“हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही” – केंद्र सरकारचा अधिकृत निर्वाळा (ले० सलील कुळकर्णी)

“महाराष्ट्राचे ज्येष्ठ राजकारणी उत्तरेकडील अवकृपा होऊ नये म्हणून “हिंदी-राष्ट्रभाषा एके हिंदी-राष्ट्रभाषा” ह्याच पाढ्याची घोकंपट्टी करीत बसले आहेत. तेव्हा एकदा शेवटचाच “हा सूर्य आणि हा जयद्रथ” असा निवाडा करण्यासाठी सर्वश्रेष्ठ अस्त्राचा आपल्याला आता प्रयोग करायचा आहे आणि ते अस्त्र म्हणजे स्वतः केंद्र सरकारच्या अधिकृत भाषा विभागाने दिलेली कबुली.”

भारताच्या केंद्र सरकारने श्री० सलील कुळकर्णी ह्यांच्या हस्ते ही एक नवीन वर्षाची भेटच दिलेली आहे.

आता यापुढे महाराष्ट्रात कुठेही “हिंदी राष्ट्रभाषा आहे” या सबबीखाली मराठीची उपेक्षा, गळचेपी होत असेल तर या पुराव्याचा उपयोग करून त्याला खंबीर विरोध करायलाच पाहिजे.

स्वभाषाभिमान या मालिकेतील श्री० सलील कुळकर्णी यांचा हा पुढला लेख खालील दुव्यावर वाचा.

अमृतमंथन-०_ हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही – केंद्र सरकारचा अधिकृत निर्वाळा_010110

वरील लेखात उल्लेख केलेले केंद्र सरकारचे मूळ पत्र व त्याची मराठी आणि इंग्रजी भाषांतरे खालील दुव्यांवर उपलब्ध आहेत.

१. केंद्रसरकारच्या  राजभाषा विभागाचे मूळ हिंदी पत्र (धारिणी उघडण्यास थोडा विलंब लागेल): अमृतमंथन-१_हिंदी राष्ट्रभाषा नहीं_भारत सरकारको कबूल_मूल पत्र_291209

२. मूळ हिंदी पत्राचे मराठी भाषांतर: अमृतमंथन-२_हिंदी राष्ट्रभाषा नाही_केंद्र सरकारचा निर्वाळा_पत्राचे मराठी भाषांतर_291209

३. मूळ हिंदी पत्राचे इंग्रजी भाषांतर: अमृतमंथन-३_Hindi is not the National Language_Admission by Central Govt_English Translation of the Letter_291209 .

.

लेखातील मते पटल्यास तो आपल्या अधिकाधिक मराठीप्रेमी मित्रमंडळींना अग्रेषित करा. प्रस्तुत लेखाबद्दलची आपली प्रतिक्रिया लेखाखालील रकान्यात अवश्य लिहा.

(टीप: हिंदी-राष्ट्रभाषा या विषयीच्या घटनात्मक, कायदेशीर, नैतिक, भावनिक बाबींचा उहापोह याच अमृतमंथन अनुदिनीवरील “हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा !!” या लेखात सापडेल. अवश्य वाचा.)

– अमृतयात्री गट

.

Tags: ,,,

.

59 thoughts on ““हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही” – केंद्र सरकारचा अधिकृत निर्वाळा (ले० सलील कुळकर्णी)

  1. “हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही” – केंद्र सरकारचा अधिकृत निर्वाळा
    ——-

    हिन्दी ही ‘घटनेनुसार राष्ट्रभाषा’ आहे की नाही, याबाबतच केन्द्र सरकार बोलू शकते. हिन्दी ही ‘खरोखरच’ राष्ट्रभाषा आहे की नाही, हा प्रश्न ज्याच्या त्यानी ठरवायचा आहे. हिन्दी भारताची राष्ट्रभाषा आहे, याबद्‌दल माझ्या मनात किंचितही संशय नाही. केन्द्र सरकारच्या अधिकृत निर्वाळ्याने हे प्रश्न सुटण्यासारखे असते तर भारत ‘निधर्मी राज्य’ आहे हा कांगावा घटनेनुसार सहज़ सिद्‌ध झाला असता, आणि तसा तो सिद्‌ध करायचे प्रकार सततच होत असतात. तेव्हा या बाबतीत माझ्या लेखी केन्द्र सरकारच्या निर्वाळ्याची किंमत शून्य आहे.

    – धनंजय नानिवडेकर

    • प्रिय श्री० धनंजय नानिवडेकर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या पत्राबद्दल आभारी आहोत.

      {हिन्दी ही ‘घटनेनुसार राष्ट्रभाषा’ आहे की नाही, याबाबतच केन्द्र सरकार बोलू शकते.}
      }} खरे आहे. तसेच ते बोलले आहेत.

      {हिन्दी भारताची राष्ट्रभाषा आहे, याबद्‌दल माझ्या मनात किंचितही संशय नाही…… तेव्हा या बाबतीत माझ्या लेखी केन्द्र सरकारच्या निर्वाळ्याची किंमत शून्य आहे.}
      }} अवश्य. आपण काय मानावे आणि काय मानू नये याचा आपल्याला व्यक्तिगत अधिकार आहेच. कोणीही काहीही मानावे, अगदी ते कायद्याला धरून नसले, तरीही. जोपर्यंत ती व्यक्ति आपले हे मत दुसर्‍यावर जबरदस्तीने लादत नाहीत तो पर्यंत कोणीही त्यास हरकत घेणार नाहीत.

      राजकारण्यांनी हिंदी राष्ट्रभाषा नसूनही ती तशी आहे असा कांगावा करून केवळ महाराष्ट्रातच (इतर अहिंदी, स्वाभिमानी राज्यांत त्यांचे पानिपत होईल) ती जनतेवर लादून बेकायदेशीरपणे मराठीला हुसकून, त्रिभाषा-सूत्र माळ्यावर टांगून मराठीची उपेक्षा व हेटाळणी करण्याचे उद्योग केले म्हणून हा सर्व प्रपंच करावा लागला. त्यांनी केवळ मनातल्या-मनात हिंदी राष्ट्रभाषा मानली असती आणि तिचा आदर केला असता तर काहीच हरकत नव्हती.

      पंडित नेहरू आणि शास्त्रीजींनी अनुसूची-८ मधील सर्वच भाषा राष्ट्रभाषा आहेत असे अधिकृतपणे लोकसभेत म्हटले (पण घटना तसे मानत नाही). तशी आम्हीदेखिल मनातल्या मनात मराठी हीच राष्ट्रभाषा मानतो (पंडित नेहरूंनी सुचवल्याप्रमाणे).

      तसं म्हटलं तर काहींच्या मते भारत हे हिंदूंचे धर्मराष्ट्र आहे, काहींना हिंदीपेक्षा इंग्रजी ही केंद्र सरकारची अधिकृत भाषा होण्यास अधिक योग्य आहे (तशी ती केंद्र सरकारची हिंदीसह अधिकृत – कार्यालयीन भाषा आहेच, आणि दुर्दैवाने तीच हिंदीपेक्षा अधिक वापरली जाते हेसुद्धा वास्तव आहे) असे वाटते, काही काश्मिरी लोक काश्मीर हा पाकिस्तानचा भाग मानतात, तर काही भारतीयांच्या मते लडाख हा भारताचा भाग आहे. असे मनातल्या मनात मानणे चालतेच. पण जर ते वास्तवात आणायचे असेल तर मात्र अधिक काही करावे लागते. जसा भारत देश स्वतंत्र केला, संयुक्त महाराष्ट्र (पण बेळगाव, कारवार, निपाणीशिवाय) मिळवला इत्यादी.

      हिंदी राष्ट्रभाषा होण्याच्या बाबतीत जर संसदेतील दोन-तृतीयांशाहून अधिक खासदारांनी ठरवले तर ते राज्यघटना बदलून हिंदी हीच राष्ट्रभाषा आहे अशी तरतूद करू शकतील.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

      • प्रिय श्री० धनंजय नानिवडेकर यांसी,
        तशी आम्हीदेखिल मनातल्या मनात मराठी हीच राष्ट्रभाषा मानतो (पंडित नेहरूंनी सुचवल्याप्रमाणे).
        —–

        म्हणजे एकीकडे तुम्ही देशाच्या एकमेव राज्यात (अधिक गोवा, हवं असल्यास धरू) बोलली ज़ाणारी मराठी ही राष्ट्रभाषा मानता (ज्याबद्‌दल माझा आक्षेप नाही, कारण मी सगळ्याच भारतीय भाषांना राष्ट्रभाषा मानण्याच्या विरुद्‌ध नाही), आणि ‘हिन्दी (मात्र) राष्ट्रभाषा नाही’ असा प्रचार करता. हे तर हास्यास्पद आहे.

        हिन्दीविरुद्‌ध, किंबहुना कशाहीविरुद्‌ध, भावना भडकावणं सोपं आहे. उदाहरणार्थ, विदर्भात पश्चिम महाराष्ट्राविरुद्‌ध भावना भडकवणारे नेते आहेत. मी विदर्भाचा आहे, पण मला कधीही पुण्यात परकं वाटलेलं नाही. मराठीचा आग्रह धरताना आपल्या देशाचे पन्तप्रधान ज्या भाषेतून १५ ऑगस्टला भाषण करतात त्या हिन्दी भाषेविरुद्‌ध वातावरण तापवण्याचा प्रकार तर निन्दनीय आहे. (‘आर्य’ यांनी मला विचारलेले शिवराळ भाषेतले मूर्खप्रश्न तुम्ही तसेच राहू दिल्यास ते मला आवडेल. पण तो निर्णय माझ्या हातात नाही.)

        इतर प्रान्तांच्या तथाकथित स्वाभिमानाबद्दल आपण आता थोडक्यात पाहू. १) पंजाबी लोक कट्टर असतात. कॉंग्रेस सरकारनी त्या राज्यातल्या सुवर्णमन्दिरासारख्या पवित्र स्थानावर १९८४ साली हल्ला केला. त्यानन्तर ५-६ वर्षांत त्या राज्यात कॉंग्रेस सरकार सत्तेवर आलं. मग तो स्वाभिमान कुठे गेला? २) उच्चशिक्षित तमिळ लोक हे उच्चशिक्षित मराठी लोकांपेक्षाही अशुद्‌ध मातृभाषा बोलतात, हा माझा अनुभव आहे. ३) तमिळनाडूतल्या लोकांच्या भाषिक भावना भडकावणारी नेत्यांची भाषा देशद्रोहासारखी वाटावी इतकी तीव्र झाल्यावर केन्द्राला १९६५ सुमारास कायदा करून द्रविड चळवळीला त्यांच्या काही मागण्या रद्‌द करायला भाग पाडावं लागलं. असला अभिमान नकोच. कारण तो दुरभिमान आहे. ४) हिन्दीत कमी पडल्यामुळे दक्षिणेतले नेते अखिल भारतीय पातळीवर पुढे येत नाहीत. उलट हिन्दी नीट शिकून मराठी लोक १०-१५ वर्षांचा अपवाद वगळता रा स्व संघासारख्या भारतीय पातळीवरच्या संघटनेचं नेतृत्व करताहेत. याविरुद्‌ध हिन्दी भाषिकांनी बंड केलेलं नाही. उत्तरेकडेही असं नेतृत्व करणारे नरसिंह राव, कुप्पहळ्ळी सुदर्शन, आणि संघाचेच हो वे शेषाद्री हे दक्षिण भारतातले नेते त्यांची मातृभाषा अनुक्रमे तेलुगु, कन्नड आणि तमिळ असूनही अस्खलित हिन्दी बोलत, हा योगायोग नाही. उलट हिन्दी न येणार्‍या देवे गौडांची प्रतिमा (आणि वर्तनही) विदूषकासारखी होती. ५) चीनसारख्या अमित्र राष्ट्राकडून आदेश घेणारे कम्युनिस्ट नेते बंगाली लोकांना राज्यकर्ते म्हणून चालतात. हे त्यांच्या स्वाभिमानाचं लक्षण खचित नाही. नुसता ज़ाळपोळ करायला तयार असलेला भाषाभिमान काय कामाचा? ६) मुम्बईत इतके परभाषीय असूनही महापालिकेत सत्ता शिवसेनेची आहे. निवडणुकांत राज्यभर ठाकरे मंडळीला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. हे स्वाभिमानशून्यतेचं लक्षण नाही.

        मराठीसाठी भांडावं लागतच राहणार आहे. पण बंगाल, कर्नाटक या इतरांवर स्वाभिमानाचा गुण अवास्तव स्तरावर लादून तुमचा अनावश्यक न्यूनगण्ड तो काय मला दिसतो. दुरुन डोंगर साज़रे. इतर राज्यांतही इंग्रजीच्या आक्रमणाचा प्रश्न आहे. त्या राज्यांतही हे आक्रमण मुकाटपणे सहन करून स्थानिक भाषा न येणार्‍यांना छळू पाहतात, आणि महाराष्ट्रातही शिवसेना तेच करते. आणि हिन्दीविरुद्‌ध भावना भडकावून तर आपल्याच राष्ट्रभाषेचा अपमान काय तो होतो.

        – डी एन

        • प्रिय श्री० धनंजय नानिवडेकर यांसी,

          सप्रेम नमस्कार.

          आपल्या पत्राबद्दल आभार. पत्रातील मुद्द्यांना प्रत्युत्तर देत नाही कारण त्याने वाद वाढण्याव्यतिरिक्त काही निष्पन्न होईल असे वाटत नाही.

          श्री० कुळकर्णींच्या ह्या लेखात मराठीचा अभिमान नसून हिंदी भाषेविरुद्ध भावना भडकवण्याचा प्रयत्न आहे असे आपल्याला कुठल्याही वाक्यांवरून वाटले असेल तर आपला हा गैरसमज दुर्दैवी आहे एवढेच आम्ही म्हणू. त्यापेक्षा अधिक खोलात शिरू इच्छित नाही.

          तसं म्हटलं तर प्रत्येक मराठी वाचकाने त्या लेखातील मते मान्य केलीच पाहिजेत असे आम्ही कोणीही कसे म्हणू शकू? याआधीच्या पत्रात म्हटल्याप्रमाणे आपल्याला आपली मते बाळगण्याचा नक्कीच अधिकार आहे. आपण हिंदीला राष्ट्रभाषा अवश्य मानावी, तशी कायदेशीर वस्तुस्थिती नसली तरीही. आपल्या भावना आपण इतरांवर कायद्शीरपणे लादू शकणार नाही एवढीच काय ती अडचण.

          अर्थात राष्ट्रभाषेची नक्की व्याख्या काय? तिचे विशेषाधिकार कोणते? ती इतर भाषांहून कुठल्या बाबतीत उच्च व श्रेष्ठ मानावी? तिचे सर्वोच्च स्थान इतर भाषांवर (त्यातील काही हिंदीपेक्षाही प्रचीन व संपन्न आहेत) कसे लादणार? असे अनेक प्रश्न इतर भाषकांनी उपस्थित केल्यामुळेच हिंदीचे राष्ट्रभाषीकरण ढेपाळले. अशा अनेक प्रश्नांना उत्तरे शोधून जर दोन-तृतियांश बहुमताने घटनेत सुधारणा केली गेली तर मग मात्र आम्हा सर्वांनाही आपल्याप्रमाणे हिंदी ही राष्ट्रभाषा मानावीच लागेल, केवळ मनातल्या मनात नव्हे, तर उघडपणे, अधिकृतपणे. आणि त्याविरुद्ध वागणार्‍याला शासनही होऊ शकेल. अर्थात आत्याबाईला अशा मिशा फुटेपर्यंत तरी आम्ही तिला काका न म्हणता थोडी वाट पाहू इच्छितो.

          क०लो०अ०

          – अमृतयात्री गट

      • प्रिय श्री० आर्य यांसी,

        सप्रेम नमस्कार.

        नानिवडेकरांनाही तुमच्या-आमच्या एवढाच मराठीचा अभिमान असेल. पण लहानसहान बारकाव्यांच्या बाबतीत मतभिन्नता असू शकते, नाही का? स्वातंत्र्यकाळाच्या आधीचे दिवस पाहिलेल्या बर्‍याच जणांना “हिंदी ही राष्ट्रभाषा नाही” हे विधान “भारत स्वतंत्र झालेलाच नाही” असे म्हणण्याइतके अशक्यप्राय वाटते असे जे “हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा !!” या लेखात लिहिले आहे ते आपण वाचले असेलच. हिंदीखेरीज दुसर्‍या भाषेत देशप्रेम व्यक्तच होऊ शकत नाही असेही काहींना वाटत असते. त्याबद्दलही उल्लेख “एकच अमोघ उपाय – मराठी एकजूट !!” या लेखात आला आहे.

        दोन्ही लेख प्रत्यक्ष वाचून पहावेत.

        अमृतमंथन ह्या अनुदिनीवर इतर अनौपचारिक गप्पांच्या संकेतस्थळांप्रमाणे भावनातिरेकाची भाषा वापरणे टाळूया. आपल्या दुसर्‍या पत्रात आपण उत्तम भाषा वापरली आहे, तीच ’आर्य संस्कृती’ आपण पाळूया.

        आभारी आहोत.

        प्रत्येक मराठीप्रेमीने मराठी+एकजुटीवर नाव नोंदवावे.

        क०लो०अ०

        – अमृतयात्री गट

    • Prati Shri Salil Kulkarni Yansi,

      Saprem Namaskar Aani Shatashaha Dhanyawad,
      Tumchya Ya Karya Baddal Agadi Manapasun Aabhar, ani Anek Shubhechchha.
      Mazya Sarkhya Anekanna Lahanpani GNYANESHWARI che Balkadu Pajale Gele. “Marathi” Aamuchi Aai Aahe. Aani Aai Peksha Shreshtha Jagat Kaahi Naahi.

      Pratikriya Lihitana Marathi Akshare Waparta Aali Nahit Tyabaddal Dilgir Aahe.

      Aapla Namra,

      Susheel

      • प्रिय श्री० सुशील पाटलेकर यांसी,

        सप्रेम नमस्कार.

        आपल्या प्रतिमताबद्दल (feedback) श्री० सलील कुळकर्णींच्या वतीने आपले आभार मानतो.

        आपल्या मातेबद्दल आत्यंतिक प्रेम व अभिमान असणे हे जसे साहजिकच आहे त्याचप्रमाणे आपल्या मातॄभाषेबद्दलही त्याच भावना असणे नैसर्गिकच आहे. आणि त्यात पुन्हा भारताची घटना, विविध तज्ज्ञांचे अहवाल, जगभरच्या भाषा शास्त्रज्ञांची मते ही मातृभाषेच्या महत्तेला पुष्टीच देतात. त्यात पुन्हा कायद्याने देखिल आपली मातृभाषा ही इतर कुठल्याही भाषेच्या मानाने दुय्यम नाही ही कल्पना, जी आपल्यापैकी बर्‍याच जाणांनी स्वप्नातदेखिल मनात आणलेली नव्हती, ती सत्यच आहे आणि हे सत्य स्वप्नापेक्षादेखिल सुंदर आहे ही भावनाच फार सुखावह ठरते.

        क०लो०अ०

        – अमृतयात्री गट

    • ” आणि ‘हिन्दी (मात्र) राष्ट्रभाषा नाही’ असा प्रचार करता. हे तर हास्यास्पद आहे.”
      ‘हिन्दी (एकमात्र) राष्ट्रभाषा नाही’असे सुचवायचे आहे स.श्री.कुळकर्णी यांना या चळवळीच्या माध्यमातून.निष्कारण विपर्यास करू नका.

      “हिन्दीविरुद्‌ध, किंबहुना कशाहीविरुद्‌ध, भावना भडकावणं सोपं आहे.”…भावना आधीच भडकलेल्या असतात. राजकारणी लोक फक्त त्या भावनांना व्यासपीठ मिळवून देतात(व आपलाही फायदा साधतात.) तुम्हाला जनता म्हणजे अगदीच ××× वाटते काय?
      ” १५ ऑगस्टला भाषण करतात त्या हिन्दी भाषेविरुद्‌ध वातावरण तापवण्याचा प्रकार तर निन्दनीय आहे.”
      अहो तेच तर त्यांना सांगायचय की ही उत्तर भारतीय नेते मंडळी(आजवरच्या आपल्या पंतप्रधानांपैकी एखाददुसरा अपवाद सोडला तर सारे उत्तर भारतीयच होते) घटनेतील कुठल्याही आधाराशिवाय हिंदीला इतर भारतीय भाषांपेक्षा वरचे स्थान देत आली आहेत.

      ” (‘आर्य’ यांनी मला विचारलेले शिवराळ भाषेतले…”
      मी तर काहीच शिवराळ भाषा वापरली नाही. मराठी एकजूटीमधे निष्कारण खो घालणारी माणसं हा तर मराठी राज्याला इतिहास काळापासून लागलेला शाप आहे. पण त्यामुळे मराठी एकजूटीत काही बाधा येणार नाही.

      मराठी लोकांना हिंदी बद्दल आकर्षण वाटत आले आहे ते शाळेतून सक्तीने शिकलेल्या हिंदी विषयामुळे नव्हे; हिंदी ही राष्ट्रभाषा आहे अशा चालवलेल्या खोट्या प्रचारांनीही मराठी माणूस हिंदीच्या इतक्या आहारी जायचेही तितके कारण नाही. मराठी माणूस हिंदीकडे आकर्षीत झाला तो हिंदी सिनेमा व त्यातील चटकदार झगमगाटामुळे.पण आता मराठी सिनेमाने हिंदी सिनेमाला परत मागे टाकले आहे.

      “इतर प्रान्तांच्या तथाकथित स्वाभिमानाबद्दल आपण आता थोडक्यात पाहू. १) पंजाबी लोक कट्टर असतात. कॉंग्रेस सरकारनी त्या राज्यातल्या सुवर्णमन्दिरासारख्या पवित्र स्थानावर १९८४ साली हल्ला केला. त्यानन्तर ५-६ वर्षांत त्या राज्यात कॉंग्रेस सरकार सत्तेवर आलं. मग तो स्वाभिमान कुठे गेला?”…
      आपल्या देशातील राजकीय निवडणूका खर्या अर्थाने कधीच जनतेचा कौल प्रतिबिंबीत करू शकल्या नाहीत. मुळात मतदानही फारसे उत्साहात होत नाही
      “२) उच्चशिक्षित तमिळ लोक हे उच्चशिक्षित मराठी लोकांपेक्षाही अशुद्‌ध मातृभाषा बोलतात”….
      हा अनुभव फक्त मुंबईसारख्या शहरातलाच असेल. तामिळनाडूत तामिळ भाषेलाच प्राधान्य आहे.(आपण जशी काही तामिळ जाणताच)

      ” ४) हिन्दीत कमी पडल्यामुळे दक्षिणेतले नेते अखिल भारतीय पातळीवर पुढे येत नाहीत.”
      हा हा हा, हे विधान कितपत शहाणपणाचे आहे ते स्वत:लाच विचारून पहावे. एकेकाळी पहिल्या क्रमांकावर असणारा महाराष्ट्र आज पाचव्या क्रमांकावर आहे. औद्योगिक दृष्टया आता कर्नाटक, आंध्र महाराष्टरापेक्षा जास्त महत्वाचे होत आहेत. देवेगौडा, करूणानिधी, के.नारायणन, शशी थरूर, अँटनी, इ. मंडळी काय हिंदी चांगलं येत होतं म्हणून पुढे आली? मराठी नेत्यांनी आजवर हिंदीची हुजरेगिरी केली;काय मिळवले?? दक्षिणेतल्या नेत्यांसारखे केंद्रसरकारला वेठीस धरण्याचे सामर्थ्य आहे काय?

      ” उलट हिन्दी नीट शिकून मराठी लोक १०-१५ वर्षांचा अपवाद वगळता रा स्व संघासारख्या भारतीय पातळीवरच्या संघटनेचं नेतृत्व करताहेत”
      रा.स्व.संघाचं नेतृत्व मिळालं म्हणून महाराष्ट्राचं काय भलं होणार कप्पाळ?
      ” ५) चीनसारख्या अमित्र राष्ट्राकडून आदेश घेणारे कम्युनिस्ट नेते..” तुम्हाला भारतातील कम्युनिस्ट चळवळीविषयी माहिती आहे काय? एकतर चिनशी मौत्री करायचा प्रयत्न सरकारते आहे.
      ” ६) मुम्बईत इतके परभाषीय असूनही महापालिकेत सत्ता शिवसेनेची आहे. ”
      खरेतर महाराष्ट्रावर मराठी हितवादी सरकार असायला हवे पण बेगडी पुरोगामित्वाने मराठी एकजूटीत अडथळा आणू पहात आहेत.

      • प्रिय श्री० आर्य यांसी,

        सप्रेम नमस्कार.

        या आधी नानिवडेकरांची पत्रे प्रसिद्ध झाली आहेत. आता आपलेही पत्र प्रसिद्ध होते आहे. पण आता आपणा दोघांचा हा सवाल-जबाबाचा जंगी सामना स्थगित करूया व यापुढे नवीन विषयांवर विचारमंथन करूया. कारण आता आपल्याला असे दिसून येते की याबाबतीत मतपरिवर्तन होण्यापेक्षाही मराठी+एकजुटीचे नुकसान होण्याचीच शक्यता अधिक असू शकेल.

        खरं म्हणजे ’हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा’ आणि ’एकच अमोघ उपाय – मराठी एकजूट’ या दोन लेखांमध्ये श्री० नानिवडेकरांच्या मूळच्या सर्व शंकांना समर्पक उत्तरे सापडतात असे आम्हाला तरी वाटते. शिवाय या दोन्ही लेखातील एकही विधान वास्तवाला, कायद्याला किंवा नीतिमत्तेला सोडून आहे व हिंदीच्या विरुद्ध द्वेष निर्माण करण्याच्या हेतुने लिहिले आहे असे आम्हाला वाटत नाही. लोकसत्तेतील प्रसिद्धीनंतर त्या लेखांबद्दल लेखकाला स्वतःला शेकडो विरोप (ई-मेल्स) आले. पण इतर कोणी तसा आरोप केलेला नाही. परंतु श्री० नानिवडेकरांना तसे वाटले ही खरोखरच दुर्दैवाची बाब वाटते. अर्थात आधी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाने लेखातील मतांशी सहमत व्हायलाच पाहिजे अशी आपण कशी अपेक्षा करू शकतो?

        असो. आता यापुढे या विषयावर आपण पडदा पाडूया. मात्र आपण दोघांनीही अमृतमंथनाचे वाचन व त्यावर्रील मतप्रदर्शन चालू ठेवावे. न जाणो पुढे एखाद्या लेखाच्या बाबतीत आपल्या दोघांची घट्ट सहमतीही होऊ शकेल.

        आभारी आहोत.

        क०लो०अ०

        – अमृतयात्री गट

  2. भारत सरकारच्या ह्या उत्तराची एकेक प्रत कृपया श्री. शरद पवार व श्री. देशमुख ह्या केंद्रीय मंत्र्यांस रजिस्टर पत्राने पाठवून त्यांस त्यांच्या विधानांबद्दल मराठी जनतेची जाहीर माफी मागण्याची विनंती करावी.

    • प्रिय श्री० मोरेश्वर संत यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहोत.

      तसे केले असते. पण राजकारण्यांवर त्याचा काही परिणाम होईल का? गेल्या निवडणुकीत घोषणापत्रात शेतकर्‍याला वीज मोफत देऊ असे म्हणून राज्य स्थापन केल्यावर “तो घोषणापत्रातील मुद्रण-दोष (printing mistake) होता” असे म्हणणारे, ३०-४० वर्षे राजकारणात राहून मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री अशी पदे भूषविलेले हे राजकारणी, “ते आमचे व्यक्तिगत मत होते, घटनात्मक परिस्थिती नाही” असे म्हणून मोकळे होतील.

      प्रत्येक मराठीप्रेमीने मराठी+एकजुटीवर नाव नोंदवावे.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  3. अभिनंदन, खूप महत्त्वाची व यशस्वी पायरी होती ही. केंद्र सरकारच्या ह्या निर्वाळ्याची एक एक प्रत शरदपवार व विलासरावांसारख्या धादांत खोटे बोलणा-या नेत्यांच्या पत्त्यावर पाठवावी.

    • प्रिय श्री० अभिजित नीलेगावकर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      पत्राबद्दल आभार. आत्ताच श्री० मोरेश्वर संतसाहेबांना दिलेले उत्तर पहावे. दुर्दैवाने भारतातील राजकारणी स्वतःला उत्तरदायी समजतच नाहीत.

      प्रत्येक मराठीप्रेमीने मराठी+एकजुटीवर नाव नोंदवावे.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० ??? यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहोत. (नाव आणि ई-मेलचे तपशील लिहायचे राहून गेलेली दिसतात. पुढे कृपया थोडी काळजी घ्यावी.)

      हा लेख अधिकाधिक मराठी-अमराठी लोकांना अग्रेषित करावा. लेखात लिहिल्याप्रमाणे मराठी माणसांनी लेखाच्या मुद्रित प्रती नेहमी जवळ बाळगाव्या व मुक्तहस्ताने त्यांचा उपयोग करावा.

      प्रत्येक मराठीप्रेमीने मराठी+एकजुटीवर नाव नोंदवावे.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  4. खुपच कौतुकास्पद काम केल आहे तुम्ही आणी हि माहिती इथे शेअर केल्याबददल धन्यवाद…जास्तित जास्त लोकांनी हे वाचल पाहिजे अस मला वाटते.

    • प्रिय श्री० देवेंद्र चुरी यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या अभिप्रायाबद्दल आभारी आहोत. हे सर्व आपले सर्वांचे घरचेच काम आहे.

      हा लेख अधिकाधिक मराठी-अमराठी लोकांना अग्रेषित करावा. लेखात लिहिल्याप्रमाणे मराठी माणसांनी त्याच्या मुद्रित प्रती नेहमी जवळ बाळगाव्या व मुक्तहस्ताने त्यांचा उपयोग करावा.

      प्रत्येक मराठीप्रेमीने मराठी+एकजुटीवर नाव नोंदवावे.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० श्रीकांत बर्वे यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      श्री० देवेंद्र चुरी यांना दिलेलेच उत्तर आपणाला देऊ इच्छितो.

      प्रत्येक मराठीप्रेमीने मराठी+एकजुटीवर नाव नोंदवावे.

      आभारी आहोत.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  5. सर्व प्रथम अभिनन्दन… मी आपल्या लेखाच्या लिंक्स माझ्या मराठी मित्राना आवर्जुन पाठवत असतो..आपले कार्य कौतुकास्पद आहे…एक सांगू इच्छितो,आपण ह्या तथाकथित मराठी नेत्याना (जसे शरद पवार , विलासराव देशमुख इ.) त्यांच्या बेजबाबदार विधानान्बद्दल जाब विचारायला हवा.. त्यांचे वाचन नसेल तर त्यांनी असे विधान लोकांसमोर करू नए … कीव येते त्यांच्या बुद्धीची .

    • प्रिय श्री० अतुल देशमुख यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      पत्राबद्दल आभार. आम्ही आपल्या भावना नक्कीच समजू शकतो.

      राजकारणी स्वतःला कधीच उत्तरदायी समजत नाहीत. श्री० मोरेश्वर संत यांच्या पत्राचे उत्तर पहावे.

      प्रत्येक मराठीप्रेमीने मराठी+एकजुटीवर नाव नोंदवावे.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० श्रीनिवास गर्गे यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आभार. आभार. आभार. शेवटी हे सर्व आपले मराठीपरिवाराचेच काम आहे.

      हा लेख अधिकाधिक मराठी-अमराठी लोकांना अग्रेषित करावा. लेखात लिहिल्याप्रमाणे मराठी माणसांनी त्याच्या मुद्रित प्रती नेहमी जवळ बाळगाव्या व मुक्तहस्ताने त्यांचा उपयोग करावा.

      प्रत्येक मराठीप्रेमीने मराठी+एकजुटीवर नाव नोंदवावे.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय रुता यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आभारी आहोत. राजकारण्यांच्या एका षड्‌यंत्रातून तरी सुटका झाल्याबद्दल आपण सर्वांनीच एकमेकांचे अभिनंदन करूया.

      हा लेख अधिकाधिक मराठी-अमराठी लोकांना अग्रेषित करावा. लेखात लिहिल्याप्रमाणे मराठी माणसांनी त्याच्या मुद्रित प्रती नेहमी जवळ बाळगाव्या व मुक्तहस्ताने त्यांचा उपयोग करावा.

      प्रत्येक मराठीप्रेमीने मराठी+एकजुटीवर नाव नोंदवावे.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० आनंद काळे यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आभारी आहोत. शेवटी हे सर्व आपले मराठीपरिवाराचेच काम आहे.

      हा लेख अधिकाधिक मराठी/अमराठी लोकांना अग्रेषित करावा. लेखात लिहिल्याप्रमाणे मराठी माणसांनी त्याच्या मुद्रित प्रती नेहमी जवळ बाळगाव्या व मुक्तहस्ताने त्यांचा उपयोग करावा.

      प्रत्येक मराठीप्रेमीने मराठी+एकजुटीवर नाव नोंदवावे.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  6. Dear Salil,
    First of all please accept my sincere thanks. You have done a great job, indeed this is the most valuable NEW YEAR GIFT offered by you to all Marathi Bandhav. In fact this is a gift to all non Hindi States.
    I have already expressed my keenness in becoming an active member.
    I hope you have received my earlier correspondence with President of India, PM office and other press offices.
    Once again thanks for what ever you are doing for our mother tongue and the Marathi culture.
    Please go through an article in Mid Day ( 3/01/2010, Sunday) which has appeared as FOURTH IDIOT, which reflects the importance of Mother Tongue in education. I once again request you to go through the article, it may be useful as a reference for any of your further articles.
    Please think if we can lodge cases in the court of law for the discriminating treatment given to Marathi. Can we sue Ministers and government officials for violating the trilingual basis as decided by the government?
    Regards,
    Uday.
    PS I shall learn Marathi typing on priority basis.

    • प्रिय श्री० उदय वैद्य यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या प्रतिमताबद्दल (feedback) आभार.

      मिड-डे मधील त्या लेखाचा दुवा पाठवू शकाल काय?
      आपण अमृतमंथनावरील “हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा !!” हा लेख वाचलात का? ह्या मुद्द्यामागची संपूर्ण पार्श्वभूमी तिथे स्पष्ट केलेली आहे. नक्की वाचा.

      अमृतयात्री गटाची अमृतमंथन अनुदिनी आणि श्री० सलील कुळकर्णी व इतर काहींनी पुढाकार घेऊन सुरू केलेली मराठी+एकजूट या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत हे आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो.

      न्यायालयात प्रकरण दाखल करण्याबाबत :: दुर्दैवाने भारतातील राजकारणी स्वतःला लोकांप्रती उत्तरदायी समजतच नाहीत. त्यामुळे राजकारण्यांवर त्याचा काही परिणाम होईल का? गेल्या निवडणुकीत घोषणापत्रात शेतकर्‍याला वीज मोफत देऊ असे म्हणून राज्य स्थापन केल्यावर “तो घोषणापत्रातील मुद्रण-दोष (printing mistake) होता” असे म्हणणारे, ३०-४० वर्षे राजकारणात राहून मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री अशी पदे भूषविलेले हे राजकारणी, “ते आमचे व्यक्तिगत मत होते, घटनात्मक परिस्थिती नाही” असे न्यायालयात म्हणून मोकळे होतील. आणि काहीही असले तरी पैसा, वेळ, सत्ता, दडपशाही या सर्वच दृष्टीने सामान्य माणूस दुर्बळ ठरतो. म्हणून शेवटी एकजुटीने त्यांच्यावर दबाव आणू शकलो (इतर राज्यांप्रमाणे) तरच तेवढा पर्याय करून पाहू.

      प्रत्येक मराठीप्रेमीने मराठी+एकजुटीवर नाव नोंदवावे.

      आभारी आहोत.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  7. namskar ani hardik shubheccha………..shalet astana pasun hech amchy pathypustkat dusrya panavar hindi pattigya rashtry matrubhasha as lihun bimbavl gel agdi tewa pasun te rajsaheb thakre yani jo paryant ha mahtvacha aaplya maharashtracha asmitecha abhimanacha vishay airnivar aanla navta tewaparyant hech vachun man thamb zal hot ki he mhanje hindi matrubhasha aahe ….tumchya ye lekhamule nyanat khup mothi bhar zali …

    pathyapustak kiti seriously ghyachi ha vishay ghahan hoil aata??

    • प्रिय श्री० हरिहर मयेकर यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या प्रतिमताबद्दल (feedback) आभार.
      पाठ्यपुस्तकांबाबत आपली शंका रास्तच आहे. “इतिहास हा जेते लिहितात” असे म्हणतात. त्याप्रमाणे पाठ्यपुस्तके ही राज्यकारभार चालवणारे राजकारणी लिहून घेतात. महाराष्ट्राच्या संपूर्ण इतिहासात महाराष्ट्र राज्याच्या जन्मासाठी घडलेला संयुक्त महाराष्ट्राचा लढा ही अत्यंत महत्त्वाच्या घटने पैकी एक. पण राजकारण्यांनी त्या घटनेचे महत्त्व नेहमीच दडपून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या तरूण पिढीला त्याबद्दल काहीच फारसे ज्ञान नसते. सर्वच पक्षांच्या राजकारण्यांना अधिक उत्तरदायी बनवले पाहिजे.

      प्रत्येक मराठीप्रेमीने मराठी+एकजुटीवर नाव नोंदवावे.

      आभारी आहोत.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  8. श्री. सलिल कुळकर्णी यांचे मन:पूर्वक अभिनंदन!!! या संबंधी काही प्रश्न विचारावेसे वाटतात.
    या सरकारी पत्रावर जावक क्रमांक आहे . पण अधिकार्याच्या सही सोबत शिक्क्याची व्यवस्था नसते का?
    हे पत्र इतके संक्षिप्त आहे की त्याची वादामधे किती गांभिर्याने दखल घेतली जाईल असा प्रश्न पडतो. घटनेत आरक्षणाची मुदत वाढवण्याचा अधिकार सरकारला मिळण्याची तरतूद आहे का?
    घटनेत समान नागरी कायदा लागू करण्याची तरतूद नाही का?
    घटने बदल होऊ शकत नाही का?
    मुंबईत मराठी माणसे बहुसंख्येने नसली तरी इतर कुठल्याही भाषिक गटापेक्षा संख्येने अधिक आहेत. हीच गोष्ट हिंदी भाषिकांच्या बाबतीत संपूर्ण देशाचा विचार केला तर खरी नाही का?

    • प्रिय श्री० आर्य यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या प्रतिमताबद्दल अभार.

      {{या सरकारी पत्रावर जावक क्रमांक आहे . पण अधिकार्याच्या सही सोबत शिक्क्याची व्यवस्था नसते का?}}
      }} आम्हाला सरकारी नियमांची नक्की कल्पना नाही. आणि त्यांनी आपले काम केले नाही म्हणून जर कोणी हे पत्र खोडसाळ आहे असा आरोप केला तर मग पाहू.

      {{हे पत्र इतके संक्षिप्त आहे की त्याची वादामधे किती गांभिर्याने दखल घेतली जाईल असा प्रश्न पडतो.}}
      }} आपल्या या प्रश्नाला आम्ही काय उत्तर देऊ शकतो? जनतेने गांभीर्याने दखल घेतली आहे असे प्रतिसादावरून तरी वाटते. राजकारणी लोक गैरसोयीच्या मुद्द्यांची दखल घेतच नाहीत, ते सत्य असले तरी. कारंण “सत्यमेव जयते” हे सुभाषित फक्त शाळेतील मुलांसाठीच असते असे त्यांचे मत असावे.

      {{घटनेत आरक्षणाची मुदत वाढवण्याचा अधिकार सरकारला मिळण्याची तरतूद आहे का? घटनेत समान नागरी कायदा लागू करण्याची तरतूद नाही का? घटने बदल होऊ शकत नाही का?}}
      }} हे प्रश्न सध्याच्या संदर्भात अप्रस्तुत असल्याने इथे उत्तर देत नाही. पण याची माहिती महाजालावर किंवा इतर जाणकारांकडून सहजच मिळू शकेल.

      {{मुंबईत मराठी माणसे बहुसंख्येने नसली तरी इतर कुठल्याही भाषिक गटापेक्षा संख्येने अधिक आहेत. हीच गोष्ट हिंदी भाषिकांच्या बाबतीत संपूर्ण देशाचा विचार केला तर खरी नाही का?}}
      }} मुंबईची तुलना बेंगळुरूशी करावी. आपण “हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा !!” हा लेख वाचला नसल्यास वाचावा. त्यात बहुधा आपल्या शंकेला उत्तर सापडेल.

      आभारी आहोत.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय श्री० महेश चिंतावार यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या सूचनेबद्दल आभार. आपण तशी मदत केलीत तर उत्तम होईल. ह्या सत्याचा प्रसार व्हायलाच पाहिजे.

      प्रत्येक मराठीप्रेमीने मराठी+एकजुटीमध्ये नाव नोंदवावे.

      आभारी आहोत.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  9. मनापासुन धन्यवाद.आपले लेख मी नेहमीच अनेकांना पाठवत असतो.आता मी आपल्याला आलेल्या पत्राच्या ५० प्रती काढुन वाटनार आहे.कारण मला माझ्या मरठी मित्रांना मरठीचे महत्व पटवने सोपे जाइल.

    • प्रिय श्री० अक्षय यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आभारी आहोत. राजकारण्यांच्या एका षड्‌यंत्रातून तरी सुटका झाल्याबद्दल आपण सर्वांनीच एकमेकांचे अभिनंदन करूया.

      हा लेख अधिकाधिक मराठी-अमराठी लोकांना अग्रेषित करावा. लेखात लिहिल्याप्रमाणे मराठी माणसांनी त्याच्या मुद्रित प्रती नेहमी जवळ बाळगाव्या व मुक्तहस्ताने त्यांचा उपयोग करावा.

      प्रत्येक मराठीप्रेमीने मराठी+एकजुटीवर नाव नोंदवावे.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

    • प्रिय उज्ज्वला पारसनीस यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या अभिप्रायाबद्दल आभार.

      आपण अमृतमंथनावरील “हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा !!” हा लेख वाचलात का? ह्या मुद्द्यामागची संपूर्ण पार्श्वभूमी तिथे स्पष्ट केलेली आहे. नक्की वाचा.

      आभारी आहोत.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  10. 1) The reference to ‘Hindi’ as rashtrabhasha in school textbooks in Maharashtra should be deleted.
    2) Maharashtra Rashtrabhasha Sabha, Pune, and Rashtrabhasha Prachar Samiti, Wardha, have misleading names and they are perpetuating the myth that Hindi is rashtrabhasha. These organisations should change their names to ‘Maharashtra Adhikrut Bhasha Sabha, Pune, and ‘Adhikrut Bhasha Prachar Samiti, Wardha, respectively.

    • प्रिय श्री० एम० जी० देसाई यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपली विधाने योग्यच आहेत. पण तसे त्यांना सांगायला हवे. त्यांना माहिती अधिकाराखाली लिहून जाब विचारणे शक्य आहे.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  11. Those who wish to know how Hindi became India’s official language will do well to read “Between the lines’ by Kuldip Nayar. He has devoted 60 pages to this subject. The committee was equally divided on this issue and Nehru, as Chairman of the committee, gave his casting vote in favour of Hindi. However, Mr. Gobind Ballabh Pant, Home Minister, who was from U.P., voted against Hindi by saying that ‘I place the unity of the country above Hindi’. I think that should be the spirit.

    • प्रिय श्री० एम० जी० देसाई यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या पत्राबद्दल आभार. आपण पुरवलेली माहिती सर्वच वाचकांना सुरस वाटावी.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  12. > अर्थात राष्ट्रभाषेची नक्की व्याख्या काय? तिचे विशेषाधिकार कोणते? ती इतर भाषांहून कुठल्या बाबतीत उच्च व श्रेष्ठ मानावी?
    >—

    माझे काही एक संघविरोधी मित्र (ज़ोगळेकर, पवार अशी त्यांची नावे धरू) मला ‘हिन्दु’ शब्दाची व्याख्या विचारित. ती व्याख्या माहीत नसूनही ते त्यांच्या दहावीच्या परिक्षा-अर्जात, जनगणनेत वगैरे स्वत:चा उल्लेख ‘हिन्दु’ करत. तेव्हा एखाद्‌या (खरे म्हणजे बर्‍याच) गोष्टीची व्याख्या करता येत नसूनही ती स्पष्ट ज़ाणवू शकते. हरियाणा, राजस्थान, गुज़राथ इथल्या स्थानिक भाषा आपल्याला येत नसूनही हिन्दीच्या आधारावर आपण या राज्यांत वावरू शकतो. तेच महाराष्ट्रालाही लागू आहे. माझ्या एका तेलुगु मित्राच्या आईशी मी एक शब्दही बोलू शकत नाही. अशा प्रसंगी निव्वळ आपलेपणाची भावना पुरेशी ठरू शकते. या काकू दोसा चांगला करत असतील, तर मग दुधात छान ग्लुकोज़ पडणार. संघात हा प्रकार हिन्दी न ज़ाणणारे लोक भेटल्यास दिसून येतो. पण राष्ट्रद्रोही आणि संकुचित भाषाभिमानी द्रविड लोकांनी याच्यात सर्वाधिक अडवणूक केली आहे. असा कित्ता गिरवण्यापासून आपण दूर राहिलेले बरे.

    आपण मुंबईबाहेरचे मराठी लोक तिथे आपला डेरा सहज़ हलवू शकतो. पण आपण स्थानिक वातावरणाला वैतागलेले बिहारी असतो, तर आपणही कदाचित महाराष्ट्रात पळून आलो असतो. त्यांच्या गुंडगिरीचं मी समर्थन करत नाही. पण आक्रमकपणा किंवा आक्रस्ताळेपणा हा मनुष्यस्वभाव आहे. बिहारी लोकांत तो जास्त असला तरी या चर्चेत अकारण शिवराळ भाषा वापरणारे तथाकथित सुशिक्षित ‘आर्य’ यांच्यासारखे मराठी लोकही त्याला अपवाद नाहीत.

    मला शिवसेनेचा भाषाभिमान आवडतो. क्वचितप्रसंगी पुढार्‍यांच्या चिथावणीने किंवा त्यांचा सबूरीचा सल्ला धुडकावून झालेला हिंसाचारही मी समज़ू शकतो. कायम मिळमिळीत धोरण ठेवणार्‍या संघाला शिवसेनेचा भडकपणा अनेकदा चांगल्या अर्थानी पूरक ठरतो. पण संपूर्ण राजकारणाची उभारणी द्‌वेषावर नको. आणि ज़े लोक आपलेच आहेत त्यांच्याशी उद्‌भवलेल्या प्रासंगिक अडचणींवरून (महाराष्ट्रात आलेले अमराठी लोकांचे लोंढे) त्यांच्याशी कायम शत्रुत्व पत्करण्याचा शिवसेनी प्रकार तर अजिबात नको.

    – डी एन

    • प्रिय श्री० डी० एन० यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या पत्राबद्दल आभार. आपल्याला बरेच विचार, बरेच मुद्दे मांडायचे आहेत, पण स्थलकालाच्या मर्यादांमुळे ते मर्यादित शब्दांत व्यक्त करणे कठीण होते हे आम्ही समजू शकतो.

      एक मूलभूत बाब लक्षात घ्यावी. प्रस्तुत लेखाचा व याआधीच्या हिंदी-राष्ट्रभाषा-एक-चकवा या लेखाचा उद्देश सत्यस्थिती, घटनात्मक वास्तव लोकांसमोर मांडणे हा आहे, ती स्थिती अयोग्य आहे, बदलायला पाहिजे, व ते कसे साधायचे ह्या पैलूंचा लेखात उहापोह केलेला नाही. त्यामुळे याआधीच सांगितल्याप्रमाणे वादात भर घालून तो वाढवण्याचे आम्ही टाळले. शिवाय प्रत्येक व्यक्तीने आपले प्रत्येक मत समोरील प्रत्येक व्यक्तीला मान्य करायला लावायलाच हवे, यावर आमचा विश्वास नाही. कधीकधी आपल्याला आपल्यातील मतभेदांचे अस्तित्व एकमताने मान्य करावे लागते. (Let us agree to disagree?)

      द्रविड लोक राष्ट्रद्रोही (treasonous) असतील तर त्यांच्याविरुद्ध न्यायालयात जाऊन त्यांना शिक्षा करणे शक्य होईल का? की पुन्हा हा राष्ट्रद्रोह सत्यातील राज्यघटनेविरुद्ध नाही? मग ती राज्यघटना बदलणे एवढाच उपाय आपल्यापुढे राहतो.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  13. I JUST READ THIS NEWS IN TODAY’S TOI. PLS FORWARD THIS INFO. 2 ALL.

    There’s no national language in India: Gujarat High Court

    Saeed Khan, TNN, 25 January 2010, 12:34am IST

    AHMEDABAD: Does India have a national language? No, says the Gujarat High Court. The court also observed that in India, a majority of people have

    accepted Hindi as a national language and many speak Hindi and write in Devanagari script, but it’s not officially the national language.

    With this observation, a bench headed by Chief Justice S J Mukhopadhaya refused to issue directions that packaged commodities must contain details about goods in Hindi.

    Petitioner Suresh Kachhadia had, in 2009, filed a public interest litigation (PIL) in the Gujarat HC seeking mandamus to the Centre as well as the state government to make it mandatory for manufacturers of goods to print in Hindi, all details of goods like price, ingredients and the date of manufacture. His contention was that the consumers are entitled to know what they are consuming.

    It was argued that because Hindi is the national language and is understood by a large number of people in the country, directions should be given to publish all such details in Hindi. His counsel placed reliance on the deliberations in the Constituent Assembly in his arguments. Even the Centre’s counsel referred to the Standard of Weights and Measures (Packaged Commodities) Rules and told the court that such declaration on packets should be either in English or in Hindi in Devanagari script.

    But the court asked whether there was any notification saying Hindi is India’s national language, for it’s an “official language” of this country. No notification ever issued by the government could be produced before the court in this regard. This is because the Constitution has given Hindi the status of the official language and not the national language.

    The court concluded that the rules have specific provisions for manufacturers that particulars of declaration should be in Hindi in Devanagari script or in English, and it’s their prerogative to use English. Therefore, no mandamus can be issued on manufacturers or governments for giving details or particulars of package in Hindi.

  14. Right from my childhood and school days I was told that Hindi is National Language. I feel like I got cheated. The people who have Hindi as mother tongue are by and large reluctant to speak, learn and communicate in other language even if they are residing in that non Hindi state for decades.
    They feel speaking other official language is below dignity and just because their mother tongue is Hindi they all are Pandits even if they have not completed primary education. Because if their false superiority complex they never respect local official language, do not respect local culture and never try to be with local society. They relocate to other states for their own survival and the lack of job opportunities in their Hindi speaking states. I have seen many Biharis speaking in Mithila ( another local language ) in other non Hindi states. This is wrong,any body who relocates to any state or country should accept and respect local culture and local language.

    • प्रिय श्री० उदय वैद्य यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपल्या पत्राबद्दल आभारी आहोत. आपल्या भावना आम्हाला १०० टक्के समजतात. पण मुंबई-पुण्यावरून आपण देशातील इतर ठिकाणचा अंदाज बांधला तर तो चुकीचा निघण्याची शक्यता आहे.

      १. The people who have Hindi as mother tongue are by and large reluctant to speak, learn and communicate in other language even if they are residing in that non Hindi state for decades.
      >> हे सर्व मुख्यत्वेकरून महाराष्ट्रासारख्या (म्हणजे कशा?) राज्यातच घडते. बंगालमध्ये शेजारीच असलेल्या बिहारमधून शतकाहून अधिक वर्षे लोक येत असतात. पण तिथे ते समाजात सर्वत्र उघडपणे बंगाली मध्येच बोलतात. इतके की रिक्शा ओढणारा हा बिहारी असण्याची शक्यता अधिक असली तरी तो बिहारीच आहे की बंगाली हे आपल्याला त्याच्या बोलण्यावरून लगेच समजणार नाही. तीच गोष्ट इतर राज्यांमध्ये. अगदी ओरिसा, आसाम अशा गरीब राज्यांतही समाजात मूळ हिंदी भाषक स्थानिक भाषेतच बोलतात. अर्थात अशा बाबतीत महाराष्ट्राचा अपवाद का केला जातो हे आपण प्रत्येकाने इतर कोणाहीपेक्षा स्वतःलाच विचारलेले बरे.

      २. They feel speaking other official language is below dignity… Because if their false superiority complex they never respect local official language, do not respect local culture and never try to be with local society…
      >> आपचे मत वरीलप्रमाणेच. इतर राज्यांत असे घडत नाही. इतर सर्व राज्यांत ते स्थानिक भाषाच बोलतात किंबहुना त्यांना ती बोलावीच लागते. पण महाराष्ट्रात त्याशिवाय चालत असल्यामुळे त्यांनी परभाषेत बोलण्याचाउत्साह का दाखवावा? शेवटी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे स्वतः मराठी माणसाकडे येऊनच थांबते.
      आणि हिंदी भाषकांना कसली आली आहे विशेष पत-प्रतिष्ठा (dignity)? उ०प्र, बिहार ही शिक्षण, उत्पन्न, व इतर सर्व संस्कृती व संपन्नतेच्या निकषांच्या बाबतीत देशातील अत्यंत मागासलेली राज्ये आहेत. त्यांना फार पत-प्रतिष्ठा आहे असे आपणच मानत असलो तर तो आपलाच न्यूनगंड म्हटला पाहिजे.

      ३. I have seen many Biharis speaking in Mithila ( another local language ) in other non Hindi states.
      >> परराज्यात असताना त्यांना स्वतःच्या घरात, नातेवाईकात, स्वभाषक मित्रमंडळीत बोलू दे की मैथिलीमध्ये. पण घराबाहेर समाजात त्यांनी स्थानिक भाषा बोलावी. आणि हे ते महाराष्ट्र वगळता इतर राज्यांत करतातही. परराज्यात किंवा परराष्ट्रातही राहणार्‍या मराठी माणसानेही आपली मातृभाषा स्वतःच्या घरात अवश्य बोलावी. अगदी मालवणी, अहिराणी, वर्‍हाडी, खानदेशी, अशी कुठलीही बोली नक्कीच बोलावी. आपली संस्कृतीही अवश्य जोपासावी. पण बाहेर, समाजात वावरताना तेथील स्थानिक भाषेला महत्त्व दिलेच पाहिजे. बडोदे, इंदूर, ग्वाल्हेर, तंजावर व इतर अशा अनेक ठिकाणी मराठी माणूस बाहेर, समाजात स्थानिक भाषा व संस्कृतीशी एकरूपता स्वीकारतोच, स्वीकारलीच पाहिजे.

      आमच्या मते आपली मतेही फार वेगळी नसावीत. फक्त इतर राज्यांतील परिस्थितीबद्दल आपला अंदाज महाराष्ट्रातील अनुभवावर अवलंबून नसावा एवढीच सूचना.

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  15. aaplya kaDle chaangle vyakhyata kityekda hee goshT saangtaat-‘maastaraannee phaLyavar ek resh kadhun mulaanna vichaarle, hyaala na mitavita lahaan karta yete ka?’ Tyachyach khaalee tyapekshahee moTThee resh banavoon sarvaannaa khush karNaaraa to baalak kuNeehee aso, tyaat kahi dhaDaa naahi ka ghyaayala?
    hindi kaaheehee aso, maraaThee atulya aahe. hindi kadheehi baLzabareene thopavili jaaoo shakat naahee hey chhaatee Thokoon saangitle, tya dravid chaLvaLeechya netyaanna thode se shreya dilele chaalel.
    RajakaaraNaavar Taakoon dile ki sagaLe prashna suTle- ha sushikshit madhyamvargeeyancha moTha gayrsamaz. maraaThee vruttapatrikach sagLe marathi vaachat naaheet. maraaThee kaadambarya paahijet tar kiti laamb jaave laagate- shaharaat ek don ThikaaNeech miLtaat.
    GhaTnenusaar khara kaay te kaLalele nehmeech bare. Dhanyavad.

    • प्रिय श्री० भास्करभट्ट यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपले म्हणणे खरे आहे.

      (उत्तरास विलंब झाल्याबद्दल क्षमस्व.)

      क०लो०अ०

      – अमृतयात्री गट

  16. मी ती जी PDF आहे त्याचा screenshot shot मारून शेरअ केली आहे .फेसबुक व whatsapp वर त्या बद्दल आपला काही आक्षेप तर नाही ना ?

    • प्रिय श्री० प्रथमेश शिवाजी हराळे यांसी,

      सप्रेम नमस्कार.

      आपले पत्र वाचून फार आनंद वाटला. ती पीडीएफ ही सर्वांच्या माहितीसाठीच आहे. त्या माहितीचा जास्तीत जास्त प्रसार व्हायला हवा. त्यासाठी ती पीडीएफ तुम्ही अवश्य वापरू शकता. त्याचा स्क्रीनशॉट घेण्यापेक्षा ती सरळ खाली उतरवून (डाऊनलोड करून) घेणे अधिक सुलभ ठरू शकेल.

      प्रादेशिक भाषांना खाली दाबून हिंदीचे महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार सातत्याने करत आलेले आहे. त्याविरुद्ध आपण जनजागृती करायलाच हवी. त्यासाठी आपण करत असलेल्या प्रयत्नांबद्दल तुमचे अभिनंदन आणि आभार.

      अमृतमंथनावर त्यासंबंधात अनेक लेख आहेत. चाळून पाहा. पसंत पडल्यास पूर्ण वाचा. आवडल्यास मित्रमंडळींना दाखवा.

      खालील लेख आपण वाचले आहेत काय? अवश्य वाचा. इतर लेखही पाहा. आपले मत कळवा.

      इंग्रजी भाषेचा विजय (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता ४ ऑक्टोबर २००९) –} http://wp.me/pzBjo-8x

      हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा! (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, १५ नोव्हें० २००९) –} http://wp.me/pzBjo-9W

      Hindi, the National Language – Misinformation or Disinformation? –}} http://wp.me/pzBjo-fr

      “हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही” – केंद्र सरकारचा अधिकृत निर्वाळा (ले० सलील कुळकर्णी) –}} http://wp.me/pzBjo-e8

      Translation of the original letter obtained under RTI: अमृतमंथन-३_Hindi is not the National Language_Admission by Central Govt_English Translation of the Letter_291209 .

      https://amrutmanthan.wordpress.com/2009/12/21/एकच-अमोघ-उपाय-मराठी-एकजूट/

      एकच अमोघ उपाय – मराठी एकजूट !! (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, २० डिसें० २००९) –} http://wp.me/pzBjo-d8

      ’हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा !!’ वाचकांच्या निवडक प्रतिक्रिया (लोकसत्ता – २९ नोव्हेंबर २००९)

      आपल्या आईचा मान आधी आपणच राखला पाहिजे (‘अंतर्नाद’ दिवाळी अंकातील लेख, ले० सलील कुळकर्णी) — } http://wp.me/pzBjo-Iv

      क०लोअ०

      – अमृतयात्री गट

आपला अभिप्राय इथे नोंदवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s