

    एक चांगला शिक्षकच अप्रतिम समाजाचा आधारस्तंभ होऊ शकतो ह्यावर माझा 100 टक्के विश्वास आहे व माझ्या नशिबाने व आई-वडिलांच्या पुण्याईमुळे मला ते लाभले हा पण हा एक दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल.

    सुंदर लेख आहे. लेखात दिलेले दाखले तर इतके जिवंत आहेत की स्वत:ची चिड येते, स्वत:चा राग येतो, स्वत:ची खंत वाटते. लेख वाचल्यावर मेंदू गडाबडा लोळायला लागतो. माझी खात्री आहे की आपणही हा लेख जेव्हा वाचाल तेव्हा अशाच काही भावना व/वा विचारांचे मंथन आपल्यात होण्याची शक्यता आहे.

    जमेल तितक्या मराठी वाचकांपर्यंत हा लेख पाठवू या कां?

    त्यांच्या बुद्धीला विचार करायला मदत करू या कां?

    चला सुरूवात माझ्या पासून करत आहे.

    आपणही प्रत्येकानी आपला हातभार लावला (हा लेख सर्व मराठी वाचकांपर्यंत, सर्व शाळा/महाविद्यालयातल्या प्रार्चाया पर्यंत पोचवणे) तर हा लेख अनेक लोकांपर्यंत आपल्याला पोचवता येईल.

    प्रयत्न करायला काय हरकत आहे?
    माझे आणखी एक ई-मित्र, श्री. सलिल कुलकर्णी यांनी ह्या लेखाची कळ ई-मेल द्वारा पाठवली.

    आपला विनम्र व कृपाभिलाषी,

    फडके सुबोधकुमार नारायण (पूर्ण नांव)

    • प्रिय श्री० सुबोधकुमार फडके यांसी,

      राईलकर सरांचे पत्रोत्तर खाली दिले आहे.

      – अमृतयात्री गट

      ———————–

      Dear Subodhkumar,

      Saprem Namaskar

      Kindly forgive me for not replying to you in Marathi. At present I am living elsewhere, where Marathi has not been installed and I don’t know whether he likes to do so or not. So I am compelled to write in English.

      I am very much thankful to you for praising me. That was not necessary, as the work is more important. Besides, I am yet to complete 81 which I shall do in coming August.

      This concept, that I have tried to elaborate in my article, has to be spread among people preferably youngsters, for these people are going to be our next citizens ruling the nation. You are therefore free to circulate it.

      Thanking you again.

      Sincerely,

      Manohar

  5. खरच खूप चांगला लेख आहे. प्रत्येक मराठी माणसाला हा लेख वाचायलाच हवा. प्राध्यापकांनी दिलेली उदाहरणे वाचून खरोखर लाज वाटली.

    • प्रिय श्री० शरदराव यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      प्रत्येक मराठी माणसाने हा लेख वाचायलाच हवा, खरेच. त्यासाठी आपण ह्याचा दुवा अधिकाधिक मित्रमंडळी-नातेवाईक-मराठीप्रेमींना अग्रेषित करूयाच. आपल्याले शक्य तेवढे सर्व आपण कर्तव्यबुद्धीने नक्कीच करावे.

      प्रा० राईलकर सरांचा आपल्यासाठी असलेला निरोप खाली चिकटविला आहे. पाहून घ्यावा. अशा अनुभवी, ज्ञानवृद्ध, गुरूंनी पाठीवर हात ठेवला तर तो आपल्याला नक्कीच प्रोत्साहक ठरतो, नाही का?

      – अमृतयात्री गट

      ———————-

      प्रिय शरद यांस,

      सप्रेम नमस्कार.

      प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार.

      तुम्हाला माझ्या लेखातली उदाहरणं वाचून लाज वाटली, ही तुमची प्रतिक्रिया सार्वत्रिक केव्हा होईल, अशी उत्कंठा मला लागली आहे. जेव्हा आपल्यापैकी सर्वांना, निदान पुष्कळांना जेव्हा लाज वाटेल, तेव्हाच परिस्थितीत काही पालट होण्याची चिन्हं दिसतील. तोवर अशी लाज वाटणा-यांची संख्या वाढवी राहणं, इतकंच आपल्या हाती आहे. तेवढा प्रयत्न करायचा.

      पुन्हा एकदा आभार.

      मनोहर

  6. pratikriya usheeraa daet asalyabaddal khed. saadhaaraNpaNe yathochit ‘sir’ aivajee ‘guruji’ ha khitaab vaaparaave ase haa lekh vaachlyaavar suchvaavese vaaTate. lahaanpaNee ‘limbekar taee’ tar ‘deshmukh sir’ ase mhaNataanna kadhi farak bhaasena.
    gnyaan aarjan ingrazeet karNyaat kaaheech kameepaNa naahee, tar gnyaanaacha upyog kevaL amaerikaet settle hoNyaasaaThi karoon ithe sagLyapuDhe aapalee maan miraviNyaat kaheech moThepaNaa naahee.
    shaaLaanche gaNvesh tar soDaach, RSS chya gaNveshabaddal kay? aata guruji paaduka ghaloon kuThparyant jaaoo shakateel? sankaraachaarya dekhil moTaar va havaeejahaj vaapartaat. aaplya ghaTanenusaar unchavrutteela kay sthaan aahe? vignyaan va tantragnyaana saaThi aapaN poorNapaNe paashchaatya deshaanvar avalamboon aahot. te banavataat, aapaN vikat gheto un upabhog karato. mhaNoon bhaasha navhe, upbhogaachi laalasa hae aaple khare daasatvache prateek. vignyaan kshetraat aaple paraavalamban hae aaple daasatvache kaaraN. swarakshaNaa karita swabhaasha va swasanskrutila gahaaN thevaNe he sadhya aaplyala bhaag.
    bouddha aani musalmaanaannee china va rashiyaat jase aaple dharma jopasoon Thevale tase aapaN aaple sanskruti, swabhiman kaahi kaaLa karita jopasoon thevaayla have. bhaarataa var che ingrazee va paashchaatya sanskruteenche dushprabhav (udaaharaNaarth daasatv bodh) kaLaantaraane swaaha hoteelach.

  7. ज्यांचे ब्रेनवॉश झालेले आहे अशा लोकांना सांगून काय उपयोग.
    मराठी माणूस म्हणजे कोण माहित आहे का??
    १. जो हिंदी चित्रपट आवडीने पाहतो
    २. जो हिंदी गाणी विकत घेतो,गुणगुणतो,गातो,त्यात प्राविण्य मिळवितो.
    ३. जो दिवसभर हिंदी एफ.एम.वाहिन्यांवर तासनतास हिंदी बडबड आणि गाणी ऐकण्यात वेळ घालवतो.
    ४. जो मित्रांशी हिंदी चित्रपटातील डायलॉग्स मारून बोलतो,किंवा चलता है,क्या बात है,असे शब्दप्रयोग वारंवार वापरतो.
    ५. जो १०० मराठी माणसांत एक कोणताही अमराठी (ज्याला हिंदीही येत नसेल असाही) आला कि लगेच हिंदीत बोलायला सुरूवात करतो.
    ६. जो दुकानदारला मराठी येतच नसेल असे समजतो, व भैय्या ये कितने को दिया विचारतो.
    ७. जो अनोळखी माणसाशी सर्वप्रथम हिंदीत ओळख करुन घेतो नंतर वाटल्यास हिंदीत भांडतोही.
    ८. जो आपल्या घरातले सोडले तर बाहेर जगात हिंदीच लोक जास्त रहातात असे समजून घराबाहेर मराठी शक्यतो बोलण्याचे टाळतो.
    ९. ज्याला त्याची भाषा मराठी आहे का असे एखाद्याने विचारल्यास हळूच हो म्हणतो किंवा काही वेळेस अगदीच नाईलाज म्हणून सांगावेसे वाटले तर या…बट आय डोन्ट नो मराठी मच..इ.अशी काहीतरी थाप मारतो.
    १०. ज्याला हे माहित नसते कि एकेकाळी भारताचा १/३ भाग हा मराठी साम्राज्याचा भाग होता आणि जवळपास १० कोटी लोकांना मराठी बर्यापैकी समजते.
    ११. ज्याला हे माहित नसते कि मराठी जगातली १५ वी मोठी भाषा आहे.
    १२. ज्याला हिंदी विषयात मराठी पेक्षा अधिक गुण मिळतात व मराठी भाषा खूप कठिण आहे असे वाटते.

    * आता तुम्हीच सांगा मराठी माणसाला एवढ्या ठिकाणी जर हिंदीच लागत असेल तर त्याला मराठी म्हणण्याचा अधिकार आहे काहो?? कशाला हवी त्याला महाराष्ट्रात मराठी ??

    • प्रिय श्री० चेतन जोशी यांसी,

      आपली व्यथा, उद्विग्नता, चीड आम्ही समजू शकतो. पण अशाच प्रकारच्या (किंबहुना याही पेक्षा वाईट) परिस्थितीतून इंग्रजांनी मार्ग काढला आहे. आपण खालील लेख वाचला आहे का?

      https://amrutmanthan.wordpress.com/2009/10/04/इंग्रजी-भाषेचा-विजय-ले०-स/

      जेव्हा मराठीत अध्यात्म, तत्त्वज्ञान, व इतर विषयांवरील उत्तमोत्तम ग्रंथ होते तेव्हा इंग्रजीमध्ये बायबलचे साधे भाषांतरही नव्हते. इंग्रज लोक फ्रेंच भाषेपुढील न्यूनगंडाने ग्रस्त झाले होते. प्रस्तुत लेखात उल्लेख केलेल्या पुस्तकातही याबद्दल बरीच माहिती आहे. इतरही काही पुस्तके उपलब्ध आहेत. म्हणजे आपल्याला आशेला थोडी जागा आहे.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s