“अब्दालीने अफगाणिस्तानमध्ये परत जाताना शिखांचे सुवर्ण मंदिर उद्ध्वस्त केले होते. सरोवर मातीने भरून टाकले होते. ८ मार्च १७५८ला मराठी फौजा सरहिंदला आल्या. मराठे येताहेत हे पाहिल्यावर अब्दालीचा मुलगा लाहोरहून पळाला. जाताना त्याने अनेक गुलामांना गुलामगिरीतून मुक्त केले. मराठी फौज मोठ्या दिमाखाने लाहोरात आली. मानाजी पायगुड्यांच्या अधिपत्याखाली मराठी फौजांनी लाहोरचा ताबा घेतला. मराठी विजयाचे डंके लाहोरात झडू लागले. “
प्रख्यात इतिहाससंशोधक व लेखक निनाद बेडेकर ह्यांनी २८ फेब्रुवारी २०१० दिवशीच्या दैनिक पुढारीमधील बहार पुरवणीसाठी लिहिलेला हा लेख आपले मराठीप्रेमी वाचकमित्र श्री० प्रसाद परांजपे यांनी आपल्यासाठी पाठवला आहे.
मराठ्यांमुळे केवळ दक्षिण भारतातील मंदिरांचेच संरक्षण झाले असे नव्हे तर मराठ्यांमुळे जवळपास संपूर्ण हिंदुस्थानातील हिंदू, शीख, जैन बौद्ध, व इतर धर्मियांची मंदिरे, प्रार्थनास्थळे, जनसामान्यांची घरे, जमीनजुमला, शेती-संपत्ती, व्यवसाय-उद्योग ह्यांचे संरक्षण तसेच भारतीय स्त्रियांचे शीलरक्षण झाले. मराठ्यांच्या शौर्याचा हा इतिहास म्हणजे हिंदुस्थानाच्या स्वाभिमानाचा इतिहास आहे. म्हणूनच आपण आज अभिमानाने म्हणू शकतो, – “लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी”.
निनाद बेडेकरांचा संपूर्ण लेख खालील दुव्यावर वाचा.
अमृतमंथन_लाहोरवर कब्जा _ले० निनाद बेडेकर_150310
.
आपल्या प्रतिक्रिया लेखाखालील रकान्यात अवश्य नोंदवा.
– अमृतयात्री गट
.
निनाद बेडेकर त्रिवार धन्यवाद! या लेखाबद्दल . आम्हाला तुमचा अभिमान आहे.
प्रिय श्री० सावधान यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपले वाचकमित्र श्री० प्रसाद परांजपे ह्यांचेसुद्धा आपण आभार मानूया.
क०लो०अ०
॥ सर्वांना नव वर्षाच्या व गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्या ॥
प्रिय श्री० अक्षय सावध यांसी,
सर्व अमृतमंथन परिवारातर्फे आपल्या शुभेच्छांच्याबद्दल आभार मानतो. आपल्यालाही हे नवीन वर्ष (शके १९३२) सुखाचे, समाधानाचे, समृद्धीचे जावो.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
lekh apratim aahe. parantu aahmi nehemi ase eikato ki uttaret maraathyan vishayi faar chid aahe kaaran tyaani dehliche takhta fodale. maraathyanna thithe lok lutere mhanataat. ha eetihaas tyanaa koni saangel kaay?
प्रिय रुता यांसी,
असे मराठ्यांच्याबद्दल अनेक गैरसमज पसरवले गेले आहेत. नेहरूंनी त्यांच्या भारतीय इतिहासाबद्दलच्या लेखनात शिवाजी महाराजांबद्दलही अनुदार उद्गारच काढले होते. मराठ्यांनी हिंदुस्थानचा बराच मोठा प्रदेश स्वतःच्या अधिपत्याखाली आणला होता. तेव्हा स्थानिक प्रजा त्याबद्दल कदाचित संतुष्ट नसेल. अर्थात दिल्लीचे तख्त हे मराठ्यांनी फोडले नाहीच. उलट शेवटपर्यंत दिल्लीवर प्रभाव असूनही मोगलांच्या प्रतिनिधीलाच गादीवर बसवून त्याच्याकरवी राज्यकारभार करवून घेतला. नामधारी मोगल बादशहाच्या मार्फत दिल्लीचा राज्यकारभार करण्यात त्यांची व्यूहनीती असावी. नक्की तपशील निनाद बेडेकरांसारख्या इतिहासाच्या विद्वानालाच माहित असेल.
विकीपीडियावर मराठा साम्राज्याचा नकाशा उपलब्ध आहे. तोसुद्धा पहावा.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
आपला इतिहास खूप मोठा आणि विजयाची ललकारी देणारा आहे. आपण, आपला हिंदुस्तान जगज्जेता होता. आपल्याला हरवणारे इतिहास बनले. पण सध्यस्थितीला आपण झोपलो आहोत. उठून काही तरी करण्याची वेळ आहे. आपला देश खूप मोठा आहे त्याला पुन्हा जगज्जेता बनवण्यासाठी आपण प्रत्यक्षपणे सुरुवात करायला हवी.
प्रिय हेमंत आठल्ये यांसी,
सप्रेम नमस्कार.
जेते इतिहास लिहितात. इंग्रजांनी लिहिलेल्या अनेक बाबी आता खोट्या ठरताहेत. अशा इतिहासाचे पुराव्यानिशी पुनर्लेखन केले पाहिजे. रियासतकार सरदेसाई, राजवाडे, म० म० दत्तो वामन पोतदार, सेतु माधवराव पगडी इत्यादींनी मराठी संस्कृतीचे व मराठ्यांच्या इतिहासाचे बरेच संशोधन केले आहे. पण त्यांचे संशोधन आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. राज्य शासनाला तर त्याची काहीच कदर नाही.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
I think we have unnessarily glorified Marathas. At that time Marathis had big battalians. We should not forget what happened in 1761. Marathis were completely routed in that battle. Marathis were winning against Mughals as the empire was in decline and Marathis were employing different tactics. They were exposed when they were confronted by English who had superior arms and tactics.
Anyway instead of dwelling in the past let us pay attention to the present and future. We are now being defeated in every field. Instead of protecting our interest politicians are selling Maharashtra at a throwaway price for a few crumbs.
Shrikant Pundlik
प्रिय श्री ० श्रीकांत पुंडलिक यांसी,
सप्रेम नमस्कार.
निदान शौर्य व राजकारणाच्या बाबतीत आपण मराठ्यांच्या इतिहासाची इतर भारतीयांच्या (बंगाली, तमिळ, पंजाबी, राजस्थानी, गुजराथी इत्यादी) इतिहासाशी तुलना करून पहावी. मराठ्यांची सत्ता व प्रभाव क्षेत्र जेवढ्या भागात पसरले होते तेवढे भारताच्या अर्वाचीन इतिहासात कोणी यश मिळवले असेल तर त्यांच्याशी तुलना करावी. आणि मग मराठ्यांचा इतिहास हा कितपत तेजस्वी आहे (किंवा नाही) हे आपण ठरवावे.
मराठ्यांकडे मोठे सैन्य होते आणि मोगलांची स्थिती खालावली होती ह्यामुळे मराठ्यांच्या शौर्याचे महत्त्व कमी कसे होते? मोठे सैन्य असणे ही केवळ नशिबाची गोष्ट नव्हे. त्याकरता शौर्य, वचक, असायला लागतो. मोगलांचे साम्राज्य कोणामुळे खालावले? त्यांच्यावर अधिकार गाजवायला मराठ्यांनी दक्षिणेहून जाण्यापेक्षा इतर राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्ये प्रदेश, काश्मीर, अफगाणिस्तान, पाकिस्तान, इत्यादी ठिकाणच्या राज्यांनीच ते का मनगटाच्या बळावर संपादन केले नाही?
इंग्रजांकडे आधुनिक यंत्रणा होती हे खरे. त्या जोरावर त्यांनी हिंदुस्थानात इतरत्र व हिंदुस्थानाच्या बाहेरही सत्ता मिळवली. पण तरीही मराठ्यांचे शौर्य कमी लेखून चालणार नाही. मराठ्यांच्या आधीच त्यांनी इतर सर्व राज्ये गिळंकृत केली होती. आणि मराठ्यांनी इंग्रजांना हरवलेल्या लढाया तर आपण विसरूनच जातो. शिवाजी महाराजांनी इंग्रजांचे खरे स्वरूप केव्हाच ओळखले होते.
ताज्या दमाची अमेरिका जर दुसर्या महायुद्धात पडली नसती तर इतिहास कदाचित बदलला असता. पण म्हणून काही इंग्लंडसह इतर सर्व युरोपीय राष्ट्रे कुचकामी, भेकड होती असे म्हणता येणार नाही.
मराठी माणसाने शक्यतो स्वाभिमानी असूच नये, शोधून शोधून आपले दोष जगाला मोठे करून दाखवावे व गुण मात्र क्षूद्र लेखून लपवावे; ह्याला उदात्तपणा म्हणतात की विशालहृदयीपणा हे आम्हाला माहित नाही. आजचे राजकारणी, शासनकर्ते व सामान्य जनताही अगदी तेच करते. आणि केवळ ह्या एका गुणामुळेच मराठी माणसाची स्वतःच्या राज्यातही अशी उपेक्षा होते. ज्याला स्वतःबद्दल अभिमान नाही त्याला इतर लोक कशाला मान देतील?
स्वाभिमान म्हणजे काय हे जाणण्यासाठी बंगाल, तमिळनाडू इथे काही वर्षे वास्तव्य केलेल्या मंडळींना त्यांचा अनुभव विचारावा. तो गुण कदाचित महाराष्ट्रात राहून आपल्याला सध्याच्या परिस्थितीत अपरिचितच राहतो.
आपण सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या सध्याच्या हलाखीच्या परिस्थितीसही हाच गुण कारणीभूत आहे. आपल्या भाषेला सरकारी अस्थापनांत, रेलवे मध्ये, टपाल खात्यात, बॅंकांमध्ये काहीही स्थान नाही ह्याबद्दल फक्त मराठी माणूसच बेफिकिर राहू शकतो. इतर राज्यांत अशी आस्थापने धड राहूच शकणार नाहीत आणि हे जाणूनच इतर कोणी तशा प्रकारे स्थानिकांचा अपमान करण्यास धजत नाही. इथे आम्ही स्वतःच स्वतःचा कमीपणा करून घेतो व परकीयांचे जोडे उचलण्यात धन्यता मानतो. अशा समाजाच्या नशीबात दुसरे काय असणार? आपल्या मुख्यमंत्र्यांनी टॅक्सी परवान्यांच्या बाबतीतील मंत्रीमंडळाचा निर्णय उत्तरेकडून आदेश आल्यावर रातोरात कसा बदलला हा इतिहास अगदीच ताजा आहे. हे असे काहीही इतर स्वाभिमानी राज्यांच्या बाबतीत घडलेले उदाहरण द्यावे. आजच्या ह्या सर्व परिस्थितीचे मूळ मराठी माणसाच्या आजच्या उदासीन स्वभावात, स्वाभिमानाच्या अभावात, न्यूनगंडात व आत्मदोषी वृत्तीतच आहे.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
I think we are unnecessarily taking Srikant Pundalik’s response seriously. In 1761(battle of Panipat) bot sides suffered heavy losses. Marathis were winning against Mughals at heavy odds. Aurangzeb tried his best for 17 years to crush the Marathis but it was all in vain. He employed the largest army in the world for this mission. Then he himself realised that in the Marathi land even the grass blades turn into sword’s blades if need be and that his aim was far from realisation. Just refer the mention in the London Gazete about Chhatrapati Shivaji Maharaj. Marathis were first to rise against the mughals and last to lose to Britishers and again first to rise against Britishers(Vasudev Balwant Phadke)
प्रिय श्री० विपिन मुसळे यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपण इतिहासातील अगदी अचूक मुद्दे नोंदले आहेत. आपले शेवटचे विधान फार म्हत्त्वाचे आहे.
अत्यंत आभारी आहोत.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
sadya paristhiti pahta aanisaglyanche reply vachun ase disat aahe ki sarv jan itihasat farach ramat aahet….ghadla to itihas hota aani ghadel to nava itihas asel….asa vichar karava.
itihas jarur vachava aani abhyasava pan tyat ramun jau naye….tyatun navin dhade geun aajchya yugat tyanchi kashi aani kothe sangad ghalta yeil yacha vichar hone aavshayk aahe…..
atachya pratyutaranvarun ase disun yete ki pratyekacha aahumbhav,garvishthpana aani mazhya sarkha dusare koni nahi ase vatat aahe……ha nyungand dur karava aani kharokharach jar kahi karun dakhvayche asel tar hindustana sathi kara….(tumhi je bolat aahat te prantiyvadit aahe)…aajachi paristhiti pahta aapan ektra yenyachi garaj aahe…..pan ulat ghadat challe aahe….maharaj asate tar kay mhanale asate……aaj koni telangana…koni belgaon…koni xxxxxx……yachach fayda itihasat ghetla gela aahe aani tich paristhiti punhahi nirman hou shakate…..vaiyktit,tarkik,tantrik aani chaukas vichar vhava ashi apeksha balgato……(ekjut karaychi asel tar chala ektra yeut…aani nava itihas ghadvu……………nahitar punaravrutan nakkich aahe)
dhanyavad
प्रिय श्री० मिलिंद यांसी,
सप्रेम नमस्कार.
इतिहासातच रमून जाऊ नये, भविष्यकाळाकडेही लक्ष द्यावे, हे योग्यच आहे. पण इतिहासातून योग्य धडे घेणे, आपला न्यूनगंड कमी करून स्वाभिमान वाढवणे ह्यासाठी इतिहासही उपयोगी ठरतोच. इतिहास म्हणजे सामूहिक अनुभव. आपल्या व्यक्तिगत अनुभवातूनही आपण शिकतो व भविष्यकाळाला सामोरे जाताना आपले दोष कमी करून गुण वाढवण्याचा प्रयत्न करतो. तसेच समाजाने एकत्रितपणे इतिहासाबद्दल करावे.
मी, माझे कुटुंब, माझे गाव, माझा जिल्हा, माझे राज्य, माझा देश, सर्व जग, सर्व विश्व अशा विविध पातळीवर माणूस जगत असतो. त्यामधील जीवनात संतुलन असले की मग कुठलीही पातळी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरत नाही. राज्य पातळीपेक्षा राष्ट्रीय पातळी उच्च व तिच्यापेक्षा जागतिक पातळी अधिक श्रेष्ठ असे कोष्टक मांडता येत नाही. माझा भारत देश महान असे म्हणणे म्हणजे पाकिस्तानला किंवा अमेरिकेला शिव्या देणे किंवा जगातील इतर मुसलमान राष्ट्रांबद्दल तिरस्काराचे शब्द उच्चारणे नव्हे. तीच गोष्ट राज्याच्या पातळीवर. माझ्या राज्याचा, भाषेचा संस्कृतीचा अभिमान असणे ह्यात काहीच गैर नाही. मी विनाकारण इतर भाषांचा तिरस्कार करू नये हे मात्र खरे. मी शालेय पातळीवरील क्रीडास्पर्धेत भाग घेताना जो माझा प्रतिस्पर्धी असतो तो जिल्हा पातळीवर माझा सहयोगी असतो. तशीच गोष्ट राज्याच्या, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत भाग घेताना. केवळ आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांतच भाग घ्यावा, राष्ट्रीय पातळीवर इतर राज्यांशी लढू (खेळात) नये असे तर आपण म्हणणार नाही. सर्वत्र तोल ढळू न देता खिलाडूवृत्तीने जगणे हे महत्त्वाचे. दुसर्याची चूक दाखवून दिली म्हणजे उद्धट व आपल्याला कमीपणा घेतला म्हणजेच विनयशीलपणा असे मुळीच नाही. तारतम्य, विवेक ह्यांचा तोल सांभाळणे महत्त्वाचे.
अर्थात ही सर्व तात्त्विक (theoretical) चर्चा झाली. आपण माणसे आहोत. कधीतरी तोल जाऊ शकतो. अशाच वेळी एकमेकाचा हात धरायचा. त्यालाच तर मैत्री, बंधुत्व म्हणतात.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
Dear Sir
I have carefully gone through your response. You have misunderstood. I am as proud as anybody that I am Marathi. If you will carefully peruse my responses to your old articles you will find that I was writing with very heavy heart and it is all based on my own experience and observations. I am a student of military history and I would quote Rajwade about Maratha-British confrontation. He was very specific that had British not defeated Marathas the French would have. It is no use dwelling in the past.What is happening today. Why there are 30% non-marathis in Maharashtra when in other states the% of outsiders is 2 to. Either we are too cowards or fools to stand up and say we are not cosmopolitan. Recently one lady wrote in Bahutanci Antaray in Ma. Ta. stating that since Hindi is spoken all over the country it is national language. I send a rejoinder. As I wanted them to publish it I wrote it very politly. They have not published it it and I do not think they ever will.
I think we Marathis should introspect as to why we have reached to such a depth that nobody takes us seriously. I am not used to write long articles and you may find my thoughts a little disjointed. But I would request you to fill in the gaps and understand.
Shrikant Pundlik
प्रिय श्री० श्रीकांत पुंडलिक यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपले पत्र वाचून अत्यंत आनंद झाला. या आधीचे पत्र वाचून काहीतरी घोटाळा, गैरसमज होत आहे अशी रुखरुख वाटत होती. ती आता दूर होऊन चित्र स्पषट झाले. आमचा गैरसमज झाला होता असे आपल्याका वाटत असेल तर त्याबद्दल क्षमस्व.
आपला कोणी गंभीरपणे विचार करत नाही कारण आपल्यातच फूट आहे. स्वभाषा, स्वसंस्कृती, स्वाभिमान अशा विषयांवर आपण दहा तोंडांनी बोलतो. साहजिकच समोरचा माणूस त्याला फायदेशीर वाटते ते गंभीरपणे घेतो व इतरांकडे छद्मीपणे पहातो. इतर राज्यांप्रमाणे आपणही स्वाभिमानासारख्या काही मूलभूत भावनांच्या बाबतीत एकी साधू शकलो तर आपल्याला कोणीच रोखू शकणार नाही. शौर्य, देशभक्ती इत्यादी बाबतीत मराठी माणसे कधीच पिछाडीवर नव्हती. आज न्यूनगंडाने ते सर्व गुण पोखरून टाकले आहेत.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
I am aware that my response is very late. This matter should have been closed long back. But since my response I have observed that we are still dwelling in the past that also pertaining to last 300 years. I will not recommend a few good books on Panipat and others on Maratha history like Maratha Supremacy published by Bhavans.What about our history when Ajanta caves were being painted and Verul caves were being excavated. What about Satvahana period when we were carrying out trade with Romans through ports of Nala Sopara and Dabhol. What about beautiful folk-songs which were compiled by Hal King of Satvahana dynasty known as Gatha Saptashati. Though I remember and admire Bhalji Pendharkar I remember some Marathi Sardar from his movies with one hand on his sword,with another twirling his moustache and threatening with dire consequenses. We are still relics. The people from other states are laughing at us. When somebody says other states have geography, we have history, my reply is you have only history not future. Concenrate on future which is very bleak.I am not going to write on history again.In the end I would quote Baba Amte (Error expected )
ITIHAASAAT RAMNAARE ITIHAAS GHADWU SHAKAT NAAHIT
Shrikant Pundlik
प्रिय श्री० श्रीकांत पुंडलिक यांसी,
सप्रेम नमस्कार.
गणेशोत्सवामुळे उत्तर देण्यास विलंब होत आहे, याबद्दल क्षमस्व. (बंगालात दुर्गापूजेच्या काळात सर्वत्र अघोषित बंद पाळला जातो. तसाच आपल्याकडील गणेशोत्सवाचा उत्सव !!)
आपले म्हणणे योग्य आहे की इतिहासातच रमून जाऊन वर्तमानकाल विसरून जाऊ नये. पण एक मात्र नक्की सांगावेसे वाटते की इतिहासाचे भान आणि ज्ञान नक्की असावे व त्यातून योग्य ते धडे घ्यावेत. जुन्या चुकांची पुनरावृत्ती टाळावी. चांगल्या गोष्टींबद्दल अभिमान बाळगावा. त्यामुळे न्यूनगंड दूर ठेवून आत्मविश्वास वाढवण्यास मदत होते. (ज्याची आज भारतीयांना व विशेषतः मराठीजनांना अत्यंत आवश्यकता आहे.)
शिवाजी महाराजांपासून सर्वांनीच इतिहासाचा अभ्यास केला, त्यातून स्फूर्ती घेतली व चुका टाळल्या. माणसाने स्वतःच्या आयुष्यातील अनुभवांपासून शिकावे हे जर योग्य असेल तर इतरांच्या अनुभवांवरून काहीच शिकण्यासारखे नसते असे कसे म्हणता येईल? इतिहास म्हणजे इतरांच्या आयुष्यामधील कृती, अनुभवांवरून आपण शिकणे.
आजचा शास्त्रज्ञ कालच्या शास्त्रज्ञाच्या शोधाचा अभ्यास करून त्याच्या शोधाच्या खांद्यावर उभा राहूनच आज नवीन शोध लावतो. म्हणजे तोही एका प्रकारे दुसर्याच्या इतिहासापासूनच शिकतो व स्वतःची प्रगती साधत असतो, नाही का?
आपल्याला काय वाटते?
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
I regret delay in my reply. Since you have not referred to my reference to old history I take it that you are interested only in history of last 300 years. Not only it is very young but Marathis are going to be finished by 2025. What is so special about your young history if nothing permanant was built. Do you think people from other states care whether you have saved their religion, temples, women etc.You are being treated contemptously. By 2025 all these tri-lingual formula, Marathi shools about which we all are writing will be irrevelevant. Marathis will be in minority. So what is the point in shouting hoarse about neglect of Marathi. Today what is important is opposing SEZ, opposing selling of Maharashtra to builders which is sure going to reduce Marathis to minority.
Let us agree to differ. Kindly delete my name from your mailing list.I do not want to part of movement that is like some politicians skirting real issues.
Shrikant Pundlik
प्रिय श्री० श्रीकांत पुंडलिक यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपला राग गैरसमजातून उद्भवला असावा असे वाटते. खरं म्हटलं तर आपल्या म्हणण्याचा नीटसा अर्थ आम्हाला समजलेलाच नसावा अशीही शक्यता आहे.
{{Since you have not referred to my reference to old history I take it that you are interested only in history of last 300 years.}}
आम्हाला ह्या वाक्यामधून खरोखरच नीटसा अर्थबोध झालेला नाही; याबद्दल क्षमा मागतो. आपल्या कुठल्या संदर्भाचा संदर्भ (की दखल?) आम्ही घेतली नाही हे समजले नाही. आपली प्रतिक्रिया प्रसिद्ध करायची राहून गेली आहे का? सहसा तसे होणार नाही. क्वचित कधीतरी एखादे प्रतिमत अवांच्छित/अनिष्ट (undesired – spam) म्हणून आपोआपच वेगळे काढले जाते व लक्षात येत नाही. पण तसे आपल्या पत्राच्या बाबतीत झाले आहे असे वाटत नाही. (आताच स्पॅम फोल्डर उघडून पाहून खात्री करून घेतली.)
शिवाय “आम्हाला गेल्या तीनशे वर्षांच्या इतिहासात स्वारस्य नाही” हा निष्कर्ष कसा काढलात हे देखील समजले नाही. पण अंदाजाने आपल्या शंकेबद्दल खालीलप्रमाणे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. (राग निवळल्यावर मगच शांतपणे ते वाचावे व विचार करावा, ही विनंती.)
समाजाला नेहमीच विविध दिशांनी, विविध आघाड्यांवर अनेक प्रकारचे प्रश्न/समस्या भेडसावत असतात. तुम्हाआम्हासारखी संवेदनशील माणसे “आपल्याला काय त्याचे?” असे म्हणून गप्प न राहता त्याबद्दल काहीतरी तोंडाने, लेखनाने किंवा इतर कुठल्या तरी प्रकारची प्रत्यक्ष कृती करण्याचा प्रयत्न करतो. अर्थात समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक समस्येबद्दल कृती करणे शक्यच नसते. तसा प्रत्येकाचाच बौद्धिक किंवा शारीरिक आवाका, लायकी, शक्ती, क्षमता नसते. त्यामुळे कुठलाही माणूस आपल्या स्वतःच्या बुद्धीनुसार व कुवतीनुसार प्राधान्यक्रम ठरवते व ठराविकच (मर्यादित संख्येने – एक-दोन-चार अशा) समस्यांबद्दल कृती करते. म्हणजे इतर समस्यांबद्दल त्याला काही पर्वाच नसते असे नाही. “इतर समस्या इतर कोणीतरी हाताळाव्यात, त्यांचे मी कौतुक करीन, यथाशक्ती पाठिंबा देईन, पण प्रत्येक समस्येच्या बाबतीत मी पुढाकार घेऊ शकेन असे नाही” असेच प्रत्येक माणसाचे मत असते. टिळक-आगरकर वाद हा अशा प्रकारचाच थोडाफार होता. त्यापैकी कुणीही दुसर्याच्या कार्याचे अवमूल्यन केले नाही. पण त्यांचे प्राधान्यक्रम भिन्न होते, नाही का? आज आम्ही मराठी शाळांच्या पाठिंब्यासाठी चळवळ करीत आहोत, कोणी विस्थापितांच्यासाठी लढा देतो, कोणी पर्यावरणासाठी, मुक्या जनावरांसाठी, लढे देतात तर कोणी इतर कुठल्यातरी क्षेत्रातील भ्रष्टाचाराबद्दल लढे देतात. कोणी गावाच्या पातळीवरच लढतो तर कोणी आपापल्या कुवतीप्रमाणे जिल्हा-राज्य-देश-जग अशा भिन्न पातळ्यांवर लढतात. डॉ० अभय बंग, डॉ० प्रकाश आमटे, अण्णा हजारे, व अशा अनेक श्रेष्ठ लोकांच्या मानाने आम्ही अत्यंत क्षुल्लक, क्षूद्र असूही. पण केवळ दोन-चार थोर लोक असूनही चालत नाही. आम्ही आपापल्या परीने एखाद्या छोट्याशा उद्दिष्टासाठी काम करण्याचा प्रयत्न करतो. त्यातील आपल्याला पटणार्या मुद्द्यांच्या बाबतीत आपल्यासारख्या विचारी, प्रामाणिक व संवेदनशील व्यक्तींबरोबर काम करायला (एकत्र किंवा समांतर) नक्कीच आवडेल. आम्हाला पटणार्या काही मुद्द्यांवर आम्हाला कृती करणे शक्य नसेल पण आपण करीत असाल तिथे आम्ही आपल्या मागे उभे राहू, यथाशक्ती पाठिंबा देऊ. पण प्रत्येकाने प्रत्येक मुद्द्यावर झगडणे हे शक्यच नाही, हे कृपया लक्षात घ्यावे. आपल्या काही योग्य मुद्द्यांबद्दल या विचारमंचावर पुरेसा पाठिंबा मिळत नसेल तर एक तर आपला मुद्दा स्पष्टपणे समजला नसेल किंवा तशा प्रकारचे मुद्दे ह्या विचारमंचावर मांडले/चर्चिले जात नसतील. त्यासाठी अन्य काही विचारमंच नक्की असतील. किंबहुना आपण स्वतः एखादा विचारमंच निर्माण केलात तर आम्ही आपल्याला नक्कीच पाठिंबा देऊ.
अमृतमंथन परिवार व ’मराठी+एकजूट’चे सदस्य मिळून काही हजार मंडळींच्या पुढे अमृतमंथनावरील लेख मांडले जातात. (इतर नैमित्तिक वाचक वेगळे.) पण त्यातील प्रत्येकाने आमच्या “मराठी शाळा टिकू द्या, मराठीतून शिकू द्या” या चळवळीत सक्रिय सहकार्य द्यायलाच पाहिजे अशी अपेक्षा आम्ही करू शकतो का? ह्या निमित्ताने जनजागृती झाली तरी ते काही दुर्लक्षणीय मानता येणार नाही.
असो. अंदाजाने उत्तर लिहिले आहे. आपले मतांतर असू शकते. पण गैरसमजाने राग-वैर नसावे ही प्रामाणिक इच्छा.
कळावे, लोभ असावा, ही विनंती.
– अमृतयात्री गट