खासगी शिक्षण संस्थाही माहिती अधिकाराच्या कक्षेत (वृत्त: दै० सकाळ, १२ फेब्रु० २०१०)

आज उच्च शिक्षणाचे अभ्यासक्रम राबवणार्‍या महाराष्ट्रातील कुठल्याही खासगी शिक्षणसंस्थेच्या विद्यार्थ्यांच्या यादीवर दृष्टी टाकल्यास त्यात बेकायदेशीरपणे ५० ते ८० टक्क्यांपर्यंतच्या प्रमाणातील मुले महाराष्ट्राबाहेरील आहेत हे सहजच समजून येते. यावर कदाचित आता अंकुश ठेवता येईल.

निरनिराळ्या कोट्याअंतर्गत कुठल्या निकषावर किती मुले घ्यायची हे स्पष्टपणे ठरलेले आहे. अर्थात ह्याबाबतीतही महाराष्ट्र शासनाचे धोरण इतर राज्यांपेक्षा थोडेसे ढिसाळ व परप्रांतीय धार्जिणे असले तरीही कायद्याप्रमाणे एवढ्या प्रमाणात परप्रांतीय विद्यार्थ्यांना प्रवेश देताच येत नाही. हे सर्व परसदाराने रोख (अधिकृत पावतीविना) घेतलेल्या देणग्यांच्या बदल्यात स्वीकारलेले वाण आहे ह्यात काहीच शंका नाही. अभियांत्रिकीसारख्या अभ्यासक्रमांसाठी देखिल देखाव्यापुरती पहिली फेरी ही नियमांनुसार पार पाडली की त्यानंतर सर्व गोलमालाचा प्रकार असतो. अशाने प्रामाणिकपणे व मेहनतीने अभ्यास करून चांगले गुण मिळवणार्‍या लायक मुलांना बाजुला सारले जाऊन लायकी नसलेल्या मुलांना केवळ पालकांच्या (बर्‍याचदा संशयास्पद मार्गांनी मिळवलेल्या) पैशाच्या जोरावर प्रवेश दिला जातो. त्यामुळे प्रामाणिक मुलांना लायकी असूनही आवड नसलेले अभ्यासक्रम निवडावे लागतात किंवा गैरसोयीच्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागतो. कधीकधी तेही शक्य होत नाही. बर्‍याच वेळा अशी मुले मानसिकदृष्ट्या हताश व वैफल्यग्रस्त होण्याची शक्यता असते. शिवाय अशाने एकूणच प्रामाणिक नागरिकांना शासनाच्या हेतुंबद्दल शंका वाटू लागते व सामान्य माणसाला कायद्याचे पाठबळ नसल्याची भावना वाढीस लागते.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की लायकी नसलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात प्राधान्याने प्रवेश दिल्यामुळे समाजाच्या सर्वच क्षेत्रातील ज्ञानाचा दर्जा खालावतो. अशा प्रकारे उत्तम लोकांना बाजूला टाकून दुय्यम किंवा निकृष्ट दर्जाचे डॉक्टर, अभियंते, व्यवस्थापक, शिक्षक, प्राध्यापक व इतर सर्वच व्यावसायिक आपण निर्माण करत असतो याचेही शासनाला आणि समाजाला भान राहिलेले नाही.

आणि तिसरा मुद्दा म्हणजे केवळ आर्थिक लाभासाठी बेकायदेशीरपणे स्थानिक मंडळींना डावलून मोठ्या प्रमाणात धनदांडग्या परप्रांतीयांना उच्च शिक्षणात प्राधान्य दिल्यामुळे राज्यात स्थानिकांच्या मानाने परप्रांतीय अधिक प्रगती साधू शकतात. यामुळे एक प्रकारचा असमतोल निर्माण होतो व त्यामुळेदेखिल सर्वच क्षेत्रात परप्रांतीयांचे महत्त्व अवाजवी प्रमाणात वाढून घटनेच्या आणि भाषावार प्रांतरचनेच्या मूलतत्त्वांना डावलून समाजातील अनेक क्षेत्रांत स्थानिकांच्या हिताच्या विरुद्ध असलेले नियम, कायदे व प्रथा प्रस्थापित होतात असा आपला सर्वांचाच अनुभव आहे.

खालील दुव्यावर सांगितलेले वृत्त सत्यात उतरणार असेल तर सूज्ञ व जागरूक संस्थांना या विषयी सुधारणा करण्याच्या दृष्टीने नक्कीच काही कृती करता येईल. ज्या खासगी शिक्षणसंस्था देणग्या घेऊन नेमून दिलेल्या कोट्यापेक्षा अधिक मुलांना प्रवेश देतात; त्यांच्यावर अंकुश आणण्याच्या दृष्टीने हा कायदा फारच उपयुक्त ठरावा. खासगी संस्थांची प्रवेशप्रक्रिया आटोपल्यावर जर त्यांना प्रत्येक कोट्याखाली किती विद्यार्थ्यांना प्रवेश दिला, त्यापैकी प्रत्येकाची टक्केवारी किंवा प्रवेश परीक्षेतील गुण किती, व प्रत्येकाचा राहण्याचा मूळ पत्ता कोणता, एवढी माहिती जरी माहिती अधिकाराखाली मिळवली तरी त्यावरून कोणी किती गोंधळ घातला हे सहजच स्पष्ट होईल. खरं म्हणजे प्रवेशप्रक्रियेसंबंधीचे हे सर्व तपशील सर्व शिक्षण संस्थांनी शासनाकडे सादर करायला हवेत असा कायदाही असणार. पण तो पाळला जातो आहे किंवा नाही व त्यांनी सादर केलेले तपशील कायद्याप्रमाणे आहेत की नाही हे कोण पडताळून पाहणार? शेवटी ’उंदराला मांजर साक्षी’ असाच हा सर्व प्रकार.

अमृतमंथन_खासगी शिक्षण संस्थाही माहिती अधिकाराच्या कक्षेत_Sakal_120210

महाराष्ट्रात जागल्याची भूमिका वठवणार्‍या व्यक्ती व संस्थांनी याची नोंद घ्यावी व योग्य पावले उचलावी.

.

– अमृतयात्री गट

.

45 thoughts on “खासगी शिक्षण संस्थाही माहिती अधिकाराच्या कक्षेत (वृत्त: दै० सकाळ, १२ फेब्रु० २०१०)

  1. Sorry for giving my opinion in English as I don’t know how to write in Marathi font here.
    It is well nigh impossible for an individual like me to do much in the matter. Marathi – Ekjoot can do something. I suggest that through R.T.I. Marathi – Ekjoot may obtain information from different educational institutes how many students from outside Maharashtra who do not know Marathi have been given admissions during the last 2 – 3 years. If it is found that the percentage of such non-Maharashtrian students is high, a complaint be made to the right authority.
    Yeshwant Karnik.

    • प्रिय श्री० यशवंत कर्णिक यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      {{Sorry for giving my opinion in English as I don’t know how to write in Marathi font here.}}
      ह्याच अनुदिनीवरील ’संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल’ (https://amrutmanthan.wordpress.com/2009/07/27/संगणकावर-युनिकोड-टंक-वाप/) हा लेख वाचून त्याखाली दिलेल्या अनेक प्रकारच्या उदाहरणांचा सराव करावा. आपण लवकरच जाणकार होऊन जाल.

      {{a complaint be made to the right authority.}}
      अहो, सध्या चोराच्याच हातात जमादारखान्याच्या किल्ल्या आहेत आणि उंदराला मांजर साक्षी राहतो.

      अर्थात त्याने हताश न होता आपण यथाशक्ती कृती करत राहिली पाहिजेच. मराठी+एकजूट’द्वारा आधीच काही माहितीच्या अधिकाराखालील प्रकरणे चालू आहेतच. पण प्रत्येक सज्ञान व तरूण-प्रौढ (निदान साठीखालील) व्यक्तींनी किमान एकेक प्रकरण तरी एकावेळी माहितीच्या अधिकाराखाली चालू ठेवावे. आवश्यक ती सर्व माहिती व मार्गदर्शन देण्याची हमी आम्ही घेतो.

      इतरही समाजकारणी संस्थांनी ह्यामध्ये यथाशक्ती वाटा उचलावा.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

      • प्रिय रोहिणी पाटील यांसी,

        सप्रेम नमस्कार.

        आपण मांडलेला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आणि मूलभूत आहे. त्यासंबंधित विविध पैलूंबद्दल चर्चा लोकसत्तेमध्ये प्रकाशित झालेल्या आपले मित्र श्री० सलील कुळकर्णी यांच्या “एकच अमोघ उपाय !! मराठी एकजूट” या लेखामध्ये केलेली आहे. तो लेख आपण वाचला नसल्यास अवश्य वाचा व त्याबद्दलचे आपले प्रतिमत (feedback) नोंदवा. (अमृतमंथनावरच उपलब्ध आहे.)

        शिवाय त्याच स्वभाषाप्रेम या मालिकेतील लोकसत्तेमधील “हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा !!”, “इंग्रजी भाषेचा विजय”, आणि “स्थानिक आळशी मराठी माणूस आणि कामसू पाहुणे” हे लेखसुद्धा वाचून पहा. अमृतमंथनावर असे अनेक लेख वाचावयास मिळतील. लेख आवडल्यास आपल्या समविचारी मित्रमंडळींना अग्रेषित करा. स्वाभिमानाची वणवा आपण अधिकाधिक पसरवण्याचा प्रयत्न करू.

        आभारी आहोत.

        क०लो०अ०

        – अमृतयात्री गट

        • सप्रेम नमस्कार.

          खरे आहे. सर्व भारताची काळजी करताना स्वतःच्या स्थानिक जनतेला वार्‍यावर सोडण्याची थिल्लर प्रवृत्ती आपण सोडायलाच पाहिजे. स्वाभिमानाने ताठ मानेने वागलो तरच आपल्याला मान मिळेल. नाहीतर जोडे उचलण्याचीच संस्कृती आपल्या नशिबी येईल.

          क०लो०अ०

          – अमृतयात्री गट

  2. This article is an eye-opener and should reach the marathi hoi polloi as to how the private institutions providing professional courses function and how the government turns a blind eye when the admission procedure is on without really caring for the deserving local students thus driving them to the brink of frustration and by igniting within them a feeling of hopelessness

    • प्रिय श्री० शैलेश घाग यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपण थोडक्यात संपूर्ण लेखाचा सारांशच मांडलात. आभारी आहोत.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० सावधान यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      खरं आहे.

      प्रत्येकाने एकेका संस्थेच्या मागे लागलं तरी हे काम शंभर-दीडशे माणसात होऊन जाईल.

      – अमृतयात्री गट

    • सप्रेम नमस्कार.

      आपल्या आनंदाच्या, समाधानाच्या, स्वाभिमानाच्या व्याख्या एकच आहेत. कारण आपण एकाच आईची लेकरं आहोत.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० मायबोलीध्वजा यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या आनंदाच्या, समाधानाच्या, स्वाभिमानाच्या व्याख्या एकच आहेत. कारण आपण एकाच आईची लेकरं आहोत.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  3. नमस्कार सलील,
    आपण दिलेली माहिती अत्यंत उपयुक्त अशी असली तरी एक प्रश्न मनात होता कि जर ही गोष्ट घडवून आणायची असेल तर आज सुरुवात कशी आणि कुठून करावी? याबाबतच्या शोधकार्यात माझ्या समोर आलेल्या “right to information ” साठीचे केंद्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ नजरेत पडले आणि मराठी अनुवादित जारी केलेला अधिनियामही मिळाला तरी याचा उपयोग किती होऊ शकतो ते माहित नाही तरी आपण याची शहानिशा कराल ही अपेक्षा आहे.
    संकेत स्थळाची कळ पुढील प्रमाणे आहे. http://righttoinformation.gov.in/rtiact-marathi.pdf
    मी अजूनही काही माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे, आणखी काही ठोस सापडल्यास मी नक्कीच आपल्या नजरेसमोर आणेन.

    मी मराठी
    राजेश सु पालशेतकर

    • प्रिय श्री० राजेश पालशेतकर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपण दिलेल्या दुव्यावरील माहिती अधिकाराविषयीचे राजपत्र हे शासकीय मुदणालय मुंबई (चर्नी रोड स्थानकाजवळ), पुणे (पुणे स्थानकाजवळ) अगदी अल्प किंमतीत (रू० पाच) उपलब्ध आहे. तिथूनही वाचक ते घेऊ शकतात. इतरही अशी माहिती देणारी संकेतस्थळे उपलब्ध आहेत.

      आपण मांडलेला मुद्दा महत्त्वाचा आहे. केवळ औपपत्तिक (theoretical) चर्चा करीत बसण्यापेक्षा आपण काही निश्चित व भरीव काम करायला पाहिजे. माहिती अधिकार हे एक प्रभावी अस्त्र आहे. प्रत्येकाने एकावेळी निदान एका मुद्द्यावर जरी माहिती अधिकाराखाली काम चालू ठेवले तरी प्रचंड फरक पडेल.

      माहिती अधिकार हे अत्यंत परिणामकारक अस्त्र आहे हे नक्कीच. अन्यथा सुरेश शेट्टी सारख्या माणसांची हत्या झाली नसती. माहिती अधिकाराखाली त्यांनी उकरून काढलेल्या माहितीमुळेच तर हे घडले.

      आज भ्रष्टाचार, कर्तव्यात कसूर, खोटारडेपणा, जनतेची दिशाभूल, अशा बाबतीत सत्य पुढे यावे असे कुठल्या संबंधित अधिकार्‍यांना, राजकारण्यांना व त्या विषयी लाभ मिळवणार्‍या इतर माणसांना वाटत असते? तरीही माहिती अधिकाराच्या कायद्यापुढे बर्‍याच वेळात्यांचा नाईलाज होतो. अर्थात आपल्या देशातील चिवट, निर्लज्ज, सदसद्‌विवेकबुद्धी नसलेल्या नोकरशहांनी व राजकारण्यांनी जनतेला थकवण्यासाठी अनेक मार्ग काढले आहेत. पण त्याला शरण न जाता चिवटपणाने, जिद्दीने पुन्हापुन्हा मागे लागून आपले काम केले तर यश मिळण्याची शक्यता बरीच असते.

      श्री० सलील कुळकर्णींनी हिंदी ही राष्ट्रभाषा नसल्याबद्दलचे अधिकृत पत्र केंद्रिय गृह खात्याकडून मिळवले आहे ते ह्याच अस्त्राचा उपयोग करून. (कुळकर्णींच्या चौकशीचे उत्तर एकीकडे तयार होत असतानाच कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री० शरद पवार हे दिल्लीत व श्री० विलासराव देशमुख हे पानिपतात “हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा आहे व हिंदी भाषकांमुळेच तर मुंबईची व महाराष्ट्राची प्रगती झाली” अशी भाषणे ठोकीत होते.) असो. इतरही अनेक बाबतीत माहिती अधिकार वापरून काम चालू आहे. त्याला जसजसे यश येईल तसतसे आपल्याला कळवूच. पण प्रत्येकाने दुसर्‍यासाठी थांबून न राहता आपापला खारीचा वाटा उचलणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे.

      या विषयी कुठल्याही प्रकारच्या अडचणी, शंका असल्यास वश्य विचाराव्यात. त्यावर आपण नक्कीच चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करू.

      शुभस्य शीघ्रम्‌…

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  4. Approach through RTI is powerful,no doubt.But prime objective should be to stop political persons from entering into educational field.Owner or trusty of such colleges are people from political background with no adequate qualification,moral/ethical values.They are there to just mint money and market mechanism have no control on needy persons ,as usual they fool themselves.So, the second most objective is to make people aware of such facts.A long term policy need to be drafted to refrain such activity.

    • सप्रेम नमस्कार.

      आपले दोन्ही मुद्दे योग्य आहेत पण:

      १. आपल्या देशात सहसा केवळ राजकारणीच मंत्री होतात. राज्यसभेद्वारा लायक अराजकारणी मंडळी नेमली जावीत असा उद्देश होता. पण तिथेही राजकारण्यांनाच घुसवले जाते. राजकारणी लोक स्वतःला सर्व विद्याशास्त्रसंपन्न समजतात. अगदी संशोधक शास्त्रज्ञांनाही उपदेश करतात. पदवीधर नसलेले, रडतखडत किंवा अगदी गैरमार्गाने पदवी किंवा डॉक्टरेट मिळवलेले लोक शिक्षणसंस्थांचे धंदे थाटतात. विद्वान, तज्ज्ञांनी दिलेले अहवाल गुंडाळून केराच्या टोपलीत टाकले जातात व राजकीय खुशमस्कर्‍यांचे अहवाल ताबडतोब अंमलात येतात. मराठी शाळांचे गळे घोटून अमराठी शाळांच्या तुंबड्या भरण्यास शासन मदत करते. एवढे सर्व होऊन पुन्हा तेच निवडून येतात, आपलीच पाठ थोपटून घेतात व अधिक उत्साहाने भ्रष्टाचार चालू ठेवतात. अशा परिस्थितीत निदान आलटून पालटून तरी विविध पक्षांकडे सत्ता गेली तर थोडी तरी दहशत बसेल.

      २. राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातही शासनाकडे दीर्घकालीन, निश्चित धोरण नाही. शिक्षण खात्याला पूर्णवेळ मंत्री नाही व कृषिखात्याचा मंत्री फावल्या वेळात शिक्षण खाते चालवतो. असे हे राज्य दिवसेंदिवस सर्वच आघाड्यांवर मागे पदते आहे, यात आश्चर्य ते काय?

      खालील लेख वाचला आहे का?

      https://amrutmanthan.wordpress.com/2010/01/16/पन्नास-वर्षानंतरही-राज्य/

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  5. Apan kahi goshtincha vinakaran gondhal karto ahot.
    1) Vina- Anudanit ShikshanSanstha nehmeech dhandandgya lokanna paise gheun pravesh detat – mag to Marathi aso va amarathi. (Mulat Vina-Anudanit shikshansansthanchya viruddhch apan ubhe rahayla have.)
    2) Uchch shikshanachya sandhi sampoorna bhartat maryadit ahet, tyamule jethe pravesh milel tethe vidyarthi jatat – jaylach have. tethe marathi – amarathi bhed nako.
    3) samajik drushtya jo maharashtart kahi varshe rahnar ahe tyane swat: marathi shikayla have.
    Anand Katikar

    • प्रिय श्री० आनंद काटीकर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      १. आपण म्हणता:
      {{1) Vina- Anudanit ShikshanSanstha nehmeech dhandandgya lokanna paise gheun pravesh detat – mag to Marathi aso va amarathi. }}
      विनाअनुदान शिक्षणसंस्था काढू देणे म्हणजे मोकळे चराऊ कुरण उपलब्ध करून देणे असे मुळीच नव्हे, हे मूळ तत्त्व आपण कृपया प्रथम लक्षात घ्यावे. विना-अनुदानित शिक्षणसंस्था म्हणजे चित्रपट किंवा इतर धंद्यांची ठिकाणे नव्हेत. त्यांच्यावर अनेक बंधने असतात. (चित्रपटगृहांनाही इतर राज्यांत २५-५० टक्के काळात स्थानिक भाषिक चित्रपट लावावे लागतात.) व्यवस्थापनाने किती (१०-१५) टक्के मुलांना प्रवेश द्यायचा (आणि तोही अधिकृत पावतीनुसार थोडे वाढीव शुल्क देऊन, २०-३०-५० लाखांच्या रोख देणग्या घेऊन नव्हे) हे सर्व ठरलेले आहे. त्यांना प्रवेशाबद्दल, शिक्षणाच्या दर्जाबद्दल, पायाभूत सोयींबद्दल अनेक बंधने असतात. पण त्यांच्याकडे सर्वसंगनमताने दुर्लक्ष केले जाते आणि बेकायदेशीर पद्धतीने पैसे खाऊन प्रवेश दिले जातात हे आम्ही आपल्याला माहित करून देऊ इच्छितो.

      राज्यातील स्थानिक माणसाला प्राधान्य देणे ह्यासाठी असलेले नियम व कोटा हे पाळले जात नाहीत. कोट्याबाहेर प्रवेश दिले जातात. व अधिकृतपणे ठरलेल्या शुल्कापेक्षा अनेक पटींनी अधिक शुल्क टेबलाखालून, पोत्यांतून घेतले जाते, हे आपण जाणून घ्यावे.

      २. {{Uchch shikshanachya sandhi sampoorna bhartat maryadit ahet, tyamule jethe pravesh milel tethe vidyarthi jatat – jaylach have. tethe marathi – amarathi bhed nako.}}
      प्रत्येक राज्याने मूलतः आपल्या राज्यातील अधिवासी जनतेची सोय प्रथम पाहणे हे तत्त्व सर्वमान्य आहे व त्यात काहीच चुकीचे नाही. (८० टक्के भूमिपुत्रांना रोजगार हेसुद्धा कायदेशीर नियमच आहेत.) हे तत्त्व खासगी संस्थांचे नियम करतानाही इतरही सर्वच राज्यांमध्ये लक्षात घेतले जाते. पण असे कुठलेही कायदे विशेषतः महाराष्ट्रात पाळले जातच नाहीत. सर्व राज्यांत व परदेशांत स्थानिकांना परक्यापेक्षा अधिक प्राधान्य देणे हे सर्वमान्य तत्त्व पाळले जात असूनही आपण मात्र असे भेद नको असा वैश्विक शांतीचे तत्त्व केवळ आपणच पाळलो तर महाराष्ट्राची सर्वच क्षेत्रात अधोगती होणार.

      आमच्या राज्यातील गरीब मुलांच्या प्राधान्याने हक्काचे शिक्षण डावलून बाहेरील राज्यांतील मुलांना अधिकार व लायकी दोन्ही नसताना विहित कोट्याबाहेर प्रवेश देणे हे अनैतिकच नव्हे तर बेकायदेशीरही आहे हे कृपया लक्षात घ्यावे. बाहेरून आडमार्गाने प्रवेश घेणारे विद्यार्थ्यांना त्यांच्या राज्यातही प्रवेश मिळत नसतो कारण ते स्वतः नालायक पण पैसेवाल्या (येन केन प्रकारेण) बापाची मुले असतात. मग बेकायदेशीर देणगीच द्यायची तर ते इतर मागास राज्यांपेक्षा महाराष्ट्रासारख्या राज्यात येणे पसंत करतात. त्यामुळे पुढे नोकरी मिळण्याचीची शक्यताही खूप अधिक असते. पण महाराष्ट्रातील मुले बिहारमध्ये जातील का? आणि कोट्याबाहेरील मुलांना अधिकृत शुल्कापेक्षा अधिक देणग्या बेकायदेशीरपणे घेऊन जागा भरल्यामुळे आमच्या मुलांनी बाहेर जावे किंवा शिक्षण सोडावे हे आपल्या दृष्टीने नैतिक, कायदेशीर आहे का?

      ३. {{samajik drushtya jo maharashtart kahi varshe rahnar ahe tyane swat: marathi shikayla have.}}
      हा सर्वमान्य नियम आहे आणि तो इतर सर्वच राज्यांत व इतर देशात पाळला जातो, पण महाराष्ट्रात तसे घडत नाही कारण आपणच तसे घडावे अशी परिस्थिती आणत नाही. आपले निरभिमान, औदासिन्य व न्यूनगंड हे गुणच याला कारणीभूत आहेत. इतर राज्यांत व इतर देशात अथानिक भाषा शिकल्यावाचून पाहुण्यांचे चालतच नाही. पण महाराष्ट्रात मात्र आपण तसे वागणे हे संकुचितपणाचे, देशद्रोही असे मानतो. आपला-परका भेद करायचा नाही. उलट परक्यांची हांजीहांजी करायची असेल तर आपल्या सर्वसामान्य स्थानिकांना, आपल्या भाषेला व संस्कृतीला कोण महत्त्व देणार? स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मरणार्‍याला कोण वाचवू शकणार?

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

      • Karnatakaat SDM TRUST,KLE TRUST sarkhyaa khaajee pan jagteek darjaa chyaa SS ahet,SDM TRUST,Dharmasthalaa,hyaa sansthandwaare honaara faaydaa parat samaajeek vikasaa sathee kharch karte,2009 nadhe,SANSTHAA ANI MANJUNATH DEVALAYA TARFE,SKDRDP HYAA SANSTHE CHYAA TRUST LAA,25 KAROD RUPAYE DILE AAHET,VA SKD RDP CHE SWTAHACHE ARTH SANKALP 99 KAROD CHE HOTE,
        KLE SUDDHAA PAN KAMI PRAMANAAT ASHAA GOSHTEE VAR KHARCH KARTEE,
        BHARATEE VEEDYAAPEETH KITE KHARCH ASHA GOSHTEENVAR KARTE?

        • प्रिय श्री० मायबोली ध्वज यांसी,

          सप्रेम नमस्कार.

          त्याची तुलना आपल्या शिरडी, सिद्धिविनायक आदी संस्थांशी करावी. शिवाय आपले राज्यशासही अद्वितीयच आहे. मराठीला २५ लाख व गुजराथीला १ कोटी देणारे आपले उदार राज्यशासन. त्याला तोड नाही. खालील वृत्त वाचले का?

          महाराष्ट्र शासनाचे गुजराथीला १ कोटी आणि मराठीला २५ लाख? (https://amrutmanthan.wordpress.com/2009/12/03/महाराष्ट्र-शासनाचे-गुजरा/)

          क०लो०अ०

          – अमृतयात्री गट

    • In other states the number of years for domicile ie for u to be considered a local & get admission as such is as high as 10 yrs residence while in maharashtra it is 2 yrs.so anybody who has stayed for 2 yrs can get admission. we should study the rules in other states & make necessary changes in the law so we dont have to fight again & again for the same thing.

      • प्रिय सुप्रिया नायगावकर यांसी,

        सप्रेम नमस्कार.

        आमच्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात अधिवासासाठी (domicile) पंधरा वर्षांची अट आहे. इतर राज्यांतही तेवढी तरी असेल. पण इतर कायदे फारच मिळमिळीत आहेत व आहेत त्यांची अंमलबजावणी होत नाही. म्हणून कोणीही उठून महाराष्ट्रात येतो. मागच्या दिनांकाचे अधिवास प्रमाणपत्र मिळवतो. स्थानिक लोकांना खरी माहिती देऊन शिधापत्रके मिळवताना खूप त्रास होतो. पण खोटी माहिती देऊन वर मागितलेली चिरीमिरी दिल्यावर परप्रांतीयांना शिधापत्रिका ताबडतोब मिळते.

        राज्यात राज्यभाषा सर्वोच्च आहे हे घटना, कायदे भाषावार प्रांतरचना इत्यांदीची मूलतत्त्वेच सांगतात. इतर राज्ये त्याचा उपयोग करून स्वतःच्या भाषेची, संस्कृतीची जोपासना, संवर्धन करतात. महाराष्ट्रासाठी मात्र स्वाभिमानी कृत्य कायदेशीर असले तरी संकुचित मानले जाते.

        इतर राज्यांत अनेक परवाने, नेमणुका, नोकर्‍या, सरकारी लाभ व अनुदाने यांच्यासाठी अधिवास व भाषेच्या ज्ञानाबद्दल पक्की खात्री करून घेतली जाते. परीक्षाही घेतल्या जातात. टॅक्सी चालकाच्या परवान्यासाठी राज्यभाषा आणि इतर स्थानिक भाषा येणे आवश्यक आहे. पण आपल्या शासनाची तो कायदा राबवण्याची छातीच होत नाही. शासनकर्तेच जर असे असले तर जनतेला वाली कोण? बाप जर बेकार, अकर्तृत्ववान, असला तर पोरांचे हाल, उपासमार होणारच.

        खालील लेख वाचले का?

        https://amrutmanthan.wordpress.com/2009/11/15/हिंदी-ही-राष्ट्रभाषा-एक-च/

        https://amrutmanthan.wordpress.com/2010/02/19/तेलुगूमधील-सहीविणा-पगारव/

        https://amrutmanthan.wordpress.com/2010/02/26/पोलिसांची-भाषा-दै०-सकाळ-म/

        असे स्वभाषा व स्वसंस्कृतीबद्दल अभिमान या विषयासंबंधीचे अनेक लेख या अनुदिनीवर सापडतील. वाचून पहा. आवडल्यास इतरांना अग्रेषित करा. आपली मते लेखाखाली नोंदवून चर्चा करा. व्यक्तिगत पातळीवर स्वभाषेसाठी जे-जे शक्य ते सर्व करा. हीच आग्रहाची नम्र विनंती.

        क०लो०अ०

        – अमृतयात्री गट

    • सप्रेम नमस्कार.

      आपली सूचना योग्य आहे. मराठ+एकजूट उपक्रमाद्वारा ’मराठी+एकजूट, टपाल पेटी क्रमांक १९२०, कोथरूड, पुणे – ४११ ०३८’ असा टपाल पेटी क्रमांक जाहीर केलेला होता. त्यावर त्यांना पत्रे येतात. पण मोठ्या संख्येने प्रत्युत्तर देणे, वेळोवेळी परिपत्रके पाठवणे, हे सर्व शक्य नसते. यावर उपाय काय करावा?

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

        • प्रिय श्री० मायबोली ध्वज यांसी,

          सप्रेम नमस्कार.

          आपल्या काहीही प्रतिज्ञा-पण-व्रत-वसे असतील तर त्यांच्या आड आम्ही येऊ इच्छित नाही. आमची आई आम्हाला भारतीय साडीमध्येच अधिक सुंदर वाटते व तशीच तिला पहावी शी वाटते. त्याचप्रमाणे मायबोली मराठीही देवनागरी ऐवजी रोमी लिपीमध्ये विचित्र वाटते व रोमी लिपीसारख्या अत्यंत थिट्या, खुजा लिपीमध्ये कुठलीही भारतीय संस्कृतोद्भव भाषा वाचणे हे विलंबकारक व त्रासदायक वाटते. म्हणूनच ती नम्र विनंती केली होती. शक्य नसेल तर दुर्लक्ष करावे. गणपती बाप्पांच्या आगमनाची वाट पाहू.

          आभार.

          क०लो०अ०

          – अमृतयात्री गट

  6. Namaskar,
    mee baryachvelaa kaayaanimitt,
    Karnatakat asto,
    aamchya atithi gruhaa samorach,
    ek,ingrajee maadhyamaachee shalaa aahe,
    jichi varseek fee 15000 rupaye vaarshik aahe,
    parantoo sarv mule /muli,chamakdaar poshakhat astaat,parantoo,prarthanechyaa thokyaa barobar,
    JAY KANNAD MATE,JAY JAY JAY BHARAT JANANEE,hyaa kannad rajy geetachee surekh surel survat hote,
    kee geet aaikat rahawe ase vaat te,
    Maharashtra Himalayachya madatees dhaawto,malaa abhiman aahe,parantu swtaha chee samruddh olakh visrun,shalan saathee,ekhaadyaa surel,chetanaa jagrutee karnaaryaa geetachee rachanaa,amchyaa kavee lokanaa kartaa aalee naahee anee MAHARASHTRA SARKAR laa suddhaa,raajyaa chaa swaabheemaan visroon,fakt BHARAT MAAZAA DESH AAHE,GHOKWOON GHENE SOPE VAAT TE,MEE TAR MAHARASHTRAACHYAA SARKAR LAA AMMA SHARANAM GACCHAMI SARKAR MHANEN,
    Tumhaas kaay waat te ?

    • सप्रेम नमस्कार.

      आपण दिलेली माहिती महत्त्वाची आहे. ती अधिकाधिक मंडळींपर्यंत पोचायला हवी. (आपण देवनागरीत लिहू शकाल काय? मराठी पत्र रोमी लिपीत वाचण्यास तास होतो म्हणून वाचले जाण्याची शक्यता कमी होते.)

      केवळ शासनास दोष देऊन उपयोग नाही. आडात असेल तेच पोहर्‍यात येणार. या सर्वांला आपणच कारणीभूत आहोत. आपण नको त्या विशाहृदयीपणाच्या कल्पनांना गोंजारत बसतो व स्वभाषा व संस्कृतीबद्दलचा अभिमान बाळगणे हे संकुचितपणाचे, फुटिरतावादाचे, देशद्रोहाचे लक्षण मानतो.

      निवडणुकीच्या प्रचाराच्या काळातही अगदी लहानसहान ठिकाणी आपले राष्ट्रीय (?) नेते स्थानिक लोकांच्या भाषेत बोलण्याऐवजी त्यांच्या पक्षांच्या श्रेष्ठींच्या भाषेत भाषणे देतात. इतके की ही प्रचारसभा नक्की कोणासाठी आहे असा प्रश्न पडावा. पण असे चित्र इतर स्वाभिमानी राज्यांत दिसत नाही. कारण तिथे असला लोचटपणा खपवूनच घेतला जाणार नाही. आणि हाच तर मूलभूत फरक आहे महाराष्ट्र आणि इतर कुठल्याही स्वाभिमानी राज्यामध्ये. ज्याचे आपण जोडे उचलतो त्याने उद्या आपल्याच डोक्यावर जोडा हाणला तर त्यात आश्चर्य ते काय? स्वतःबद्दल, स्वतःच्या भाषेबद्दल, संस्कृतीबद्दल अभिमान नसणार्‍याला इतर माणसे कसा मान देणार वा आदर दाखवणार? आणि म्हणूनच आपल्याच राज्यात आपलाच उघडपणे जागोजागी अपमान होत असतो. आणि हेच परप्रांतीय इतर राज्यांत दाती तृण धरून समाजात वावरतात.  

      आपण खालीललेख वाचले आहेत काय? नसल्यास अवश्य वाचा.
      https://amrutmanthan.wordpress.com/2009/10/04/इंग्रजी-भाषेचा-विजय-ले०-स/
      https://amrutmanthan.wordpress.com/2009/11/15/हिंदी-ही-राष्ट्रभाषा-एक-च/
      https://amrutmanthan.wordpress.com/2009/12/21/एकच-अमोघ-उपाय-मराठी-एकजूट/

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • ANI VISARLOCH,
      rashtra geetaas kaannad raajy geetaa nantarach gaayle jaate.
      Raajyaa chaa sanskruteek ani adheekrut rajy sambandhee karyakramachaa zenda,KANNAD DHWJ NAVANE OLAKHLAA JATO,
      HYA DWAJA CHEE MANDANEE CHOUKONEE ASOON,VARTE HALDEE ANI KHAALEE LAAL AAHE,JEE HALDEE KUNKOO NISHANEE AAHE,JE ISHWAR ANI MANAVAA CHYAA MAATHEE LAVTAA YETE,HE MUKHY SWEEKRUT KAARAN AAHE,MEE EK LEKH PATHWAT AAHE.
      JAY MAHARASHTRA MAATE,
      JAY JAY JAY BHARAT JANANEE.

      • प्रिय श्री० मायबोली ध्वज यांसी,

        सप्रेम नमस्कार.

        आम्हा सर्वांना ही माहिती पुरवल्याबद्दल आभार. खरंच, आपण स्वभाषेसंबंधित लहानसहान, कायदेशीर गोष्टी करायलाही केवढे घाबरतो. इतर लोक (जे स्वतः संकुचितपणा करतात किंवा ज्यांना महाराष्ट्राव्यतिरिक्त इतरांचा अतिसंकुचितपणा दिसतच नाही ते) आपल्याला संकुचित म्हणतील याची आपल्याला केवढी भीती !! इतर राज्यांत स्वतःच्या राज्याला सर्वच क्षेत्रात सर्वोच्च (कधीकधी देशापेक्षादेखिल) देताना मात्र कोणीही कचरत नाही. आम्हा मराठी भित्यांपाठी मात्र ब्रह्मराक्षस लागलेलाच असतो.

        क०लो०अ०

        – अमृतयात्री गट

  7. Vishwa Maatrubhaashaa Dinaa nimitt zundeeteel sarvana shubhechhaa va ABHINANANDAN.
    Malaa aaj chaa diwas haa sanukt rashtra sanghaane dilelee mothi parvanee vaat toy,
    Aapan kahee staaneey mahatva shee judlele,
    antar rahtriy diwas kevaa saajre karaay la shiknaar?
    sagleekadech vegle rahun aamhaas kaay milnaar,
    Kadaachit BOPLAA SUDDHAA naahee.
    Jay Jay Jay Maharashtra Maate,
    Jay jay jay jay Bharat Jananee.

  8. Mee praathmik maay boli Dhwaj vaaparne suru kele aahe,
    pan sarv sammat,sarv pailoonchaa vichar karun ADEEKRUT MAAYBOLEE DHWAJ PUDHCHYAA 21 feb PARYANT BANOO SHAKEL KAA?
    KARAN MAHARASHTRAT SUTTEE VAR ALE KEE no mans land MADHE ALYAA SAARKHE VAAT TE,
    FAKT ekach dhwaj,ekach prateek MAAYBOLEE CHAA KUTHLYAA HEE PRAKARE VIKAAS KARU SHAKEL,

    Jay Maharashtra Maate,
    Jay Jay Bharat Jananee.

    • प्रिय श्री मायबोली ध्वज यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      कल्पना चांगली आहे. पण दुर्दैवाने तुमच्या आमच्या कल्पनेला, मताला विचारतो कोण? शिवाय मायबोली, मायसंस्कृती या विषयांवर महाराष्ट्रात एकमतही नाही. काय कराचे?

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  9. A.P. madhun Manmad paryant chyaa sarva gadyaa Shirdi paryant dhavteel,pan Maharashtratoon Shirdi saathee kiti gaadyaa dilyaa?
    Maharashtrat railway prakalpan saathee raajy sarkaar ne jaagaa dyaavi mhanun CHENDU RAWAANCHYAA HAATAAT DILAA,
    ATAA RAAW TO DIDINCHYAA TOPLEET YASHASWEE PANE TAAKU SHAAKTEEL KAA?
    JAY MAHARASHTRA MAATE,
    JAY Bharat Jananee.

    • सप्रेम नमस्कार.

      शिरडीचे तेलुगूकरण जवळजवळ पूर्ण होत आले आहे. लवकरच तिथे मराठी दिसेनाशी होईल.

      तिरुपती व इतर मोठ्या देवस्थानांप्रमाणे महाराष्ट्रातील शिरडी, सिद्धीविनायक ही देवस्थाने फारसे काहीच समाजकार्य करणे, शिक्षण संस्था, रुग्णालये चालवणे इत्यादी कामे करीत नाहीत. ते सर्व शेकडो-हजारो कोटी रुपये कुठे जातात कोण जाणे. अर्थात वरील लेखाशी या चर्चेचा काही फारसा संबंध नाही.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  10. Telgu karanaachaa ek faaydaa,Andhra madhe jithe jithe SAI BABA nchimandire aahet,tithe,agdi durkshetrat suddhaa,Pahate bhupaalee,aartee,sarvaa pujaa dhwaaniksepakavar,fakt maratheetach hotaat,
    tasech mandir pujaaree,mahaaraashtraatunach anlele aahet,karmakandanchi samagree Shirdi hunach anlee jaate.
    Godavari chyaa kinaaryaavar Bhadraachalam madhe sakaalee saade paach vaajtaa,
    ARUN UGAVALAA PRABHAAT ZAALEE SARKHYAABHOOPALYAA gav bhag Sangleet aaikun varshe zaalee aahet.
    Marathee karan sanskruteek devaan ghevaaneetun,
    honyaas purna Andhra moklaa aahe,
    mAIDAAN MAARU YAA KAA/

    • प्रिय श्री० मा० ध्व० यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      तेलुगूकरण तिथे चालू दे पण महाराष्ट्रात कशाला. भक्तांना यायचे असेल तर ते इथे येतीलच. उत्तर हिंदुस्थानात जाणारे दाक्षिणात्य किंवा दक्षिण हिंदुस्थानात जाणारे उत्तरवासी काही आपल्या भाषेची अट घालून परराज्यात जात नाहीत. हा लोचटपणा फक्त महाराष्ट्रातच होतो.

      असो. मूळ लेखाशी याचा काहीच संबंध नाही. ही चर्चा येथेच थांबवू.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s