मराठीचा उत्कर्ष – कसा करावा? (ले० प्रा० मनोहर राईलकर)

“अपत्यानं जगात झेंडा लावला की त्याचे आईवडील आपोआपच मोठे होतात. तसंच आपण मराठीचीं अपत्यं. आपल्या प्रयत्नांनीच आपली मायबोलीही मोठी होईल, अशी माझी भावना आहे. आणि ‘हिला बैसवू वैभवाच्या शिरी,’ ही माधव ज्यूलियनांची आसही सफळ होईल.”

प्रस्तुत लेखाचे लेखक प्रा० मनोहर राईलकर हे पुण्याच्या स० प० महाविद्यालयात गणित विभागाचे प्रमुख होते. शिशुवर्गापासून ते महाविद्यालयातील एम०एससी० वर्गांपर्यंतच्या मुलांबरोबर त्यांचा गणित शिकवण्याच्या बाबतीत संबंध  आला. त्यांनी एम०ए०पर्यंतच्या विषयांवर मराठीतूनही पुअस्तके लिहिली आहेत.

प्रा० राईलकरांचा संपूर्णलेख खालील दुव्यावर उपलब्ध आहे.

अमृतमंथन_मराठीचा उत्कर्ष_ले० प्रा० मनोहर राईलकर_270110

राईलकर सरांनी लेखात संदर्भिलेले लोकसत्तेतील लेख खालील दुव्यांवर पहायला मिळतील.

१. हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा! (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, १५ नोव्हें० २००९)

२. वरील लेखावरील प्रतिक्रिया (लोकसत्ता दि० २९ नोव्हेंबर २००९) (https://amrutmanthan.wordpress.com/2009/12/15/‘हिंदी-ही-राष्ट्रभाषा-एक/)

.

प्रस्तुत लेखासंबंधी आपण आपले प्रतिमत (feedback) लेखाखालील रकान्यात अवश्य नोंदवावे.

– अमृतयात्री गट

.

14 thoughts on “मराठीचा उत्कर्ष – कसा करावा? (ले० प्रा० मनोहर राईलकर)

  • प्रिय श्री० शरदराव यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपले पत्र काही अगम्य कारणामुळे अनिष्ट (स्पॅम) वर्गात गेल्यामुळे नजरेआड झाले होते. आता लक्षात आल्यावर ती प्रसिद्ध करीत आहोत.

   पुस्तकाबद्दलची आपली विनंती प्रा० राईलकर सरांपर्यंत नक्की पोचवू.

   ता०क० संगणकावर मराठीमधून लिहिण्यासाठी याच अमृतमंथन अनुदिनीवरील ’संगणकावर मराठीत लेखन करण्याबद्दल’ हा लेख वाचून त्यात दिलेल्या सर्व उदाहरणांचा सराव करावा. थोड्याच वेळात माहितगार व्हाल.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 1. ति प्रा राईलकर,
  सर्प्रथम धन्यवाद. अत्यंत अप्रतीम लेख. आयडिया या कंपनीला अश्या प्रकारे ग्राहकांनी कोंडीत पकडलं तर निः संशय झी मराठी वरील सा रे ग म प या कार्यक्रमातील लोकांचे मराठी सुधारेल आणि योग्य तो संदेश सगळ्यां पर्यंत जाईल. आपोआपच इतर कार्यक्रम किंवा जाहिराती यांमध्ये बदल घडवून आणता येईल.
  शाळांतील मराठीचा दर्जा सुधारण्या साठी आपल्याकडे काय योजना आहे? त्याची सुद्धा अत्यंत गरज आहे.

  धन्यवाद,
  अपर्णा

  • प्रिय अपर्णा लालिंगकर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   आपले पत्र प्रा० राईलकर सरांपर्यंत पोचवू. त्यांनीच आपल्याला उत्तर द्यावे हे उत्तम.

   आभारी आहोत.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

  • प्रिय सौ० अपर्णा लालिंगकर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   प्रा० राईलकरांचे उत्तर खालीलप्रमाणे:
   ————————-
   सप्रेम नमस्कार
   शाळेतील विद्यार्थ्यांच्या मराठीची प्रगती शिक्षकांच्या व आईवडिलांच्या मराठीवर अवलंबून असते, असं मला वाटतं. कारण मुलं नेहमी अनुकरणानं भाषा शिकतात. म्हणून त्यांची भाषा सुधारण्याकरता आपण म्हणजे सर्व समाजानंच काळजी घ्यायला हवी. त्याबद्दलही त्या लेखात मी थोडी चर्चा केलीच आहे.
   आपलं सर्वांचं मराठी बिघडण्याची जी कारणं आहेत, त्यातील एक असं, आपण लिहिता बोलताना फारशी काळजी करीत नाही. इतर लोक बोलतात, किंवा लिहितात, त्याचं अंधानुकरण करीत राहतो.
   हे सर्व सुधारण्याकरता वृत्तपत्रांचा मोठाच हातभार लागू शकेल. कारण आज भाषा बिघडण्याचं मुख्य कारण वृत्तपत्रंच आहेत. ते लोक इंग्रजी व हिंदी वृत्तसंकलन संस्थांतून मिळालेल्या माहितीचं भाषांतर करीत राहतात. तेव्हा त्यांना अत्यंत घाई असते. त्यातून अशा चुका होतात. अशा म्हणजे मराठीसुद्धा इंग्रजी वा हिंदी वळणाचं लिहिलं जातं. पण, वृत्तपत्र जशी भाषा, नकळत असेल, बिघडवतात, तशी ती घडवूहू सकतात. म्हणून तसं काही आढळलं की संबंधितांना पत्र लिहून कळवतो. सद्भावनेनं कळवीत आहे, गैरसमज नसावा अशी विनंतिवजा पुस्तीही जोडतो. तसं आपण करू लागायला हवं. म्हणजे पाचसात आठवड्यात बदल आढळून येईल. एकदा प्रौढांची भाषा सुधारली की मुलांचीही सुधारेल. त्याकरता वेगळं काही करावं लागणार नाही असं वाटतं. कारण, जिथं प्रौढ मंडळी अंधानुकरण करीत असतात, तिथं मुलं निराळं काय करणार?
   शिक्षण म्हणून मराठीच्या बाबत मी काय करू शकणार? कारण तिथं बदल करणं माझ्या शक्तीच्याबाहेरची बाब आहे.
   आपल्या भाषेबद्दल तुम्ही इतका विचार करीत आहात, हीच आशादायक बाब आहे.
   मानवी जीवनात मातृभाषेचं स्थान ह्या विषयावर मी लिहिलेल्या लेखाची धारिणी पाठवली आहे. सवडीनं वाचून अवश्य सूचना कराव्यात.

   मनोहर
   ——————–
   सरांनी पाठवलेली धारिणी आपल्या व्यक्तिगत विरोप-पत्त्यावर पाठवीत आहोत. कृपया पोच द्यावी.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 2. प्रा. राईलकर यांसी,
  वृत्तपत्रांच्या बाबतीत आपलं मत १००% बरोबर आहे. अगदी उदाहरच घ्यायचं झालं तर दै. सकाळ या वृत्तपत्र मध्ये अतिशय अशुद्ध मराठीचा त्याच प्रमाणे इंग्रजी मिश्रित मराठीचा वापराच असतो. त्यांच्या विविध पुरवण्यांची पण नावे इंग्रागी मिश्रित आहेत उदा. edumantra , agrovan इत्यादी. माझ्या वडिलांनी एकदा त्यांच्या मराठी जागृती अभियानावर या गोष्टी उधृत करणारे पत्र पाठवलं. तर ते त्यांनी प्रकाशित केलंच नाही आणि एक शिष्टाचार म्हणून जी पोच द्यायची असते ती पण दिली नाही.

  आपण खाली आणि “मानवी जीवनात मातृभाषेच स्थान” या लेखात नमूद केलेल्या मतांशी मी सहमत आहे. आपला लेख तर खूपच अभ्यासपूर्ण, रोचक आणि डोळे उघडणारा आहे. द्यानेश्वर महाराजांच्या आणि त्या काळातील लोकांच्या सुदैवाने त्यावेळची लोकसंख्या सुद्धा कमी होती. तसेच सध्या सारखे राजकीय प्राबल्य शिक्षणात नव्हते. त्याच बरोबर द्यानाचा इतका बाजार मांडला गेलेला नव्हता. त्यामुळे आणि स्वतः द्यानेश्वर महाराजांच्या क्षमते मुळे भगवतगीता संस्कृत मधून प्राकृत मराठीत आणता आली.
  सध्याच्या शालेय शिक्षणात गोष्टी सोप्या करून पण शिक्षणाचा दर्जा कायम राखून शिकवत नाहीत. सगळीकडे घोकंपट्टी आणि गुणांसाठी शिक्षण असाच झालं आहे. त्यामुळे आपल्याला मराठी शिक्षण सुधारणे जरा अवघडच आहे. म्हणजे अशक्य नाही पण आपल्या सारख्या बिगर राजकीय लोकांच्या आवाक्या बाहेरचे आहे हेच खरे.
  पुन्हा एकदा धन्यवाद अतिशय अभ्यासपूर्ण असा लेख वाचायला दिल्या बद्धल.

  अपर्णा

  • प्रिय सौ० अपर्णा लालिंगकर यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   पूर्वी वर्तमानपत्रे व सर्वच प्रसार माध्येमे ही समाजाला योग्य दिशा दाखवण्यात अग्रेसर होती. अनेक थोर पत्रकारांनी स्वातंत्र्यलढ्यात तसेच सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रांत समाजाचे पुढारीपण केले. पण आज समाजावर बळेच चुकीच्या, उथळ, थिल्लर कल्पना लादण्यातच वर्तमानपत्रे, दूरदर्शन वाहिन्या इत्यादींची अहमहमिका चालू असते. आम्हाला असे विश्वसनीय मंडळींनी स्वानुभवावरून सांगितले आहे की विशेषतः मराठीतील तीन वृत्तवाहिन्यांमध्ये निवेदकांना मुद्दाम प्रदूषित मराठीभाषा वापरण्यास भाग पाडले जाते. रंग नाही कलर म्हणा, मुख्य संपादक नको चीफ एडिटर हा शब्द वापरा वगैरे. सारेगमप वगैरे कार्यक्रमातील काही वाक्यांतील दहा शब्दांपैकी आठ-नऊ शब्द (मराठीत योग्य शब्द असूनही) परभाषिक असतात. अशी वाक्ये मराठी म्हणायची का? का म्हणून? त्यामानाने सह्याद्री वाहिनी व त्यानंतर मी-मराठी, झी-मराठी ह्याचे मराठी जरा तरी बरे वाटते.

   आपल्या देशात आज सर्वच क्षेत्रात सरकारला नको इतके महत्त्व आल्यामुळे तज्ज्ञमंडळींच्या मताला किंमतच उरली नाही. आणि सरकारमधील राजकारण्यांना मत आणि पैसा या बळावर कसेही वाकवता येते. त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात प्रामाणिक प्रयत्न होतच नाहीत.

   आपल्याला आपल्या लायकीप्रमाणेच सरकार मिळते, हेच खरे.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

 3. Kharokhar shri sharad yanni wicharalyapramane ekhade pustakache naw sangitalyas bare hoil. baki lekh chhan. sagle mudde patale. sadhya suru asalela maharashtracha superstar ha karykram dekhil marathichi khilli udawinyasathi ahe ka ase watu lagale ahe. amruta che marathi aikun teela marathi yete ki nahi itpat shanka yete. ani hich gosht saglya karyakramanchi ahe. ekepeksha ek madhyehikahi wegle nahi. sachin kinwa mahesh manjrekar tar english bolu ka marathi ase karat asato. sangitalyapramane Idea ani Bagpiper yanna patra lihitoch. dhanyawad.

  • श्री० अभिजित रॉय यांसी,

   सप्रेम नमस्कार.

   प्रा० राईलकरांनी प्राथमिक शाळेपासून एम०ए०च्या वर्गांना इंग्रजी व मराठीतून गणित विषय शिकवला आहे व एम०ए० पर्यंतच्या मुलांसाठी इंग्रजीच नव्हे तर मराठीतूनही पुस्तके लिहिली आहेत.

   त्यांनी नुकतेच पुस्तक लिहून हातावेगळे केले आहे. ते (निदान मराठीत तरी) मातृभाषेतून शिक्षण या विषयावरील बायबल (किंवा गीता?) ठरावे. ते लवकरच प्रसिद्ध करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करीत आहोत. प्रकाशित झाल्यावर ताबडतोब अमृतमंथनाच्या वाचकांना माहिती दिली जाईलच.

   क०लो०अ०

   – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s