वाटले, यात बिचार्या कानडी पोलिसांची काय चूक, त्यांना हिंदी येत नसेल तर ते काय करणार? पण आम्हीच वेडे ठरलो. त्यातील एक हवालदार चौकीबाहेर आल्यावर आमच्याशी हिंदीतून बोलला आणि त्याने सांगितले, “इथे सर्वांना हिंदी येते, पण कोणीही बोलणार नाही. आम्हाला आमच्या भाषेचा अभिमान आहे.”
सकाळ वृत्तपत्राच्या १५ फेब्रुवारी २०१०च्या मुक्तपीठ या पुरवणीमध्ये एका वाचकाने लिहिलेला अनुभव. आपण डोळे उघडे ठेऊन भारताच्या इतर राज्यांत फिरलो की असे अनेक सुरस आणि चमत्कारिक अनुभव येतात. अशा घटना अव्याहतपणे घडत असतात. त्याबद्दल कोणालाही काहीही अयोग्य वाटत नाही. पण अशाच घटना आपल्या महाराष्ट्र राज्यात घडल्या तर मात्र ते घोर पाप ठरते आणि मग केवळ दिल्लीश्वर नेते व महाराष्ट्रातील परप्रांतीयांचे पुढारीच नव्हे तर आमची विशालहृदयी मराठी मंडळी देखिल अशा ‘अधःपतना’बद्दल गळा काढतात.
स्वाभिमानाचा मक्ता केवळ इतर प्रांतीयांना दिला आहे व स्वाभिमान या भावनेवर मराठी माणसाने स्वखुषीने केव्हाच पाणी सोडले आहे असा गैरसमज आपण जिद्दीने व स्वाभिमानपूर्वक दूर केलाच पाहिजे.
श्री० संदीप आटपाळकर यांचे संपूर्ण अनुभवकथन खालील दुव्यावर वाचा.
अमृतमंथन_पोलिसांची भाषा-फक्त कन्नड_सकाळ_मुक्तपीठ_150210
.
आपल्या प्रतिक्रिया लेखाखालील रकान्यात अवश्य नोंदवा.
– अमृतयात्री गट
.
in our circle if anyone nonmarathi is present we should promote him/her to learn marathi and help them to practice marathi .defimately result will be nice.i am telling this by my own experince
प्रिय श्री० उमेश इनामदार यांसी,
सप्रेम नमस्कार.
अगदी योग्य बोललात. अमराठी मित्रांचा उत्साहभंग न करता उलट त्याला वेळोवेळी मदत करून प्रोत्साहनच द्यायला पाहिजे, घरातील लहान मुलाला मदत करतो तसेच. ह्यामुळे अधिकाधिक अमराठी मंडळी मराठी भाषा शिकतीलच व शिवाय मराठी भाषा व मराठी माणसाबद्दलची त्याची आपुलकीही वाढते.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट