संगणकावर युनिकोडाधारित मराठी टंक वापरण्याविषयी (ले० नितीन निमकर)

फेसबुक, ऑरकुट, महाजालावरील विविध गट अशा वेगवेगळ्या व्यासपीठावरुन अनेकवेळा मराठीतून संगणकावर मजकूर कसा लिहावा (टंकावा) याबद्दल अनेक सल्ले दिले जातात.  वेगवेगळ्या साधनांचा वापर करावे असे सुचवले जाते. यात बरहा, जीमेलची लिप्यंतराची (Use of Transliteration or Phonetic keyboard) सुविधा वापरावी असा सल्ला दिला जातो. या सर्व सुविधा वेगवेगळ्या कारणांमुळे उपलब्ध झाल्या. त्यांचे स्वत:चे असे एक महत्व आहेच मात्र या सुविधा वापरणे म्हणजे तसे द्राविडी प्राणायमच आहेत.  मायक्रोसॉफ्टच्या विंडोजवरती मराठी वापरणे अतिशय सुलभ आहे. फक्त याची माहिती संगणक मराठीसाठी वापरणार्‍यांना नसते. मायक्रोसॉफ्टसुद्धा ही माहिती स्वत:हून आवर्जून देत नाही. ही सर्व माहिती देण्यासाठीच या छोट्या लेखाचे प्रयोजन.

संपूर्ण लेख खालील दुव्यावर वाचा.

अमृतमंथन_संगणकावर युनिकोडाधारित मराठी टंक वापरण्याविषयी_ले० नितीन निमकर_140210

.

सूचना: आपल्या शंका प्रस्तुत लेखाखालील रकान्यात नोंदवा. श्री० नितीन निमकर त्यांना तेथेच उत्तरे देतील. आपल्या चर्चेचा सर्वांनाच लाभ होऊ दे.

– अमृतयात्री गट

.

16 thoughts on “संगणकावर युनिकोडाधारित मराठी टंक वापरण्याविषयी (ले० नितीन निमकर)

    • प्रिय श्री० हेमंत आठल्ये यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपले धन्यवाद प्रस्तुत लेखाचे लेखक श्री० नितीन निमकर यांच्यापर्यंत नक्की पोचवू.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० आशिष यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      अमृतमंथनासाठी आम्ही थेट बराहा किंवा इनस्क्रिप्ट ह्या पद्धती सहसा वापरतो. किंवा प्रथम वर्ड पॅडवर बराहाने लिहूनही मग इथे प्रतिरूप (कॉपी) करता येते. ज्यांना फार मोठ्या प्रमाणात टंकलेखन करायचे असेल त्यांनी प्रथमपासूनच इनस्क्रिप्ट पद्धत वापरणे अधिक चांगले. बराहा ही थोडक्यात झटपट शिकण्यासाठी चांगली पद्धत असली तरीही ती इंग्रजी कळपाटाच्या कुबड्यांवर चालत असल्यामुळे तशी लंगडीच आहे. व त्यामुळे तिचा वेग कमी असतो. मूळातच स्वतः लंगडी असलेल्या इंग्रजी लिपीचा आधार घेतल्यामुळे अनेक अक्षरांना बराहा पद्धतीने इनस्क्रिप्टपेक्षा अधिक कळा दाबून लेखन करावे लागते व म्हणून अधिक श्रम व अधिक वेळ लागून वेग कमी पडतो. झटपट व कमी लेखन करण्यासाठी बराहा योग्य ठरेल कारण तिला शिकण्यास फारसा वेळ लागत नाही व इंग्रजीत टायपिंग करणार्‍यांच्या मनातील मराठी टंकलेखनाबद्दची भीती लवकर दूर होऊ शकते.

      अर्थात इतरांची वैयक्तिक मते भिन्न असू शकतात. श्री० निमकरही कदाचित वेगळा सल्ला देतील.

      श्री० निमकरांच्या ह्या लेखाशिवाय आणखी एक लेखही ह्या अनुदिनीवर प्रकाशित झालेला आहे. (https://amrutmanthan.wordpress.com/2009/07/27/संगणकावर-युनिकोड-टंक-वाप/) तोही पाहून घ्यावा.

      आम्ही थोडक्यात एवढेच सांगू इच्छितो की कुठलीही पद्धत वापरा पण मराठीमधून (युनिकोडाधारित टंक वापरून) टंकलेखन सुरू करा. बिचकू नका, टाळू नका, पुढे-पुढे ढकलू नका. स्वभाषेच्या जोपासना-प्रसार-संवर्धनाचा भाग म्हणून आपण शक्य तिथे सर्वत्र कटाक्षाने मराठी बोलणे आणि तसेच लिहिणेही करायला पाहिजे.

      एक अनाहूत सल्ला: कोणाला आगाऊपणा वाटला तरी एक कळकळीची गोष्ट मनापासून सांगावीशी वाटते. आपल्यापैकी सर्वांचीच मायबोली मराठी असली तरी अनेकांनी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतल्यामुळे किंवा कदाचित मराठी वाचन-लेखन पुरेसे न झाल्यामुळे, जरी मनातील विचार उत्तम असले तरीही मराठी लेखन हे नकळत इंग्रजी धाटणीचे किंवा इतर काही दृष्टींनी सदोष होते. मराठी (किंवा भारतीय) धाटणीचे इंग्रजी लेखन हे जसे मूळ इंग्रजी चांगले अवगत असलेल्याला खटकते, तसाच हा उलट प्रकारही मूळ चांगल्या मराठीची सवय असलेल्याला खटकतो. इंग्रजीबद्दल आपण अत्यंत आदरयुक्त काळजी घेत असलो तरी बर्‍याचदा मराठीबद्दल तेवढी घेत नाही. अगदी साधे उदाहरण म्हणजे San Jose चा उच्चार कोणी ’सॅन जोस’ असा (लिहिल्याप्रमाणे योग्यच) केला तर त्याला मूर्खात काढून आपण तो खरा ’सॅन होजे’ आहे असे मोठ्या विजयानंदाने सांगितले जाते; पण आपल्या मराठी मधील दोष दाखवले तर आपल्याला ’त्यात काय एवढे गंभीरपणाने घ्यायचे?’ असे म्हटले जाते. मराठी भाषेच्या शुद्धलेखनाबद्दल (आम्ही विविध स्थानिक मराठी बोलीभाषा अशुद्ध मानत नाही) चालू असलेली चर्चा अनेकांना (बहुसंख्यांना) वायफळ वाटू शकेल. पण अशी भाषा जरी कदाचित आपल्या चकाट्यांना (chats) चालली तरी इतर गंभीर चर्चांच्या व्यासपीठांवर (ज्यावरून जगभरातील लोक त्या भाषेच्या व संस्कृतीच्या दर्जाविषयी निष्कर्ष काढतात) शक्य तितकी दर्जेदार भाषा असावी असेच आम्हाला वाटते.

      ज्याप्रमाणे एस०एम०एस०ची भाषा आपण नोकरीच्या अर्जात वापरणार नाही तसाच फरक आपण माध्यमानुसार करायला पाहिजे.

      असो. आगाऊपणाबद्दल क्षमा असावी.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  1. Namaskar,
    Ajun ek sadha ani khup faydeshir upay mhanje Baraha IME..
    Apan http://www.baraha.com/download.htm
    ya sanket sthalawar jaun Baraha Unicode2.0 download karave.. fakt 1.2Mb chi file ahe. ani Windows system war te sofware khup sopya padhatine chalu hote.
    Me sadhya Linux system waparat aslyane durdaiwane te software chalat nahie.
    Online marathi lihinyachi suvidha kothey ahe ka?Tyaat shuddhlekhan tapasnyachi soy asel tar uttam.
    Aslyas kalvave..
    Dhanyawaad 🙂

    • प्रिय श्री० कपिल यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या सूचनेबद्दल आभार. बराहा आय०एम०ई० बद्दल विचार व सविस्तर माहिती अमृतमंथनावरील खालील लेखातही उपलब्ध आहे.

      https://amrutmanthan.wordpress.com/2009/07/27/संगणकावर-युनिकोड-टंक-वाप/

      संगणकावर मराठी-देवनागरीमध्ये लेखन करू इच्छिणार्‍यांनी हा लेख अवश्य वाचून पहावा.

      बराहा वापरून आम्ही अमृतमंथन अनुदिनी (वर्डप्रेस), फेसबुक, ई-मेल (गूगल, याहू, हॉटमेल) ह्यांवर थेट (directly) लिहू शकतो. मात्र शुद्धलेखनाची सोय अजुन उपलब्ध नाही. गमभन संकेतस्थळावर जाऊन तपासणी करावी.

      क०लो०अ०

    • प्रिय श्री० कपिल यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपण म्हणता ते खरे आहे. पण आमच्या समजुतीप्रमाणे क्विलपॅड वर गूगलप्रमाणे लिप्यंतर (transliteration) होते. आपण थेट हवे ते अक्षर लिहू शकत नाही. त्यामुळे वेळ लागतो. त्यांच्या शब्दसंग्रहात नसलेले शब्द लिहिण्यास अडचण येते. म्हणून आम्हाला बराहा हे झटपट लिहिण्यास अधिक योग्य वाटते. अर्थात व्यावसायिक पातळीवर खूप लिहिण्यास इनस्क्रिप्ट पद्धत उत्तम. ह्या दोन्हींची माहिती खालील दुव्यावर उपलब्ध आहे.

      https://amrutmanthan.wordpress.com/2009/07/27/संगणकावर-युनिकोड-टंक-वाप/

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  2. हो.. अगदी खर आहे ते.. पण linux मध्ये बराहा नाहीना वापरता येत..
    तोच तर प्रॉब्लेम आहे..
    आणि इनस्क्रिप्ट साठी बरच शिकाव लागेल अस दिसताय..
    असो.. धन्यवाद 🙂

    • प्रिय श्री० कपिल यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      खूप लेखन करायचे असल्यास बराहा किंवा लिप्यंतराची सवय लागण्याआधीच इन्स्क्रिप्ट पद्धतीने सराव करावा. इंग्रजी टायपिंग करणार्‍यास दोन दिवस व पूर्णपणे नवख्यास ७-८ दिवस थोडेफार टंकलेखन केले तरी पुष्कळ होईल. इन्स्क्रिप्टमुळे अधिक वेग गाठता येतो.

      इन्स्क्रिप्टबद्दल काहीही शंका असल्यास निःसंकोचपणे विचार्‍याव्यात. आपले तज्ञ मित्र नक्कीच मदत करतील.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  3. विन्डोजबरोबर इन्स्क्रिप्ट आपोआप येतो असे निमकर म्हणतात. माझ्या संगणकावर विन्डोज एक्सपी आहे, पण इन्स्क्रिप्ट नाही. तो कळफलक कसा बसावायचा? (विशेष माहिती : माझा एक्सपी अनधिकृत असल्याने त्याची शिडी माझ्याकडे नाही. )

    • प्रिय श्रीमती शुद्धमती राठी यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      अशा सीड्या आपल्याला मुंबईतील लॅमिंग्टन रस्ता (डॉ० भडकमकर मार्ग) या इलेक्ट्रॉनिक्स/सॉफ्टवेअरच्या (चोर)बाजारात किंवा आपल्या नगरातील तत्सम विभागात मिळतात. (आपला हा संवाद वाचून मायक्रोसॉफ्टचे दलाल आपल्यावर धाडी घालणार नाहीत असा आशावाद बाळगूया.) असो.

      श्री. निमकरांना आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची विनंती करतो.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  4. नमस्कार शुधमती राठी,

    माझ्या वरील लेखात मी संगणकावर मराठी युनिकोड कसे चालू करायचे याची एक चित्रमय शिकवणी उतरवून घेण्यास सांगितले आहे. ती कोठून उतरवून घ्यायची याचा पत्ताही दिला आहे. तो पत्ता परत एकदा सांगतो. तो पत्ता असा: http://www.quest.org.in/Unicode/Start_Unicode_English.exe येथून उतरवून घ्यावी आणि त्यात दिलेल्या सर्व पायर्‍या संगणकावर करुन घ्याव्यात. सदर शिकवणीत मी मायक्रोसॉफ्टचे आय एम ई ही कसे बसवावे याचीही माहिती दिली आहे. आय एम ई मुळे तुम्हाला मराठीत सध्या प्रचलित असलेले 6/7 कळफलक मिळतात त्यात इनस्क्रिप्टही आहे.त्या सर्वांची माहितीही शिकवणीत आहे.

    आय एम ई अजिबात बसवले नाही तरीही चालते. संगणकावर युनिकोड मरा
    ठी चालू केल्यावर जो कळफलक तुम्हाला मिळतो तो इनस्क्रिप्टचाच असतो. आय एम ई ही एक इनस्क्रिप्ट कळफलक न शिकण्याची पळवाट आहे, पण ज्यांना आधिच इतर कळफलकांची सवय झाली आहे त्यांच्यासाठी नाईलाजाने ही सोय द्यावी लागते.

    शिकवणीतील सर्व पायर्‍या स्वत: करायची भिती वाटल्यास, या पायर्‍या बरोबर करण्याचा आत्मविश्वास आहे अशांची मदत घ्यावी. तुम्हाला अनधिकृत विंडोज एक्स पी संगणक पुरवणार तुमचा पुरवठादारही तुम्हाला ही सी डी तात्पुरती पुरवू शकतो व मदत करु शकतो. त्याला ही शिकवणी दाखवलीत तर तोही ते करु शकतो.

    आणखी काही माहिती हवी असल्यास मोकळेपणाने विचारा…

    आपला,
    नितीन

    • प्रिय श्री० अतुल यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      उत्तरास झालेल्या विलंबाबद्दल क्षमा मागतो.

      आपण स्वतः संगणक व महाजालावर मराठीमधून लिहिणे वाचणे सुरू करा आणि अधिकाधिक मित्रांनाही त्यासाठी उद्युक्त करा. मराठीच्या भविष्याच्या दृष्टीनेही ते महत्त्वाचे आहे. खालील तीनही लेख शिकण्याची इच्छा असणार्‍यांना माहितीप्रद ठरावेत.

      संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल –} http://wp.me/pzBjo-2d

      संगणकावर मराठीतून लिहिण्याबद्दल आणखी काही दृक्श्राव्य माहिती –} http://wp.me/pzBjo-Aw

      संगणकावर युनिकोडाधारित मराठी टंक वापरण्याविषयी (ले० नितीन निमकर) –} http://wp.me/pzBjo-gH

      काही शंका असल्यास कळवा. आपण तीवर तज्ज्ञांकरवी तोडगा शोधून काढू.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s