जगभरात स्वातंत्र्य ह्या शब्दाचा अर्थ केवळ आपले शासन आपण निवडणे एवढा संकुचित नसून आपल्या देशात सर्वत्र आपले शासनव्यवहार, समाजव्यवहार, न्यायसंस्था, संसदव्यवस्था, ज्ञान, विज्ञान, संज्ञापन, साहित्य, कला, छंद, व्यवसाय, उद्योग, रोजगार अशा मानवीजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ’स्व’-तंत्र प्रस्थापित करणे म्हणजेच प्रामुख्याने आपली संस्कृती, आपली भाषा, आपली परंपरा, आपले विचार (तत्त्वज्ञान), आपल्या रूढी ह्यांचे जतन, प्रस्थापन, संवर्धन व प्रसार करणे इतका विस्तृत असतो.
सामान्य जपानी नागरिकांची स्वातंत्र्याविषयीची संकल्पना ही आपले मित्र श्री० अनय जोगळेकर ह्यांनी पाठवलेल्या ह्या छोट्याश्या पत्रसंवादातून स्पष्ट होते. आता आपणच ठरवा की भारत आणि जपान यापैकी शहाणा कोण आणि वेडा कोण.
संपूर्ण लेख खालील दुव्यावर उपलब्ध आहे.
अमृतमंथन_स्व-तंत्र शब्दाविषयीची जपानी संकल्पना_040410
.
आपल्या प्रतिक्रिया लेखाखालील दुव्यावर अवश्य नोंदवा.
– अमृतयात्री गट
ता०क० जपानी स्वभाषाभिमानाबद्दलचा आणखी एक पूर्वी प्रसिद्ध झालेला लेख खालील दुव्यावर उपलब्ध आहे.
जगाची भाषा (?) आणि आपण (ले० सुधन्वा बेंडाळे)
.
आपल्या कडे सध्या जरी एकाच की-बोर्ड मध्ये दोन भाषा नसल्या तरी बरहा डायरेक्ट ने रोमन की-बोर्ड वर मराठी लिहिता येते. आणि आपल्याकडे असे मोबाईल फोन्स आहेत की ज्या मध्ये दोनही भाषा टायपींग साठी वापरता येतात. त्यामुळे मि. अनय यांनी तसे उत्तर त्या जपानी मैत्रिणीला लिहायला हवे. हे मात्र खरे आहे की जर अजुनही आपल्याला इंग्रजी भाषा वापरायची असेल तर आपण स्वातंत्र्य तरी कशाला मिळवलं? मातृभाषेचे स्थान व उपयोग हे स्वातंत्र्याचे द्योतक आहे.
प्रिय श्रीमती अपर्णा लळिंगकर यांसी,
सप्रेम नमस्कार.
बराहा वापरून लिहिताना आपण भारतीय भाषांचे/लिपींचे सर्व फायदे नाकारून रोमी लिपीच्या सर्व न्यूनता स्वीकारतो. साधा क्षत्रिय हा शब्द लिहिताना मराठी कळपाटाने ३-४ कळा दाबून ते साध्य होत असले तरी आपण k!shatriya (! म्हणजे shift) अशा प्रकारे १० कळांचा उपयोग करून ते इंग्रजी ढंगाने लेखन करतो. कुठलीही दहा वाक्ये आपण मराठी कटपाट वापरून व बराहाच्या सहाय्याने इंग्रजी कळपाट वापरून लिहून पहावीत आणि मग एकूण कळदाब मोजावेत. ह्यावरून सहजच सिद्ध होईल की थेट मराठी कळपाट वापरण्याऐवजी इंग्रजी कळपाट वापरल्यास दीडपट ते दुप्पट वेळ लागतो व इंग्रजीच्या दृष्टीकोनातून मराठी लेखन केल्यामुळे चुकांचे प्रमाणही वाढते.
इंग्रजीच्या हव्यासापायी आपली समृद्ध लिपी सोडून रोमी लिपीचा आश्रय घेणे हा वेडेपणा आहे. म्हणजे एखाद्या सशक्त माणसाने आपला पाय लंगडीप्रमाणे दुमडून बांधून दोन हातात कुबड्या घेऊन धावण्याच्या शर्यतीत भाग घेण्यासारखा किंवा आपले चांगले असलेले दात काढून टाकून कवळी वापरण्यासारख हा प्रकार झाला. आपल्या अंध पतीसाठी आपल्या डोळ्यावर पट्टी बांधणार्या गांधारीला आपण कदाचित समजून घेऊ. पण आपला पती सुदृढ असतानाही दुसर्या कोणा स्त्रीच्या अंध पतीच्या सहानुभूतीसाठी आपल्या डोळ्यावर पट्टी बांधणार्या स्त्रीला आपण काय म्हणू?
म्हणजे इथे स्वाभिमानाचा तर प्रश्न आहेच पण व्यावहारिक दृष्ट्यादेखील आपली लिपी श्रेष्ठ आहे हे विसरून चालणार नाही.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
we were slaves for more than thousand years.As Indians we don`t have a national language,nor even a national script, in India those who studied English prospered went abroad and after changing nationality got Noble prise.
We Indians have been fighting on language issue and other issues, there seems to be lack of national pride.
Last fortnight I was in Chennai for a business meeting, I was told most of the work in TN, is done in English, even at village level, barring some minor work at panchayat level.
MNC`s are comfortable doing business in TN, because even a chaprasi speaks and understands English.
Even today we don`t have local words for railway station, stamp, bus stand etc.
I personally don`t see any language ( even Hindi ) becoming national or link language and India will be the largest English speaking country in the world, this may be a harsh reality but it is a bitter truth.
Vinod Desai
Versova,Mumbai
Dear Shri Vinod Desai,
We do not agree with some of the statements and facts mentioned in your letter.
The author has clearly mentioned – जगभरात स्वातंत्र्य ह्या शब्दाचा अर्थ केवळ आपले शासन आपण निवडणे एवढा संकुचित नसून आपल्या देशात सर्वत्र आपले शासनव्यवहार, समाजव्यवहार, न्यायसंस्था, संसदव्यवस्था, ज्ञान, विज्ञान, संज्ञापन, साहित्य, कला, छंद, व्यवसाय, उद्योग, रोजगार अशा मानवीजीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ’स्व’-तंत्र प्रस्थापित करणे म्हणजेच प्रामुख्याने आपली संस्कृती, आपली भाषा, आपली परंपरा, आपले विचार (तत्त्वज्ञान), आपल्या रूढी ह्यांचे जतन, प्रस्थापन, संवर्धन व प्रसार करणे इतका विस्तृत असतो.
स्वतः इंग्रजांनी आपले भाषिक, सांस्कृतिक स्वातंत्र कसे मिळवले ते खालील लेखात वाचून पहा.
https://amrutmanthan.wordpress.com/2009/10/04/इंग्रजी-भाषेचा-विजय-ले०-स/
However, despite being an independent nation, if we still justify our being mentally and emotionally slave to our erstwhile rulers by giving lame excuses and if we continue to take pride in the status as such, then there is no point in this discussion at all. We should in fact blame Gandhiji and other so called patriots who unnecessarily bestowed us with the political freedom that we neither deserved nor were happy to have.
On the 15th August, we should stop wishing each other – “Happy Independence Day”. We should go back to the British and beg of them to take us back in their lap and take back our independence that they happily gave due to the financial compulsions. The British are already wary of the Irish and Scotch people asking for independence. They are themselves in great financial trouble as the the US, whom they followed blindly and depended on heavily, is in a semi collapsed state. Let us hope they are stupid enough to accede to our humble request.
Thanks.
– Amrutyatri Group
[…] This post was mentioned on Twitter by memarathi. memarathi said: MarathiBlogs: ’स्व-तंत्र’ शब्दाविषयीची जपानी संकल्पना – एक छोटासा किस्सा (प्रेषक: अनय जोगळेकर) http://bit.ly/ca8YJv […]
जपान च्या प्रगतीचे म्हुख्य कारण म्हणजे त्यांची accommodative / adoptive culture. जपान चे स्वतःचे असे काहीच नाहीये . जगत्याल्या विविध देशांकडे ज्या ज्या चांगली गोष्टी आहेत त्या त्यांनी adopt केल्या आहेत . अगदी त्याची भाषा सुद्धा त्यांची स्वतःची नाहीये ती त्यांनी चीन कडून घेतली आहे .( म्हणून काय ती त्यांच्या मानसिक गुलामगिरीचे लक्षन समजावे का ? ). धर्म त्यांनी भारता कडून घेतला आहे .अमेरिकन लोकांना जपान मधे यायला कुणाची परवानगी ( विसा) लागत नाही ते जपान मधे काहीही आणू शकतात जपानी सरकार त्यांना काही विचारू शकत नाही .जपान मधे अमेरिकेचे किती Air base आहेत हे जरा googleing केले के कळेल.
भारताची आज हि तरी अवस्था नाहीय . we don’t have duel keyboards that is our asset because we are muli – linguistic .Freedom has much more broader meaning than convenience
प्रिय श्री० अभय उपाख्य ’मसालापान’ यांसी,
सप्रेम नमस्कार.
जपानचे अनेक दृष्टींनी कौतुकच करायला पाहिजे. त्यांच्याकडे खनिज संपत्ती फारशी नाही. शेती करण्यासारख्या जमिनीचे प्रमाणही एकूण भूभागाच्या व लोकसंख्येच्या मानाने कमी आहे. दरडोई जमीनीचे प्रमाण भारताहून कमीच आहे. दुसर्या महायुद्धात त्यांची दोन शहरे पूर्णपणे बेचिराख झाली व जनतेच्या मनेही. पण त्यातूनही ते उभे राहिले व फार वेगाने प्रगती केली. व ती करत असताना आपला स्वाभिमान, आपल्या भाषेबद्दलची व संस्कृतीबद्दलची अस्मिता टिकवून धरली.
जपान देश भारताकडून कच्चे खनिज लोह विकत घेतो, जहाजाने एवढ्या लांब आपल्या देशी नेतो आणि त्याचे शुद्धीकरण करून त्याचे पत्रे व इतर सुटे भाग बनवून भारतासकट जगभरातील विविध देशांना निर्यात करतो. ही गोष्ट नक्कीच स्पृहणीय आहे. आपल्या त्रुटी, मर्यादा ओळखून त्यांच्यावर आपल्या बुद्धीच्या, जिद्दीच्या, परिश्रमाच्या आणि कार्यक्षमतेच्या जोरावर मात करणे याला केवळ accommodative / adoptive culture म्हणणे म्हणजे त्यांच्या गुणांची पुरेशी कदर न करणे होय. अशामुळे आपल्याला त्यांच्या गुणांचे महत्त्व समजणार नाही. आपण स्वतः काहीही विशेष कर्तृत्व न दाखवता इतरांना कमी लेखण्यामुळे आपण स्वतःही प्रगती करू शकणार नाही.
इंग्रजी भाषा म्हणजेच ज्ञान असा मूर्खपणा त्यांनी कधीच केला नाही. जपानी शास्त्रज्ञांनी आपले शिक्षण जपानीमधूनच घेतलेले असते. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र अशा विषयांत देखील मूलभूत संशोधन करून जपान्यांनी नोबेल पारितोषिके पटकावली आहेत. त्यांच्या नऊ-दहापट लोकसंख्या असणार्या व अजुनही इंग्रजीची मानसिक गुलामी करण्यात स्वतःला धन्य मानणार्या भारताचे त्यामानाने कर्तृत्व काय आहे? मग सामान्य जनतेला न कळणार्या इंग्रजीमध्ये सर्व व्यवहार करून भारताने काय कमावले?
खालील लेख पहा.
https://amrutmanthan.wordpress.com/2010/04/03/शहाणा-भारत-आणि-वेडा-जपान-ल/
https://amrutmanthan.wordpress.com/2010/04/19/खरंच-आपण-स्वतंत्र-झालो-आह/
इतरही लेखांवर नजर टाकावी.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
मला वाटते कि आपल्या माझी प्रतिक्रिया नीट कळली नाहीये . मी प्रतिक्रिया हि स्वातंत्र या शब्दाच्या संदर्भात दिली होती . जपान ला कमी लेखण्याचा उद्देश नव्हता . आणि मला हि हेच म्हणायचे आही कि त्यांनी चिन्यांची भाषा adopt करून तिला स्वतःची मातृ भाषा / राष्ट्र भाषा करून टाकले . जपान ची पुढील प्रगती तर आपण जाणताच.
सध्या जगात सर्व गोष्टी market driven आहेत . आपल्या कडे duel key board नाहीयेत कारण आपल्या market मध्ये त्याची demand नाहीये .कारण आपल्या consumers ना सद्याचे key board गैर सोयीचे वाटत नाहीत .जेव्हा आपल्या कडे इंग्रजी न येणारे computer वापरणारे ग्राहक मुबलक होतील तेव्हा ते हि key boards येतील . त्या मुळे आपली हि मानसिक गुलामगिरी म्हणणे म्हणजे कोल्य्हाची द्राक्षे आंबट असे वाटते .
आणि इंग्रजी काय किवा कुठली हि भाषा म्हणजे ज्ञान हे अती मूर्ख पणाचेच लक्षन .कारण भाषा हि माध्यम आहे ते “साध्य” ( ज्ञान ) कसे होऊ शकते .
मूलभूत संशोधन करून भारताने नोबेल पारितोषिके पटकावली नाहीत याचे मूळ आपल्या शिक्षन पद्धतीत आहेत .इंगर्जी किवा इतर कुठल्या हि मातृ भाषेतून याच पद्धतीने शिकवले तरी परिस्थिती बदलणारी नाहीये .या विषयावर स्वतंत्रं चर्चा होऊ शकते . जपान च्या शिक्षन पद्धतीतील चागल्या processes चे अनुकरण करणे जास्त चांगले .
अज्ञाना पोटी एखाद्या देशाची आंधळी स्तुती करण्याचा मूर्ख पणा करण्या पेक्षा तटस्थ / डोळस पणे मुल्याकन करणे शहाण पणाचे ठरावे .
प्रिय श्री० अभय (मसाला पान) यांसी,
सप्रेम नमस्कार.
जपानी भाषेत चीनी भाषेचे किती प्रमाण आहे याबद्दल आम्हाला कल्पना नाही. तज्ज्ञास विचारावे लागते. पण तरीही ते जी भाषा जपानी भाषा असे म्हणतात त्याच भाषेत शिक्षणव्यवस्था, शासनव्यवस्था, न्यायव्यवस्था इत्यादी चालवतात. इंग्रजी किंवा इतर परदेशी भाषेत नाही. चीनी लोकही तेच करतात. खुद्द युरोपातील इग्लंड व्यतिरिक्त प्रत्येक देश तेच करतो.
{{जेव्हा आपल्या कडे इंग्रजी न येणारे computer वापरणारे ग्राहक मुबलक होतील तेव्हा ते हि key boards येतील .}}
हे खरे आहे. पण आपण आपल्या देशात भारतीय भाषा सर्वच क्षेत्रांत दाबून टाकून इंग्रजीलाच उत्तेजन दिले तर ते कसे साध्य होणार? आपण आधीच्या पत्रात संदर्भ दिलेले लेख वाचले का? महात्मा गांधींचा, अंकलेसरिया अय्यर यांचा. प्रा० राईलकर यांचा इत्यादी लेख वाचले का? त्यात या सर्व मुद्द्यांचा उहापोह केलेला आहे. तो वाचून मगच आपण पुढे चर्चा करू. अन्यथा आपण फ्रेन्चमध्ये प्रश्न विचारता व आम्ही स्वाहिलीमध्ये उत्तर देतो, असा प्रकार घडत आहे.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
“आपण स्वतः काहीही विशेष कर्तृत्व न दाखवता इतरांना कमी लेखण्यामुळे आपण स्वतःही प्रगती करू शकणार नाही.”
हे वाक्य त्या जपानी बाईना जास्त लागू पडते . ( ज्यांनी त्या sraps post केल्या होत्या ) .आज ( महायुद्धा पासून ) जपान फक्त नावाला स्वतंत्र आहे .त्यांच्या कडे स्व सौरक्षन दल नाहीये . त्यांच्या सौरक्षनचि जबाबदारी अमेरिका घेते ! असे आसताना त्यांनी भारताला केवळ english key board साठी इंग्रजांचे मानसिक गुलाम म्हणणे कितपत योग्य आहे ?
बाकी मला जपान बद्दल असलेला आदर आणि त्यांनी भाषा जपण्य साठी केलेले प्रयत्न मी माझ्या ब्लोग वर लिहिणार आहे तेव्हा आपल्याला हि कळवीन .
प्रिय श्री० अभय (मसाला पान) यांसी,
सप्रेम नमस्कार.
अवश्य कळवावे. वाट पाहतो.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
[…] ’स्व-तंत्र’ शब्दाविषयीची जपानी संकल्… […]