मराठी अभिमानगीताच्या प्रकाशनाचे आमंत्रण (संगीतकार कौशल इनामदार)

मराठी+एकजुटीच्या सर्व बांधवांना प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार याच्या तर्फे मराठीच्या अभिमानगीताच्या प्रकाशनाचे आमंत्रण.

कौशल इनामदार म्हणतात:

२७ फेब्रुवारीला मराठी अभिमानगीताचे प्रकाशन ठाणे नगराच्या समर्थ सेवा मंडळाच्या पटांगणावर होत आहे. ११२ प्रस्थापित गायक आणि ३५० समूहगायक असलेलं हे गीत भारतातलं सर्वात भव्य असं गीत म्हणायला वाव आहे. तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला येऊन मराठी एकजूट आणि प्रेम दाखवावं ही माझी सर्वांना आग्रहाची विनंती!

हे आमंत्रण आपण खालील दुव्यावरील मराठी+एकजुटीच्या पानावर पाहू शकता.

http://www.facebook.com/group.php?v=wall&ref=mf&gid=249903824306

कौशल इनामदार निर्मित मराठीच्या अभिमानगीताची कुठल्याही मराठी माणसाला अभिमान वाटेल अशी पार्श्वभूमी व संबंधित माहिती याच अमृतमंथन अनुदिनीवरील “मराठीच्या अभिमानगीताची निर्मिती – लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी (वृत्त आणि आवाहन)” या लेखात वाचायला मिळेल.

.

प्रत्येक मराठीप्रेमीने या गीताच्या भव्य प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहून मराठी+एकजुटीचा प्रत्यय जगाला आणून द्यावा असे आपुलकीचे व नम्र आवाहन.

आपल्या सर्व मराठी कुटुंबियांचाच हा सोहळा आहे.  तर मग भेटूच २७ फेब्रुवारीला ठाण्याला !!

.

– अमृतयात्री गट

17 thoughts on “मराठी अभिमानगीताच्या प्रकाशनाचे आमंत्रण (संगीतकार कौशल इनामदार)

    • प्रिय श्री० उदय वैद्य यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      प्रस्तुत आमंत्रण संगीतकार श्री० कौशल इनामदारांनी मुद्दाम मराठी+एकजुटीच्या सर्व पाईकांना आपुलकीने पाठवले आहे. अवश्य या.

      आपल्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे आम्ही स्वतः श्री० कौशलनाच विचारून सांगतो.

      आपण फेसबुकावरील मराठी+एकजूट चर्चागटाचे सभासद झाला आहात का? तिथे श्री० कौशलही सभासद असल्यामुळे आपण तेथून त्यांना थेट प्रश्न विचारू शकाल.

      आभारी आहोत.

      क०लो०अ०

  1. कृपया ठाण्याला समर्थ सेवा मंडळात कसे पोहचावे या बद्दल थॊडक्यात सांगावे, जेणे करून बाहेरुन येणार्‍या मराठी जनांना सोयीचे व्हावे.

    दिनेश.

    http://sarvottam-marathi-vinod.blogspot.com

    • प्रिय श्री० दिनेश यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      प्रस्तुत आमंत्रण संगीतकार श्री० कौशल इनामदारांनी मुद्दाम मराठी+एकजुटीच्या सर्व पाईकांना आपुलकीने पाठवले आहे. अवश्य या.

      आपल्या प्रश्नाचे उत्तर आम्ही स्वतः श्री० कौशलनाच विचारून सांगतो.

      आपण फेसबुकावरील मराठी+एकजूट चर्चागटाचे सभासद झाला आहात का? तिथे श्री० कौशलही सभासद असल्यामुळे आपण तेथून त्यांना थेट प्रश्न विचारू शकाल.

      आभारी आहोत.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  2. *श्री. दिनेश – समर्थ सेवक मंडळाचे पटांगण बरोबर गडकरी रंगायतन समोर आहे… ही सगळ्यात मोठी खूण. आपण अवश्य या!

    *श्री. उदय वैद्य – ऍडव्हान्स बुकिंग सुरू झालं की मी या ब्लॉगवर कळवेन आणि शिवाय फेसबुकवरही कळवेन. वर्तमानपत्रामध्ये जाहिराती देण्याचाही आमचा मानस आहे. आपण इतक्या आपुलकीने चौकशी केल्याबद्दल आभार.

    आपला,

    कौशल.

  3. प्रियजनहो,
    मराठीवर प्रेम करणा-या व तिच्या उत्कर्षासाठी झटणा-या माझ्या बांधवांनो. माझे तुमच्यावर अनन्वित प्रेम आहे. तुमच्या ब्लाँगला भेट दिली की, संतांची एक्मेकांशी भेट झाली की त्यांना होणारा आनंद त्यांनी जसा अभंगांतून वर्णन केला आहे तसा आनंद होतो. माझे तुमच्यावर प्रेम आहे. माझी माय मराठी संत ज्ञानेश्वरांची आहे. तिला आपण अधिक सक्षम करण्यास झटुया.
    आपला आणि केवळ आपलाच,
    अनंत

    • प्रिय श्री० अनंत सावंत यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      पत्र वाचून अत्यंत आनंद झाला. आपण सर्व एकाच मातेची अपत्ये व म्हणूनच सहोदर, भावंडे, बांधव आहोत. आपल्या मातेचे ऋण फेडण्याची इच्छा, मातेप्रति असलेल्या स्वाभिमान, प्रेम, या सर्व भावना नैसर्गिकच असतात व त्यांच्या नुसार वागण्यास कोणाचीही मान्यता आणि अनुमतीची आपल्याला आवश्यकता नाही.

      आपल्याला आम्ही आपल्या अमृतमंथनाच्या सर्व वाचक, हितचिंतक, चर्चेत सहभागी होणारे मित्र, लेखक, व सर्वच पाठिंबा-आधार देणार्‍या मित्रमंडळींच्या वतीने सांगू इच्छितो की आपणा सर्वांच्याच मनात एकमेकांबद्दल अगदी त्याच भावना आहेत. आणि त्या सर्वांमध्ये एकच सामाईक दुवा आहे आणि तो म्हणजे आपली आई. म्हणूनच तिच्याबद्दलच्या आपल्या भावना आपण समाजात सर्वत्र बोलताना, लिहिताना, वागताना, ऐकताना, पाहताना, वागताना नेहमीच अभिमानाने व्यक्त करीत राहू. एवढी एक गोष्ट जरी आपण सर्वांनी कटाक्षाने पाळली तरी मायमराठीचे अनेक प्रश्न पटापट सुटतील. हिचे पुत्र आम्ही, हिचे पांग फेडू….

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • श्री. सावंत यांस,
      मराठी अभिमानगीताचा उद्देश्य आहे की मराठी भाषेबाद्दल जे उदासीन वातावरण आहे आणि जी मरगळ आहे ती झटकून टाकून पुन्हा एकदा भाषेबद्दल एक चैतन्य निर्माण करावं. ते होताना दिसतंय!

      आपला विनीत,

      कौशल श्री. इनामदार

    • प्रिय श्री० सुधीर भदे यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपण अजुनही त्या कार्यक्रमात भाग घेऊ शकता. आपण येऊ न श्कल्यामुळे तो कार्यक्रम श्री कौशल इनामदारांना महिन्याने पुढे ढकलावा लागला. आता तो २७ फेब्रुवारीला होईल.

      चेष्टा केली. २७ फेब्रुवारी हाच दिवस कुसुमाग्रजांचा वाढदिवस आहे व तोच मराठी भाषा दिवस म्हणून पाळला जातो. त्याच शुभदिनाचे औचित्य साधून श्री० कौशल अभिमानगीताचे प्रकाशन करणार आहेत. तो कार्यक्रम २७ जानेवारीला आहे असा आपला गैरसमज झाला असावा.

      कार्यक्रमास नक्की याच. (कृपया कौशलना कार्यक्रम आणखी पुढे ढकलायला लावू नका.) सर्व कुटुंबीय, मित्रपरिवारासह या. महाराष्ट्र सामाजिक निर्माण प्रबोधिनीमधील सहकार्‍यांनाही घेऊन या.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  4. सलीलजी,

    नमस्कार,

    निमंत्रणाबद्दल धन्यवाद.

    कौशलजी,

    नमस्कार व अभिनंदन !

    महाराष्ट्राच्या व मराठी भाषेच्या इतिहासातील एक अतिशय महत्त्वाचे कार्य तुमच्या हातून घडत आहे. 31 जानेवारी रोजी गांधी भवनमध्ये अभिमान गीत ऐकण्याचा योग आला. अतिशय सुंदर !
    पुन्हा एकदा अभिनंदन. आम्ही महाराष्ट्र सामाजिक नवनिर्माण अकादमीतील काही जण नक्की ठाण्याला येऊ.

    विनय मावळणकर

    • प्रिय श्री० विनय मावळणकर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या पत्राबद्दल अभारी आहोत. आपल्या भावना श्री० कौशल इनामदार यांच्यापर्यंत नक्कीच पोचवू.

      शेकडो वाद्ये, गायक, आणि अत्याधुनिक श्रेणीच्या शास्त्रानुसार केलेले रेकॉर्डिंग इत्यादींमुळे मराठीचे अभिमान गीत हे मराठीमधील खरोखरच एक अभिमानास्पद लेणे बनेल अशी खात्री वाटते. प्रकाशनाच्या कार्यक्रमाला सर्वांनी सहकुटुंब व मित्रपरिवारासह अवश्य यावे.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • सप्रेम नमस्कार.

      कालचा मराठीच्या अभिमानगीताच्या प्रकाशनाचा कार्यक्रम उत्तम झाला. या एका घटनेमुळे मराठीसंबंधी बरेच बदल घडतील.

      कार्यक्रमाबद्दलची माहिती सर्व वाचकांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू.

      क०लो०अ०

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s