’मनातल्या मनात मी’ (कवि सुरेश भट)

सुरेश भटांची एक अत्युत्कृष्ट कविता. नुकतीच श्रीनिवास नार्वेकर या आपल्या रसिक मित्राने पाठवली. वाचली होती. पण पुनःपुन्हा वाचूनही अशा कवितांचा कंटाळा तर येत नाहीच; उलट त्यांच्यामुळे आता मनाच्या कोपर्‍यात वळचणीला पडलेल्या जुन्या सुखद आठवणींच्या वरची धूळ झटकली जाऊन त्या आठवणींच्या उबेने मन काही क्षणापुरते का होईना पण पुन्हा टवटवीत होते व आयुष्याचे काही क्षण अत्यंत स्वर्गीय आनंदात जातात.

असा आनंद वाटत फिरणार्‍या मित्राचे आभार कसे मानायचे?

कविता खालील दुव्यावर वाचा. भविष्यकाळातही जेव्हा मनाचा तो नाजुक कोपरा उघडून पहावासा वाटेल तेव्हा पुन्हा वाचा. त्यामुळे जाग्या होणार्‍या आठवणींमुळे स्वतःचे सांत्वन करता येईल की – “देवाने आपल्यावर केवळ अन्यायच नाही केला.”

अमृतमंथन_मनातल्या मनात मी_कवि सुरेश भट

.

आपल्या प्रतिक्रिया, भावना, रसग्रहणे, निरूपणे, अभिप्राय, लेखाखालील रकान्यात अवश्य लिहा. सर्वच रसिकमित्रांबरोबर तो आनंद वाटून घेऊ.

– अमृतयात्री गट

.

6 thoughts on “’मनातल्या मनात मी’ (कवि सुरेश भट)

    • प्रिय श्री० आशिष यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      मनातील तरल भावना समर्थपणे व्यक्त करणारी कविश्रेष्ठ सुरेश भटांसारखी अभिव्यक्ती सोडाच पण त्यांच्या कवितेबद्दलच्या आपल्या कौतुकपर भावनासुद्धा स्पष्टपणे व समर्थपणे व्यक्त करण्याइतकी आमची कुवत नाही. हिमालयात गेल्यावर तेथील स्वर्गीय नैसर्गिक चमत्कारांचा नुसता आस्वाद घ्यायचा, त्याचे वर्णन शब्दांत मांडण्याचाही प्रयत्न करण्यात वेळ दवडायचा नाही. तशी ही परिस्थिती.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० अक्षय यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      खरोखरच अप्रतिम. पण अशा अप्रतिम कवितेचा मनातल्या मनात आस्वाद घेताना जी प्रतिमा मनात साकारते त्याबद्दल दुसर्‍या कोणालाही कशाला सांगायचे?

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० उमेश यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      पत्राबद्दल आभार. मुजरा करण्यास आम्ही सर्व मराठीप्रेमी आपल्या मागे उभे आहोत.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s