“मराठीच्या नावाने राजकीय घटक सरसावून पुढे येत असले तरी जोपर्यंत नागरिकांची समर्थशक्ती उभी राहत नाही, तोपर्यंत मराठीच्या बाजूने न्यायाचा कौल पडणार नाही. त्यासाठीच अशा चळवळींची गरज आहे, अशी भावना व्यक्त करण्यात आली.”
’मराठी+एकजूट’ उपक्रमाच्या वतीने ३१ जानेवारी या दिवशी पुण्यातील गांधीभवनात आयोजित केलेल्या या पूर्ण दिवसाच्या चर्चासत्राला उत्तम प्रतिसाद मिळाला. पुण्याबाहेरील महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरीलही बर्याच व्यक्तींनी त्यात भाग घेतला. मराठी भाषा व संस्कृतीबद्दल आस्थापूर्वक कार्य करीत असलेल्या विविध संस्था व व्यक्तींमध्ये समन्वय साधण्याच्या हेतूने ‘मराठी+एकजूट’ ह्या उपक्रमाने आपली पहिली चर्चाबैठक आज पुणे येथे गांधी भवनात आयोजित केली होती. तीमध्ये शिक्षण तज्ज्ञ डॉ. रमेश पानसे (ग्राममंगल), वनस्पती शास्त्रज्ञ व पर्यावरण तज्ज्ञ माधवराव गाडगीळ, प्रा० मनोहर राईलकर (निवृत्त उपप्राचार्य, स०प० महाविद्यालय), प्रा० प्र० ना० परांजपे (मराठी अभ्यास परिषद), दिनकर गांगल (थिंक महाराष्ट्र संस्था), आशिष पेंडसे (सहसंपादक, दै० लोकसत्ता), संगीतकार कौशल इनामदार, अनिल शिदोरे (महाराष्ट्र सामाजिक नवनिर्माण प्रबोधिनी), प्रा. दीपक पवार (मराठी अभ्यास केंद्र), प्रा० अनिल गोरे (समर्थ मराठी संस्था), ऍड. शांताराम दातार (मराठी भाषा संरक्षण व विकास संस्था), अभिजित पानसे (अध्यक्ष, भारतीय विद्यार्थी सेना) यांच्यासह अनेक मान्यवर ज्येष्ठ-श्रेष्ठ मंडळी उपस्थित होती.
या चर्चासत्राबद्दल लोकसत्तेच्या पुणे आवृत्तीत प्रसिद्ध झालेले वृत्त खालील दुव्यावर पहा.
अमृतमंथन_वृत्त-मराठी+एकजूटीची मुहूर्तमेढ_दै० लोकसत्ता_010210
’मराठी+एकजूट’ उपक्रमात सहभागी होण्यासाठी marathi.ekajoot@gmail.com या पत्त्यावर विरोप (ई-मेल) पाठवा व इतर मराठीप्रेमी व्यक्ती व संस्थांच्या बरोबर मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसाच्या हितासाठी करायच्या चळवळीत सक्रिय भाग घ्या.
.
– अमृतयात्री गट
.
प्रति अमृतयात्री गट,
राहुल गांधींच्या भेटीच्या निमित्ताने हिंदी बातम्यांच्या चॅनेल्सनी अखिल महाराष्ट्राच्यानावाने घातलेला गोंधळ पाहिला की भारत नावाच्या देशात महाराष्ट्र व मराठी माणसे किती तिरस्कृत आहे याचा प्रत्यय येतो. रोजची इंग्रजी दैनिके जरी वाचली तरी देशाच्या एकात्मतेपोटी मराठी माणसाने अभिमत स्वातंत्र्य देखील गमावले आहे, हे कळते.
राहुल गांधी आता देशभर भारतात कोणाला कोठेही जाण्याचा अधिकार आहे हे विजयी मुद्रेने सांगत फ़िरत आहेत.
परंतु याबरोबरच, भारतात कोणालाही कोठेही झोपड्या बांधण्याचा अधिकार आहे का? दुस-या प्रांतातील लोकांच्या रोजगाराच्या संध्या हिरावण्याचा अधिकार आहे का? एकाच शहरात किंवा राज्यात सा-या देशातील लोकांनी घुसुन तेथे बेबंदशाही करण्याचा व तेथील लोकांचा पदोपदी उपमर्द करण्याचा अधिकार आहेत का? या प्रश्नांची उत्तरे मात्र कोणापाशीच नाहीत.
कारण मराठी माणसाचा आवाजच आता क्षीण होत आहे.
उत्तरेतीललोकांनी या भारतातही शतकानुशतके गुलामगिरीत काढली आहेत महाराष्ट्रातील लोक मात्र फ़ारच कमी गुलाम राहिले आहेत. त्यामुळे त्यांचा स्वातंच्याच्या संवेदना तीव्र आहेत. त्याकाही फ़ारकाळ दबून राहणार नाहीत हे त्रिकालाबाधीत सत्य आहे.
अशा हुंकारासाठी झटण्यासाठी तुम्हास व तुमच्या प्रयत्नांस शतश: धन्यवाद !
प्रिय श्री० अनंतराव सावंत यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपले सर्व मुद्दे योग्यच आहे.
या सर्वच राजकारण्यांच्या दृष्टीने महाराष्ट्राला नियम वेगळे असतात व इतर (स्वाभिमानी) राज्यांना वेगळे. मुंबईच्या बाबतीतील वक्तव्ये ते कोलकाता, चेन्नई, बेंगळूरू यांच्या बाबतीत तेथे जाऊन करीत नाहीत.
पण एवढे होऊन महाराष्ट्राच्या राज्यकारभारासाठी हीच माणसे निवडून येणार असली तर शेवटी त्यांचेच खरे म्हणायचे. शिवाजी महाराजांचा वारसा सांगणार्या मराठी माणसाने कणाच हरवला आहे, काय करायचे?
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
श्री० सावंत यांच्या मतांशी मी सहमत आहे.
राहुल गांधी यांनी बिहारमध्ये उत्तर प्रदेशी व बिहारी लोकांनी २६/११ ला मुंबई वाचवली, त्यांनीच मुंबईचा विकास केला वगैरे जे भाषण केले ते केवळ मूर्खपणाचेच नव्हते तर नीचपणाचे होते. ते महाराष्ट्राचा, मराठीचा, व मराठी हुतात्म्यांचा अवमान करणारे होते. ज्यांना स्वार्थापुढे स्वाभिमानाची काहीही किंमत वाटत नाही, ज्यांना अपमान निर्लज्जपणे सहन करण्याची सवय आहे, त्यांना महाराष्ट्राचा अवमान झाल्याचे काहीही सोयरसुतक नाही. राहुलने मुंबईत जी नाटके केली ते त्याचे आनुवंशिक गुणच आहेत. जवाहरलाल नेहरू अशीच नाटके करीत असत. एकदम गर्दीत घुसत आणि सुरक्षा रक्षकानां संकटात टाकत. इंदिरा गांधी व राजीव गांधी असेच रोडशोज करीत. सोनियाबाई वेगळे काही करत नाहीत. इतके शौर्य त्यांच्यात असेल तर मग कायद्यात बदल करून घेऊन गांधी कुटुंबियांसाठी सर्वोच्च पातळीची सुरक्षा (पंतप्रधान व राष्ट्रपतींच्या तोडीची) का मागून घेतली? भोवताली वर्दीतल्या आणि बिगर-वर्दीतल्या सुरक्षा रक्षकांचा गराडा घेऊन लोकलने प्रवास करण्यात राहूलने काय एवढा मोठा शूरपणा दाखवला? असली symbolisms वा tokenisms जनतेला आणि त्यांच्या हुजर्यांना मूर्ख बनवण्यासाठी असतात. These are cheap tactics of populism. ह्या माणसाच्या ‘धावत्या’ भेटीने महाराष्ट्र राज्याची किंवा मुंबईची कोणती समस्या दूर झाली? त्यांनी मुख्यमंत्र्यांशी किंवा राज्याच्या इतर नेत्यांशी वा नगराध्यक्षांशी शहराबद्दल वा राज्याबद्दल संवादच साधला नाही. हा कसला केंद्रावर सत्तेत असलेल्या पक्षाचा जनरल सेक्रेटरी? काय मिळवले त्यांनी ह्या दौर्यावर सरकारचे/जनतेचे कोट्यवधी रूपये खरच करून? ह्यांची आजीसुद्धा हेच करायची. संजय गांधी यांना कुठलेही अधिकृत स्थान नसतानाही त्यांचे जोडे महाराष्ट्राच्या सध्याच्या मुख्यमंत्र्यांचे पूज्य पिताजी श्री० शंकरराव चव्हाण यांनी उचलले. अशा माणसांना या शिवाजीमहाराजांसारख्या, मोगल, आदिलशाही, व इतर शाह्या, इंग्रज इत्यादी सर्वांना जेरीस आणून स्वराज्य स्थापन करणार्या, स्वाभिमानी पुरुषाच्या या पवित्र भूमीच्या शासनामध्ये भाग घेण्याचा नैतिक अधिकारच काय?
आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांचा अपमान करायचा, त्यांना आपले जोडे उचलायला लावायचे हे या गांधी कुटुंबाचे जुनेच काम आहे. इंदिरा, राजीव, संजय, राहूल, सोनिया या सर्व नेत्यांपैकी कोणी साधा ग्रॅज्युएटही नाही आणि सर्व ज्येष्ठांना, तज्ज्ञांना, ते अशी वागणूक देत असतात. केंद्र सरकारच्या अनेक जाहिरातीत सोनिया गांधींचे छायाचित्र असते. ते का? केंद्र सरकारशी त्यांचा अधिकृत संबंधच काय?
वाईट एवढेच वाटते की आपलेच काही मराठी लोक महाराष्ट्रद्वेष्ट्या राजकारण्यांचे कौतुक करतात. स्वतःचे पाय स्वतःच्याच हाताने तोडण्याच्या वृत्तीमुळे आपण मराठी माणसे मागे पडलो आहोत. मुंबई महाराष्ट्रापासून तुटली की गरीब मराठी माणसाचे हाल कुत्राही खाणार नाही अशी परिस्थिती येईल, हे या सर्व लोकांनी ध्यानात ठेवावे.