हिदी ही राष्ट्रभाषा असल्याची कोणतीही घटनात्मक तरतूद राज्यघटनेत नाही, असे स्पष्टीकरण खुद्द गृहमंत्रालयानेच दिले आहे. पुण्यातील मराठी अभ्यास केंद्राचे सलील कुलकर्णी यांनी गृहमंत्रालयाच्या राजभाषा भवनकडे माहिती अधिकारात अर्ज करून ही माहिती प्राप्त केली आहे.
संपूर्ण वृत्त खालील दुव्यावर वाचावयास मिळेल.
अमृतमंथन_गृहमंत्रालयही म्हणते हिदी राष्ट्रभाषा नव्हे_दै० लोकमत_140110
प्रस्तुत वृत्त आपले मित्र श्री० संजय भगत, श्री० विजय पाध्ये व समर्थ मराठी संस्थेचे प्रा० अनिल गोरे यांनी पाठवले.
माहिती अधिकाराखाली मिळवलेले केंद्र सरकारचे मूळ पत्र खालील दुव्यावरील लेखात उपलब्ध आहे.
https://amrutmanthan.wordpress.com/2010/01/02/हिंदी-ही-भारताची-राष्ट्र/
.
आपले प्रतिमत (feedback) लेखाखालील रकान्यात अवश्य लिहा.
– अमृतयात्री गट
.
marathi hi mayboli aahe. ticha adar ha maharashtratlya pratek manasane kela pahije
“marathichi boli hi amruta hunahi god lage “
प्रिय श्री० सतीश भोसले यांसी,
सप्रेम नमस्कार.
शंकाच नाही. आपण व आपल्या सारख्या इतर सर्व स्वाभिमानी मराठी माणसांनी (त्यात अमृतमंथनाचे सर्वच वाचक आले) मिळूनच यावर काही तोडगा काढला पाहिजे. अर्थात सुरूवात प्रत्येकाने स्वतःपासूनच करावी.
आभारी आहोत.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
my marathi mazi my marathi ticyasathi kahihi ani
kahihi karanyachi echha.
प्रिय श्री० सतीश भोसले यांसी,
सप्रेम नमस्कार.
सर्वप्रथम मराठी+एकजूट कृतिगटासाठी नाव नोंदवा व फेसबुकावरील मराठी+एकजूट चर्चागटातही सहभागी व्हा, अशी आग्रहाची नम्र विनंती.
आभारी आहोत.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
ब्लॉगर्सच्या मेळाव्यात आपल्याशी ओळख झाल्याने फार बरे वाटले आहे.
प्रिय श्री० हरेकृष्णजी यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपले पत्र श्री० सलील कुळकर्णींना उद्देशून असावे. त्यांना आपला अभिप्राय सुपूर्द करतो व त्यांच्या वतीने आपले आभार मानतो.
आभारी आहोत.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
राष्ट्रभाषा म्हणजे काय असते रे भाऊ ? इंग्रजी सुध्दा अजुन अमेरीकेची राजभाषा किंवा राष्ट्रभाषा घोषित होऊ शकली नाही. तेथील सिनेट मध्ये अजुन बील अनिर्णयित आहे. इंग्रजी किती देशांची राष्ट्रभाषा आहे हे कृपया जाणकारांनी प्रथम सांगावे व त्या त्या देशाची घटना इंटरनेट वर वाचावी व नंतरच या देशातील राजभाषा हिंदीला ती राष्ट्रभाषा नाही असे म्हणायचे धाडस करावे. बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल असेच आता म्हणावे लागेल.
प्रिय श्री० विजय कांबळे यांसी,
सप्रेम नमस्कार.
सुदैवाने किंवा दुर्दैवाने भारत सरकारच्या गृहमंत्रालयाने राष्ट्रभाषेच्या बाबतीत बाप दाखवला आहे. नेहरूंनीदेखिल परिशिष्ट-८ मधील सर्वच भाषा या राष्ट्रभाषा आहेत असे म्हणून एकावेळी १४ बाप दाखवले होते. (इथेच इतरत्र प्रकाशित झालेला ’हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा !!’ हा लेख पहावा.) तरीही श्राद्ध करायचे असेल तर त्याला कोण काय करू शकेल?
आपल्या देशाच्या राज्यघटनेप्रमाणे या सर्व गोष्टी स्पष्टच असताना इतर देशांच्या घटना वाचून काय फरक पडणार? आपला बाप समोर दिसत असताना दुसर्याचा बाप कसा दिसतो याची काळजी कशाला करावी?
क०लो०अ०
– अमृतयात्री गट
कृपया राष्ट्रभाषा व्याख्येची गंभीर दखल घेऊन विचार करा. हिंदीला झोडपल्याने मराठीचा विकास होईल असे मला वाटत नाही. एखादी भाषा सर्वश्रेष्ठ आहे हे सांगण्याकरीता दुसरी भाषा कशी खुजी आहे हे सिद्ध करण्याचा आग्रह आपण का धरावा यामुळे भाषेचे प्रश्न सुटणार नाहीत. लेखकांनी तरी हा प्रकार थांबवावा. भारतीय भाषेच्या विकासामुळे सर्वच भाषा संपन्न होतील. जगातील इतर देशातील राष्ट्रभाषेचा सर्वांगीण अभ्यास करुन आपण हे ठरवु की भारताची राष्ट्रभाषा कोणती असावी. भाषाभेद करुन देशाची अखंडता धोक्यात आणु नये अशी माझी कळकळीची नम्र विनंती आहे.
प्रिय श्री० विजय कांबळे यांसी,
सप्रेम नमस्कार.
आपण म्हणता: {{कृपया राष्ट्रभाषा व्याख्येची गंभीर दखल घेऊन विचार करा.}}
’राष्ट्रभाषा’ या उपाधीची जागतिक स्तरावर सर्वमान्य, जगन्मान्य अशी जी काही व्याख्या असेल ती असो. पण ती व्याख्या भारताच्या घटनाकारांनी तरी निदान नक्की लक्षात घेतली असणार. ती व्याख्या व भारतातील सांस्कृतिक, भाषिक, पारंपारिक, भाषिक, परिस्थिती लक्षात घेऊनच त्यांनी स्वतंत्र भारतासाठी कुठलीही एक राष्ट्रभाषा ठरवली नाही. मात्र घटनेने अप्रत्यक्षपणे असा संकेत दिला की राज्यघटनेच्या परिशिष्ट-८ मधील सर्वच भाषा ह्या राष्ट्रभाषाच आहेत. स्वतः पंतप्रधान पंडित नेहरूंनी ही बाब लोकसभेत मांडलेली आहे. तेव्हा आता वास्तव स्वीकारणे क्रमप्राप्तच आहे, नाही का?
कोणालाही पटो वा न पटो, पण हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही. (असलीच तर ती इतर सर्वच भाषांच्या बरोबरीनेच राष्ट्रभाषा ठरेल.) हेच वास्तव आहे आणि ते स्वीकारण्यावाचून आपल्याला गत्यंतर नाही. तसेच नजीकच्या भविष्यकाळात तरी ही परिस्थिती बदलेल असे वाटत नाही, मग ’राष्ट्रभाषा’ या शब्दाची जगन्मान्य व्याख्या काहीही असो. त्याने वास्तव तर नक्कीच बदलणार नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
या विषयी भारत सरकारने अधिकृतपणे दिलेले प्रमाणपत्र आपल्याला ““हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही” – केंद्र सरकारचा अधिकृत निर्वाळा” (https://amrutmanthan.wordpress.com/2010/01/02/हिंदी-ही-भारताची-राष्ट्र/) या लेखात सापडेल. अवश्य वाचून पहा.
{{हिंदीला झोडपल्याने मराठीचा विकास होईल असे मला वाटत नाही.}}
हिंदी किंवा इतर कुठल्याही भाषेला झोडपण्याचा प्रश्नच नाही. तसा ग्रह आपण का करून घेतलात हे समजत नाही. भारतातील इतर कुठल्याही राज्यभाषेला असलेले सर्व कायदेशीर अधिकार त्यांचा कुठल्याही प्रकारे संकोच किंवा दडपशाही न करता महाराष्ट्रात आमच्या मायबोली मराठीला मिळालेच पाहिजेत एवढीच आमची ठाम मागणी आहे. आमच्या भाषेचे घटनादत्त अधिकार हिरावून घेण्यासाठी किंवा ते दडपण्यासाठी कोणीही हिंदी किंवा इतर कुठल्याही भाषेचा उपयोग केला तर त्या वृत्तीचा आम्ही प्राण पणाला लावून विरोध करू. अर्थात असा विरोध मुख्यतः तशा वृत्तीला असेल, कुठल्याही विशिष्ट भाषेला नसेल.
अधिक माहितीसाठी याच अनुदिनीवरील “हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा !!” हा लेख (https://amrutmanthan.wordpress.com/2009/11/15/हिंदी-ही-राष्ट्रभाषा-एक-च/) वाचावा.
{{एखादी भाषा सर्वश्रेष्ठ आहे हे सांगण्याकरीता दुसरी भाषा कशी खुजी आहे हे सिद्ध करण्याचा आग्रह आपण का धरावा यामुळे भाषेचे प्रश्न सुटणार नाहीत.}}
पुन्हा ह्या आपल्या निष्कर्षाचे कारण कळले नाही. घटना समितीचे अध्यक्ष डॉ० बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः विविध पुस्तकांत व स्वतःच्या व्याख्यानांमध्ये हिंदी राष्ट्रभाषा होण्याबद्दल आपली मते मांडली आहेत. त्याबद्दल थोडीशी कल्पना आपल्याला याच अनुदिनीमधील “द्रष्टया डॉ० आंबेडकरांचे भारतीय भाषांविषयी भाकित” (https://amrutmanthan.wordpress.com/2009/12/01/द्रष्टया-डॉ०-आंबेडकरांचे/) या लेखामधून यावी.
{{जगातील इतर देशातील राष्ट्रभाषेचा सर्वांगीण अभ्यास करुन आपण हे ठरवु की भारताची राष्ट्रभाषा कोणती असावी.}}
हे ’आपण’ म्हणजे कोण? तुम्हाला व आम्हाला राष्ट्रभाषा ठरवण्याचा अधिकार कोणी दिला? आणि त्यावेळी त्यांनी केवळ इतर देशातील राष्ट्रभाषांचाच नव्हे तर आपल्या देशातील परिस्थितीचा अभ्यास करून त्यातल्या-त्यात योग्य निर्णय घेतला. आता जी गोष्ट ६० वर्षांपूर्वीच ठरली आहे ती बदलण्यासाठी आपल्याला घटनादुरुस्ती करावी लागेल व त्यासाठी संसदेमध्ये दोन-तृतीयांश बहुमत लागेल. दुर्दैवाने (?) केवळ हिंदी भाषक राज्ये तेवढे बहुमत जमवू शकतील असे वाटत नाही.
{{भाषाभेद करुन देशाची अखंडता धोक्यात आणु नये अशी माझी कळकळीची नम्र विनंती आहे.}}
इतर राज्यांना व त्यांच्या भाषांना वेगळे निकष व महाराष्ट्राला व मराठीला वेगळे निकष लावणार्या राजकारण्यांमुळे, तथाकथित ढोंगी व उचभ्रू विचारवंतांमुळेच देशाची अखंडता धोक्यात येईल. सर्वांना समान कायदा व समान नीतितत्त्वे लागू केल्यास हा प्रश्नच न उद्भवावा. देशाच्या एकात्मता आणि अखंडतेची जबाबदारी केवळ मराठी माणसावर व भाषेवर टाकून त्यांच्यावर जुलूम करू नये अशी आमची सर्वांनाच कळकळीची नम्र विनंती आहे.
क०लो०अ०
– अमृतयात्री गट