मायबोलीप्रेम प्रथम, धंदा दुय्यम (पत्र: दै० लोकसत्ता, १ फेब्रुवारी २०१०)

आपल्या स्वार्थासाठी आपल्या स्वाभिमानाचा बळी देण्याबद्दलची उदाहरणे आज आपण महाराष्ट्रात सतत पाहत असतो. राजकीय स्वार्थापुढे परक्याचे जोडेही शिरसावंद्य मानण्याची काही तथाकथित नेत्यांची हुजुरेगिरीची संस्कृतीही आपल्याला आता फार नवीन राहिलेली नाही. पण स्वभाषाभिमानापुढे व्यावसायिक फायद्यालाही दुय्यम स्थान देणे अशी उदाहरणे महाराष्ट्रात घडतील काय आणि घडलीच तर त्याचे इतर मराठी माणसे कौतुक करतील की संकुचितपणा म्हणून हेटाळणी करतील?

आपले मित्र श्री० विजय पाध्ये यांनी पाठवलेले हे लोकसत्तेच्या वाचकाचे पत्र १ फेब्रुवारी २०१० या दिवशी प्रसिद्ध झाले आहे.

———–

मराठी माणूस आणि मायबोलीवरचे प्रेम (लोकसत्ता, पुणे । सोमवार, दि० १ फेब्रुवारी २०१०)

सुमारे दहा वर्षांपूर्वी पतीच्या नोकरीनिमित्त आम्ही टांझानियास राहत होतो. तेथील स्थानिक लोकांची भाषा ‘स्वाहिली’. त्यांना इंग्रजी भाषाही जुजबी बोलता येते. एकदा मी भाजी बाजारात गेले असताना दुकानदारास, ‘टोमॅटो काय भावाने दिले?’ असे इंग्रजीत विचारले. त्यावर तो म्हणाला, ‘तुम्ही स्वाहिलीमध्ये का नाही विचारले?’ मला स्वाहिली भाषा येत नसल्याचे सांगितल्यावर तो म्हणाला, ‘किती वर्षे इकडे राहता?’ मी सांगितले, ‘गेली तीन वर्षे’. यावर तो म्हणाला, तीन वर्षे येथे राहाता आणि स्वाहिली भाषा येत नाही? मी तुम्हाला टोमॅटो देणार नाही!’

मी शरमले आणि दुसऱ्या दुकानात जाऊन हाताने खुणावून टोमॅटो खरेदी केले. परत जाताना मी कामचलाऊ ‘इंग्रजी-स्वाहिली’ पुस्तक विकत घेऊनच घरी गेले. आपल्याकडे असे किती मराठी दुकानदार, मराठीमध्ये विचारले नाही म्हणून गिऱ्हाईकास परत पाठवतील?

– मालती देशमुख, जुहू, मुंबई

———–

अशा स्वाभिमानपर घटना महाराष्ट्राबाहेर, म्हणजे बंगाल, तमिळनाडू, कर्नाटक यासारख्या राज्यांतच नव्हे तर आफ्रिका, फ्रान्स, श्रीलंका, बांगला देश, जर्मनी, जपान, इस्रायल इत्यादी जगभरातील अनेक देशात घडत असतात. पण तशा घटना महाराष्ट्रात घडू शकत नाहीत आणि घडल्याच तर संबंधित व्यक्तीवर दोषारोपाचा इतका वर्षाव होतो की तसे करण्यास इतर कोणी पुन्हा धजूच नये.

आपल्याला याबद्दल काय वाटते? आपले मत या लेखाखालील रकान्यात अवश्य नोंदवा.

– अमृतयात्री गट

23 thoughts on “मायबोलीप्रेम प्रथम, धंदा दुय्यम (पत्र: दै० लोकसत्ता, १ फेब्रुवारी २०१०)

  1. याला कारण मराठी माणसेच आहेत. परवा राज ठाकरे यांनी डोंबिवीती एका सभेत बोलताना फक्त मराठीतच बोला असे सांगितले. पण मुंबई वगळता उर्रित महाराष्ट्रात जास्तीत जास्त लोक मराठीतच बोलतात, मुंबईत मात्र मराठी बोलणे म्हणजे काहीतरी गुन्हा केला असे मराठी माणसालाच वाटत असावे. तो आपल्या घरात, सोसायटीत असतो तो पर्यंत मराठीच बोलतो, पण बाहेर पडला कि हिंदीत बोलतो इतकं हे हिंदी त्याच्या डोक्यात भरविलेले आहे.
    बिरबलाच्या एका गोष्टीत माणसाची मातृभाषा ओळखण्यासाठी तो झोपला असता त्याच्या अंगावर पाणी ओतावे म्हणजे तो ज्या भाषेत ओरडत उठेल तीच त्याची मातृभाषा समजावी. गुजराती माणूस गुजरातीत ओरडत उठेल, तामीळी तामीळमध्ये ओरडत उठेल, पण मराठी माणूस मात्र कदाचित ङिंदीतच ओरडत उठेल. अजूनही मराठी म्हणजे घाटी लोकांची भाषा असाच आपल्या मराठी लोकांचा समज आहे. त्यामुळे मराठी माणसाचा आपल्या भाषेविषयीचा दृष्टीकोन बदलल्याशिवाय मराठी हे सगळी उठाठेव व्यर्थ आहे असंच मला वाटतं.

    • श्री० श्रीहरी गोडबोले यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपली मते पटतात.

      {{As a customer atleast one can speak in Marathi in Maharashtra?}}>
      – ग्राहक म्हणून तरी आपण आत्मविश्वासाने आपली स्थानिक भाषा बोलावी. तेवढाही स्वाभिमान आपल्याला नाही. आणि प्रस्तुत लेखात तर तो ग्राहक नाही तर व्यावसायिक असूनही त्याने मातृभाषेला धंद्यातील नफ्यापेक्षा प्राधान्य दिलं.

      {{We have already converted Marathi names of vegetables either to Hindi or English – No body knows Bhopali Mirchi, Ratale, Vangi etc.}}
      – इतर राज्यात याविरुद्धच घडतं. म्हणून तर गेली २० वर्षे भय्या मंडळी इतर कुठल्याही राज्यातील अगदी मोठ्या शहरांपेक्षादेखिल महाराष्ट्रातील लहान ठिकाणंही पसंत करतात. कारण त्यांना आपण “आपलेच घर आहे. आपलीच भाषा व संस्कृती चालू दे.” अशी सतत शाश्वती आपण देत असतो.

      {{I made it a point to buy all possible things only from Marathi Dukandar and where it is not possible to buy it from the shop who will speak to me in Marathi}}
      – असे प्रत्येकाने केले तर परिस्थिती नक्कीच पालटू शकेल. अन्यथा काही वर्षातच महाराष्ट्राला अधिकृतपणे राज्यभाषा बदलावी लागेल.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  2. As a customer atleast one can speak in Marathi in Maharashtra? We speak Hindi to buy vegetables in Mumbai market because Bhajiwala can’t understand.

    We have already converted Marathi names of vegetables either to Hindi or English – No body knows Bhopali Mirchi, Ratale, Vangi etc.

    Another typical place is Bhel Puri wala where we speak in Hindi

    I made it a point to buy all possible things only from Marathi Dukandar and where it is not possible to buy it from the shop who will speak to me in Marathi

    • श्री० अनिल करंबेळकर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपली मते पटतात.

      <>
      – ग्राहक म्हणून तरी आपण आत्मविश्वासाने आपली स्थानिक भाषा बोलावी. तेवढाही स्वाभिमान आपल्याला नाही. आणि प्रस्तुत लेखात तर तो ग्राहक नाही तर व्यावसायिक असूनही त्याने मातृभाषेला धंद्यातील नफ्यापेक्षा प्राधान्य दिलं.

      <>
      – इतर राज्यात याविरुद्धच घडतं. म्हणून तर गेली २० वर्षे भय्या मंडळी इतर कुठल्याही राज्यातील अगदी मोठ्या शहरांपेक्षादेखिल महाराष्ट्रातील लहान ठिकाणंही पसंत करतात. कारण त्यांना आपण “आपलेच घर आहे. आपलीच भाषा व संस्कृती चालू दे.” अशी सतत शाश्वती देत असतो.

      <>
      – असे प्रत्येकाने केले तर परिस्थिती नक्कीच पालटू शकेल. अन्यथा काही वर्षातच महाराष्ट्राला अधिकृतपणे राज्यभाषा बदलावी लागेल.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  3. अगदी बरोबर ! मी ठणकाऊन सांगतो, सांगत आलो आहे आणि येथून पुडःए ही सांगत रहाणार! पण जेव्हा पर राज्यात वा देशात जातो तेथील भषा जाणुन घेण्याचा आणि त्या भाषेचा आदर राखण्याचा पण प्रयत्न करतो.प्रत्येकाला आपली आई प्रिय असते याची मी नेहमी आठवण ठेवतो.

    • श्री० सावधान यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      अगदी योग्यच बोललात. पण मराठी माणूस हे तत्त्व महाराष्ट्राबाहेरच पाळतो. त्यामुळे त्याला महाराष्ट्रात किंमत नाही. व त्याने तसेच लोचटपणे वागावे अशी सर्वांचीच इच्च्छा आहे. फक्त मराठी माणसाचाच स्वाभिमान हा संकुचितपणा ठरतो.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  4. मी सध्या बंगलोर मध्ये राहत आहे. माझे प्रोफेसर तामिळ आहेत. त्यांचे व्यावसायिक आयुष्य मुंबईतच गेले. निवृत्तीनंतर ते बंगलोर मध्ये राहायला आले. मुंबई मध्ये २० पेक्षा जास्त वर्ष राहून सुद्धा त्यांना मराठी शिकावे असे वाटले पण नाही आणि त्याची गरजपण निर्माण केली गेली नाही. त्यामुळे इतके वर्ष महाराष्ट्रात राहून देखील त्यांना मराठी येत नाहीच आणि उलट ते मुंबई मधील मराठी वादावर टीका करतात. पण बंगलोर मध्ये आल्यावर त्यांना कन्नड शिकण्याची गरज भासली. त्याचे कारण हे तिथे इंग्रजी किंवा हिंदी चालत नाही असे नसून रिक्षा वाले, taxi वाले, पोलीस स्टेशन मधले पोलीस, ट्राफिक पोलीस यांच्या डोळ्यात दिसणारा अनादर कारणीभूत आहे. आणि ते म्हणाले कि जर स्थानिक भाषा शिकली सांस्कृतिक दृष्ट्या स्थानिकांशी आपल्यालाच खूप जवळ असल्यासारखा वाटत. आता हे त्यांना मुंबईत का जाणवलं नाही? सध्या जो मराठी चा वाद चालू आहे तो मुख्य मुदे सोडून भलतीकडेच जातो आहे. आणि मुंबई सारख्या ठिकाणी सुरुवातीपासूनच कोणी मराठीला महत्व दिलं नाही. पुण्यात अजूनही अनेक अमराठी दुकानदार मराठीतच बोलतात. कारण त्यांना माहिती आहे कि त्याशिवाय त्यांचा धंदा होणारच नाही. पण मुंबई मध्ये खरं सांगायचं तर कोळी आणि आगरी सोडले तर तसे स्थानिक कोणीच नाहीत. जे महाराष्ट्राच्या दुसर्या भागातून आले त्यांनी अमराठी लोकांची हांजी करण्यातच धन्यता मानली. आता ओरडून काय उपयोग? पाणी डोक्यावरून कधीच निघून गेलं आहे. एकूणच महाराष्ट्रात मराठीची वाटच लागते आहे. किमान आता इतर उर्वरित महाराष्ट्रात जर मराठी भाषा वाचवायची असेल तर व्यावसायिकांनीच नव्हे तर स्थानिक लोकांनी सुद्धा शुद्ध मराठीतच बोललं पाहिजे. शासनाने शासकीय कारभारात मराठीचाच वापर ठेवला पाहिजे. म्हणजे ज्यांना महाराष्ट्रात राहायचे आहे त्यांना मराठी शिकण्याशिवाय पर्यायाच राहणार नाही.

    • अपर्णा लालिंगकर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      तमिळ प्राध्यापकांचे उदाहरण मार्मिक आहे.

      मुंबईत केवळ कोळी होते तेव्हा इतरही अनेक ठिकाणी आदिवासीच होते. पुण्याचे कोकणस्थ ब्राह्मण पेशवाईमुळे आले. तेव्हा फार मागे गेलो तर ऑस्ट्रेलिया व अमेरिकेतही फक्त आदिम लोकच होते. तेव्हा एवढे मागे कशाला जावे?

      बंगळूरमध्ये कानडींपेक्षा तमिळ अधिक आहेत. पण कानडीच्या सर्वोच्च असण्यात त्याने काहीही बाधा आलेली नाही.

      {{किमान आता इतर उर्वरित महाराष्ट्रात जर मराठी भाषा वाचवायची असेल तर व्यावसायिकांनीच नव्हे तर स्थानिक लोकांनी सुद्धा शुद्ध मराठीतच बोललं पाहिजे. शासनाने शासकीय कारभारात मराठीचाच वापर ठेवला पाहिजे. म्हणजे ज्यांना महाराष्ट्रात राहायचे आहे त्यांना मराठी शिकण्याशिवाय पर्यायाच राहणार नाही.}}
      – तसे झाले तरच मराठी भाषा व मराठी माणूस वाचेल. नाही तर सामान्य, गरीब मराठी माणसाला दुय्यम नागरिकाचे आयुष्य जगावे लागेल.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

      • “मुंबईत केवळ कोळी होते तेव्हा इतरही अनेक ठिकाणी आदिवासीच होते. पुण्याचे कोकणस्थ ब्राह्मण पेशवाईमुळे आले. तेव्हा फार मागे गेलो तर ऑस्ट्रेलिया व अमेरिकेतही फक्त आदिम लोकच होते. तेव्हा एवढे मागे कशाला जावे? ”

        खूप मागे मी जाताच नाही आहे. स्थानिक कोण हा मुदा जरा बाजूला ठेवूयात. कारण तसा झालं तर आपण कोणीच सध्या जिथे राहतो आहोत तिथले स्थानिक नाहीत असाच निष्कर्ष निघेल. त्यामुळे त्या वादात नं पडता जरा वस्तुस्थिती जाणून घेऊ. माझं आजोळ मुंबईचं. म्हणजे ते सुद्धा सातारा जिल्ह्यातील लोक पण कामा निमित्त मुंबईत येऊन स्थायिक झालेले. आम्ही पुण्याहून लहानपणी मुंबईला यायचो तेंव्हा हे मुंबईचे लोक उठ सुठ हिंदी (ते सुद्धा शुद्ध नाही ) का बोलतात तेच कळायचं नाही? मी ही जवळ जवळ ३० वर्ष मागची गोष्ट सांगते आहे. आजूनही माझ्या आजोळच्या नवीन पिढीतील मुलांचे मराठी शुद्ध नाही. त्यात हिंदी तसेच इंग्रजी शब्द पण असतात. आणि त्यातच सगळ्यांना धन्यता वाटते. (असं निदान माझं तरी मत आहे त्यांच्या एकूण संभाषण बघता) म्हणजे आम्ही लहानपणी शुद्ध मराठीत बोलायचो तर आम्ही किती मागासलेले असाच आमचा समाज हे मुंबईतील लोक करून द्यायचे. माझा मुद्दा एवढाच आहे कि जे कोणी मराठी लोक मुंबईत राहायला आले त्यांनी मराठीचा आग्रह कधीच धरला नाही जसा पुण्यात धरला गेला. हिंदी चित्रपट संस्कृती मुळे मुंबई मध्ये अनेक उत्तर भारतीय आले आणि त्यांनी रोजगार निर्माण केले. दुर्दैवाने पूर्वीच्या हिंदी चित्रपटांतील दर्शया ही मुंबईत किंवा महाराष्ट्रात जरी चित्रित केली असली तरी चित्रण करणारा मुख्य माणूस (मी कॅमेरा वाला म्हणत नाही) हा उत्तर भारतीय असल्याने तसेच अभिनेते अभिनेत्री सुद्धा अमराठी असल्याने मराठी भाषेला महत्व दिलंच नाही. त्याच बरोबर चित्रपटातील
        कामवाला(ली) हे सहजपणे मराठी दाखवले गेले. आणि तसे ते सगळ्यांनी स्वीकारले. ह्या सगळ्या मोठ्याच चुका आहेत. कालच मी ८० च्या दशकातील अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटतील “अंग्रेजी में कहते हैं की…..” हे गीत ऐकलं. आणि सहजच माझ्या मनात प्रश्न आला कि त्याने बंगाली, गुजराती आणि पंजाबी घेतले पण
        जिथे ते गीत चित्रित झालं ती मराठी भाषा वापरावी कुठे तरी हे सुद्धा सुचलं नाही. वेगळे पण म्हणजे आनंद चित्रपटात डॉ कुलकर्णी मराठी बोलताना दाखवले आहेत. मुंबई साठीचं ईतर भारतीयांमधील मुख्य आकर्षण म्हणजे हिंदी चित्रपट सृष्टी हे मान्य करायलाच हवं. आणि त्याचाच प्रभाव त्या शहराच्या जडणघडणीवरही झालेला आहे. भारतातील कोणत्या तरी शहरातून आपलं नशीब आजमावायला कोणीतरी मुंबईत येतो आणि पैसे वाला बनतो. ह्या कथा अशी दृश्य यातूनच मुंबई विषयीचं आकर्षण वाढलं आणि लोक मुंबईत येऊ लागले. खूप पूर्वीच मुंबईतील मराठी आणि मराठी माणूस याचा विचार करायला हवा होता.

        आता पुणे आणि इतर ठिकाणी तेच लोण पसरत आहे. तेंव्हा मनसे ने शिवसेनेवर कुरघोडी करण्या साठी आणि मुंबईतील शिवसेनेचे अस्तित्व संपलं आहे का नाही हे सिद्धं करण्या साठी आंदोलन न करता खर्या अर्थाने मराठी माणसाचे हित बघायचे असेल तर इतर महाराष्ट्रा कडे लक्ष द्यायला हवे. आणि राज ठाकरे नि नुसताच फेस बुक वर मराठी + एकजूट याचे सदस्य बनून मराठी एकजूट न करता आपल्या भावाशी हात मिळवणी करून पहिली मराठी एकजूट दाखवावी. मराठी लोकांची इतर भाषिकांच्या तुलनेत प्रगती न होण्या मागचे अजून एक कारण म्हणजे त्यांची एकमेकांमधील लाथाळी आणि एकमेकांची भाऊबंदकी. मला अशी अशा आहे कि जर राज ठाकरे व उद्धव ठाकरे चुकून माकून (त्यांच्या राजकारणातून वेळ मिळाल्यास) यातील प्रतीमते वाचत असतील तर आणि त्यांना मराठी माणसाचे खरच हित वाटत असेल तर त्यांनी स्वतःची प्रथम एकजूट करावी. सगळा महाराष्ट्र त्यांच्या मागे उभा राहील. आजून एक त्यांनी पार प्रांतीयांना पळवून लावण्याची भाषा न करता मराठी भाषा आणि मराठी माणूस यांचे सबलीकरण कसं होईल या कडे लक्ष द्यावे. मराठी मानसं मधील व्यावसायिक कौशल्य वाढवण्यास मदत करावी. आपल्या कडील नेतृत्व क्षमतांचा चुकीच्या ठिकाणी वापर करू नये. नाहीतर राहुल गांधी सारख्या अतिशय नवख्या आणि भारतीय राजकारणाची काहीच समाज नसलेल्या तसेच माणसाचे फावते. उद्या जर तो भारताचा पंतप्रधान म्हणून वर आला तर दोष हा तुमच्या सारख्या वैयक्तिक स्वार्थाचे राजकारण करणार्या लोकां कडे जाईल. तुमच्यात आणि काँग्रेसी लोकांमध्ये काहीच फरक राहणार नाही. विचार करावा.

        • प्रिय सौ० अपर्णा लालिंगकर यांसी,

          सप्रेम नमस्कार.

          आपल्या दीर्घ, विचारपूर्ण आणि चिंतनपर पत्राबद्दल अत्यंत आभारी आहोत. तपशीलाचा लहानसहान मुद्दा सोडला तर कोणीही सच्चा मराठीप्रेमी आपल्या सर्वच मुद्द्यांशी सहमत होईल.

          क०लो०अ०

          – अमृतयात्री गट

  5. I have experienced in France that a local will not help you if you fail to communicate in French. Even while seeking directiosn to reach to an address on streets, a Frenchman will refuse to oblige if you do not know French.

    Ofcourse thats an extreme and we do not expect that to happen in Mumbai/Maharashtra/India, but whats wrong in knowing local language.
    How one can dare to protest against knowing local language when he/she is seeking an domicile to that region!

    I will be most happy to learn Tamil if I have to stay there for a longer duration. Thats how we learn cultures and that broadens our vision. But the vested interests try to maintain distinct identity of those in Mumbai from outside for their vote bank politics.

    A Parsi in my office used to get offended if I tried to talk to him in Hindi. He used to insist I should talk to him in Marathi and he would respond back in whatever broken Marathi with typical Parsi accents. Thats how we bridge bonds and not by hating a language.

    • प्रिय श्री० नितीन यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपण फ्रान्सबद्दल जे म्हणालात ते तमिळनाडू मध्ये तर घडतेच पण इतर राज्यांतही थोड्या प्रमाणात घडू शकते. तथाकथित विशालहृदयी तमिळ लोकांना मात्र संकुचित म्हणणार नाहीत.

      {{How one can dare to protest against knowing local language when he/she is seeking an domicile to that region!}}
      – हेच तर भाषावार प्रांतरचनेचे तत्त्व आहे.

      “हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा !!” या लेखातील खालील उतारा आपण वाचलाच असेल.

      कर्नाटक शासनाच्या शालेय शिक्षणात कानडी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरुद्धच्या रिट याचिकेत राज्य शासनाची बाजू घेऊन सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ‘कोणाला आवडो अथवा न आवडो, परंतु या देशात भाषावार राज्यरचना व्यवस्थित प्रस्थापित झाली आहे. अशा भाषावार राज्यरचनेचा उद्देश असाच आहे की प्रत्येक राज्यातील लोकांची त्यांच्या राज्यातील भाषेच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती साधण्यासाठी अधिकाधिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे.’

      महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षणात पाचवी ते दहावीच्या वर्गाना मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरुद्धचा रिट अर्ज फेटाळताना महात्मा गांधींच्या मताचा हवाला देऊन सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ‘वस्तुत: एखाद्या राज्यात वास्तव्य करणार्‍या लोकांना तेथील स्थानिक भाषा शिकण्यास सांगता कामा नये असे प्रतिपादन मुळीच मान्य करता येणार नाही. परक्या प्रदेशात राहताना भाषिक अल्पसंख्याकांनी स्थानिक भाषा शिकून घ्यायला पाहिजे हे तत्त्व पूर्णपणे उचितच आहे. आमच्या मते स्थानिक भाषा शिकण्यास विरोधाच्या भावनेचे पर्यवसान समाजजीवनाच्या मुख्य प्रवाहापासून अलग होण्यात होते आणि त्याचा परिणाम म्हणून राज्यात भाषेवर आधारित विखंडन (तुकडे-तुकडेत पडणे) होते व तसे घडणे ही राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने निंद्य गोष्ट आहे.’

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  6. Long ago Javaharlal Nehru& his YESMAN YB Chavhan succeeded in wiping out the ‘Self Esteem’ of Maharashtrian community.Since then we are living like cowards in our own state.
    It was Shankarrao Chavhan, the then CM of Maharashtra lifted the shoes of a novice Sanjay Gandhee just to express his loyalty to Nehru-Gandhi regime!
    So, live like a spineless worm(gandool in Marathi) & be happy!
    What else can be said in this context?
    amgovilkar

    • प्रिय श्री० अरविंद गोविलकर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपण आम्हा सर्वांच्याच भावना, आमच्या हृदयातील सल यथार्थपणे मांडलात. याहून आणखी काय लिहावे?

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० ज्ञानेश यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      खरंच आहे. गुलामगिरीची वृत्ती अंगी बाणलेल्या माणसाने इतरांकडून सन्मानाची अपेक्षा करणे निरर्थकच आहे. राहूलचे जोडे उचलणारा माणूस यापुढे जन्मात कधीतरी ताठ मानेने उभा राहू शकेल काय?

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  7. mala tari aata ase watte ki marathi mansalach marthi cha abhiman rahilela nahi. jethe kothe me pahato mala ya mumbait train athwa bus madhe marathi bolnara shodhawa lagto, he sare pahun far wait watate. ya upar aaple maharashtra sarkar mhanje marathi chya babtit sarach anand ahe. he sare pahun man vishanna hote. marathi lokani jage whave ani aaplya ya bhashela ticha yogya to maan dhaya hich iccha.

    • प्रिय श्री० रवींद्र अवसरे यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या सारखे जे कोणी थोडेसे स्वाभिमानी उरले आहेत त्यांनीच धीर सोडला तर कसे चालेल?

      ’इंग्रजी भाषेचा विजय’ लेखाप्रमाणे इंग्रजी भाषेची स्थिती एवढी सुधारेल अशी किती इंग्रजांना आशा होती? स्वतःच्या भाषेला व परिस्थितीला दोष देऊन गप्प बसणे सोडून त्यांनी कृती करण्यास शासनाला भाग पाडले तेव्हाच तो मोठा बदल झाला. शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य, भारताचे स्वातंत्र्य, यासुद्धा एकेकाळी अशक्यप्राय घटनाच होत्या. पण त्या घडू शकल्या. आणि यापैकी प्रत्येक घटना ही अनेक सामान्य एकत्र आल्यानेच झाली. एका इंग्रजाने, एकट्या शिवाजी महाराजांना किंवा एकट्या गांधीजींनी अशा घटना घडवल्या नाहीत तर मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या जनसामान्यांनीच त्या घटना घडवल्या.

      आम्ही दिलेली उदाहरणे हास्यास्पद वाटतीलही. पण त्या घटना घडण्याच्या आधी तसे स्वप्नरंजन करण्याचे धारिष्ट्यही अनेकांना शक्य नव्हते.

      आता नकारात्मक विचार मनात न आणता आपण प्रत्येकाने यथाशक्ती प्रत्यक्ष कामास लागुया. आपण किंवा आपली भाषा कुठल्याही दृष्टीने नालायक, हिणकस, अक्षम, नाही एवढा आत्मविश्वास बाळगून जसे जमेल तसे पुढे जाण्याचा प्रयत्न करू. त्यातून अपयश आले तरीही निदान आपल्याला शांतपणे शेवटचा श्वास घेण्याच्या वेळी आपली सदसद्विवेक बुद्धी तरी आड येणार नाही.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  8. I do not think that one should incur loss for just for the sake of pride of language. One should not have allowed such a situation to arise. Why have we allowed about 30% non-Marathi people to reside in Maharashtra? Why are we communicating in Hindi? Why our 90% trade and industries are in the hands of non-Marathis? On one hand Loksatta is publishing such a letter and on the other hand preaching fake cosmopolitanism. Marathis have themselves brought such a situation to the fore. Let Marathis occupy different strategic fields. Then there will be no need to incurr losses.
    Shrikant Pundlik

    • प्रिय श्री० श्रीकांत पुंडलिक यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      ज्या देशात किंवा राज्यात स्थानिक माणूस महत्त्वाच्या पदांवर आहे तिथेच स्थानिक माणसाला महत्त्व मिळेल हा गैरसमज आहे. निदान लोकशाहीत तरी बहुजनांच्या इच्छेला महत्त्व हवे. लोकशाही म्हणजे लोकांनी, लोकांसाठी, लोकांद्वारे चालवलेले राज्य. पण ते लोकांच्या भाषेतही हवे. अन्यथा त्याला काहीच अर्थ नाही. भाषावार प्रांतरचनेचे हेच मूळ तत्त्व आहे. आसाम, ओरिसा, बंगाल एवढेच नव्हे तर दक्षिणी राज्यांतही धंदे इतरांच्या हातात असतात. पण स्वतःचा स्वाभिमान मात्र पक्का मनात असतो. तो विकाऊ नसतो. तिथे स्थानिक भाषेला डावलले जात नाही. प्रस्तुत लेखातील स्वाहिली भाषा ही काही फार श्रीमंतांची, प्रगत लोकांची भाषा नव्हे. नैरोबीमध्ये अनेक धंदे भारतीयांच्या हातात आहेत.

      राजस्थानातील मारवाडी, गुजराथमधील लोकांनी स्वतःच्या राज्यांत इतकी वर्षे काय मोठे दिवे लावले? राजस्थान अजुनही गरीब राज्यच आहे. तेव्हा स्थानिक प्रजा गरीब असली तरीही स्वाभिमानी असली पाहिजे. हेच तर याचे सार.

      दुसरे म्हणजे लेखिकेने लिहिल्याप्रमाणे तिने ताबडतोब स्थानिक भाषा शिकणे सुरू केले. तसे केले नसते तर तिचाच तोटा झाला असता. त्या सर्व दुकानदारांचा नव्हे.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  9. ypa aadhi ekadaa, SAADHANAA maddhe wachalyaache aathavate ki,patralekha va tyaachaa mitra madraas madhhe kaamaa nimitta rahaat asataa,tyaanaa english-tamil dictionary ghevun firaave laagat hote mhanun tyaani tamil shikanyas suruwaat keli aani tyaanchya shejaaryaani aanadaane te shikavile. patralekhak mhanataat,”ugaach bhaashewarun vaad ghaalanaarya shivsena, manase ni yaa varun bodha ghyava.assa vaad jhalaa asataa tar aamhi tethe raahu shakalo nasato.” aapan kay bodha ghyaava?

    • प्रिय रुता यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या पत्राबद्दल आभारी आहोत. आपण लिहिलेले उदाहरण योग्यच आहे.

      हा प्रश्न केवळ शिवसेना, मनसे यांच्या कुवतीबाहेर गेलेला आहे. सर्वसामान्य मराठी माणसाला मुळातच जर स्वाभिमान नसेल तर दुसरा कोणी कितीही प्रयत्न केले तरी त्याचा उपयोग नाही. प्रत्येकाने स्वतःला शक्य तेवढे सर्व तरी लगेच करावे. मराठीत सर्वत्र बोलावे-लिहावे. मराठीसाठी भांडावे. मराठी माणसांना शक्य तिथे सहाय्य करावे. तरच हळूहळू काही सुधारणाहोऊ शकेल.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s