“सलील कुलकर्णी यांच्या १५ नोव्हेंबरच्या लेखात हिंदी ही राष्ट्रभाषा नसून ती केंद्र सरकारच्या व्यवहाराची राजभाषा आहे आणि तरीही ती राष्ट्रभाषा असल्याचा आभास जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आल्याचे आग्रही प्रतिपादन करण्यात आले आहे. त्यांच्या या प्रतिपादनाला पाठिंबा देणारी वाचकांची पत्रेही प्रसिद्ध झाली. कुलकर्णी यांनी माहितीच्या अधिकारात अर्ज करून केंद्र सरकारकडून तसे कबुलीपत्रही मिळविले. याबरोबरच मराठी शिवाय इतर कुठल्याही भाषेला महाराष्ट्रात स्थान मिळणार नाही. तेव्हा अमराठी लोकांनी मराठी शिकले पाहिजे, असा आणखी एक मुद्दा या वादाला जोडण्यात आला आहे.”
श्री० अब्दुल कादिर मुकादम ह्यांचा हा विचारप्रवर्तक लेख खालील दुव्यावर उपलब्ध आहे.
अमृतमंथन_हिंदी आणि मराठीचे महाभारत_ले० अब्दुल कादिर मुकादम_Loksatta_130310
.
श्री० मुकादम ह्यांना प्रस्तुत लेख लिहिण्यास निमित्त झालेला श्री० सलील कुळकर्णी ह्यांचा मूळ लेख ह्याच अमृतमंथन अनुदिनीवर उपलब्ध आहे. तो आपण खालील दुव्यावर वाचू शकता.
हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा! (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, १५ नोव्हें० २००९)
.
दोन्ही लेख नीटपणे वाचून, त्यावर चिंतन करून आपल्याला ह्या लेखांमध्ये मांडलेल्या विविध समान व असमान मुद्द्यांबद्दल काय वाटते हे अवश्य कळवावे. आपण सर्वजण मिळून त्यावर चर्चा करू. आपल्या प्रतिक्रिया ह्या लेखाखालील रकान्यात अवश्य नोंदवा.
– अमृतयात्री गट
.
लेख आधीच वाचला होता. यातील काही मुद्दे मी माझ्या इतर संकेतस्थळावरील लिखाणात यापूर्वीच मांडले होते. त्यातले माझे एक वाक्य– हिंदी ही अतिशय चांगली आणि सोपी भाषा आहे, ती प्रत्येकाने उत्तम प्रकारे शिकावी, आणि तिला राष्ट्रभाषा होण्यास मदत करावी. (अवांतर : इंग्रजी ही अमेरिकेची राष्ट्रभाषा नाही या माझ्या माहितीची शहानिशा मी परवाच एका अमेरिकन नातेवाइकाकडून करून घेतली.) –SMR
मग अमेरीकीची राष्ट्रभाषा कोणती आहे?
प्रिय श्री० शरद यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपल्या एक नियमित वाचक श्रीमती शुद्धमती राठी ह्यांनी मध्यंतरी एकदा “हिंदी आणि मराठीचे महाभारत (ले० अब्दुल कादिर मुकादम, लोकसत्ता, १४ मार्च २०१०)” ह्या लेखाखाली “(अवांतर : इंग्रजी ही अमेरिकेची राष्ट्रभाषा नाही या माझ्या माहितीची शहानिशा मी परवाच एका अमेरिकन नातेवाइकाकडून करून घेतली.)” अशी नोंद केली होती.
त्यांना ह्या माहितीबद्दल अधिक तपशील देण्याची विनंती करूया.
महाजालावरही काही माहिती मिळते का ते पहावे.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट