एके दिवशी मी टिळकांकडे बसलो असता ‘केसरी’त प्रसिद्ध करण्याकरिता बुद्धिबळांचा एक डाव त्यांचेकडे आला. तो त्यांनी भूमितीच्या प्रश्नाप्रमाणे कागदावर पाहूनच तोंडाने सोडविला.
लहानसहान बाबतीतही जागरूकता, हजरजबाबीपणा आणि स्वाभिमान ही लोकमान्यांचे वैशिष्ट्ये. लोकमान्यांसारखी बुद्धिमत्ता व स्वाभिमान असणारे नेते जर स्वातंत्र्योत्तर काळातही भारताला लाभले असते तर आजच्या मानसिक गुलामगिरीत व न्यूनगंडात अडकून न पडता भारताने कितीतरी अधिक प्रगती केली असती.
पूर्ण किस्सा खालील दुव्यावर वाचा.
अमृतमंथन_काळ्यांची पांढर्यांवर मात_लोकमान्यांचा किस्सा_170410
.
– अमृतयात्री गट
.
‘मी कसा झालो’ ह्या पुस्तकात आचार्य अत्रे म्हणतात जर स्वातंत्र्य लढ्याच्या अंतिम टप्प्याचे नेतृत्व कश्मिरी नेहरू किंवा पटेल-गांधींच्या ऐवजी जर एखाद्या मराठी टिळकाच्या हाती असते तर भारत पाकिस्तान फाळणी कधीच झाली नसती. कारण लहानसहान बाबतीतही जागरूकता, हजरजबाबीपणा आणि स्वाभिमान ही लोकमान्यांचे वैशिष्ट्ये होती आणि हा तर उभ्या राष्ट्राचा प्रश्न होता. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा विजय असो.
प्रिय श्री० शरद यांसी,
सप्रेम नमस्कार.
महात्मा गांधी लो० टिळकांना आपले राजकीय गुरू मानत. (आणि नामदार गोखले यांना समाजकारणातील.) लोकमान्यांनी योजनापूर्वक ब्रिटिश महासत्तेला प्रखर, जहाल विरोध करणे सुरू केले. पण आर्थिकदृष्ट्या दुसर्या महायुद्धानंतर जेरीस आलेल्या ब्रिटिश सरकारला राजकीय व सुरक्षेच्या दृष्टीकोनातूनही त्रास असह्य झाल्यामुळे महायुद्धानंतरच्या काळातच त्यांनी भारतास स्वराज्य देण्याचे विचार सुरू केले होते. शेवटी जाताना भारताला शक्य तेवढा कमकुवत करण्यासाठी त्यांनी तो कुटिल डाव खेळला. त्यावेळी लोकमान्य निवर्तल्याला पंचवीस वर्षे होऊन गेली होती. लोकमान्य हयात असते तरी त्यांच्या नव्वदीचा तो काळ असता. तेव्हा टिळकांनी त्याकाळी धुरा सांभाळणे शक्य नव्हते. पण पं० नेहरूंच्यापेक्षा सरदार पटेलांनी कदाचित अधिक कौशल्याने राजकारण हाताळले असते. पण गांधीजींने आपले वजन नेहमीच नेहरूंसाठी खर्च केले.
स्वातंत्र्यानंतर बहुसंख्य कॉंग्रेस नेत्यांच्या मागणीप्रमाणे सरदार पटेलांना पंतप्रधान होऊ दिले असते तर भारताचा इतिहास पूर्णपणे बदलला असता. शिवाय आज देश जसा नेहरू घराण्यास आंदण दिल्यासारखा आहे, तसेही घडले नसते.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
माझ्या लिखाणातून आपला कदाचित गैरसमज झाला असावा. मला फक्त टिळकांसारखा एखादा नेता असता तर फाळणी झाली नसती असे म्हणायचे होते.
प्रिय श्री० शरद यांसी,
सप्रेम नमस्कार.
क्षमा असावी. आपले मूळ पत्र पुन्हा एकदा काळजीपूर्वक वाचल्यावर त्यातील गर्भितार्थ नीट लक्षात आला व आपल्या मनातील विचारही कलले. घाईघाईत धांदरटपणाने चुकीचा समज झाला, याबद्दल क्षमस्व. (शाळेत परीक्षेत प्रश्नपत्रिका नीट न वाचल्यामुळे प्रश्नाला भलतेच उत्तर लिहिले जाते व उत्तर चुकीचे नसले असले तरीही संबंधित प्रश्नासाठी अयोग्य असल्यामुळे शून्य गुण मिळतात, तसा हा प्रकार झाला, नाही का?)
अशीही एक दंतकथा सांगितली जाते की लोकमान्यांच्या मृत्यूनंतर इंग्रजांचा त्यांच्या मेंदूचे विश्लेषण करून अशा असामान्य बुद्धिमत्तेचे कारण शोधण्याचा प्रयत्न करण्याचा इरादा होता. ह्यातील अतिशयोक्तीचा भाग सोडला तरीही टिळकांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेला, हजरजबाबीपणाला इंग्रज सरकार घाबरत होते हे नक्की.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट